
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.
"म्हण" म्हणजे नेहेमीच्या व्यवहारात म्हटले जाणारे सरळ सोपे वाक्य. ते वर्षानुवर्षाच्या अनुभवातून, जगराहाटीतून तयार झालेले असते आणि त्याचा अन्वयार्थ सर्वमान्य असतो. एक छोटीशी म्हण आपल्याला बराच मोठा गाभा सांगून जाते, जसे की, तत्कालीन परिस्थिती, त्यात गुंफलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव वगैरे वगैरे.
अशा शेकडो म्हणी मराठीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना आठवूया आणि खेळूया म्हणींच्या भेंड्या. आपण गाण्यांच्या भेंड्या खेळत आलो आहोत, तश्याच. पण यात थोडी भर किंवा बदल म्हणून आधीच्या म्हणीत आलेला एखादा शब्द किंवा त्या म्हणीतले शेवटचे अक्षर घेऊन पुढची म्हण लिहावी.
समजा, पहिली म्हण दिली असेल,
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता."
तर पुढचा लिहील,
"तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे."
किंवा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.
सर्वसामान्यपणे भेंड्यांच्या खेळात ण चा न होतो. त्यामुळे मग पुढची,
"नाचता येईना अंगण वाकडे "
... आणि हा खेळ सुरूच राहील.
चला तर मग, खेळूया, म्हणींच्या भेंड्या.
धन्यवाद हर्पेन आणि हर्पा
धन्यवाद हर्पेन आणि हर्पा
"नमनाला घडाभर तेल" अस नसून ते "नमनाला धडाभर तेल" अस आहे.
खालचा धागा पाहा....
https://www.maayboli.com/node/79578
उधार तेल खवट.>>>>
उधारीचे पोते सव्वा हात रीते.
ऋतुराज तुमच्या म्हणी नेहमी
ऋतुराज तुमच्या म्हणी नेहमी पेक्षा वेगळ्या आहेंत आणि भारीच आहेंत.
वरच्या म्हणी चा अर्थ नाही कळला सांगाल का?
अच्छा. हे माहीत नव्हते.
अच्छा. हे माहीत नव्हते. धडाभर याने पूर्ण अर्थ लागतो, तेल घड्यात ठेवत नाहीत. ( घड्यात पाणी ठेवतात म्हणुन कोणी घडाभर पाणी म्हणत असतील तर!)
उधारीच्या वरील दोन्ही म्हणींचा अर्थ: उधारीत काही घेतले तर त्यात काहीतरी खोट असणारच.
धडाभर आहे, अरे हे माहीती
धडाभर आहे, हे माहीती नव्हतं.
झाकली मुठ सव्वा लाखाची.
झाकली मुठ सव्वा लाखाची.
धन्यवाद मानव _ /\_
धन्यवाद मानव _ /\_
धन्यवाद मी बिल्वा.
धन्यवाद मी बिल्वा.
उधारीचे पोते सव्वा हात रीते.>>>>>उधारीचा माल कमी भरतो/ असतो. उधारीने माल आणल्यास तो कमी देतात.
ह्यातल्या बऱ्याच म्हणी माझी आजी वापरायची
लाखाची मधला च घेऊन चोराच्या
लाखाची मधला च घेऊन चोराच्या मनात चांदणे
नाकर्त्याचा वार शनिवार
नाकर्त्याचा वार शनिवार
ऋतुराज धन्यवाद म्हणीचा योग्य
ऋतुराज धन्यवाद म्हणीचा योग्य अर्थ कळला. मला वाटलं कि सव्वा हात रिता म्हणजे कितीही उधार मागितलं तरी अजून हवय म्हणून हात रिता च अस काही आहे का काय.
रिकामा न्हावी भिंतीला
रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.
वाचाल तर वाचाल.
वाचाल तर वाचाल.
अरे 'धडाभर' तेल माहितीच
अरे 'धडाभर' तेल माहितीच न्हवतं. आता तसं वापरत जाईन.
ऋतुराज., लिंक साठी धन्यवाद!
ऋतुराज., लिंक साठी धन्यवाद!
नवीन म्हणी कळतायात हे खरंय.
लंकेत सोन्याच्या विटा!
लंकेत सोन्याच्या विटा!
नाव सोनु बाई हाती कथळाचा
नाव सोनु बाई हाती कथळाचा वाळा!
हातच्या कंकणाला आरसा कशाला.
हातच्या कंकणाला आरसा कशाला.
हात दाखवून अवलक्षण
हात दाखवून अवलक्षण
नाचता येईना अंगण वाकडे,
नाचता येईना अंगण वाकडे, रांधता येईना ओली लाकडे..
डाळही शिजत नाही आणि वरणही
डाळही शिजत नाही आणि वरणही उकळत नाही
हपापाचा माल गपापा
हपापाचा माल गपापा
पदरी पडलं पवित्र झालं.
पदरी पडलं पवित्र झालं.
हपापाचा माल गपापा >> माझ्यावर
हपापाचा माल गपापा >> माझ्यावर म्हणी आहेत याचा मला अभिमान आहे
हपापाचा माल गपापा >> माझ्यावर
हपापाचा माल गपापा >> माझ्यावर म्हणी आहेत याचा मला अभिमान आहे >>>

(No subject)
पोटात एक आणि ओठात एक
पोटात एक आणि ओठात एक
एका पिसाने मोर झाला
एका पिसाने मोर झाला
मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते
मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते
चोरावर मोर
चोरावर मोर
रात्र थोडी सोंगे फार.
रात्र थोडी सोंगे फार.
Pages