Submitted by अनन्त्_यात्री on 7 February, 2024 - 00:07
रिकामटेकडी मोठी तिच्या माथ्यावर
माझा वायफळमळा-त्याच्या बांधावर
मृगजळ साठवीन रोज थोडे थोडे
पिऊन जे दौडतील कल्पनांचे घोडे
एकशृंगी घोडे त्यांचे पसरूनी पंख
उडतील - टाळण्यास समीक्षकी डंख
कल्पिताचे वास्तवाशी जुळवी जो नाते
ज्योत त्याची विझण्याच्या आधी मोठी होते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
क्या बात है !! __/\__
क्या बात है !!
__/\__
धन्यवाद शशांक!
धन्यवाद शशांक!
फार सुंदर!
फार सुंदर!
तुमच्या कवितांमध्ये एक गूढ
तुमच्या कवितांमध्ये एक गूढ अर्थ लपलेला असतो.
कविता छानच..!
सामो, रूपाली धन्यवाद
सामो, रूपाली धन्यवाद