Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओश्कु बेबी ला ओडीन दादा कडून
ओश्कु बेबी ला ओडीन दादा कडून खूप शुभेच्छा
हॅप्पी वाला बर्थडे
ओश्कुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ओश्कुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
इन्स्टावर बघितलं.
ओश्कुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ओश्कुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
अरे वा एकदम क्युट फोटोज आहेत
अरे वा एकदम क्युट फोटोज आहेत सगळे.
हॅपी बर्थडे ओश्कु...
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/C2ZUxxstdPv/?igsh=MWpjY3RlNWE0OGw5cw==
आमचं 32 किलोचं बाळ
नशिबवान म्हणू शकतो तुम्हाला …
नशिबवान म्हणू शकतो तुम्हाला … थोडं वजन ऊचलावं लागतंय …
आमचा हिरोतर अजीबात ऊचलू देत नाही… त्याला हाईट फोबीया आहे …. अर्थतात ९० पाऊंड ऊचलायची ईच्छापण नाही
हॅपी बर्थडे ऑश्कु
हॅपी बर्थडे ऑश्कु
अबब बीग बेबी ओडीन
सॅमी स्नोफॉल पाहताना
कोण क्लिक करतंय मला
परवा तिला नवीन बेड आणला पण ती झोपतच नाही त्यात. खूप युक्त्या केल्या तिची आवडती ओढणी, खेळणी ठेवून पाहिली. पण वास घेण्यापलिकडे काहिच नाही. अगदी त्याच्या शेजारी फरशीवर झोपेल पण त्यात नाही. मुलीने शेवटी कंटाळून झोप आता इथे तिथे होमलेस सारखी, चांगलं करतोय तुझ्यासाठी काही किंमत नाहीये वगैरे आता काही लाड नाही तुझे वगैरे ऐकवलं आणि येताना दुकानातून तिचं आवडीचं वेट फूड आणलं सकाळी ओरडली म्हणून.... :डोक्यावर हात मारणारी बाहुली:
अंजली, मला आज सकाळीच सॅमीची
अंजली, मला आज सकाळीच सॅमीची ( खरं सांगायच तर मंकीची ) आठवण आली होती की खूप दिवसांपासून तुझी पोस्ट नाही... आणि या धाग्यावर हा तुझा प्रतिसाद वाचला..
ओह धनवंती! टेलिपथी... हो ना
ओह धनवंती! टेलिपथी... हो ना मंकी ला जाउन या अप्रिल ला १ वर्ष होईल
त्याच्यासारखा प्रेमळ बोका नव्हता पाहिला कधी.. फार लवकर गेला.
ज्यांचा विश्वास आहे अॅनिमल कम्युनिकेटर बद्दल त्यांना जस्ट एक अपडेट मंकीबद्दल (लिहू का नको कळत नव्हते) पण आज विषय निघाला म्हणून थोडक्यातः
मंकी गेल्यावर फार अस्वस्थ वाटून मी एकीशी संपर्क साधला होता की आम्ही योग्य ती ट्रिटमेंट देऊ शकलो नाही किंवा जे त्या वेळी सुचले ते केले गेले याबद्दल सारखं गिल्टी वाटत होतं. म्हणून एकदा बोलून बघायचं होतं. तिने त्याच्याशी संवाद साधून खूप आश्वासक आणि बर्यापैकी करेक्ट उत्तरं दिली. त्यामुळे आनंद वाटला की मंकी दुसरं आयुष्य छान जगत आहे. तिच्याशी खूप बोलला तो मजेमजेचं. म्हटली खूप बोलका आहे गं. मजा वाटली मलाच संवाद साधायला. मी त्याच्या काहीच सवयी किंवा कोणतीच जास्त माहिती दिली नव्हती. पण बरंचसं बरोबर निघालं. खात्री झाली की तो मजेत आहे
ओहह, हे खरंच असतं का असं
ओहह, हे खरंच असतं का असं
मी ऐकून होतो असं काही, व्हिडीओ पण पाहिले काही
पण विश्वास नव्हता बसत की असे कसे असू शकेल
आता हे वाचून थोडं थोडं वाटू लागलं आहे की काहीतरी असेल जे आपल्याला कळत नाही
माहित नाही आशूचँप पण त्या
माहित नाही आशूचँप पण त्या वेळी कुठल्यातरी हळव्या क्षणी असंच वाटून गेलं आणि फारच लो वाटत होतं म्हणुन तो एक मार्ग निवडला होता.
ज्याच्या त्याच्या विश्वास ठेवण्यावर आहेत या गोष्टी.
आशुचँप — काय वाचताय, कुठे
आशुचँप — काय वाचताय, कुठे वाचताय ईथे शेअर करता येईल का?
मला वाटते तसे मायबोलीकर कविन
मला वाटते तसे मायबोलीकर कविन ही एनिमल कम्युनिकेटर म्हणून काम करते
हो, कविनने मला पण बर्याच
हो, कविनने मला पण बर्याच वेळेस मदत केलीय स्नोई साठी.
<< मी त्याच्या काहीच सवयी किंवा कोणतीच जास्त माहिती दिली नव्हती. पण बरंचसं बरोबर निघालं. >> हाच अनुभव मला पण आला.
कविनने मला पण बर्याच वेळेस
कविनने मला पण बर्याच वेळेस मदत केलीय स्नोई साठी. <<>>>>> कविन तर माझी हक्काची कम्युनिकेटर आहे थिओ साठी.
आशुचँप — काय वाचताय, कुठे
आशुचँप — काय वाचताय, कुठे वाचताय >>>> हरितात्या बहुतेक ते मी लिहिलेला अनुभव वाचून असं म्हणत आहेत.
हो
हो
होय, मला वाटतंय कि मी एनिमल
होय, मला वाटतंय कि मी एनिमल कम्युनिकेटर बद्दल मिस केलंय या धाग्यावर. कुणी माहिती किंवा लिंक देता का?
ओड्या आज वाचलाय थोडक्यात....
ओड्या आज वाचलाय थोडक्यात....
मागे अंगणात मांजर येतं आमच्या, आणि या दोघांची जानी दुष्मनी आहे. ते आलं की हा धावून जातो आणि ते पळून पत्र्यावर उडी मारतं... इकडे हा भुंकत बसतो...
पण आज त्या मांजराचा कसा माहीती नाही पण अंदाज चुकला किंवा ओड्या नेहमीपेक्षा जास्त चपळपणे गेला. ते जिन्याच्या कोपऱ्यात सापडलं, आणि कोंडीत सापडल्यावर त्याने सगळी मांजरं करतात तेच केलं, फिस्कारून ओड्यावर पंजा मारला. आम्ही धावत गेलो तर नशिबाने ओड्याला कुठं लागलं नव्हतं त्यानेही झुकांडी दिली, त्यामुळे डोक्याच्या वरती, टाळूवर अगदी ओझरता व्रण दिसला, कुठं ओरखडा, रक्त नाही.
म्हणलं नको ना तिच्या मागे लागू, महागात पडेल, पण तो इतका चिडला होता की आवरतच नव्हता. म्हणजे मला वाटलेलं तो घाबरुन आत पळून येईल पण तो अजून जोरात अंगावर गेला....
मांजर पण वाचलंच म्हणायचं थोडक्यात....
आता हे नविनच सुरु झालंय, दोघांनाही शांततेत बसून सांगितलं तरी काही कळत नाही....
नशीब डोळ्यावर नाही फटका लावला
नशीब डोळ्यावर नाही फटका लावला.
मला तीच भिती वाटली, म्हणलं
मला तीच भिती वाटली, म्हणलं हकनाक काहीतरी उद्योग, नाक, डोळे फार सेन्सेटीव्ह असतात
माकडाला हे कळतच नाही, किंवा कळत असेल पण त्या मोमेंटला त्याला कशाची पर्वा नसेल
एरवी मस्त आळशी, सुस्त, लाडावलेला कणकेचा गोळा असतो. पण अशा वेळी बरोबर त्याचं अॅनिमल इन्स्टिंक्ट जागं होतं...
बरं ते मांजर घरात पण येत नाही, ते फक्त अंगणात असतं, तिथं काही नसतं खायला, चोरायला, पळवायला....
पण नाही म्हणजे नाहीच....
अरेरे! लक्षच ठेवायला हवंय मग.
अरेरे! लक्षच ठेवायला हवंय मग..
अरे देवा ! थोडक्यात निभावल की
अरे देवा ! थोडक्यात निभावल की...बाय द वे तुम्ही दोघाना म्हणजे कुणाला शान्ततेत बसुन सान्गितल?मला फार उत्सुक्तता आहे की तुम्ही काय सान्गता नक्की?
बाय द वे तुम्ही दोघाना म्हणजे
बाय द वे तुम्ही दोघाना म्हणजे कुणाला शान्ततेत बसुन सान्गितल?मला फार उत्सुक्तता आहे की तुम्ही काय सान्गता नक्की?>>>>
ओड्याला आणि मांजराला....की तुम्ही आता शहाण्यासारखे वागा म्हणून...
भांडण करू नका, मारामारी करू नका..ओड्याला सांगतो ते मांजर काही चोरत नाही, मांजराला सांगतो ओडीन जागा असताना येऊ नकोस, तो चिडतो वगैरे वगेरे
ओड्या जरा तरी लक्ष असल्याचे दाखवतो, मांजर डांबिस आहे, ते निवांत अंग चाटत राहतं, हा तु बोलत रहा म्हणत....
अरेरे! लक्षच ठेवायला हवंय मग..>>>>
किती वेळ लक्ष ठेवणार ना....आमच्या मागच्या पुढच्या अंगणात, गच्चीत सगळीकडे तो हिंडत असतो. शेजारी पाजारी पण जाऊन येतो भटकून...
त्याला मी उनाड व्यक्तीमत्व म्हणतो...
लोल... उनाड व्यक्तिमत्व
लोल... उनाड व्यक्तिमत्व
मांजर डांबिस आहे, ते निवांत अंग चाटत राहतं, हा तु बोलत रहा म्हणत....>>>>>>>>>> मांजरं तशीच असतात.
उनाड व्यक्तिमत्व! लोल
उनाड व्यक्तिमत्व! लोल
चित्रदर्शी वर्णन केलत तुम्ही.. वाचुन अजुनच हसु आल....माजर तुमच कधिही एकणार नाहिये तेव्हा ओडीनलाच काय ते डोस दयावे लागतिल..
पहिल्या मजल्यावरील सॅम -
पहिल्या मजल्यावरील सॅम - गोल्डन रिट्रीवर आणि हॅरीचा एकत्रित फोटो . खूपच मस्ती करुन झाल्यावर दोघानी फोटोसाठी पोझ दिली. दोघापैकी एकाचाही मूड पलटायच्या आत फोटो काढला
मस्त आलाय फोटो!
मस्त आलाय फोटो!
फार गोड आलाय फोटो.
फार गोड आलाय फोटो.
केवढे दमलेले दिसताहेत!
केवढे दमलेले दिसताहेत!
Pages