पुणे/ नाशीक येथे २ बी एच के फ्लॅट विकत घेणे आहे. माहिती द्या.

Submitted by अश्विनीमामी on 29 January, 2024 - 02:40

तर मं डळी पुणे किंवा नाशीक येथे २ बीएच के २ रेस्ट रूम वाला फ्लॅट विकत घेणे आहे. जाणकार माहिती द्या.
१) कोणता एरिआ चांगला? मुंबई हून कॅब ने आरामात येता यावे. व मला ट्रीटमेंट ला ह्या घरातून मुंबईस जावे लागेल. ते जमावे.
२) काय कागद पत्रे जमवावी?
३) होम लोन कुठून घेउ?
४) माझी गरज ७५० - १००० स्क्वे फूट आहे. अगदीच अंधेरी स्टाइल बारका नाका एव्ढा फ्लॅट नको.
५) इन्स्टा वर फार जहिराती येतात पण त्या खर्‍या असतात का?
६) अजून काय विचारावे बिल्डर ला/ री सेलर ला?
७) मला रीसेल/ रेडी टू मुव्ह इन फ्लॅट हवा आहे. नव्या स्कीम नको. साइट वरौन माहिती विचारले की हजारो फोन व मेसेजेस येत राहतात.

तुमच्या काही सूचना असल्यास नक्की लिहा. मला मदतच होईल. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

औंध - budget वाढेल>> हो लेकीच्या मैत्रीणीचा तिथे बंगला आहे. एरिआ मस्त आहे. वाकड हिंजेवाडी, बाणेर बघत आहे.

अमा
तुम्हाला पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवड हद्दीत भूमकर चौक, किवळे, पुणावळे, वाकड ह्या area मध्ये मुंबई जाणे येणे साठी सोयीस्कर आहे. हायवेपासून थोडं आत चालत असेल तर रावेत बेस्ट.
पुण्यातही उत्तम ट्रिटमेंट मिळू शकेल. त्या दृष्टीनेही विचार केलात तर area कोणता हे नंतर सोयीने ठरवू शकता.
एक constraint निघून जाईल.
मी वर उल्लेख केलेल्या एरिया मद्धे under construction भरपूर प्रॉपर्टी आहेत. रेडी टू मूव्ह मिळतील पण एजंट पकडावा लागेल.
लोन साठी HDFC बेस्ट. कमी त्रासात घरपोच सेवा.

बाकी साईट वर inquiry टाकली की हजार फोन येतात ह्याला सहमत. तुम्ही वाकड साठी inquiry केली असेल तर मुंढवा कोंढवा undri पिसोळी त्या बाजूचेही प्रॉपर्टी डीलर फोन करतात.

तुम्हाला पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवड हद्दीत भूमकर चौक, किवळे, पुणावळे, वाकड ह्या area मध्ये मुंबई जाणे येणे साठी सोयीस्कर आहे. हायवेपासून थोडं आत चालत असेल तर रावेत बेस्ट.>> नक्की चेक करते.

अमा, हायवे आणि बी आर टी बस स्टेशन पासून जवळ ही अट असेल तर या सोसायटी बघा मॅजिक ब्रिक वर रिसेल फ्लॅट साठी:
1. द्वारकाधीश(शिवार गार्डन चौक)
2. लॉर्ड्स (शिवार गार्डन)
3. आकाशगंगा/रॉयल इंपिरिओ (कोकणे चौक जवळ)
4. साई ओझोन (वाकड, मुंबई पुणे हायवे सी सी डी जवळ)
5. ईशा फुटप्रिंट (या गल्लीत सर्व शाळा आहेत.मुंबई पुणे बस चा हायवे स्टॉप 100 मीटर वर)
6. पार्क स्ट्रीट (मोठी सोसायटी, शिवराज नगर बी आर टी स्टॉप समोर, मुंबई पुणे हायवे पासून साधारण 7 किलोमीटर)
7. कल्पतरू पिंपळे गुरव(बी आर टी बस स्टॉप अगदी जवळ, रिक्षा मिळतात,पिंपळे गुरव मुख्य बस स्टेशन 10 मिनिट अंतरावर, कासारवाडी मेट्रो स्टेशन 1.5 किलोमीटर
8. कुणाल आयकॉन(पिंपळे सौदागर), सर्व महत्वाची दुकाने आणि मार्केट अगदी जवळ.रिक्षा पटकन मिळतात.
9. साई ऑर्किड पिंपळे सौदागर
10 राधाई नगरी पिंपळे सौदागर
11. नम्रता मॅजिक पिंपळे सौदागर
12 एल्मवुड पिंपळे सौदागर
13 तुषार गार्डन, नॅचरल आईस्क्रीम पाशी पिंपळे सौदागर

गुगल मॅप वर शोधल्यास सोसायटी फोटो आणि रिव्ह्यूज मिळतील.

अजून नावं सांगते.शक्यतो ओनर टू ओनर,99 एकर्स किंवा मॅजिक ब्रिक वरून संपर्क साधा, इंस्टा फेसबुक अजिबात नको

माझ्या बायकोचा हाच व्यवसाय आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे व अन्य माहितीही मिळतील. विपु त फोन नं देतो.

माझा पयला पैसा - पुण्यात अगदी कुठल्याही रेंज चे फ्लॅट्स मिळतात (रीड - पायलीचे पन्नास). सहज. मुंबई सारखी घाई नक्कीच नसते. अपवाद - खूपच प्राईम लोकेशन आणि/किंवा नावाजलेला बिल्डर इ.
शक्यतो सगळ्या मेडिकल सुविधा इथेही आवाक्याच्या अंतरात अव्हेलेबल आहे. लक्षात घेण्याजोगा मुद्दा - अंतर. सर्वीस अव्हेलेबिलिटी शक्यतो सगळीकडे आहे.
तर - शक्यतो रिसेल चा फ्लॅट नको. अगदीच मन असेल एखाद्यावर तर सोसायटी / बिल्डिंग फारतर ५-७ वर्ष जुनी ठीक. नपेक्षा नवीन बांधकाम कधीही चांगले.

धन्यवाद सर्वाम्चे . प्रकाश विपू नक्की करा.

अनु धन्यवाद फारच डिटेल वारी माहिती. शाळांचे काही मला लागणार नाही. ह्या वरशात हे मार्गी लावलेच पाहिजे.

एच डी एफ सी लोन द्यायला फारच मागे लागले आहेत.

साई विस्टा, रहाटणी, पिंपळे सौदागर - ही नवीनच सोसायटी आहे. त्यामुळे रेडी पझेशन फ्लॅट मिळेल कदाचित. याचा अप्रोच रोड थोडा नॅरो आहे. पण मुंबई पुणे हायवे पासून फार लांब नाही.

एस बी आयवाल्यांबरोबर deal करण्याची सवय/तयारी असेल तर एस बी आय मध्ये पण लोन ट्राय करू शकता. त्यांची आणि बँक ऑफ बरोडावाल्यांची मॉड बॅलन्स फॅसिलिटी चांगली आहे. त्यात तुम्ही ई एम आय पेक्षा जास्त पैसे त्या अकाउंट मध्ये ठेवू शकता व गरज लागल्यास ई एम आय डेटच्या आधी आवश्यक तेव्हढे पैसे ठेवून एक्स्ट्रा पैसे काढून घेऊ शकता. पण BoBचा बाकीचा अनुभव खास नाही

फ्लॅटची चौकशी करताना बिल्डरच्या ऑफिसमध्येच विचारा कोणत्या बँकांची लोन्स झाली आहेत त्या बिल्डिंगसाठी. त्यांना माहिती असतेच.

मुंबईत पब्लिक ट्रांन्सपोर्ट खास करुन बस्/ रिक्षा वापरत असल्यास रहाटणी, पिंपळे सौदागर, वाकड मध्ये सुरवातिला काही दिवस कठीण जातिल. फक्त ओला /उबर वापरत असल्यास काही फरक जाणवणार नाही. स्कुटर चालवता येत असल्यास उत्तम. वाकड/चिंचवड वरुन नवी मुंबई शिवनेरीने ने २ तासात. कॅबने आजुन कमी वेळ लागेल.

शक्यतो सगळ्या मेडिकल सुविधा इथेही आवाक्याच्या अंतरात अव्हेलेबल आहे. >> +१ ते ही स्वस्तात. स्पेशलिस्ट , हॉस्पिटल पण सगळ्या भागात उपलब्ध ते ही मुंबई पेक्षा कमी दरात.

Mantra meraki आकुर्डी
हे ताबा डिसेंबर मध्ये देणार आहेत

स्पेशलिस्ट , हॉस्पिटल पण सगळ्या भागात उपलब्ध ते ही मुंबई पेक्षा कमी दरात.
>>> मला पुण्यातले हॉस्पिटलायझेशन खर्चिक वाटते मुंबईच्या मानाने.
प्लस पॉईंट हा की ऍडमिट व्हायची वेळ आली तर निदान रूम म्हणण्याइतपत रूम्स असतात, मुंबईसारखी कबी होल्स नसतात. त्यामुळे सोबतच्या माणसाचे हाल होत नाहीत.
हे फारच विषयांतर होत असल्यास माफ करा अमा.

हॉस्पिटल/ डॉक्टर रादर सगळंच पुण्यात महाग आहे - मुंबईच्या तुलनेत असं मलाही वाटतं.
मुंबईत मम वाढलो आणि पुण्यात पैसे कमावू लागल्यावर राहिलो त्यामुळे रहाणीमानातला/ असणार्‍या माहितीतला/ आजुबाजूच्या लोकांच्या रहाणीमानातला फरक हा ही मुद्दा असेल थोडाफार.

गृहकर्ज देताना देणारी बँक Tenure वयाच्या हिशोबाने आणि नोकरीची बाकी वर्षे किती उरलीयत हे बघते.
स्वतःच्या नावावर गृहकर्ज घेणार असल्यास हा ही मुद्दा तपासून/त्यांच्याशी बोलून बघा..

मंत्रा मेराकी आकुर्डी हे त्यांना बायपास रोड हुन लांब आहे.
जुन्या मुंबईपुणे हायवे लगत आहे. लोकेशन चांगले पण त्यांचा purpose solve होईल का हा doubt.
भक्तीशक्ती स्टॉप वर गेले की शिवनेरी शिवशाही मुंबईकडे जाणाऱ्या मिळतात इथून.

डायरेक्ट investment करण्यापेक्षा रेंट वर राहून अंदाज घ्या.
वाकड, पिंपळे सौदागर रोजच्या राहणीमानासाठी महाग तर आहेतच पण medical facility तितक्या उत्तम नाहीत. रावेत आणि इतर उपनगरे अजून develop होत आहेत.
त्यापेक्षा तुम्ही तुम्हाला हवी असणारी treatment पुण्यात कुठे मिळेल ते शोधून घ्या. त्यासाठी सुरुवातीला रेंट वर राहणे बरे पडेल.
स्थायिक होणार असाल तर शक्यतो रोजचा भाजीपाला, किराणा, अडीअडचणीला घरगुती जेवणाचे डबे, इमर्जन्सी ला जवळ हॉस्पिटल अशा गोष्टींचा विचार करून ठेवा. जर area आवडला की तिथे /आसपास नवीन/resale फ्लॅट बघू शकता.
मुंबईला जवळ पडण्याचा constraint ठेवला नाही तर योग्य जागा ठरविणे सोपे जाईल.

१) कोणता एरिआ चांगला? मुंबई हून कॅब ने आरामात येता यावे. व मला ट्रीटमेंट ला ह्या घरातून मुंबईस जावे लागेल. ते जमावे.
>>> माझी चॉईस - रावेत, गहुंजे, पाषाण, सुस
२) काय कागद पत्रे जमवावी?
>>> इनकम टॅक्स रिटर्न्स, इनकम प्रूफ, ID प्रूफ्स, CIBIL score आणि रिपोर्ट. अजून इतर डॉक्युमेंट लागतील पण ती लोन एजेंट किंवा बँक सांगू शकेल
३) होम लोन कुठून घेउ?
>>> माझी चॉईस - SBI, यांचे Max Gain नावाचे प्रॉडक्ट आहे. (Overdraft अकाउंट आहे). दुसऱ्या क्रमांकाला BoB, तिसरी पसंती HDFC
४) माझी गरज ७५० - १००० स्क्वे फूट आहे. अगदीच अंधेरी स्टाइल बारका नाका एव्ढा फ्लॅट नको.
>>> पुण्यात या आकारमानाचे फ्लॅट असतात. तुमचे बजेट, तुम्ही सिलेक्ट केलेला शहराचा एरिया यावर किंमत ठरेल.
५) इन्स्टा वर फार जहिराती येतात पण त्या खर्‍या असतात का?
>>> हो, फक्त तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल, builder तपासून घ्यावा लागेल (महारेरा वर प्रोजेक्ट नंबर ने पूर्ण माहिती मिळते)
६) अजून काय विचारावे बिल्डर ला/ री सेलर ला?
>>> क्लिअर टायटल, पूर्वीचे लोन, जागेवर कुठले आरक्षण आहे कि नाही, जागेतून/शेजारून कुठला DP जातोय का. माझ्या बघण्यात एक सोसायटी आहे, कन्स्ट्रक्शन झाल्यावर सोसायटी च्या मधोमध ४४०KV ची इलेक्ट्रिकल लाईन गेली. अगदी मधेच एक मोठा पिलोन उभा केला गेला Sad
७) मला रीसेल/ रेडी टू मुव्ह इन फ्लॅट हवा आहे. नव्या स्कीम नको. साइट वरौन माहिती विचारले की हजारो फोन व मेसेजेस येत राहतात.
>>> वर एका प्रतिसादात लिहिले तसे एरिया नुसार गुगल मॅप चेक करा किंवा महारेराच्या वेबसाईटवर चेक करा. तिथे तर बिल्डिंग/अपार्टमेंट मधील फ्लॅट कुठल्या रेंज मध्ये विकल्या जात आहे याची सुद्धा माहिती मिळेल

कारलेस,अधून मधून पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणारे सिनियर सिटीझन राहणार असतील तर शक्यतो गहूनजे, मारुंजी,म्हामुरडी,पुनवळे,लोढा बेलमंडो,उंदरी नको.या एरियांचा अजून खाजगी वाहनांवर डिपेंडन्स जास्त आहे.कॅब रिक्षा मिळतात पण कधीकधी त्रास होतो.
वाकड ते हिंजवडी एरिया चालणार असेल तर रॉयल मिराज, अटलांटा. एकदा मेट्रो झाल्यावर इन्फ्रा वाढेल(2024 एन्ड)
बावधन,वाकड,पिंपळे सौदागर, बालेवाडी,पाषाण, थोडं लांब चालणार असेल तर सन सिटी.बाकी पब्लिक ट्रान्सपोर्ट ची कमी फ्रिक्वेन्सी, गर्दी हे सगळीकडे आहे.'मुंबई ला जायला जवळ' क्रायटेरिया असेल तर वाकड बेस्ट.थोडं अंतर चालणार असेल तर मग एम एच 12 मध्ये बाणेर पाषाण बावधन पर्याय आहेतच.
जगताप डेअरी चौकाजवळ ऐश्वर्यम ग्रीन्स ही सुद्धा चांगली सोसायटी आहे.276 नंबर बस(चिंचवड गाव ते वारजे माळवाडी) दर 20 मिनिटांनी असते आणि पुण्यात जायचे काही पॉईंट(पॅव्हेलीयन मॉल, रत्ना हॉस्पिटल,नळ स्टॉप) कव्हर करते.

ईथे स्वतः गाडी चालवत असल्यास सगळ्याच गोष्टी अगदी सोप्या होतात. पायी जाण्याच्या अंतरावर गोष्टी नाहीत असं नाही पण पब्लिक ट्रांसपोर्ट वर १००% भरवसा ठेवून पुण्यात राहाणं कठीण. स्वतः ची अटलीस्ट दुचाकी (३-५ किमीमध्ये जायला उदा. ग्रोसरी, भाजी, पोस्ट, कुरिअर इ.), ओला-उबर (कुठे कुणाकडे जरा लांब जायला) आणि पीएमपी बस-ऑटो (पेठातल्या गल्ल्यांमध्ये फिरायला इ) हे कॉम्बो बेस्ट पडतं.

रिक्षावाले मेट्रो च्या वेळा बघून योग्य कनेक्शन्स करणार म्हणत आहेत.बघू 2025 ला पुण्याचं मुंबई होतं का.मुंबई ला कार घेणारे, चालवणारे वाढल्याने मुंबई चं पण पुणं होईल.

रिटायर झाल्यावर (आणखी पाचेक वर्षांनी) रहाण्यसाठी उंदरी कसे आहे ? एकदोन नातेवाईकांनी घेतले आहेत व रहातही आहेत म्हणून मोह होतोय.

उंदरी ला खूप चांगल्या टाऊनशीप सोसायटी आहेत क्लोवर हायलँड वगैरे.nibm चौक,बिबवेवाडी, कॅम्प कनेक्टिव्हिटी चांगली.पब्लिक ट्रान्सपोर्ट बहुधा नसावा.पण आजूबाजूला सर्व चांगली दुकानं जवळ मिळतील.
फक्त कुठेही येताना मधला कोंढवा एरिया ट्रॅफिक साठी बराच गडबड आहे.

नाशिकच कुणीच लिहल नाहि म्हणून
कॉलेज रोड्,गन्गापुर रोड, सिटी सेन्टर मॉल जवळ हे सगळे प्राइम एरिया आहेत
गोविन्द नगर, इन्दिरानगर ह्याची हायवे कनेक्टव्हिटी एकदम चान्गली आहे...
बाकी अद्द्यवायत हॉस्पिटल आहेतच...अशोका,व्होकार्ड इत्यादी.
ओला,उबेर, इतर फुड हब, मॉल सगळे चान्गले डेव्हलप झाले आहेत..

Pages

Back to top