Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनू, ठोकळेपणा, मख्खपणा
अनू, ठोकळेपणा, मख्खपणा ओळखण्यात तुझी मास्टरी दिसते.
खामोशिया नावाचा १ चित्रपट आहे, कथा, गाणी, सिनरी आणि अभिनय(फक्त मेन लीड अली जफर) फार छान आहे, कथा आणि गूढपण ईंटरेस्ट टिकवून ठेवते, पण जो काही त्यातल्या २ र्या पुरूष लिड (लिद म्हटले तरी चालेल )ने माती खाल्लीये, त्या ठोकळेपणा ला कशा ची सर नाही. फारेंड, अस्मिता, आचार्य, अनू ह्यांनी बघून पिसे काढावी अशी त्याची अॅक्टींग आहे
अभिनत्री दिसायला सुंदर आहे.. बस्स.
मीसींग अ आ धागा.. आणि आका वाल्या परिक्षणा नंतर फारसं दर्जेदार काही वाचलं नाहिये, भूक लागली
>> सुरवंट चावला आहे त्यात,
>> सुरवंट चावला आहे त्यात, तिला जिवंत गाडलेलं असतं
सिरियसली मलाही हे अगदीच खरं वाटलं.
सुरवंट चावला आहे त्यात, तिला
सुरवंट चावला आहे त्यात, तिला जिवंत गाडलेलं असतं
>>
मलाही वाटलं की हिर्विणीला गाडलं असल्यानी मातीतून सुरवंट येतात अन् चावतात असा सीन वगैरे असेल...
Let me rephrase:
Let me rephrase:
Once upon a time in mumbai.- अंदाजे 13 वर्षापूर्वी हा मूवी आणि केवळ ह्या एकमेव मूवी मध्ये तुषार कपूर आवडलेला. सिरियस आहे. चांगला केलाय असे वाटलेले तेव्हा तरी
>>
कुठे होता?
पहिल्या भागात विमल देवगण, हाश्मी, रणदीप हुडा, कंगना अन् प्राची देसाई होते
दुसऱ्यात विमल कुमार, सोनाक्ष सिन्हा अन् इमरान खान होते
शूट आउट ॲट लोखंडवाला अन् वडाळा मधे तु क होता
शर्मन त्याचे हावभाव शब्दातित
शर्मन त्याचे हावभाव शब्दातित करतो तेंव्हा लय हसू येतं कॉन्सेप्ट पण नवी, वेगळी वाटलेली तेंव्हा
>>> याच्या बर्याच आधी ऑल द बेस्ट नाटकात ही कन्सेप्ट मस्त वापरलेली आहे. संजय नार्वेकर - मुका, भरत जाधव - बहिरा. तो स्वत:चे डायलॉग बोलता बोलता पाठोपाठ मुक्याचे संवाद प्रकटपणे बोलतो, ते फार धमाल करायचे दोघं. टायमिंग कमाल होतं! (नाटकाने ही कन्सेप्ट कुठून उचलली असेल तर माहिती नाही :हाहा:)
मी पाहिलंय, ओरिजिनल संचासह
मी पाहिलंय, ओरिजिनल संचासह.अतिशय धमाल होते भरत,संजय आणि अंकुश.
ऑल द बेस्ट धमाल होतं. मीपण
ऑल द बेस्ट धमाल होतं. मीपण ओरिजिनल बघितलंय.
कुठे होता?
कुठे होता?
पहिल्या भागात विमल देवगण, हाश्मी, रणदीप हुडा, कंगना अन् प्राची देसाई होते>> मी पण कालपासून तोच विचार करत आहे. मस्त सिनेमा व गाणी. आता रिट्रो म्हणतात पण आमच्य वेळची.
Once upon a time in mumbai
Once upon a time in mumbai या चित्रपटात तुषार कपूर नव्हता, तुम्हाला कदाचित *शोर इन the सिटी* ह्या विषयी म्हणायचे असावे
>> शूट आउट ॲट लोखंडवाला अन्
>> शूट आउट ॲट लोखंडवाला अन् वडाळा मधे तु क होता <<
तुषार हेटर्स खूष होतील.. कारण तुक चा मायबोली फुलफॉर्म..
(No subject)
निरु
निरु
तुच्छ कटाक्ष
तुच्छ कटाक्ष
निरु अगदी हेच आलं होतं
निरु अगदी हेच आलं होतं डोक्यात.
काल जुना हृषिकेश मुखर्जींचा 'अनुपमा' बघितला. धर्मेंद्र, शर्मिला टागोर, शशिकला, देवेन वर्मा, डेव्हिड, दुर्गा खोटे.
छान आहे सिनेमा, संवाद, कपडेपट नेपथ्य सगळंच कमालीचं ग्रेसफुल आहे. गाणी तर अवीट अप्रतिम आहेत. मला फक्त गाणीच माहिती होती. 'धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार' हे कमालीचं आवडतं गाणं होतं. ते बघायलाही रोमॅन्टिक आणि गोड आहे. शर्मिला आणि शशिकला अतिशय तरूण होत्या तेव्हा. चेहऱ्यावर खूप गोडवा आहे. कथा साधीशी आहे. 'ऐ दिल की सुनो दुनियावालों' हे मला दुःखी विरहगीत वाटायचं पण वाढदिवसाच्या पार्टीत गायलेलं आहे.
हृषिकेश मुखर्जींच्या सिनेमात एक 'ठेहराव' असतो, जो मोहक वाटतो. त्यांच्या स्त्री पात्रांना वास्तवाच्या अनेक छटा असायच्या. एखादी हट्टी, एखादी भाबडी, एखादी प्रेमळ, हळवी काकू, एखादी सर्वांना धरून ठेवणारी-आत्मविश्वासु वगैरे..... कुठेही 'अती' वाटायचं नाही.
धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार -
https://youtu.be/mLJk-vC4ESE?si=lInfm7Ti5zXEyVjo
अनुपमा माझा पण आवडता चित्रपट
अनुपमा माझा पण आवडता चित्रपट आहे. मला त्यातले कुछ दिल ने कहा जास्ती आवडते. तशी सगळीच गाणी मस्त आहेत.
आवडण्याची दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॅक अँड व्हाइटचा केलेला वापर. खूप सुंदर चित्रीकरण आहे. पाठारेंना फिल्मफेअर मिळाले होते
हो धनि, कृष्णधवल असूनही
हो धनि, कृष्णधवल असूनही महाबळेश्वर वगैरे जे दाखवले आहे, ते अतिशय सुंदर- निवांत वाटतं. ते गाणंही सुरेख आहेच. सगळंच सुंदर आहे ह्या सिनेमाचं.
अस्मिता, कूछ दीलने कहा जास्त
अस्मिता, कूछ दीलने कहा जास्त छान आहे.. धीरे धीरे पण छानच आहे. लताला स्वतः ला तिचं कुछ दिलने फार आवडत असे तिने तीन चार मुलाखती मध्ये सांगितलं आहे. तिच्या लाईव्ह शो मध्ये ती गायची हे.
गोलमाल original आणि रोहित
गोलमाल original आणि रोहित शेट्टी चा गोलमाल पहिला प्रचंड आवडता आहे. रोहित शेट्टी चा परवाच थोडा थोडा लंच टाईम मध्ये असा बघून झाला त्यामुळे सगळे डायलॉग्स refresh झाले.
तुषार कपूर ला मुक्याचा अभिनय कसा करायचा याचे ट्रेनिंग श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेतील Shiryane दिलेले. धमाल करतो तो. Chinese billi ला मी अजूनही तेवढीच हसते. मनोज जोशी ने ही धमाल उडवली आहे. एक अजय देवगण सोडला तर मला सगळे आवडतात या चित्रपटात. तो ही बाकीच्या मुळे चालवून घेते.
काही जुने चित्रपट मी ही पाहिले. त्यात सुनील दत्त आणि मीना कुमारी चा गझल खूप आवड्ला. मदन मोहन ची गाणी अप्रतिम आणि इतकी क्यूट, तरुण लव स्टोरी. मीना कुमारी मला एकदम sensous वाटली.
दुसरा, देव आनंद आणि वहिदा रेहमान चा सोलहवा साल. एका रात्रीत घडणारी गोष्ट. थोडी जुनी मुंबई दिसते. वहिदा रेहमान चा बॉयफ्रेंड तिला फसवतो आणि मग देव तिची मदत करतो अशी सिम्पल गोष्ट पण सामान्य माणूस कसा अशा प्रसंगात वाट काढेल असे दाखवले आहे, काही अतर्क्य सुपर हीरो वगैरे नाही. छान वाटले.
अनुपमा add करते लिस्ट मध्ये.
धीरे धीरे मचल >> माझ्या
धीरे धीरे मचल >> माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक
आवडण्याची दुसरी गोष्ट म्हणजे
आवडण्याची दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॅक अँड व्हाइटचा केलेला वापर >>> +१
अनुपमा पाहिलेला नाही. पण धीरे धीरे मचल ऑटाफे आहे. अप्रतिम गाणे आहे. त्या काळच्या अशा अनेक गाण्यांना एक स्ट्रक्चर असे असे मधे जाणवले. पहिल्या कडव्यात त्याच्या येण्याची चाहूल, ते तिसर्या कडव्यात मग तो आल्यावर मी काय करणार वगैरेच्या कल्पना ई. कभी कभी मधल्या मेरे घर आयी एक नन्ही परी सुद्धा तसेच आहे (बाय द वे त्यातले "चाहे देखूँ उसे हजारों बार" दोन वेगळ्या चालीत ऐकायला काय सुरेख वाटते).
मात्र धीरे धीरे मधे पियानो वाजवणे फिल्मी नियमांनुसार असावे - मधल्या दोन तीन कीज वर बोटे फिरवायची. ट्यून कोणतीही असो
कुछ दिल ने कहा - हे मात्र लहानपणीपासून हजारो वेळा कानावर पडल्यावर कधीतरी एकदम "क्लिक" होते आणि इतके सुंदर गाणे इतके दिवस आपल्याला कसे अॅप्रेशिएट झाले नाही याचे आश्चर्य वाटते. आपली आवड त्या गाण्याच्या उंचीपर्यंत पोहोचली नव्हती असे वाटते.
आवडण्याची दुसरी गोष्ट म्हणजे
आवडण्याची दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॅक अँड व्हाइटचा केलेला वापर >>> +१
मी पण पाहिलेला नाही. पण ब्लॅक अँड व्हाईट चा ठळक वापर आणि प्रकाशयोजना म्हटलं कि गुरूदत्तच आठवतो.
खचाखच भरलेलं भलं मोठं प्रेक्षागृह, पाठीमागे एण्ट्रन्स, त्यापासून दूर जात अलिकडे येणारा कॅमेरा, दारातून येणारा प्रकाश आणि त्या प्रकाशात दाराच्या चौकटीला हात टेकवून उभा असलेला , शाल गुंडाळलेला एक व्यक्ती.... काय फ्रेम आहे ती !
दुसरे कागज के फूल मधल्या गाण्यातल्या प्रकाशझोतांची रचना, वहिदाच्या चेहर्यावर येणारा प्रकाश आणि पुतळ्यासारखा अंधाराला आलेला तिचा चेहरा.
तो गुरुदत्त. ती शाल. ती
तो गुरुदत्त. ती शाल. ती व्यक्ती.
ब्लॅक अॅण्ड व्हाइट पिक्चर्स
ब्लॅक अॅण्ड व्हाइट पिक्चर्स मधल्या फ्रेम्स या uncluttered वाटतात सध्याच्या पिक्चर्समधल्या फ्रेम्स पेक्षा. जुने फोटो पाहिले की तेही तसेच वाटतात.
तो गुरुदत्त. ती शाल. ती व्यक्ती. >>> शाल ओव्हरराइड्स. तो गुरूदत्त, त्यावर ती शाल पांघरली, की ती व्यक्ती होतो
लोल हो, आणि त्यामुळे मग
लोल हो, आणि त्यामुळे मग फ्रेमसुद्धा ती होते.
शाल म्हणजे ब्लॅन्केट ती होते!
शालूच म्हणू मग.
शालूच म्हणू मग.
चालेल. दर्वर्शी हिरवा ई. शालू
चालेल. दर्वर्शी हिरवा ई. शालू पांघरून धरती सुद्धा कंटाळली आहे. इतरांना वापरू देत
धरतीला जरा लॉंग स्कर्ट द्या
लंपन
फा, 'धीरे धीरे मचल' कदाचित गुणगुणायला सोपे आहे, 'कुछ दिलने कहां'पेक्षा. त्यामुळे आपल्यापर्यंत जास्त 'पोचलं' असेल. 'डिक्लटर्ड लूक' हे पर्फेक्ट निरीक्षण आहे, त्यामुळे शांतवणाऱ्या फ्रेम्स आहेत.
आचार्य+१
गुरुदत्त नेहमी एकाकी, दुःखी आणि जगापासून अलिप्त वाटलेला आहे. धर्मेंद्र तेव्हढा दुःखी होऊच शकत नाही, तो 'त्यातल्या त्यात' दुःखी होऊ शकतो. तो त्याच्या चार फेवरेट शिव्या देऊन मोकळा झालेलाच चांगला वाटतो. ही नंतर झालेली प्रतिमाही असेल पण त्यामुळे 'या दिलकी सुनो गाणं' मी गुरुदत्तचं समजत होते.
-----------
आशु२९, मनमोहन
धीरे धीरे मचल <3
धीरे धीरे मचल <3
खूप दिवसांपासुन एकदम जुन्या
खूप दिवसांपासुन एकदम जुन्या काळात घेऊन जाईल अस सिनेमा पहायचा होता. हल्लीच्या फटकळ काळापासुन जुन्या भाबड्या काळात पोचल्यासारखे वाटेल. आता ‘अनुपमा’ पहाते. थँक्स.
आणि तुषार कपूरवर इतके प्रतिसाद आल्याने त्याचा गोलमाल चा एकतरी बोबडा सीन पहावाच लागेल.
कालच लहू के दो रंग बघून
कालच लहू के दो रंग बघून संपवला. महेश भट्टाच्या सुरूवातीच्या चित्रपटांपैकी एक चित्रपट. फारच भन्नाट कथानक आहे. आझाद हिंद फौजेत असणारा विनोद खन्ना. सोन्याची चोरी. त्याचा खून. आणि त्याच्या लहू चे दोन रंग. हे दोन रंग कोणते ते कळण्याकरता पिक्चर पहावा लागेल. सुरूवातीला एडिटिंग गांडलेले आहे. एकदम जम्प वाटतात काही कट. शेवट मात्र चुकवू नका. रणजीतला एका भारी गेटअप मध्ये पाहायला मुकाल.
भप्पी लहरी ची मस्त गाणी आहेत. चाहीये थोडा प्यार सगळ्यांना माहिती असेल. मला मात्र सध्या मुस्कुरता हुआ मेरा यार जास्ती आवडायला लागले आहे.
Pages