महावस्त्र

Submitted by अनन्त्_यात्री on 21 January, 2024 - 07:06

भासे महावस्त्र | चिंधी जिंदगीची
जेव्हा कवितेची । हाक येते ।।

हाक नि:शब्द ही। पंचप्राणांवर
घालते फुंकर । हलकीशी ।।

हलकेच काही । आक्रीत घडते
बेडी निखळते । त्रिमितीची।।

तिठा त्रिमितीचा । चिंधी ओलांडते
आणि मग होते । महावस्त्र।।

Group content visibility: 
Use group defaults

आवडली.

टाइम - स्पेस फॅब्रिकवर ओव्या ओवल्या आहेत. छान!
पुणेरी मराठीत चादरीला महावस्त्र म्हणतात म्हणे (संदर्भ - पुल).