पुणे/ नाशीक येथे २ बी एच के फ्लॅट विकत घेणे आहे. माहिती द्या.

Submitted by अश्विनीमामी on 29 January, 2024 - 02:40

तर मं डळी पुणे किंवा नाशीक येथे २ बीएच के २ रेस्ट रूम वाला फ्लॅट विकत घेणे आहे. जाणकार माहिती द्या.
१) कोणता एरिआ चांगला? मुंबई हून कॅब ने आरामात येता यावे. व मला ट्रीटमेंट ला ह्या घरातून मुंबईस जावे लागेल. ते जमावे.
२) काय कागद पत्रे जमवावी?
३) होम लोन कुठून घेउ?
४) माझी गरज ७५० - १००० स्क्वे फूट आहे. अगदीच अंधेरी स्टाइल बारका नाका एव्ढा फ्लॅट नको.
५) इन्स्टा वर फार जहिराती येतात पण त्या खर्‍या असतात का?
६) अजून काय विचारावे बिल्डर ला/ री सेलर ला?
७) मला रीसेल/ रेडी टू मुव्ह इन फ्लॅट हवा आहे. नव्या स्कीम नको. साइट वरौन माहिती विचारले की हजारो फोन व मेसेजेस येत राहतात.

तुमच्या काही सूचना असल्यास नक्की लिहा. मला मदतच होईल. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिर्डी आणि तिरुपती सुद्धा आहेत पुण्यात >>> वैष्णोदेवी पण आहे म्हणे. साबा जाऊन आल्यात.

अमा >>> शुभेच्छा. निर्णय घ्याल तेव्हा स्टुडिओ अपार्टमेन्टचा विचार करा. साधारण एक वर्षांपूर्वी पाषाण भागात जाहिरात पाहिली होती.

शिर्डी आणि तिरुपती सुद्धा आहेत पुण्यात >>> वैष्णोदेवी पण आहे म्हणे. साबा जाऊन आल्यात.>> मी जरा वेगळी म्हातारी आहे. पूर्ण वेळ वायफाय
सपोर्ट हवा. सोशल इंटर अ‍ॅक्षन फार नको. ते पुणेरी क्लास लावणार उत्साही म्हातारे डोक्यात जातात. कमीत कमी दोन फोन. पडी मारायची सुखद व्यवस्था हवीच. आजच मस्त नव्या गाद्या ऑर्डर केल्यात ड्रॉइन्ग रूम साठी. जुने सोफे फेकून देणार.
फूड ऑन डिमांड. (ऑर्डर करते) आमचे देउळ एकच. पांचाळेश्वर डे. जी. मज्जानु लाइफ. माझा प्रभात रोड कर्वेरोड. लक्ष्मी रोड नी नारायण पेठ. एफ सी रोड नी वैशाली. क्यांप. पुना में हमे जगह मिले ना मिले. हमारे दिल में तो सिर्फ और सिर्फ पुणे ही है. जब तक है जां. हार्ट इमोजी.
बाफ बंद करण्यास हरकत नाही.

तुम्ही यंग @ हार्ट आहात हे तुमच्या माबोवरील एकंदर वावरामुळे समजतेच Happy आणि ते खरेच कौतुकास्पद आहे.

ते वैष्णोदेवी वगैरे आपलं इतरांसाठी

द्वारका परेडाईझ बहुतेक लोटस हॉस्पिटल लेन मध्ये आहे.ऑफिस च्या वेळात थोडा ट्रॅफिक चा त्रास असू शकतो कारण हा रस्ता मुख्य रस्त्याला चिकटून थोडा साईड लेन आहे.पण सर्व ठिकाणांना चांगला एक्सेस आहे.बाहेर पडल्यावर डे केअर्स ची मोठी रांग, विजय सेल्स, राधिका, जॉकी शोरूम्स आहेत.चॅलेंजर पब्लिक स्कुल एकदम जवळ आहे.अगदी उठसूट सगळीकडे कार घेऊन बाहेर निघायचं नसल्यास चांगली सोसायटी.

Pages