भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mi_anu -- > Lol Lol Lol Lol

ओड्याने काल सॉलिड कांड केलं
बासुंदी आणली होती घरी, आजीने तिची वाटी संपल्यावर उरलेली थोडीशी ओड्याला चाटवली. भाऊ एकदम खुश झाले
आणि तितक्यात दादू उठून पोळी घ्यायला गेला आणि त्याच्या ताटाच्या बाजूला भरलेली वाटी होती, ओड्या त्या बासुंदी च्या अनावर मोहाने खेचला गेला आणि कुणाला काही कळायच्या आत लपलप करून सुरूच केलं
चार वर्षात म्हणजे तो आल्यास पहिल्यांदाच त्याने असा हापापले पणा केलाय म्हणजे त्याला आवडणारी गोष्ट आम्ही खात असलो तरी तो कधी थेट येत नाही, समोर बसून करुण डोळे करून बघत राहतो की समोरच्याला एकट्याने खाणे अशक्य व्हावे
पण असं दिसतंय म्हणून तोंड घातलं अस कधीच केलं नव्हतं

म्हणजे त्याचा खाऊ समोर असला, खाली जमिनीवर असला तरी तो वाट बघतो खायला कमांड मिळण्याची

मी आता एकदम भडकणार असं आजीला वाटलं ती एकदम त्याची काही चूक नाहीये मीच त्याला मोहात पाडलं वगैरे म्हणायला लागली

मी म्हणलं मी काही बोललोय तरी का
म्हणे शिक्षा करशील तू त्याला
म्हणलं नाही करत

तोवर ओड्याला कळलं आपलं चुकलंय काहीतरी आणि मग तसाच मान खाली घालुन नजर चुकवत बसून राहिला
आता वाटी उष्टी केलीच होती, मग त्याला म्हणलं खा आता संपव
तरी त्याला खात्री वाटत नव्हती
मग दादू नेच त्याच्या बाउल मध्ये ओतून त्याला दिली
मस्त टमतमीत ओरपली
म्हणलं याला पचली नाही तर जुलाब होतील आणि ते मलाच रात्री उठून निस्तराव लागणारे तुमची भूतदया माझ्या अंगाशी येते वगैरे

पण काही नाही, काहीसुद्धा झालं नाही Happy

>>>>>>त्याची काही चूक नाहीये मीच त्याला मोहात पाडलं
हाहाहा Happy आई ग्ग!!!
>>>>>>पण काही नाही, काहीसुद्धा झालं नाही Happy
थँक गॉड Happy
ओडीनचे किस्से फार आवडतात.

हे हे . ओडीन भारी .
सेम किस्सा हॅरीने मागील मकर संक्रतीला केलेला. इथे लिहिलेला आहे . यावेळी सावधानता बाळगू .

भूभू एकंदरिच गोडघाशे असतात असे दिसतेय

<<मी आता एकदम भडकणार असं आजीला वाटलं ती एकदम त्याची काही चूक नाहीये मीच त्याला मोहात पाडलं वगैरे म्हणायला लागली >>
किती गोड आजी...
आई असलेली स्त्री जेव्हा आजी होते ना, तेव्हा जणू काही गुणसुत्रेच बदलतात त्यांची...

ओडिन Lol एकूण असा चोरून खाल्लेला खाऊ भुभूज मस्त पचवतात असे दिसते. माउईने आख्खा मफिन पळवून खाल्ला आणि पचवला होता तो किस्सा लिहिला होता मी मागे. तसेच एकदा शंकरपाळ्यांचा बोल पण Happy

भू भूंचे पळवा पळवी किस्से फारच भारी. ओ ड्याला तर सरळ सरळ आजीचाच पाठींबा असल्याने त्याचे लाडावणे सहाजीकच आहे.

सिंबा तसा अजून साधासरळच म्हणायचा.. अजून तरी काहीही पळवा पळवी केलेली नाही… अन्न समोर असले कि त्याकडे एकटक पहात बसतो आणी ईतक्या करूणतेने त्याकडे पहातो कि तुकडा तरी द्यावाच लागतो. परंतू खा म्हटल्याशिवाय तोंड लावत नाही.

मस्त किस्सा आमच्याकडे गुलाब जाम, आइसक्रीम फेवरिट. संध्याकाळच्या वॉक नंतर एक वाटी आइस क्रीम देते मी म्हातारीला. व्हॅनिला हो.
बाकी बिर्याणीतले चिकन किवा मटन. समहाउ तिला व्हेज पुलाव/ चिकन फ्राइड राइस पण आव्डतो. अगदी दोन चमचे देते म माझ्या बरोबरीने तिला. नाहीतर बघत बसते. व्हेज पुलाव मधले लुसलुशीत पनीर!!! मौ शिजलेले चिकन एकदम फेवरिट.

मंडळी जरा आपआपल्या बाळांचे फनी फोटो टाका बर, बरेच दिवस झाले कोको, ओडिन, हॅरी तसेच इतर मंडळींना पहिले नाही

काल मी केळ खातखात एका हाताने चिकवा वर काही तरी लिहीत होते, माझं लक्ष नसताना कोकोनट माझं थोडं केळ खाऊन पळून गेला. मग सगळंच दिलं त्याला. Lol

नॉटी बॉय कोकोनट Happy
माउई ची आवडती पोज. सोफ्याच्या पाठीवर चढून चहूकडे लक्ष देत बसणे. सोबत एखादे खेळणे. म्हणजे ते २ सेकंदात खाली पडते. मग समोर जो ह्यूमन असेल त्याच्याकडे पॅसिव अ‍ॅग्रेसिवपणे बघत बसणे की मग तो/ती हमखास याला ते उचलून आयते तोंडात देतील. Proud
sofa.jpg

माऊई Lol
पेन्शनरला खूप हसले होते.

धन्यवाद सर्वांना

आई असलेली स्त्री जेव्हा आजी होते ना, तेव्हा जणू काही गुणसुत्रेच बदलतात त्यांची...>>>> अगदी अगदी, मी लहान म्हणजे अगदी कॉलेज मध्ये असताना हिने कडाडून विरोध केला होता भुभु घरी आणायला, मला सगळं करावं लागेल म्हणून, त्याला मांस मटण द्यावं लागेल, घरात शु शी करेल म्हणून
आता म्हणजे सगळं सगळं केलेलं चालतंय त्याने
वर पुन्हा, मुका जीव आहे तो, काय करणार तो तरी म्हणत आम्हालाच उपदेश देते Happy
तो इतका दंबिस की केशरी गाजर खात नाही, लाल खातो फक्त तर त्यासाठी मंडईत जाऊन तसली गाजरं आणणे, मटार सोलताना त्याला साल काढून मटार खायला देणे, खोबऱ्याची वाटी देणे, दही भात कालवून देणे सगळे लाड करते
तोही ऐतोबा मस्त तिच्या शेजारी पसरून कुडुम कुडम करत चरत राहतो

मंडईत जाऊन तसली गाजरं आणणे, मटार सोलताना त्याला साल काढून मटार खायला देणे, खोबऱ्याची वाटी देणे, दही भात कालवून देणे >>> Happy मजाय ओडिन ची! एकूण हे सगळे लाडोबे मुके जीव मुके जीव म्हणवत मस्त डोक्यावर बसतायत Happy

माउई आणी ऑश्कु काय सुंदर फोटो आहेत, एकदम गोंडस

ओड्याला बहूदा आजीची सगळी ईस्टेट मिळणार असं दिसतंय :हाहा :हाहा

माऊई आणि ऑस्करचे फोटो बघितल्यावर ते आधी सॉफ्ट टॉय वाटतात मला कायम. म्हणजे "कसले सॉफ्ट टॉय दिसतायत दोघं!" असंच वाटतं!
ओडिन तर हीरो आहे!

Pages

Back to top