पिंपळे सौदागर इथे फ्लॅट

Submitted by पेरु on 5 February, 2024 - 11:58

मी पिंपळे सौदागर इथे॑ फ्लॅट बघते आहे.क्२बिचके. कोणता एरिआ बघावा, कोणता नको. रिसेल आनि नवे दोन्ही बघतोय. ९०० च्या आसपास एरिआ. साइ पॅरेदाइज आनि शिवम या कशा आहेत सोसायट्या?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

(विचारपूस पहिली, नंबर संपर्क मध्ये पाठवला होता.)
तसे सर्व एरिया चांगले आहेत.फक्त आपली जीवन पद्धती काय असणार आहे, घरी इकडे तिकडे रिक्षा बस करून जावे लागेल असे ज्येष्ठ नागरिक आहेत का, पटकन दुचाकी बाहेर काढून आजूबाजूला 2 किलोमीटर आत जाता येणार आहे का घरी फक्त चार चाकी आहे,एरिया मार्केट जवळ हवाय की मूळ उद्देश शांत कमी रहदारी चा रस्ता आहे, यावर अवलंबून.तसेच बजेट किती आहे?फ्लॅट बद्दल अटी काय आहेत(गॅलरी/ड्राय बाल्कनी/व्ह्यू साठी उंचावर हवा/कमी मजल्यांवरच पाहिजे/शेजारी लिनीयर गार्डन/एखादा सार्वजनिक कार्यक्रम हॉल असलेला चालेल की अजिबात चालणार नाही इत्यादी)

धाग्यात दिलेल्या दोन्ही सोसायटी चांगल्या आहेत.त्यांच्याच शेजारी साई साहेब/वसंत विहार/लक्ष्मी आंगन याही जुन्या सोसायटी आहेत.साई मारीगोल्ड पण रस्त्यावर आहे.मोठे स्टेशनरी दुकान, चितळे वगैरे आजूबाजूला आहेत.मोठी सोसायटी/शाळेच्या बस आत येणे/अगदी दारावर येणे ही अट असेल तर कल्पतरू/गणिशम/रोझ व्हॅली/रोझ आयकॉन/दिपमाला/लॉर्ड्स/द्वारकाधीश याही बघ.

पिंपळे सौदागरचे लोकेशन रहाण्यासाठी सोयीस्कर आहे पण वर मी-अनुने म्हटले आहे तसे सिनिअर सिटीझन्सचे वांदे होतात. ओला/उबेर शिवाय पर्याय नाही.

इंडियन बँकेच्या ओपोझिट एक मोठे construction सुरू आहे, तिथे चेक करा. मध्ये एक जाहिरात पहिली होती की साई ड्रीम्स मध्ये एक नवीन फेज झाली आहे अशी. तिथेही चौकशी करून बघा.

अगदी ठरवलं तर पी एम पी एम एल ने ये जा शक्य आहे.पण हाताशी भरपूर पेशन्स आणि वेळ हवा.324 नंबर भोसरी-हिंजवडी जाते.किंवा आणि नवी महादेव मंदिर ते पुणे स्टेशन बस चालू झालीय.अर्धी बस अर्धी रिक्षा असंही करतात काही जण.जगताप डेअरी वरून 276 आणि 100, 115 नंबर.
पण घाई असेल, वेळ पाळून कुठे पोहोचायचं असेल तर ओला उबर किंवा स्वतः गाड्या काढण्याला पर्याय नाही.

अनु, नंबर नाही मिळाला. मि माझा पाठवते. राहणारे सिनियर सिटिझन आहेत. रिक्शा वगैरे सहज मिळत नाही का? साइ ड्रिम्स बघितली. खुप छोटे फ्लॅट् आअहेत.

रिक्षा: ओला pcmc मध्ये सहज मिळते.आता उबर पण.मॅप लोकेशन्स नीट द्यावी लागतात.घरात बसून कॅब बुक केल्यास कधीकधी मागची सोसायटी लागते गुगल लॉटरी मध्ये.कधीकधी ड्रॉप लोकेशन आधीच विचारून त्यांना जायचे नसेल तर रद्द करतात आणि आपल्याला 25 रु दंड लागतो पुढच्या राईड ला.मग कॅन्सल झाल्या झाल्या लगेच कस्टमर सपोर्ट मेनू मॅक्सज्ये जाऊन driver cancelled booking पर्याय निवडून ते 25 रु परत मिळवावे लागतात.(हे ओला)
पण अर्थातच इतके कठीण नाहीये.फक्त रात्री जरा इश्यू येऊ शकतात.ज्ये ना ना अर्थातच हे सर्व आपण करून दिलेलं बरं असतं.
(भारतात आली आहेस का?)

Pcmc चे रस्ते छान रुंद आहेत.
झपाट्याने विकसित झालेलं शहर.
पी सौ मध्ये किंवा आकुर्डी निगडी मध्ये खरंच घर असायला हवं.
#City life

हो.आता pmc मध्ये गेल्यावर स्वतः गाडी चालवायची असेल तर बोअर होतं.अर्थात पिंपरी मार्केट ला गेल्यावर पण.

पेरू पि सौ असाच प्रेफरन्स आहे का? फक्त ज्ये ना साठी सोयीस्कर नाही हा भाग. अत्यंत गजबजाट, बेशिस्त वाहतूक, निवांत बागा ई नाही जे खरे तर इतर पी सी एम सी मध्ये खूप आहे. पी एम टी ची फार सोय नाही. जरा निवांत गाव फिल हवा असेल तर आदित्य बिर्ला समोर किंवा गंगा आशियाना किंवा प्राधिकरण भाग बघा. आणि मुख्य म्हणजे बिल्डर आणि बांधकाम क्वालिटी पण बघा.

लंपन, पि सौ मधे गुंतवणुक सुरक्षित राहिल असा विचार. थोडे पुना नासिक हायवे जवळ हवे. म्हनुन तो भाग.
दुसरा काहि ऑप्शन असेल तर तो पण बघु.

गंगा आशियाना बरीच जुनी आहे. त्यामुळे flat ऐसपैस आहेत. पण
तिथे कबुतरांचा त्रास फारच जास्त आहे.
नात्यातले एक जण राहतात.

साई मारीगोल्डमधे माझ्या मित्राचा २ बीएचके आहे विकायला, पहिला मजला. चालत असेल तर डिटेल्स देता येईल.

पेरु,
राहाणारे सिनीयर सिटीझन असल्यास आणि तिथे एकटेच ( मुले जवळ नाहीत) रहाणार तर 'एजिंग इन प्लेस' हे लक्षात घेवून जागेचा विचार करा. पि सौ मधे गुंतवणुक सुरक्षित राहिल असा विचार या बाबत आमचा अनुभव - गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेणे आणि जे नां च्या सध्याच्या गरजांची पूर्तता, त्यांचे वाढत जाणारे वय आणि गरजा यासाठी कितपत सोयीचा हा विचार हे एकत्र जमून येणे जरा कठीण जाते , शोधण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तुमचे प्राधान्य गुंतवणूक की जे नां चे तिथे कायमचे वास्तव्य ? आम्ही शेवटी गुंतवणूक कमी प्राधान्याची असा विचार केला. नो रिग्रेट्स!

ज्ये ना लोकांची इन्फ्रा सोय नीट करून बाकी गोष्टींची फार चिंता करू नये.ते नोकरी करणाऱ्या तरुणांपेक्षाही लवकर रुजतात.आजूबाजूला ज्येष्ठ म्हणून मान मिळतो.आमच्या साबा, आई बाबा, आता सोसायटी बाहेर वेगळ्या सोसायटीत राहत असलेले एक 75+ नातेवाईक जोडपं या सर्वांना हीच चिंता होती.पण ते खूप चांगले रुजले.लोक त्यांच्या रेफरन्स ने आम्हाला ओळखू लागले. 'पक्के शिष्ठ लोक बघा, मख्ख कुठचे' या इमेज चा डॅमेज कंट्रोल व्हायला ज्येष्ठ नागरिकच उपयोगी पडले.आता सोसायटीत सगळे खुर्च्या टाकून पार्किंग मध्ये बसतात, सिक्युरिटी ला पैसे देऊन चहा वडे मागवतात, पंधरा दिवसातून एकदा चालत जवळपास हॉटेलिंग करतात.
जर शारीरिक व्याधी खूप त्रास देणाऱ्या नसतील तर हे सगळे आपापले उद्योग शोधतात.

ज्ये ना रहाणार असल्यास घरकामाचे अव्वा च्या सव्वा रेट हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. आमच्या इथे झाडू पोछा भांडी या प्रत्येक कामागणिक 900 रु 2 bhk साठी आणि 1000रु 3bhk चा रेट आहे. रेटचा घरातल्या माणसाच्या संख्येशी संबंध नाही. 2 माणसे असली किंवा 4 असली तरी रेट तोच.
अर्थात स्वयंपाकाचे रेट वेगळे आहेत, सध्याचे मला माहीत नाहीत.

लोक त्यांच्या रेफरन्स ने आम्हाला ओळखू लागले. 'पक्के शिष्ठ लोक बघा, मख्ख कुठचे' या इमेज चा डॅमेज कंट्रोल व्हायला ज्येष्ठ नागरिकच उपयोगी पडले >>>> मी-अनु खूप हसले. आमच्याकडेही हीच कहाणी

मला दिसतेय तुझी विपू अनु.
पक्के शिष्ठ लोक बघा, मख्ख कुठचे' या इमेज चा डॅमेज कंट्रोल व्हायला ज्येष्ठ नागरिकच उपयोगी पडले. हे भारी आहे Lol
आमच्या शेजारी राहतात त्या काकू मला एरवी अक्षरशः ओळखही दाखवत नाहीत. पण साबा मागे एकदा काही दिवस येऊन राहिल्या होत्या त्यांना खाली भेटल्यावर अगदी भरपूर गप्पा मारल्या त्यांनी. सगळी चौकशी वगैरे यथासांग करून. पण अजूनही मला साधं एक स्माईलही देत नाहीत. माझी इमेज बहुतेक अजूनही शिष्ठ अशीच असावी Lol

चिंचवड मध्ये आमची सोसायटी ज्ये. नागरिक जर सोशल असतिल तर उत्तम आहे. ४००-५०० ज्ये नागरिक मेंबर आहेत. ६० वर्ष झाले की ज्ये. नागरिक क्लब मध्ये जाउ शकतात. सहल, भजन , किर्तन , हुर्डा पार्टी असे बरेच प्रोग्राम होतात. चहा पाणी तर रोजच असते. काही लोक रोज जॉईन होतात तर काही जसा वेळ मिळेल तसे जातात. काही जण सोसाईटी मधल्या देवळात जातात. बस, मेट्रो ची connectivity पण आहे. गणपती, नवरात्र , क्रिकेट च्या मॅचेस वेगळ्या . आजु बाजुला दुकाने भरपुर. पण जुनी सोसयटी असल्याने गुंतवणुक कॅटॅगिरी मध्ये नाही येणार.

ज्ये ना लोकांची इन्फ्रा सोय नीट करून बाकी गोष्टींची फार चिंता करू नये.ते नोकरी करणाऱ्या तरुणांपेक्षाही लवकर रुजतात. > +१ पुर्ण वेळ घरी असल्याने जुळवुन घेतात. नोकरी करणारे बाहेर असतात म्हणुन वेळ लागतो.

ज्ये ना रहाणार असल्यास घरकामाचे अव्वा च्या सव्वा रेट हा वादाचा मुद्दा होऊ शकतो.>>>
पिसौमधल्या एका सोसायटीत तुमच्या घरातील कोणी परदेशी असेल तर रेट वेगळा असतो हे ऐकून धन्य झाले होते.
त्यामुळे हा मुद्दा नक्कीच लक्षात घेण्यासारखा आहे.
शिवाय वाटेल तेवढ्या सुट्या हे गणित ज्येनांना त्रासदायक ठरू शकतं हा ही अनुभव आहे.
एकंदरीत पिसौमध्ये फक्त ज्येनाच राहणार असतील तर रुंबा, डिश वॉशर गरजेचे आहेत असं माझं मत.

हो फक्त ज्येना असतील आणि घरात फार धूळ येत नसेल तर रुंबा आणि डिश वॉशर फायद्याचे ठरेल.पण ज्ये ना परफेक्शनिस्ट असले तर त्यांना रुंबा बाईचं काम आवडणार नाही.शिवाय समाज संपर्क हा एक मुद्दा ठरतो.सोसायटीत चार घरी आधीच येणारी विश्वासू मदतनीस घेतल्यास रोज बाईशी गप्पा, इकडचे तिकडचे अपडेट, शिवाय बाई करवी रोज थोडा का होईना ज्ये ना कसे आहेत यावर चेक.
रेट जास्त आहेत.कामाच्या वेळा पण आपल्याला हव्या त्या मिळतील असं सांगता येत नाही.अर्थात मदतनीस वर्गाचे हक्क आणि राहणीमान खर्च लक्षात घेतल्यास हे आता इतर एरिया मध्ये पण येईल.
बॅचलर कडे काम करायचं असल्यास मदतनीस बाया खुश असतात.बॅचलर खूप जास्त कामात चुका काढत नाहीत.nri व्यक्ती घरात असल्यास बहुतेक या व्यक्तीशी भेटी गाठी, पाहुणे राबता वाढत असेल म्हणून पैसे जास्त असं गणित असेल.

शिवाय समाज संपर्क हा एक मुद्दा ठरतो.सोसायटीत चार घरी आधीच येणारी विश्वासू मदतनीस घेतल्यास रोज बाईशी गप्पा, इकडचे तिकडचे अपडेट, शिवाय बाई करवी रोज थोडा का होईना ज्ये ना कसे आहेत यावर चेक....... एकदम बरोबर.