Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24
आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा
आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद अस्मिता. वाचून मग
धन्यवाद अस्मिता. वाचून मग विचारेन काही शंका असेल तर.
मैची गुजा मिक्स वापरुन
मैची गुजा मिक्स वापरुन कोफ्याची आयडिया भारी आहे.
धन्यवाद अस्मिता & मै.
धन्यवाद अस्मिता & मै.
हातसडीचे तांदूळ आणले आहेत पण
हातसडीचे तांदूळ आणले आहेत पण नीट शिजत नाहीयेत , ८ तास भिजवून ठेवून पहिले , जास्त शिट्ट्या करून पहिल्या , पाणी जास्त टाकून पहिले पण हवे तसे शिजत नाहीयेत. कोणी कसे शिजवायचे सांगाल का प्लीज ...
आम्ही वेळेवर धुवून ५ - ६
आम्ही वेळेवर धुवून ५ - ६ शिट्ट्या होऊ देतो.
ब्राऊन राईसला ८.
कोकणातले हातसडीचे लाल तांदूळ
कोकणातले हातसडीचे लाल तांदूळ आमच्याकडे बरेचदा आणले जातात, मी कुकरमध्ये नाही करत पण भरपूर पाणी घालून असेच विस्तवावर शिजवत ठेवते, अजिबात भिजवत नाही, धुऊन घेते फक्त, मंद विस्तवावर एक तास लागतो. जास्त करून गुरगुरीत भात करते. क्वचित साधाही करते. ते ब्रोकन असतात पण मोठ्या कण्या असतात, अगदी बारीक नाही. तांदूळच म्हणतात त्यांना.
हातसडीचे तांदूळ आणले आहेत पण
हातसडीचे तांदूळ आणले आहेत पण नीट शिजत नाहीयेत , ८ तास भिजवून ठेवून पहिले , जास्त शिट्ट्या करून पहिल्या , पाणी जास्त टाकून पहिले पण हवे तसे शिजत नाहीयेत. कोणी कसे शिजवायचे सांगाल का प्लीज ...
शिट्ट्या करू नका, कुकर प्रेशर आल्यावर गॅस बारीक करून 10 -15 मिनिटे ठेवा. नक्की शिजतील.
थोडं तेल किंवा तूप टाकून
थोडं तेल किंवा तूप टाकून शिजवून बघा. स्निग्ध पदार्थांमुळे लवकर शिजेल. मऊ आणि मोकळा होईल.
हातसडीचे तांदूळ जास्त पौष्टीक
हातसडीचे तांदूळ जास्त पौष्टीक असतात का?
सर्व सुचना बद्दल धन्यवाद !!
सर्व सुचना बद्दल धन्यवाद !!
मी थोड्या दिवसात परत प्रयत्न करून पाहतो आणि सांगतो ..
त्याचे इडली डोसा पीठ बनवता
त्याचे इडली डोसा पीठ बनवता येइल संपवायचे असेल तर - हातस डी तांदुळ. संदर्भ.
हातसडीचे तांदूळ जास्त पौष्टीक
हातसडीचे तांदूळ जास्त पौष्टीक असतात का?
<<
हो.
दाण्यावरची 'साल' जागीच रहाते. ज्यात पोषक तत्वे असतात. पॉलिश केलेल्या तांदळात मुख्यत्वे स्टार्च उरतो.
मैदा = पॉलिश्ड तांदूळ, अन कोंड्यासकट कणीक = हातसडीचा तांदूळ अशी तुलना करता येईल.
थँक्यु!
थँक्यु!
कुरडया केल्यावर गव्हाचा बराच
कुरडया केल्यावर गव्हाचा बराच चोथा उरला आहे, त्या चोथ्याचे काहि करता येइल का ?
कोथिंबीर वडी च्या उकडलेल्या
कोथिंबीर वडी च्या उकडलेल्या उंड्याचे तुकडे आणि चुरा शिल्लक आहे...तळायला नको आहे..काय करता येईल..
यात थोडा उकडलेला बटाटा घालून
यात थोडा उकडलेला बटाटा घालून मसाले घालून नॉन स्टिक पॅन वर अगदी कमी तेलात परतून टिक्की आणि मग ती बर्गर बन मध्ये घालून बर्गर (जर कोणाला नुसती टिक्की नको असेल तर)
उंड्याचे तुकडे आणि चुरा असे
उंड्याचे तुकडे आणि चुरा असे सगळेच जरा चॉपरमधून काढायचे आणि पीठ फेरुन भाजी, झुणका वगैरेत घालायचे.
फोडणीचा भात करायचा त्यावर
फोडणीचा भात करायचा त्यावर चुरा टाकून खूप परतायचं ...
कुरडया केल्यावर गव्हाचा बराच
कुरडया केल्यावर गव्हाचा बराच चोथा उरला आहे, त्या चोथ्याचे काहि करता येइल का ?>>>>
कोंडा म्हणतो आम्ही त्याला, उरलेला कोंडा कडकडीत उन्हात वाळवायचा आणि ज्वारी, बाजरी किंवा तांदूळ घालून दळून आणायचा आणि तिखटमीठ जिरे तिळ घालून परत नेहमीसारखं पीठ शिजवून पापड्या करायच्या, वेळखाऊ आहे पण चवीला मस्त.
कोंड्याच्या भातवड्या म्हणतो आम्ही त्याला, तळण्यापेक्षा भाजून छान लागतात
तळण्यापेक्षा भाजून छान लागतात
तळण्यापेक्षा भाजून छान लागतात......... लॉक डॉऊनमध्ये हे ज्ञान प्राप्त झाले.आधी तळले.आवडले नव्हते तेव्हा टाकून दिले.फक्त काहीच भाजले.ते मस्त लागले.
'कोंड्याचा मांडा' ही म्हण
'कोंड्याचा मांडा' ही म्हण यातुनच आली असावी.
कुरडया केल्यावर गव्हाचा बराच
कुरडया केल्यावर गव्हाचा बराच चोथा उरला आहे, त्या चोथ्याचे काहि करता येइल का ?>>> भुसपापड्या करा, त्यात थोड मिठ,जिरेपुड मिसळुन
गोलसर पापड्या थापुन घया...कडकडित उन्हात वाळवा, तळुन, भाजुन खा...भारी लागतात.
फक्त काहीच भाजले.ते मस्त
फक्त काहीच भाजले.ते मस्त लागले.>> तळल्यावर नेहमीच्या पापड्यांसारखे फुलत नाहीच ते, त्या चवीची सवय असेल तर आवडेल
कोंड्याचा मांडा' ही म्हण यातुनच आली असावी. >>नक्कीच
गव्हाच्या चोथ्याच्या भुसवड्या
गव्हाच्या चोथ्याच्या भुसवड्या करता येतील . भुसा तिखट ,मीठ , हळद , हिंग , थोड्या तांदुळाच्या कण्या किंवा भिजवलेला साबुदाणा घालून शिजवायचा . त्याच्या पापड्या थापून उन्हात वाळवायच्या. तळून किंवा भाजून खायच्या . चरचरीत फोडणीची अंबाडीची भाजी , भाकरी आणि तळलेल्या भुसवड्या एकदम मस्त मेनू !!
मला हे भातवड्या आणि
मला हे भातवड्या आणि भूसपापड्या (हे नाव माहीत नव्हते) फार आवडतात. भातवड्या तर मी कच्याच खाते खूप साऱ्या.
रगडा पॅटीसचे पॅटीस करायला
रगडा पॅटीसचे पॅटीस करायला कुठल्या प्रकारचे/जातीचे बटाटे वापरावेत?. रसेट ?
मागे एकदा जे वापरले होते (आता आठवत नाही कुठले होते) त्याने नीट form झाले नव्हते
लाल चिकट होतात आणि रसेट
लाल चिकट होऊ शकतात आणि रसेट भुसभुशीत.
सो द विनर इज…
कपड्यावर पडलेला गंज किंवा
कपड्यावर पडलेला गंज किंवा रक्ताचा डाग कशाने घालवावा? लिंबू, स्टेन remover, विविध साबण, पावडर लावून झाले आहे.
लाल चिकट होऊ शकतात आणि रसेट
लाल चिकट होऊ शकतात आणि रसेट भुसभुशीत.
सो द विनर इज…
>>
फ्रोजन टिक्की
धन्यवाद स्वाती, रीया
धन्यवाद स्वाती, रीया
युकॉन गोल्ड जनरली सेफ आहेत
युकॉन गोल्ड जनरली सेफ आहेत सगळ्याकरताच.
फ्रोजन टिक्की किवा हॅश ब्राउन
फ्रोजन टिक्की किवा हॅश ब्राउन पॅटि
रक्ताचा डाग हायड्रोजन
रक्ताचा डाग हायड्रोजन पेरोक्साईड ने जातो. अर्थात त्याने रंग ही फेड होऊ शकेल. .. पांढऱ्या रंगावर काय त्यास मारामाऱ्या करा.
टिकटॉक बरेच बघितले आहेत डाग जाण्याचे. करून बघायच आहे अजून. ते ग्रोसरी/ फार्मसी मध्ये सहज मिळावे.
रक्ताचा डाग हायड्रोजन
रक्ताचा डाग हायड्रोजन पेरोक्साईड ने जातो. >> हो . ते नसेल तर गार पाण्यात मीठ घालून त्यात तो कपडा बुडवून ठेवा. व मग सर्फ ने घासुन धुवुन घ्या. ही टिप आम्हाला शाळेत पाचवी सहावीत शिवणाच्या / होम सायन्स क्लास मध्ये दिलेली होती. तेव्हा आम्ही सर्व इतक्या इनो संत की आपल्या घरात कश्याला रक्ताचे हे ते डाग पडतील? असा विचार आलेला. पुढे सातवीत मचुअर झाल्यावर ही टीप वाप रावी लागलेली. टीएम आय अलर्ट.
धिस वॉस अल्सो बिफोर जोशी अभ्यंकर हत्याकांड. रक्ताचे डाग वगिरे वाचून प्रचंड घाबरलेले लोक्स तेव्हा.
शाळेत धडपडले किंवा नाकातुन रक्त आले आणि युनिफॉर्मच्या सफेद शर्टावर पडलेतरच रक्ताशी संबंध.
धन्यवाद अमितव आणि अमा
धन्यवाद अमितव आणि अमा
गव्हाच्या कोंड्याबद्दलच्या
गव्हाच्या कोंड्याबद्दलच्या सुचनांकरता सर्वांना धन्यवाद .. मस्त भुसवड्या केलया आणि सध्या वाळवत ठेवल्यात !!
बरणीभर वॉलनट शिल्लक आहेत
बरणीभर वॉलनट शिल्लक आहेत त्याची चव चान्गलि आहे पण त्याला दबकट किवा जुनकट म्हणता येइल असा वास येतोय काय करता येइल? उन्हात ठेवले तर वास जाइल का?काचेच्या बरणीत ठेवले होते.
कॉस्ट्कोची मोठी बॅग होती त्यातले जेमतेम अर्धे सन्पलेत.
मी Costco chi नट बॅग आणली की
मी Costco chi नट बॅग आणली की freezer मध्ये ठेवते. एका छोट्या जार मध्ये थोडे वापरायला काढून तो जार सुद्धा फ्रीज मध्ये ठेवते.
हे अक्रोड थोडे भाजून बघा, कदाचित वास कमी होईल. कोशिंबिरी मध्ये दाण्याच्या कुट ऐवजी, रात्री भिजवून सकाळी खायला असे वापरून पहा.
इथे एक उपाय दिला आहे. बघा
इथे एक उपाय दिला आहे. बघा पटतो का.
कसे स्टोअर करावे याबद्दलही माहिती आहे.
(मनमोहन यांनी सांगितल्या प्रमाणेच भाजायला, पण ओव्हनमध्ये, सांगितले आहे त्यात.)
दबकट नवा शब्द ऐकला.
दबकट नवा शब्द ऐकला.
खोमट माहीत होता.
प्राजक्ता, टाकून दे ही बॅच.
प्राजक्ता, टाकून दे ही बॅच. वॉलनट्स आधीच खवट असतात, जुने झालेले तर अजिबार रिपेयर होत नाहीत. रेफ्रिजरेट करत जा इथून पुढे.
थॅन्क्स सगळ्याना !
थॅन्क्स सगळ्याना !
सिन्ड्रेला मलाही तसच वाटतय त्यातले पोषण मुल्य किती शिल्लक असतिल कुणास ठाउक?
अक्रोड खवट असतील तर कठीण आहे
अक्रोड खवट असतील तर कठीण आहे दुरुस्ती तशी. जरा मोकळ्या हवेवर ठेवून, जरा शेकवून (शेकण्याच्या ष्टेप ला मपला काणफिडन्स नाय, अजूनच खवट झाले तर काय घ्या?; सो कंजना, आपल्या जिम्मेवारी वर कर) नंतर फ्रीज केले तर होईल काम असं वाटतंय.
आक्रोड महाग असतात(हे मी नवीन
आक्रोड महाग असतात(हे मी नवीन शोध लावल्यासारखं का म्हणतेय?)
मायक्रोवेव्ह ला अगदी कमी आचेवर भाजून, प्रत्येक व्हिज्युअल चांगला दिसणारा आक्रोड शबरीचं बोर बनवून चांगले लागतील ते खाऊन टाकले/ज्याने चव घेतली त्याने बाजूला ठेवून रोज 2 संपवले तर बरे.बाकी व्हिज्युअल बुरशी किंवा खराब न दिसणाऱ्या पण चवीला खवट असलेल्या आक्रोड चे बारीक साखर(कॅफे मध्ये पाकिटात मिळते त्या जाडीची) मिसळून रोज रात्री फेस स्क्रब बनवून सर्वांनी लावून संपवता येईल
आपली,
(टिपिकल ममव)
व्हिज्युअल बुरशी किंवा खराब न
व्हिज्युअल बुरशी किंवा खराब न दिसणाऱ्या पण चवीला खवट असलेल्या आक्रोड चे बारीक साखर(कॅफे मध्ये पाकिटात मिळते त्या जाडीची) मिसळून रोज रात्री फेस स्क्रब बनवून सर्वांनी लावून संपवता येईल
>>> हा हंत हंत! गेल्याच महिन्यात मनावर दगड ठेवून बरेच खवट अक्रोड फेकले होते.
अर्थात दररोज स्क्रब करण्याचा उत्साह नसेल तर एकदाच घरगुती बॉडी स्पाही करता येईलच की.
अरे फेकु नका ते वर बरोबर
अरे फेकु नका ते वर बरोबर लिहिले आहे. बारीक वस्त्रगाळ पाव डर बनवुन स्क्रब छान होईल. फेस पॅक होईल. व अक्रोडाचे तेल ही निघते. कोल्ड प्रेस घाणीवर कोणी काढून देइल तर बघा. बॉडी मसाज ला मस्त आहे .
अर्रे वा स्क्रब मस्त आयडिया
अर्रे वा स्क्रब मस्त आयडिया अनू. खवट बदामाचे ही करता येईल.
इतकुश्या अक्रोडाचे तेल
इतकुश्या अक्रोडाचे तेल कितिसे निघणार?
त्यापेक्षा स्क्रब ची आयडिया जबरी आहे.
अनुची फेसपॅक आयडिया छान किंवा
अनुची फेसपॅक आयडिया छान किंवा निदान पूड करून रोपांना घालायला हरकत नसावी, पोषणमूल्य काही शिल्लक असतील तर मिळतील त्यांना, खवटपणाचा त्रास नाही होणार बहुतेक.
स्क्रब केलाच तर आधी हातावर
स्क्रब केलाच तर आधी हातावर ट्राय करा. खवट झाला असेल तर रिअक्शन येऊ शकते.
Pages