
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता."
"नाचता येईना अंगण वाकडे."
"गाढवाला गुळाची चव काय?"
ही आणि अशी ठसकेदार वाक्ये आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, कधी आजी-आजोबांकडून, तर कधी आई-बाबांकडून. मग शाळेत चौथी पाचवीला मराठी व्याकरण शिकताना कळते की ह्यांना "म्हणी" म्हणतात.
"म्हण" म्हणजे नेहेमीच्या व्यवहारात म्हटले जाणारे सरळ सोपे वाक्य. ते वर्षानुवर्षाच्या अनुभवातून, जगराहाटीतून तयार झालेले असते आणि त्याचा अन्वयार्थ सर्वमान्य असतो. एक छोटीशी म्हण आपल्याला बराच मोठा गाभा सांगून जाते, जसे की, तत्कालीन परिस्थिती, त्यात गुंफलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव वगैरे वगैरे.
अशा शेकडो म्हणी मराठीत आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना आठवूया आणि खेळूया म्हणींच्या भेंड्या. आपण गाण्यांच्या भेंड्या खेळत आलो आहोत, तश्याच. पण यात थोडी भर किंवा बदल म्हणून आधीच्या म्हणीत आलेला एखादा शब्द किंवा त्या म्हणीतले शेवटचे अक्षर घेऊन पुढची म्हण लिहावी.
समजा, पहिली म्हण दिली असेल,
"गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता."
तर पुढचा लिहील,
"तेल गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे."
किंवा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ.
सर्वसामान्यपणे भेंड्यांच्या खेळात ण चा न होतो. त्यामुळे मग पुढची,
"नाचता येईना अंगण वाकडे "
... आणि हा खेळ सुरूच राहील.
चला तर मग, खेळूया, म्हणींच्या भेंड्या.
वराती मागून घोडं
वराती मागून घोडं
खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी
खाई त्याला खवखवे >>> खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी
दोन्ही घरचा पाव्हणा उपाशी.
दोन्ही घरचा पाव्हणा उपाशी.
घरोघरी मातीच्या चुली
घरोघरी मातीच्या चुली
घरचे झाले थोडे अन् व्याह्याने
घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे
खिळ्यासाठी नाल गेला, नालासाठी
खिळ्यासाठी नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला
जावई माझा भला लेकीसंगे आला,
जावई माझा भला लेकीसंगे आला, तो मेला बाईलबुद्ध्या सुने मागे गेला.
सोप्प एकदम
सोप्प एकदम
लेकी बोले सुने लागे
गाढवाला गुळाची चव काय
गाढवाला गुळाची चव काय
छडी लागे छमछम विद्या येई घमघम
छडी लागे छमछम विद्या येई घमघम (हा अॅसॉल्ट आहे)
माळी तश्या बागा आणि कोळी तसा
माळी तश्या बागा आणि कोळी तसा धागा
माळी तश्या बागा आणि कोळी तसा
शेवटच्या अक्षरावरून लिहिलेली चालणार आहे का?
गर्वाचे घर खाली
लग्नाला वीस आणि वाजंत्र्याला
लग्नाला वीस आणि वाजंत्र्याला तीस
नकटीच्या लग्नाला सतराशे
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने
नाजूक नार तिला चाबकाचा मार
नाजूक नार तिला चाबकाचा मार
रात्र थोडी, सोंगं फार.
रात्र थोडी, सोंगं फार.
शेवटच्या अक्षरावरुन लिहीलंय.
सगळी सोंगं घेता येतात पण
सगळी सोंगं घेता येतात पण पैशाचं सोंग नाही घेता येत.
ताकाला जाऊन भांडे लपविणे
ताकाला जाऊन भांडे लपविणे
दुधाने तोंड पोळलं की ताकही
दुधाने तोंड पोळलं की ताकही फुंकून प्यावं. (ही म्हण आहे की वाकप्रचार, कन्फुज्ड)
मला वाटते ही म्हण आहे,
मला वाटते ही म्हण आहे, ताकाला जाऊन भांडे लपवणे वाक्प्रचार.
नाक दाबले की तोंड उघडते.
नाक दाबले की तोंड उघडते.
तुझं माझं जमेना अन
तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचुन करमेना
नळी फुंकली सोनारे इकडून
ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं
रडतराऊत काय चालविल औत
रडतराऊत काय चालविल औत
तेरड्याचा रंग तीन दिवस
तेरड्याचा रंग तीन दिवस (शेवटच्या अक्षरावरून )
सासू मेली उन्हाळ्यात, आसू आले
सासू मेली उन्हाळ्यात, आसू आले पावसाळ्यात
चार दिवस सासूचे चार दिवस
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
दिवसभर नव्हती घरी अन
दिवसभर नव्हती घरी अन नवऱ्यादेखत पाणी भरी
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ
Pages