किन्वाची साबुदाणा खिचडी

Submitted by कल्पु on 20 March, 2011 - 11:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप किन्वा (मी कॉस्को मधून 2 lb च पाकिट आणल)
१ १/२ कप उकळत पाणी
३/४ टे-स्पून खमंग जीरा पावडर (आवश्यक)
३/४ टे-स्पून अख्खे जीरे (फोडणीसाठी)
३ हिरव्या मिरच्या आणी ३/४ कप शेंगदाणे (भरड कूट करून)
२ टे-स्पून शेंगदाण्याच तेल
१ टे-स्पून साजुक तूप
१ टे-स्पून सा़खर
१ १/२ स्पून लिंबाचा रस
१/२ कप ओल खोबर
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

कृती किन्वा फुलवण्याची
१ १/२ कप पाणी उकळवत ठेवा आणि त्यात १ कप किन्वा टाका. मिक्स करून घ्या आणि मंद आचेवर, झाकण ठेउन शिजत ठेवा. साधारण १० मिनिटात किन्वा शिजतो आणि फुलायला लागतो. त्यानंतर गॅस बंद करून, झाकण ठेउन किन्वाला सावकाश फुलू द्यात. ज्वारी सारख टणक texture असलेला किन्वा मऊ होतो. २० मिनिटानी झाकण काढा आणि गार होउ द्यात. मधे मधे काट्याने मोकळा करून घ्या. १ कप कच्चा किन्वा शिजून आणि फुलून २ कप होतो. मोकळा होण्याकरता फक्त दिडपट पाणी लागत.

कृती खिचडीची:
गार झालेल्या अणि फुललेल्या किन्वा मधे मीठ, साखर, जीरा पावडर, दाण्या-मिर्चीच कूट टाकून मिक्स करून घ्या.
किन्वाला, तिळासारखा एक मंद वास असतो जो खंमग भाजून केलेल्या जिरेपूडामुळे mask होतो. मी regular साबुदाण्याच्या खिचडीत सुद्धा जिरेपूड घालते.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल्-तुपात जिरे घालून फोडणी करा
जिर्‍यांचा रंग बदलला की वर तयार केलेल किन्वाच मिश्रण घालून परतून घ्या.
झाकण ठेउन दणदणीत वाफ येउ द्यात.
लिंबाचा रस घाला, परतून घ्या. अजून एक वाफ येउ द्यात.
खोबर-कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.

वाढणी/प्रमाण: 
४-५ पाच माणसांना पुरते.
अधिक टिपा: 

किन्वा अमेरिकेच्या बाहेर कुठे मिळतो हे माहिती नाही पण हा pseudo grain अमेरिकेत खूप पॉप्युलर होतो आहे. भरपूर प्रोटिन्स असलेला किन्वा खूप भारतीय पदार्थात पर्याय म्हणून वापरू शकतो. उदा. उपमा, सांजा, पुलाव. मायबिलीवरच्या सुगरणी तर अजून टिप्स देतील. हि खिचडी इतकी साबुदाण्याच्या खिचडी सारखी लागते कि.....माझ ऐकू नका..करूनच बघा. फोटो आहेत पण jpeg images कश्या टाकायच्या हे महिती नाहित.

माहितीचा स्रोत: 
राधिका चेंबूरकर्-मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे किन्वाला अजिबातच भाव नाही. आणि साखिला रिप्लेस करून किन्वा साखि म्हणून चालवायचा तर अजिबातच नॉ चॉलबे. किन्वा खायला हवा म्हणून मी मग स्टर फ्राय वेजी घालून खाते.

हा किंन्वा नुसताच आमटीबरोबर भाताऐवजी खाऊन पाहिला होता. अजिबात म्हणजे अजिबात चव आवडली नाही. म्हणुन बंद केला तसा खायचा. त्यात जरा मालमसाला टाकुन त्याची मुळ चव मारली गेली तरच मला आवडतो.

परवा एका पार्टीत एकीने पोह्यासारखा कांदाबिंदा घालुन पण भरपुर कडिपाला, पिवळाधमक्क करुन आणला होता. फार छान झाला होता.

Pages