पुणे/ नाशीक येथे २ बी एच के फ्लॅट विकत घेणे आहे. माहिती द्या.

Submitted by अश्विनीमामी on 29 January, 2024 - 02:40

तर मं डळी पुणे किंवा नाशीक येथे २ बीएच के २ रेस्ट रूम वाला फ्लॅट विकत घेणे आहे. जाणकार माहिती द्या.
१) कोणता एरिआ चांगला? मुंबई हून कॅब ने आरामात येता यावे. व मला ट्रीटमेंट ला ह्या घरातून मुंबईस जावे लागेल. ते जमावे.
२) काय कागद पत्रे जमवावी?
३) होम लोन कुठून घेउ?
४) माझी गरज ७५० - १००० स्क्वे फूट आहे. अगदीच अंधेरी स्टाइल बारका नाका एव्ढा फ्लॅट नको.
५) इन्स्टा वर फार जहिराती येतात पण त्या खर्‍या असतात का?
६) अजून काय विचारावे बिल्डर ला/ री सेलर ला?
७) मला रीसेल/ रेडी टू मुव्ह इन फ्लॅट हवा आहे. नव्या स्कीम नको. साइट वरौन माहिती विचारले की हजारो फोन व मेसेजेस येत राहतात.

तुमच्या काही सूचना असल्यास नक्की लिहा. मला मदतच होईल. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे म्हणजे मुंबईत घर भा डे ४२ के आहे. काम संपले तर माझा इथे काहीही कनेक्ट नाही. तेच इ एम आय ला जातील असा विचार केला आहे.

अंधेरी खार बांद्रा वर्सोवा इथे घर घ्यायचे तर बजे ट नाही. पुणे/ नाशी क मध्ये घर घेतल्यास व सजवून ठेवुन दिल्यास मुलांना वीकें ड साठी तरी वापरता येइल. सध्या तरी तिची करीअर मुंबईतच आहे.

अंधेरी खार बांद्रा वर्सोवा इथे घर घ्यायचे तर बजे ट नाही. पुणे/ नाशी क मध्ये घर घेतल्यास व सजवून ठेवुन दिल्यास मुलांना वीकें ड साठी तरी वापरता येइल. सध्या तरी तिची करीअर मुंबईतच आहे. <<
ठाण्याचा विचार का करत नाही..??

बर्‍याच लोकांच म्हणणं असतं की आजच्या काळी रेंटेड अकोमोडेशन सोपं पडतं पण त्या घरात तुम्ही हवी ती सोय (फॉर लईफटाईम इ.) करू शकत नाही. दुसरं म्हण्जे ते घर कधीही सोडून जायला लागण्याची शक्यता. वयोमानानुसार (अगदी कितीही ट्रान्स्पोर्ट अन घर शिफ्टिंग च्या सोयी अवेलेबल असल्या तरी) घर शिफ्ट करणे जिकिरीचं होतं. नपेक्षा स्वतः चा फ्लॅट असणं उजवं ठरतं इथे.

४२ के रेंट हे बरंच जास्त आहे (अर्थात माझ्या मते), मुंबई, लोकेशन्स. आणि सोयी इ. मुळे असेल अर्थात.
ईएमाय मध्ये शक्यतो लाखाला ९००/- रुपये पडतात तर ईएमआय भरण्यास माझी पसंती.

आता मी डाउन पेमेंट करु शकते व इ एम आय भरु शकते. पण घर व लोन तिच्या नावावर
>>>> तुम्ही आर्थिक जबाबदारी घेणार असल्यामुळे कॉ-बॉरोअर म्हणून तुमचे नाव आणि त्यायोगे फ्लॅटवरही तुमचे नाव पाहिजेच. बहुतेक मुलीचे पहिले नाव व तुमचे दुसरे असे लागेल कारण तिचे अर्निंग पोटेन्शिअल जास्त धरले जाईल.
मुलीच्या आईचे घरात आर्थिक काँट्रीब्युशन आहे व घरात लिगली हिस्साही आहे हे गरज पडल्यास इतरांसमोर एस्टॅब्लिश करता आले पाहिजे.

ठाण्याचा विचार का करत नाही..??>> तिला रोज सेंट्रल वेस्टरन करावे लागेल. अंधेरी वेस्ट मध्ये ऑफिस व कामाच्या मीटिन्ग बीकेसीत असतात. मुलुंड/ ठाणे वरून रोज कॅब म्हणजे अवघड आहे. व अडीच तासाचा कम्युट पडतो.

विथ ऑल ड्यु रिस्पेक्ट ठाणे इज जस्ट नॉट पुणे.

ं मी परवा खरेच ७४६ भागवत बिल्डिन्ग मध्ये रेंट वर काही आहे का ते बघावे का असा विचार करत होते. पण बिलिडिनग इज ऑलमोस्ट अनलिव्हेबल. जोशी आजी राहायच्या ते दोन खोल्या परफेक्ट होईल मला तर.

बहुतेक मुलीचे पहिले नाव व तुमचे दुसरे असे लागेल कारण तिचे अर्निंग पोटेन्शिअल जास्त धरले जाईल.
मुलीच्या आईचे घरात आर्थिक काँट्रीब्युशन आहे व घरात लिगली हिस्साही आहे हे गरज पडल्यास इतरांसमोर एस्टॅब्लिश करता आले पाहिजे.>> बरुबर. मुद्दा बरोबर आहे.

तिची करियर मुंबईत असेल आणि तिला पुण्यात स्कोप नसेल तर पुण्यात घर घेऊन एक तर तुम्ही किंवा ती असं अप डाऊन करत राहणार का दर weekend ला? त्याची कॉस्ट- cab असेल तर एका राउंड ट्रिप चे ५०००- ६००० प्लस human hours , traveling fatigue हेही लक्षात घ्या. एक घर मुंबईत आणि एक पुण्यात अशी दोन्ही maintain करणार का? तुमची मेन सपोर्ट सिस्टीम/ care giver तुमची मुलगीच असेल तर ती ज्या शहरात आहे तिथे जवळपास असाल तर तिला धावपळ करायला सोपं.
तिचा परदेशात जाण्याचा, लग्न करून परदेशात सेटल होण्याचा प्लॅन आहे का? तसं असल्यास तुम्ही सीनियर स्पेशल प्रोजेक्ट बघा म्हणजे ती निवांत कुठेही जाऊ शकेल.

सिनियर स्पेशल प्रोजेक्ट ठीक आहे.पण मला (कधी न पाहिल्याने) जरा आर्थिक बाबींची शंका वाटते.म्हणजे सर्व खर्च अश्या प्रोजेक्ट मध्ये जास्त असतात का(म्हणजे थोडक्यात आणि स्पष्ट: फक्त nri मुलांचे पालक अफोर्ड करू शकतील का?)
एखादी जुनी, घरगुती, चांगली ये जा आणि सोसायटी बाहेर सर्व वस्तू , जवळपास किंवा सहज रिक्षा च्या अंतरावर हॉस्पिटल असलेली(माझ्या डोळ्यासमोर कोथरूड ची गुरू गणेश नगरी किंवा वात्सल्य नगरी सोसायटी येतेय हे लिहिताना) मिळाल्यास पण चालेल ना?

सिनियर स्पेशल प्रोजेक्ट >> यात फ्लॅट विकायचा झाल्यास सोसायटीला किंवा इतर सिनिअर सिटिझन्सनाच विकावा लागतो हे खरे आहे का? असे असल्यास भविष्यात फ्लॅट विकायचा ठरवला तर लिक्विडीटी कमी होऊन जाईल.

अमा
पुण्यात घेतलेले घर liability ठरू नये म्हणून सर्वांगीण विचार तुम्ही करत असालच. मी मला जाणवलेले मुद्दे लिहितो.
1 ) मुलगी मुंबईतच असणार कारण तिचे करियर तिथेच त्यामुळे पुण्याचा फ्लॅट नंतर अडकून सीताराम नको.
2) तुम्हाला आणि तिला भेटायला मुंबई पुणे 3 ते साडेतीन तास प्लस प्रवास होणार
3 ) डॉ मुंबईतला असेल तर तुम्हाला जाणे येणे प्रवास वेळ आणि खर्च दोन्ही वाढले
4) नवी मुंबई वै फ्लॅट मिळू शकेल का? मला रेट्स माहीत नाहीत option म्हणून बघतोय. असेही तुम्ही पुण्यात आल्यावर घराचा हप्ता देणार आणि मुलगी तिकडे रेंट भरणारच आहे. सेम नवी मुंबई किंवा जवळ पास घर असेल तर सेम स्थिती. ती तिच्या कामाच्या ठिकाणाच्या जवळपासच रेंट वर राहणार असेल तर. फक्त तुमचा प्रवास वेळ वै कमी होईल. भेटणे जास्त सोपे होईल का? मला मुंबईच्या ट्रॅव्हल चा अंदाज नाही म्हणून विचारले.

पुण्यात आलात पिंचित आलात तरी आनंदच आहे.
पण हा देखील विचार केला असेल नसेल म्हणून सुचवले.
_/\_

अनु, ज्येना फ्रेंडली सोसायटीज जरा चढत्या रेट्स चे असतात हे खरं आहे पण इतकेही उच्च नसावेत. मागे एकदा अथश्री बावधन मध्ये १ बिएचके काही ६० पर्यंत होता.

त्यांना पुण्याचा माहोल, पुण्याचा फील हवा आहे बालपण पुण्यात गेल्याने असं वाटतं.तसा मिळायला मिळू शकतोच मुंबईत.
ओके योकु, कळले.माझा असा समज होता की अथश्री मध्ये वगैरे राहणे हे बरेच प्रीमियम वृद्धत्व असेल तरच शक्य आहे.

अमा प्राइझेस च्या द्रुष्टिनेच बघत असाल तर नाशिकला ३५-४० लाखात तुम्हाला फार तर ५ वर्ष जुना खुप चान्गल्या एरियात किवा निट शोधल तर नविन सुद्धा फ्लॅट (२ बीएचके )मिळेल...मुबैची कनेक्टिव्हिटी चान्गली आहे.३-४ तासात मुबै गाठु शकता...नाशिक मधे सुद्धा उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत...नाशिक फार झपाट्याने डेव्हलप होतय त्यामुळे पुण्या सारख्या सोयि सुविधा तुम्हाला नाशिकलाही मिळु शकतिल..
हे फक्र वरचे खर्चाचे गणीत वाचुन लिहले आहे...नाशिकला घराची भाडी पण पुण्या-मुबैपेक्षा एकदम आटोक्यात आहेत त्यामुळे काहि दिवस रेन्टल करुन पटल तर पुढे जावु शकता...
एवढ लिहल असल तरी नाशिक पुण्या-मुबैइतक फास्टट्रॅक नाही त्यामुळे तो रिदम आवडत असेल तर इथे तो मीस कराल..

नाशिक पुण्या-मुबैइतक फास्टट्रॅक नाही त्यामुळे तो रिदम आवडत असेल तर इथे तो मीस कराल..>> नाही अगं ते सर्व मुलीचे अकाउ़म्ट आहे. मी म्हणजे आवश्यक काम करुन मग एका जागी पडून घरी आरामात.

अथश्री बावधन मध्ये १ बिएचके काही ६० पर्यंत होता.>> तळे गावला पण आहेत ह्या बजेटात.

पुण्यात शाळकरी मैत्रीणी नाते वाईक आहेत.

झक्या अरे पिंची तर माझे माहे र होते. आई आकुर्डी प्राधिकरणा त राहायची. पण माझी जीवन शैली वेगळी आहे. मी त्या एरिआत बघितलेत घरं.

लेकीला मनास येइनात

यात फ्लॅट विकायचा झाल्यास सोसायटीला किंवा इतर सिनिअर सिटिझन्सनाच विकावा लागतो हे खरे आहे का? ///

नाही. सीनियर सिटीझन नसलात तरी flat घेऊ शकता. भविष्यात वापरण्यासाठी किंवा पेरेन्ट्स साठी. आम्ही वयाच्या तिशीच्या आतच घेऊन ठेवलाय! पण तिथे राहण्यासाठी कुटूंबात एक तरी सीनियर सिटीझन असावा लागतो. म्हणजे भाड्याने घेतला तर निदान जोडप्यात किमान नवरा तरी सीनियर सिटीझन आहे असं काहीतरी आहे.
अजून एक म्हणजे परांजपे यांचा विशेष मुलांसाठी पण एक प्रोजेक्ट आहे. (अवांतरासाठी सॉरी अमा!). मतिमंद, ऑटिझम, डाऊन सिंड्रोम असलेली वगैरे मुलं, त्यांचे पालक यांच्यासाठी खास सोयी (डे केअर, ट्रेनिंग स्कुल, sensory garden) वगैरे. स्वानिकेतन नाव आहे प्रोजेक्टचं.

मी आधी लिहिले नव्हते पण आता नात्यातील व्यक्तीचा अनुभव लिहिते -
मुलं कॉलेजमधे असतानाच पुण्यात फ्लॅट घेवून ठेवला होता. पुण्यात नातेवाईक, स्वतःचे कॉलेज शिक्षणही तिथेच झाल्याने मोठा मित्रपरीवारही. स्वत:चे कार्यक्षेत्र वैद्यकीय व्यवसाय असल्याने ते नेटवर्कही मजबूत.
निवृत्त झाल्यावर रिअ‍ॅलिटी - मुलगा परदेशात, मुली मुंबईत स्थायिक., त्यांनाही त्यांचे व्यवसाय (एक मुलगी डॉक्टर) , नोकर्‍या यातून वारंवार पुण्याला धावत येणे शक्य नाही. नातेवाईकही वृद्ध झालेले, त्यांच्या मुलांचा कामाच्या वेळा बघता त्यांना स्वतःच्याच पालकांना आधार देणे कठीण जात होते. शेवटी पुण्याचा मोठा फ्लॅट भाड्याने देवून मुंबईला मुलींच्या जवळ छोटा फ्लॅट भाड्याने घेतला. मुलींचे कायम वास्तव्य मुंबई हे पक्के झाले तेव्हा मुलींना डाउनपेमेंटसाठी रक्कम गिफ्ट केली होती. लोन , हप्ते मात्र मुलगी-जावई जॉईंट आहे.

माझ्या पुण्यातच रहाणार्‍या कझिनने पुढे रिटायरमेंटसाठी अथश्रीत फ्लॅट घेवून ठेवलाय. नात्यातील ७५+ मंडळींना तो पर्याय पसंत नाही, त्यांना सवयीच्या परीसरात मदनीस ठेवून रहायला बरे वाटते.

१. रिटायरमेंटच्या पैशातुन हयातभर मॉर्गेज भरणे,
२. आपण भरत असलेल्या इएमआयचे घर मुलांच्या नावावर आपल्या हयातीत करणे,
३. मुलं रहाणार नसणार्‍या घराच्या कर्जात मुलांना सहभागी करुन घेणे- ज्याने त्यांची भविष्यात कर्ज घेण्याची ऐपत कमी होईल,
४. लहाणपणीच्या स्वप्नामागे जाणे हे पूर्ण होईल न होईल.

हे सगळे मला तरी रेड फ्लॅग वाटले. यातल्या प्रत्येकाचं उत्तर अर्थात व्यक्तीपरत्वे बदलेल त्याचा विचार करुन निर्णय घ्या.
मुंबईत हवं असेल तर ठाण्यात भाड्याने रहाणे किंवा पुण्यात भाड्याने रहाणे हे जास्त सोयिस्कर ऑप्शन ठरावे. या निमित्ताने आपल्याकडल्या चाळींचे (नावावर जाऊ नका, संपूर्ण भाड्याची इमारत, जी फक्त भाड्याची म्हणुनच कायम स्वरुपी वापरली जाईल... परदेशांत अपार्टमेंट असतात तशी) महत्त्व अधोरेखित होते. भाड्याचे घर सतत बदलावे लागू शकते ती टांगती तलवार जाणार असेल तर अद्ययावत रेंटल बिल्डिंग (चाळ) असण्यासारखे सुख नाही.
तुम्ही पुण्यात घर घेतलंत तर ९९% खात्री बाळगा ते मुलीला ओढणंच असेल. ती येऊन तिकडे कदापि रहाणार नाही, कारण तिचं काम तिकडे नाही. मुलांसाठी व्हेकेशन होम हे ही मिथ आहे, असं काही नसतं. बंद घरात दोन दिवसांची उस्तवार करण्यापेक्षा इतर ऑप्शन कायम सोयीचे पडतात.
तुम्हाला रहायचं असेल तर जरुर घ्या. व्हेकेशन होम. सेकंड होम या सबबीत स्वतःला फसवू मात्र नका. ती तुमची सोय असेल. तुम्हाला एक बेडरुम पुरणार असेल तर तितकंच घ्या. सहा महिन्यांनी मुलगी आली तर चार दिवस दोघी हॉटेलात जाऊन रहा. वर्षातील १० दिवस स्पेअर खोली वापरात येणार असेल, तर तेवढे दिवस मोठं घर सोयीचं का ३५५ दिवसांची सोय बघायची?

अमा, एक वेगळाच मुद्दा. जो आत्तापर्यंत चर्चेला आला नाही. माझ्या नात्यातल्या एका मुलीचे उदाहरण देते.
मुलगी एकुलती एक. बँकेत नोकरी. आईवडील कायम भाड्याच्या घरात. भाड्याच्या किंमती वाढू लागल्या तशी मालकांची कुरबूर वाढ्ली. मुलीनी बँकेचं लोन घेऊन १बीएचके घेतला. लग्नाचं बघायला लागल्यावर प्रश्न आला. काही मुलांनी नकार दिला. काहींना जागेची गरज होती तेव्हा तिच्या नावावरचे कर्ज खुपले. कारण पुढील काही वर्षे तरी तिला पुन्हा कर्ज मिळाले नसते. तिचं भाग्य थोर की तिला स्वतःचं घर असलेला नवरा मिळाला.
तुमच्या मुलीचे लग्न ठरले नसेल आणि भविष्यात तिला व तिच्या नवर्‍याला जॉईंट नावावर कर्ज घ्यायचे झाल्यास अडचणी येऊ शकतात.

तसंच रिटायर्ड लाइफ पुण्यात घालवायचे असेल तर पूर्ण तिथल्याच होऊन का नाही राहात? जिथे राहणार तिथलीच वैद्यकीय सेवा घेणे आवश्यक आहे असे मला तरी वाटते.
तुमचे हे मिशन तुमच्या मनाप्रमाणे पार पडो हीच सदिच्छा.

चांगली चर्चा चालु आहे

तसंच रिटायर्ड लाइफ पुण्यात घालवायचे असेल तर पूर्ण तिथल्याच होऊन का नाही राहात? जिथे राहणार तिथलीच वैद्यकीय सेवा घेणे आवश्यक आहे असे मला तरी वाटते.>> +१ आमच्याच घरचे उदाहरण. वडिल पुर्ण वेळ मुंबईत काम म्हणुन मुंबईत राहात होते, त्यामुळे वैद्यकिय सेवा पण मुंबईत. मागच्या वर्षी वयाच्या ८० व्या वर्षी निव्रुत्त होउन पि चि मध्ये आले. कारण सगळे जवळचे नातेवाईक पुण्यात आहेत. इथे आल्यावर वैद्यकिय सेवा सगळ्या पुण्याच्या घ्यायला चालु केल्या. ते सोपे जाते. ह्याच धाग्यावर आमच्या अनुभवावरुन लिहले होते की पुण्यात चांगल्या व स्वस्त सेवा आहेत.

हा मुद्दा अगदी बरोबर. रोम मध्ये असतांना रोमनांसारखे राहावे.
नव्या ठिकाणांची माहीती व्हायला फारतर ६ ते ८ महिने लागतात. मग मुरतेच लोणचं. मुळात अमांना पुणं नवं नसल्यानी अजूनच सोपं होईल.

तुमच्या मुलीचे लग्न ठरले नसेल आणि भविष्यात तिला व तिच्या नवर्‍याला जॉईंट नावावर कर्ज घ्यायचे झाल्यास अडचणी येऊ शकतात. >>>
हा पॉईंट महत्वाचा आहे. मुलीला नवऱ्यासोबत जॉईंट लोन घ्यायचे असेल तर एक्झिस्टिंग प्रॉपर्टी विकू शकते. पण इथे अमा राहणार असल्यामुळे मी त्यांच्या लीगल हिश्श्याचा विषय लिहिला होता. जर त्यांचे आर्थिक काँट्रीब्युशन असेल तर घर विकताना त्यांची आयदर आर्थिक ऑर राहण्याची कायमस्वरूपी सोय झाली पाहिजे.

एक पॉईंट असा आहे की मुलगी नुकतीच वर्क फोर्स मध्ये आली असेल तर तिचे अर्निंग पोटेन्शिअल झपाट्याने वाढत जाऊ शकते आणि लोन अमाऊंट आवाक्यात असेल तर लवकर प्रीपेमेन्ट करून अमा + मुलगी मॉर्टगेज फ्री घराच्या मालक होऊ शकतात. अर्थात त्यासाठी थोडी फार प्रुडंट लाइफस्टाइल गरजेची ठरेल. व ती अडजस्टमेन्ट करायची दोघींची तयारी आहे का हे ही महत्वाचे.

थोडेसे अवांतर :
थँक्स टू हौसिंग मार्केट, आत्ताची मुलेही प्रॅक्टिकल असतात. नवऱ्याने बायकोच्या मालकीच्या घरात राहणे टॅबू राहिले नाही. ही संख्याही वाढणार आहे. सिंगल मुलीने/बायकोने स्वतः पूर्णपणे आर्थिक काँट्रीब्युशन करून घर घेणे हे माझ्या पिढीतच सुरु झाले आहे. प्लस महिलेच्या नावाने पहिलेच घर असेल तर भारतात काही अनुदानही मिळते. बहुतेक आर्थिक स्थितीवर अवलंबून असावे.

सर्वांचे अनेकानेक धन्यवाद. मी एकटीने विचार करुन काही करण्यापेक्षा इतकी मते मिळाली. त्यामुळे सध्या निर्णय लांबणी वर टाकला आहे. फारच पुण्याची आठव ण आली तर पुणे मॅरिअट मध्ये दोन दिवस राहीन व रिक्षाने फिरून जुन्या जागा बघे न. एक वनाज ते सिविल कोर्ट मेट्रो राइड पण बकेट लिस्टीत आहे. पुणे प्रेमिकांसाठी खालील कविता. जयेश पवार ऑफिशिअल २०१० ह्या इन्स्टा अकाउंट वरुन साभार शेअर.

समुद्र माझ्या पुण्यात नाही हर कत नाही.
पुण्यात खार ट असा किनारा हवा कशाला.

हिच्या मिठीला तिचा शहारा हवा कशाला.
मनात इतका जुना पसारा हवा कशाला.

पुण्यात समुद्र आहे आणि किनाराही आहे. फक्त ते एकमेकांपासून थोडे लांब आहेत. Wink

https://maps.app.goo.gl/XZzmbfLWZznXBV6S8
https://maps.app.goo.gl/VUqX3KdPDYLj67ga7

अमा, तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी शुभेच्छा Happy

वावे Lol
शिर्डी आणि तिरुपती सुद्धा आहेत पुण्यात

Pages