आकाशासारखं.. आकाशाएव्हढं!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सर्वांनाच हवं असतं
हक्काचं आकाश..
उडायचा मोह नसला तरीही..

मलाही मिळालयं माझं आकाश-
क्षितीजाच्या रेषा रुंदावत उडतांना,
जमीनीची आठवण न येऊ देणारं-माझं गुणी आकाश;

त्या मऊ मऊ ढगांच्या हातांना धरून सांगावसं वाटतं-
तुझ्या मायेने पुष्ट पंख पसरून,
होईन मी आकाश..
नाही पडून देणार दु:खाचा टिप्पूसही जमीनीवर..
अगदी तुझ्याचसारखं!

विषय: 
प्रकार: 

<< मलाही मिळालयं माझं आकाश-
क्षितीजाच्या रेषा रुंदावत उडतांना, >>

खासच..!!