Submitted by किरण कुमार on 19 January, 2024 - 02:28
ओठ हासरे जरी ठेवतो डोळ्यामध्ये खळखळ बाकी
मनात एका खोल तळाशी ती गेल्याची हळहळ बाकी
तहात गेले सारे काही जीव वाचला नसे थोडके
मृत्यू नंतर कुठे राहते रक्तामधली सळसळ बाकी
भव्य यशाचे वाटत पेढे गाव पालथे करून आलो
आणि पाहिली शेजाऱ्याच्या पोटामध्ये मळमळ बाकी
शेतामधल्या मालाला तो भाव मागतो चुकले कोठे ?
झोपडीतल्या पिल्लांसाठी किती राहते कळकळ बाकी
आयुष्याचे चटके बिटके नकोस विसरू सहजा सहजी
खरी वेदना लिहायची तर ठेव अंतरी जळजळ बाकी
रोज दिसे मज अश्वत्थामा गर्दीमध्ये या लोकांच्या
दुःख फाटके डोक्यावरती अन रक्ताची भळभळ बाकी
बह्म कळाले आहे ज्याला तो शांतीने निघून गेला
अध्यात्माच्या शिबिरामध्ये फक्त राहिली वळवळ बाकी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह!! आवडली.
वाह!! आवडली.
बह्म कळाले आहे ज्याला तो
बह्म कळाले आहे ज्याला तो शांतीने निघून गेला
अध्यात्माच्या शिबिरामध्ये फक्त राहिली वळवळ बाकी >> मस्त!
सुंदर!
सुंदर!
आवडली.
आवडली.
((बह्म कळाले आहे ज्याला तो
((बह्म कळाले आहे ज्याला तो शांतीने निघून गेला
अध्यात्माच्या शिबिरामध्ये फक्त राहिली वळवळ बाकी))
वाह क्या बात है!
वाह!!! खुप छान!
वाह!!!
खुप छान!
धन्यवाद मित्रांनो ..../\....
धन्यवाद मित्रांनो ..../\....
बह्म कळाले आहे ज्याला तो
बह्म कळाले आहे ज्याला तो शांतीने निघून गेला
अध्यात्माच्या शिबिरामध्ये फक्त राहिली वळवळ बाकी
>हा शेर भारी आहे
>>>>>ओठ हासरे जरी ठेवतो
>>>>>ओठ हासरे जरी ठेवतो डोळ्यामध्ये खळखळ बाकी
मनात एका खोल तळाशी ती गेल्याची हळहळ बाकी
हा मला सर्वात आवडला.
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
वाह, जबरदस्त ! गझल अतिशय
वाह, जबरदस्त ! गझल अतिशय आवडली. सुंदर आशय. शेवटचा शेर तर खासच
आवडली.
आवडली.
मस्त. आवडली.
मस्त. आवडली.
सर्व गझलप्रेमी साहित्यिकांचे
सर्व गझलप्रेमी साहित्यिकांचे आभार .... /\......
क्या बात है!!
क्या बात है!!