कोवळ्या जिवाचे ते नर्कातले जगणे...त्यालाही समजेनI.
आई..
खरच देवाचे रुप...
कोवळ्या जिवाची धडकन. ... कसा जगेल जीव तिच्या शिवाय?
जी आई आहे. जिला आईपण आले...तिच समजेल हे नर्कातले जगणे.. त्या कोवळ्या जीवनाने आई असण्याचे स्वर्गच पाहीले नाही, त्यला काय समजनार की , नर्कातच जगतोय..
मी बोलते आहे डे बोर्डिंग फॉर प्री-प्रायमरी स्कूल ...हो....प्रायमरी स्कूल and प्री-प्रायमरी स्कूल . (LKG and UKG , पहिली ते चौथी पर्यंत )
1. त्याला कसे समजेल रात्रीचे आईच्या कुशीत निवांत झोपणे.
2. त्याला कसे समजेल मन मोकळे करणे.
3. त्याला कसे समजेल मायेचा हात.
4. त्याला कसे समजेल आपन नस्ताना आपल्या हक्का साठी कोणी सतत उभे रहाणे.
5. त्याला कसे समजेल आपल्या साठी जगाशी भांडणे कसलीही अपेक्षा ना ठेवता.
6. त्याला कसे समजेल आपल्या साठी कोणाचे तरि खाऊ लपाऊं ठेवणे.
7. त्याला कसे समजेल आपन कुणाचे तरि संपूर्ण आयुष्य असने.
8. त्याला कसे समजेल आपन कितिही चुकलो तरी आपल्यI चुका पाठीशी घालणे.
देवा असे जगणे ...नको रे देऊ कोणाला..
देवा सुखी ठेव तीला..... जिने स्वर्ग दिले मला......
डे बोर्डिंग म्हणजे माझ्या
डे बोर्डिंग म्हणजे माझ्या समजूतीप्रमाणे मोठ्या मुलांसारखे 10 ते 5(किंवा 4) वेळ असलेली शाळा, मिलेनियम किंवा अक्षरा सारखी.ते हॉस्टेल किंवा बोर्डिंग स्कुल नाही.
प्रि प्रायमरी ला डे बोर्ड बऱ्याच जणांचे आहे.दोन्ही पालक नोकरी करत असतील तर लहान मूल शाळेतून डे केअर मध्ये, त्यातले बस चे गोंधळ वगैरे काही अंशी कमी होतात.लहान मुलांना डे बोर्ड मध्ये नीट झोपायला पण देतात.
(अर्थात हे खऱ्या हॉस्टेल बद्दल असेल तर पास.)
मी बोलते आहे डे बोर्डिंग फॉर
मी बोलते आहे डे बोर्डिंग फॉर प्री-प्रायमरी स्कूल ...हो....प्रायमरी स्कूल and प्री-प्रायमरी स्कूल . (LKG and UKG , पहिली ते चौथी पर्यंत )>> अगदी गाद्या पांघरुणे अशी सोय असते की एल के जी यु केजीत. पहिली ते चौथी मधली सुट्टी व खेळ असतात.
तशी आयांनी सोडलेली मुले पण मस्त वाढतात की फॉस्टर पेरेंट कडे. अगदीच नरक नसतो. काही काही अपवाद आहेत सगळी कडे.
काही कोवळे जीव पण झोपायचे नाव घेत नाहीत. टीचर/ आयांच्या नाकात दम आणतात.
ओळखीत एक आहे..चाळीस वर्षांत
ओळखीत एक आहे..आतापर्यंत लहाणपणापासून मोजून तीन वर्षे आईबापाकडे राहिलाय...पहिलीपासून नोकरी लागेपर्यंत हॉस्टेल आणि बाहेरच राहिलाय.. चांगलं करियर झालंय..आणि
घरच्यांशी अटैचमेंट तर वर्षातून चारदा आईबाबाला भेटायला गावी जाऊन येतो...
अगदीच नरक नसतो. काही काही अपवाद आहेत सगळी कडे.>>>> +११
काही कोवळे जीव पण झोपायचे नाव
काही कोवळे जीव पण झोपायचे नाव घेत नाहीत. टीचर/ आयांच्या नाकात दम आणतात.+१११
कोवळे जीव बम्माश झालेत हल्लीचे
बोर्डिंग ला वाढलेली पूर्ण पीढी म्हातारी होते आहे आता.
एवढं काय नसतं ओ.
आजकाल काही शाळांत डे बोर्डिंग
आजकाल काही शाळांत डे बोर्डिंग आहे. आमच्या शाळेत प्री व प्रायमरीसाठी पाळणाघर आहे. शाळा सुटल्यावर मुले शाळेतच ३ ते ५ तास थांबतात. तिथे त्यांना व्यवस्थित स्नॅक्स दिले जातात व झोपायची सोय आहे. प्रीची मुले झोपत असतीलही. प्रायमरीच्या मुलांनी जर शाळेत चालणाऱ्या एक्सट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला असेल तर त्या ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करून ती मुले परत पाळणाघरात येतात.तुम्ही लवकरही मुलांना पिकअप करू शकता.
न्यूक्लिअर फॅमिलीत दोन्ही पालक वर्किंग असतील तर मुलांना शाळा, बसप्रवास व नंतर वेगळे पाळणाघर/क्लासेस असा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा डे बोर्डिंग ही सोय चांगली वाटते मला. कोवळ्या जीवांना टीवीसमोर एंगेज ठेवणाऱ्या केअररकडे सोपवण्यापेक्षा विविध ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतवून त्यांची एनर्जी चॅनेलाईझ करणारी डे बोर्डिंग स्कुल्स चांगली की.
अर्थात कितीही चांगली सोय आणि केअरर असले तरी प्री/प्रायमरीसाठी रेसिडेंट बोर्डिंग इज नॉट माय कप ऑफ टी.
/प्रायमरीसाठी रेसिडेंट
/प्रायमरीसाठी रेसिडेंट बोर्डिंग >>>> नसतेच. फक्त डे बोर्डिंग स्कुल्स असतात.
आमच्या शेजारी एक मुलगी रहाते.
आमच्या शेजारी एक मुलगी रहाते.
आई बाबा अंदाजे 8:३० 9 ला जातात ते रात्री येतात.
Aaee 8:३० 9 कडे. वडील 10:३० 11 कडे.
सांभाळणारी मावशी आणि आजी दोघंही चांगले आहेत.
आजी टीवी बघते बराच काळ पण स्वतः:ची मुलं मोठी केल्यावर दुसऱ्याची मुलं सांभाळायची का नाही ह्याचा चोइस असावा त्यानाही.
प्रेमळ आहेत त्या पण.
पण तरीही मुलीचं पालकांकराता कासावीस होण मी रोज बघते.
आईं बाबाही स्वभावाने खूप चांगले आहेत.
त्यांना काय restrictions aahet माहीत नाही.
बरोबर असले की आई खरंच खूप quality time देते. सो काहीतरी restriction असल्याशिवाय हे choose करतील अस वाटत नाही.
पण त्या मुली करता हे अजिबात बरोबर नाहीये हे दिसतं तिच्या वागण्यातून.
अधिक जास्त लिहू इच्छित नाही कारण माझ्या सोसायातीतले काही जण इथे आहेत.
पण एका वयापर्यंत एक तरी पालक significant amount of time (ani quality) मुलांबरोबर असावा अस माझं आजूबाजूची मुलं आणि विविध अनुभव बघून प्रामाणिक मत झालंय.
एकदा 10 वर्षाचे झाले की ते बऱ्यापैकी स्वतंत्र आणि mature होतात.
तरीही पालक हवेतच पण dependency जरा कमी कमी होत जाते.
असले दळीद्री लोक असतात , आपण
असले दळीद्री लोक असतात , आपण काहीही करू शकत नाही ... देवाची इच्छा असेल तेव्हाच बिचाऱ्या पोराची सुटका होईल कोणत्यातरी मार्गाने .. ह्या बाईचे शेवटचे दिवस फार हाल होऊन जावेत ही इच्छा आहे .. पोराने , ह्या आणि आणखी झाली तर त्या , कोणीही तोंड बघता नये हिचं आयुष्यभर मोठं झाल्यावर , पश्चातापात जळत पूर्ण आयुष्य गेलं पाहिजे ..
https://youtu.be/dMzl9Sy21Zk?si=qezfep_2RbnBNjjS