नाही, मथळा जरा चुकलाच आहे.
एका कवीच्या उपेक्षित जन्मस्थळी साजरा केलेला म. भा. गौ. दि. २०२४ असा पाहिजे तो.
का बरं? कोण हे कवी?
सांगतो.
पण आपण या कथनाचा प्रारंभ सुरवातीपासून करू...
कथा सुरू होते - आजकाल जिथे बऱ्याच कथा सुरू होतात - आणि तिथेच संपतात - तिथे
स्थळ:
तात्विक दृष्ट्या - अखिल विश्व! म्हणजेच व्हाट्सॅपवरील मराठी शाळेत शिकलेल्या पन्नाशीपार मित्रांचा एक समूह
भौगोलिक दृष्ट्या- सकल विश्वाचे केंद्रस्थान(!), सदाशिव पेठ पुणे - ३०!
काळ: म. भा. गौ. दि. २०२४, फेब्रुवारी २७, २०२४
वेळ: सकाळी साडेदहाची
पात्रपरिचय:
जागरूक पुणेरी नागरिक
निरुद्योगी पुणेरी नागरिक
हौशी पुणेरी नागरिक
अष्टपैलू पुणेरी नागरिक
प्रसिद्ध कवी पुणेरी नागरिक
कोटीभास्कर पुणेरी नागरिक
पत्रकार पुणेरी नागरिक
पुणेरी परदेशस्थ नागरिक
अब आगे:
(जापुना):
माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये, खरंतर नऊच्या दरम्यान मराठी भाषा प्रेमी मंडळाचे कार्यकर्ते येतात आणि लहान कार्यक्रम होतो, यावेळी अजून आले नाहीयेत
(निपुना):
येतील, मोठ्ठा समारंभ करतील. आशा सोडू नका.
(जापुना):
विचारायला गेलो होतो,
बहुदा कालच येऊन गेले असे विनोदी उत्तर मिळाले
अहो पाटीला हार घातला नाहीये, काल कसे येतील?
म नसतील आले बा....
(हौपुना):
संध्याकाळपत्तर नाही आले, तर आपण हार घालू! आपले मान्यवर अपुना आणि प्रकपुना यांच्या हस्ते. कशी काय आयड्या???
(निपुना):
झकासच.
(हौपुना):
कार्याध्यक्ष म्हणून जापुना यांची पदसिद्ध नेमणूक आहेच.
कार्यवाह म्हणून कोपुना यांना ठेवू.
पपुना यांना पब्लिसिटीची व्यवस्था देऊ.
आणि वादही झाला पाहिजेच. त्यासाठी कोणाला बरे बोलवायचे?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खानपान व्यवस्था...?
म्हणजे कोणत्याही मराठी कार्यक्रमात या सर्व गोष्टींचा अंतर्भाव हवाच!
(कोपुना):
मी काय म्हणतो, मुद्दामहून वाद घालायला कोणाला बोलवायला कशाला पाहिजे? दोन-चार पुणेकर जमले की वाद होतीलच...
जोरदार हशे आणि टाळ्या
(जापुना):
हार घालायला शिडीवर कोण चढणार? मी मंडळाची शिडी असली तर आणेन.
(कार्याध्यक्षांना काळजी वाटणे साहजिक कारण त्यांच्या घेरापुढे अग्निशमन दलाची शिडीही बापुडवाणी भासली असती)
(हौपुना):
या ग्रुपचे माननीय ॲडमिन या साठी योग्य वाटतात (वजन अंदाजे ४५ किलो)!
जापुना, तू आणि मी शिडीचे पाय पकडून ठेवायला योग्य आहोत (एकूण वजन अंदाजे पाव टन)!
हशे आणि टाळ्या
(हौपुना):
"शिक्षण, शासन आणि उद्योजकता या क्षेत्रांत मराठीचे योगदान काय?" यावर एक परिसंवाद ठेऊ. त्यासाठी शिक्षणमहर्षी समूहसदस्य, राजपत्रित अधिकारी समूहसदस्य, आणि उद्योगरत्न समूहसदस्य अशा तिघांना बोलावू. परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी उच्चपदस्थ समूहसदस्य यांची वर्णी लावू!
पुन्हा हशे आणि टाळ्या
(हौपुना):
पुस्तक छापून मराठी सारस्वताची सेवा केलेलं आणखी कोणी आहे का या समूहात? त्या सगळ्यांना मानाचं आमंत्रण
होय, नाही तर मानापमान प्रयोगानंतर शिमगा व्हायचा!
इथे माफक हशे आणि टाळ्या
वेळ: सुमारे दोन
(हौपुना):
जे येतील त्यांचे बोलाची शाल-श्रीफल देऊन स्वागत करण्यात येईल.
जे येणार नाहीत त्यांना शालजोडीतील देण्यात येतील!
खानपान व्यवस्थेसाठी प्रायोजक न मिळाल्याने येणाऱ्या सर्वांना (मराठी साहित्यिकांना जे मिळतात ते) फाके वा फारतर भेळभत्ता मिळू शकेल!
(निपुना):
कांदा-मिरची?
(जापुना): आपापली...
माफक हशे आणि टाळ्या
कुठल्याही सार्वजनिक मराठी कार्यक्रमाचे रीतसर आमंत्रण आवश्यक असतेच...
(हौपुना):
मराठी भाषेचा गौरव करण्याची संधी!
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म सदाशिव पेठ, लोणीविके दामले आळी या ठिकाणी झाला.
आज अवचित ही संधी चालून आली आहे की इथे असलेल्या कुसुमाग्रजांच्या जन्मस्थळी नीलफलकाला (blue plaque) आपण हार अर्पण करू या!
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण
स्थळ: (जापुना) याच्या घरासमोर ही जागा आहे. म्हणजे निंबाळकर तालमीजवळ.
वि. सू.: लोणीविके दामले आळी म्हणजे (सुजाता) मस्तानीकडून बाजीराव (रस्त्या)कडे जाणारा बोळ!
(पुपना)
आयला, ही धमाल पहायला नाही मिळणार नेमकी! हौपुना, भले शाब्बास !
(हौपुना):
फेसबुक लाईव्ह करायचं का?
(पुपना):
करा प्लिज, फार कशाला - ह्याच ग्रुपचा whatsapp कॉल करा म्हणजे दिसेल जिवन्त प्रक्षेपण आम्हाला. किती वाजता ? भारतीय प्रमाण वेळ ??
(हौपुना):
आता भाप्रवे म्हटलं की झाला का घोटाळा! पाच-सव्वापाच जमवू. थोडं इकडे थोडं तिकडे...
संध्याकाळी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मस्थानी असलेल्या नीलफलकाची थोडी स्वच्छता करून त्याला हार वाहिला.
मराठी भाषागौरव दिनाप्रीत्यर्थ शालेय मित्रांसोबत घडलेली एक छोटी सेवा.
उपस्थिती - सदरहू लेखकधरून सात.
- आजूबाजूचे दुकानदार अमराठी, त्यांच्यालेखी हा वेडाचार
- मतदार जमायची शक्यता शून्य असल्याने राजकीय व्यक्तींची (आनंददायी) अनुपस्थिती
- रहिवासी दिनचर्येत मग्न
- जाणाऱ्या येणाऱ्या एम.पी.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी मराठी हा परीक्षेपुरताच विषय
मथळ्यात कवीला उपेक्षित म्हणण्याची गरज नव्हती. खरं तर भाषाच उपेक्षित आहे. गौरवाच्या केवळ वल्गना?
छान काम केलेत!
छान काम केलेत!
खुसखुशीत
खुसखुशीत
मस्त
मस्त
कुसुमाग्रजांचं जन्मस्थान
कुसुमाग्रजांचं जन्मस्थान पुण्यात आहे हे मला आत्ता समजलं! त्यासाठी धन्यवाद.
नाशिकला कुसुमाग्रजांच्या घरी मी जाऊन आले आहे. (कुसुमाग्रज असताना नाही, आत्ता साताठ वर्षांपूर्वी) त्यांची एक खोली आतल्या वस्तूंसह जतन करून ठेवली आहे आणि उरलेल्या घरात वाचनालय चालवलं जातं. वेगळीकडे कुसुमाग्रज स्मारक आहेच (तेही खूप छान आहे), पण घरही चांगलं नीट सांभाळलेलं आहे. फाटकाबाहेर त्यांच्या 'विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती...' या चार ओळी कोरलेल्या आहेत. घराच्या समोरच्या बाजूला भिंतीवर त्यांचं मोठं चित्र/ फोटो आहे.
मी आणि माझा मुलगा (तो तेव्हा सातआठ वर्षांचा असेल) कुसुमाग्रजांच्या घराच्या अंगणात उभे होतो. (हे आता लिहितानाही छान वाटतंय) त्याला कुसुमाग्रज म्हणजे कोण, हे माहिती नव्हतं तेव्हा. पण त्याला 'वेडात मराठे' हे गाणं माहिती असल्यामुळे मी 'ते गाणं ज्यांनी लिहिलं ते' असं त्याला सांगितलं. मग तो म्हणाला की त्यांची अजून कुठलीतरी कविता सांग. मला 'कोलंबसाचे गर्वगीत' पाठ आहे, ती त्याला म्हणून दाखवली आणि म्हणता म्हणता मला अचानक जाणीव झाली की आपण कुसुमाग्रजांच्या अंगणात उभं राहून त्यांची कविता म्हणतोय या ठिकाणी ते किती तरी वेळा उभे राहिले असतील आणि कदाचित कधीतरी ते मनात स्वतःची हीच कविता गुणगुणले असतील! माझ्या अंगावर सरसरून काटा आला अक्षरशः तेव्हा. तो क्षण मी विसरूच शकणार नाही.
वावे! तुझी पोस्ट वाचताना इथे
वावे! तुझी पोस्ट वाचताना इथे अंगावर काटा आला!
मला पण वाटले त्यांचे
मला पण वाटले त्यांचे जन्मस्थान नाशिकच असेल असे.
वावे, फार मस्त आठवण!
छान काम केलेत! +१
छान काम केलेत! +१
छान काम केलेत! +१
छान काम केलेत! +१
छान काम केलेत! >>> +१
छान काम केलेत! >>> +१
वर्णनही हलकुफुलके आहे पात्रपरिचयाची खरे गरज नव्हती. एक "कवी" सोडले तर बाकी सगळी वर्णने बहुतांश पुणेकरांना एकाच वेळी लागू होतात
बाय द वे हा फोटो या कोनातून काढू द्यायला यातले कोणी पुणेकर तेथेच राहणारे होते, की कोणी त्रयस्थ अस्सल स.पे.पुणेकर तितके उदार झाले?
कुसुमाग्रजांचं जन्मस्थान पुण्यात आहे हे मला आत्ता समजलं! त्यासाठी धन्यवाद. >>> मलाही आत्ताच समजले. मीही नाशिकच समजत होतो.
वावे - तुमची माहिती/अनुभवही भारी!
अबुवा छान काम केलेत! +१
अबुवा छान काम केलेत! +१
वावे. काय अनुभव आहे तुझा!!
कोकणात पण कुसूमाग्रजांचं स्मारक आहे का? बहुतेक पावसच्या आश्रमाच्या जवळपास? मी गेले आहे कारण.
कोकणात पण कुसूमाग्रजांचं
कोकणात पण कुसूमाग्रजांचं स्मारक आहे का? बहुतेक पावसच्या आश्रमाच्या जवळपास? मी गेले आहे कारण >>
केशवसुतांचं (कृष्णाजी केशव दामले) स्मारक मालगुंड या गावी (म्हणजे गणपती पुळे याच्या जवळ) आहे. ते म्हणायचं आहे का? कारण ते साधारणतः कुसुमाग्रजांच्या नाशिकच्या स्मारकासारखं आहे. पण ते पावसच्या (तितकं) जवळ नाही.
फोटो बराच वेळ शोधला. शेवटी
फोटो बराच वेळ शोधला. शेवटी सापडला!
माझ्या दृष्टीने हा अनुभव खरोखरच एकमेवाद्वितीय आहे.
छान काम केलेत!+१
छान काम केलेत!+१
वावे, तुमचा अनुभव वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.
अबुवा, वावे मस्त….
अबुवा, वावे मस्त….
अबुवा, छान काम केलेत.
अबुवा, छान काम केलेत.
वावे, काय मस्त अनुभव!
कुसुमाग्रजांच्या एका बंधूंनी त्यांचं चरित्र लिहिलं आहे. ते वाचायला घेतलं होतं. पण त्यांच्या आधीच्याच पिढ्यांच्या इतिहासाचा कंटाळा आल्याने अर्धवट सोडलं. त्यातून ते दत्तक गेलेले, त्यामुळे त्या दोन्ही कुटुंबांचा इतिहास.
मस्त आठवण, वावे.
मस्त आठवण, वावे.
अबुवा, मलाही या लेखामुळेच कुसुमाग्रज पुण्यात जन्मले होते हे कळलं.
तरीहीकिती शांत प्रसन्न होतं त्याचं व्यक्तिमत्त्व!मस्त आठवण, अनुभव, वावे.
मस्त आठवण, अनुभव, वावे.
अबुवा, मलाही या लेखामुळेच कुसुमाग्रज पुण्यात जन्मले होते हे कळलं.>>>>>>+११
मस्त लिहिलंय जापुना, पुपना
मस्त लिहिलंय जापुना, पुपना वगैरे शॉफॉ आवडले.
वावे, तुझा प्रतिसादही आवडला.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
वावे चा प्रतिसाद made my day!!
(अर्धवट मराठीत लिहिलंय तरी समजून घ्या)
मलाही या लेखामुळेच कुसुमाग्रज पुण्यात जन्मले होते हे कळलं.>मलाही.
अबुवा, छान काम केलेत. >> +१
अबुवा, छान काम केलेत. >> +१
प्रतिसाद आवडल्याचं लिहिणाऱ्या
प्रतिसाद आवडल्याचं लिहिणाऱ्या सगळ्यांना धन्यवाद
असा अनुभव येणं आणि त्या अनुभवाचं मूल्य समजणाऱ्या व्यक्तींबरोबर त्याचा आनंद वाटून घेता येणं, या दोन्हीचं महत्त्व आहे.
छान लिहीलंय. एका असामान्य
छान लिहीलंय. एका असामान्य व्यक्तिमत्वाच्या स्मृती " नाही चिरा नाही पणती ' अशा विरुन जाऊ नयेत, यासाठी अबुवा, तुम्ही केलेले काम खूप मोलाचे आहे.
कविवर्य कुसुमाग्रजांचे जन्मस्थान पुण्यात आहे आणि कुठे आहे , दोन्ही समजले.
त्या रस्त्यानी काही वेळा जाणे झाले आहे, पण या पाटीकडे कधी लक्ष गेलेच नाही.
वावे तुझा प्रतिसाद आवडला.
अबुवा, छान काम केलेत.
अबुवा, छान काम केलेत. तुमच्यामुळे कुसुमाग्रजांच्या जन्मस्थानाबद्दल माहिती मिळाली.
वावे, किती छान अनुभव!