Submitted by बागेश्री on 28 August, 2014 - 06:24
कल्पनेच्या तरल प्रवाहात,
शब्दांचं लाघव खळाळत रहावं.... अविरत!!
फुलून येतील भोवताली मग,
काव्याच्या काही उत्स्फुर्त ओळी...
एखादं लोभस टपोरं मुक्त,
भिरभिरत राहतील त्यावर निरागस साहित्यीक मूल्ये
आणि आच्छादेल भुई हिरव्यागार काफियांनी....
तुझ्यासारखा उमदा रसिक
सवडीने इथे येईल तेव्हा,
फांदी- फांदीवरून ऐकू येईल सृजनाचं कोवळं कूजन..
मग विहरत रहा निवांत,
उमलून आलेल्या सौंदर्याला तुझ्या नेमक्या नजरेने न्याहाळत...
निसटावी मंगल दाद तुझ्या तृप्त मनातून,
तुझ्या अनवाणी पावलांना लाभावा गारवा,
चित्ती रुजावा गंधित मारवा...
अलगद उचलून घेशीलच ना तू भावलेला आशय?
कुरवाळशील त्याचा पोरकेपणा..
तोही बिलगेल तुला तितक्याच तत्परतेने
रसिका, तुला माय- बाप म्हणतो, ते उगारच?
-बागेश्री
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे! कृपया हे काव्य
छान आहे!
कृपया हे काव्य विभागात हलवणार का?
का रे काव्य विभागात?
का रे काव्य विभागात?
मस्त मस्त!
मस्त मस्त!
छान आहे!
छान आहे!
> ते उगारच? उगाचच हवय का ?
> ते उगारच?
उगाचच हवय का ?