Submitted by पॅडी on 6 March, 2024 - 23:19
गाव- पांदीत पायाचा , आता उमटेना ठसा
सांदीकोपऱ्यात उभा , गाव रडे ढसाढसा ...
ओढ आटली; जिव्हाळा, नात्यातला हरपला
अंगणातला पिंपळ, उभ्या उभ्या करपला...
रस्ते डांबरट झाले, वीज उजळते गाव
मिणमिण कंदिलास, कवडीचे मोल भाव...
लेकबाळ माहेराला, सणासुदीला पारखी
मायमाऊली सचिंत, लागे उचकी सारखी...
चिल्या-पिल्यांचा गलका, नाही पदराशी झोंबी
चिंचा आवळे सुकले, गेली करपून ओंबी...
गुरावासरांचा गोठा; नाही हंबरत गाय
डेअरीच्या दुधावर, मेली येईनाच साय...
घंटा-घुंगरांचा नाद, गेल्या बंड्या बैलगाड्या
दारापुढे झाकलेल्या, उभ्या चारचाकी गाड्या...
हरपल्या गप्पा-टप्पा, वड -पारंब्याचे झोके
विकासाच्या आरशात, दिसे गाव ओकेबोके..!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नाण्याची दुसरी बाजू?
नाण्याची दुसरी बाजू?
कविता जरा निराशावादी वाटली. गावांचा विकास व्हायलाच हवा पण निसर्गाचेही जतन व्हावे.
गावचा विकास होत असताना कमी
गावचा विकास होत असताना कमी होत चाललेली मातीमधील ऊब ह्याची खंत शब्दबद्ध करण्याचा अल्पसा प्रयत्न.
प्रतिक्रियेबद्दल आभार.
अतिशय सुंदर कविता..
अतिशय सुंदर कविता..
अनिरुद्ध जी, प्रतिक्रियेबद्दल
अनिरुद्ध जी, प्रतिक्रियेबद्दल आभार
छान आहेत सगळ्याच कविता. खूप
छान आहेत सगळ्याच कविता. खूप दिवसांनी यमक जुळवलेलं काही छानसं वाचायला मिळालं
रिया - प्रतिक्रियेसाठी मन
रिया - प्रतिक्रियेसाठी मन:पूर्वक आभार!