Submitted by अनन्त्_यात्री on 10 January, 2024 - 06:14
कवितेच्या काही ओळी
काल सहज सुचल्या
दोन चुकल्या मात्रेत
दोन वृत्तात गंडल्या
यतिभंग एकीमध्ये
एकीमध्ये रसभंग
दोष दूर करण्यास
पछाडिले जंग जंग
वृत्तछंदांची बंधने
पाळताना दमछाक
झाली-आली कुठूनशी
मुक्तछंदाची झुळूक
मुक्तछंदाच्या स्पर्शाने
ओळ ओळ थरारली
कोष कोंदट फोडून
फुलपाखरे उडाली
खळखळ तुटताना
बेड्या आनंदे म्हणती
गण, वृत्त, मात्रा यांची
मुक्तछंदी ना गणती
वेध लागला मुक्तीचा
बंधी कोंडल्या ओळींना
सुंभ जळला-पण हा
पीळ जळता जळेना
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
क्या बात है !!
क्या बात है !!
छान...
छान...
(No subject)
छान
छान
प्रतिसाद देणार्या सर्व
प्रतिसाद देणार्या सर्व कवितारसिकांना धन्यवाद!
वाह!
वाह!
छान..
छान..
मुक्तछंदाची भलावण वृतछंदात.. मस्तच..
कविता छान..
कविता छान..
मनात सूर लावून वाचली.
किल्ली, अनिरुद्ध, रूपाली
किल्ली, अनिरुद्ध, रूपाली धन्यवाद!