------- अन्यत्र पूर्वप्रकाशित -------------------------------------
------ शेवटी आगगाडी डिरेल होउन (घसरुन) ज्योतिषाकडे वळल्याने, ज्योतिष विभागात हा धागा टाकलेला आहे. ज्याप्रमाणे हाती हातोडा असेल त्याला सर्वत्र खिळेच दिसतात, तद्वत ज्योतिष या विषयावर अधिक प्रीति असल्यामुळे, तेच विश्लेषणाकरता वापरले जाते. --------------
आधीची कंपनी सोडुन, दुसऱ्या कंपनीवर रुजु होउन बरेच दिवस/महीने झाले आहेत. खरं तर आधीच बोलायला, तोंड उघडायला हवे होते, पण बेटर लेट दॅन नेव्हर, या न्यायाने परवाच माझ्या वरील अधिकाऱ्याला लिन्कडिन वरुन संदेश पाठविला व तक्रार केली.
गेल्या नोकरीत, एका (जर्मन ओरिजिन)स्त्रीच्या "बुली" स्वभावाचा, दादागिरी अतोनात त्रास झाला. १० च्या स्केलवरती ७-७.५. मी कामात असताना सतत लक्ष वेधुन घेत असे, काहीना ना काही फालतु मुद्दे उकरुन बोलणे, कामात व्यत्यय आणणे हे सर्रास होई. मी कामात मग्न असताना, मुद्दाम हे अमुक तिला (=मला) विचार असे अन्य सहकाऱ्यांना सल्ले देणे वारंवार घडे.
जराही कीबोर्डची टकटक त्या बाईला सहन होत नसे. मग त्यावरुन सदा बोलले जाई. की तू (=मी) कीबोर्ड बदल, दुसरीकडे बस, आवाज कमी कर. काम करताना पायाने लयीत ठक ठक करण्याच्या सवय माझ्या सवयिचा अन्य लोकांना त्रास होत नसे, किंबहुना सारे आपापल्या कामात मग्न असत पण हिला कोण त्रास्. काम करताना मी स्वत:शी किंचित पुटपुटते. अगदी लहान आवाजात त्याचा ही तिला त्रास होई. एकंदर आवाजाचा त्रास हाच स्थायीभाव होता. चला, त्या त्रासास बेनेफिट ऑफ डाऊट देऊ.
पण पर्सनल गोष्टी खोदुन खोदुन विचारण्याच्या तिच्या सवयीचा मलादेखील कंटाळा येत असे कारण ती माहीति जाणून घेउन काही सहानुभूती किंवा उदासीनता वाटण्यापेक्षा स्निकरींग (तिरकस हसणे) अशाच गोष्टी घडत्. उदाहरणार्थ नवरा, काय करतो, किती दूर रहातो, महीन्यातून /वर्षातुन कितीवेळा भेटतो आणि हे सर्व मला कसं चालतं याची माझ्यापेक्षा तिलाच चिंता असे. व ती चिंता फक्त Vicarious नसुन, तिचा गैरवापर केला जाई. उदाहरणार्थ - अन्य लोकांशी बोलताना, माझ्यासमोर मुद्दाम "काही नवरा बायको कसे दूर रहातात कोणास ठाउक्?" वगैरे उगाळले जाई. मलाही मग तू दुसरी नोकरी का नाही शोधत वगैरे प्रश्न. एकंदर सेडिस्ट स्वभाव.बरं बरेचदा (=एकदा/दोनदा) माझी वैयक्तिक माहीती माझ्या मॅनेजरला सांगुन मला संकटात आणण्याचाही प्रयत्न झालेला आहे.
एकंदर हलकट व्यक्ती होती.आमचे पुर्ण गावच मोठ्या तळ्याकाठीआहे. एकदा आम्ही ऑफिसच्या वेळात, जहाजे पहायला जायचे ठरविले होते, नंतर मला काही कारणाने काम निघाले, व मी जाण्याचे नाकारले, तेव्हा इतका टॅंट्रम दाखविला,राग काय आला, एकंदर महामुर्ख व अत्यंत सेडिस्ट व्यक्ती असल्याचा घाणेरडा अनुभव आलेला आहे. ही प्रत्येक खाजगी बाबीत ढवळाढवळ करे. "मग तू सोशल सेक्युरिटी' देतेस का. तर मी म्हटलं हो माझ्या पगारातून कापून घेतात. तर ती विचारे "आर यु शुअर?" याचा अर्थ - तिचे म्हणणे होते - तुम्ही इमिग्रन्टस सोशल सेक्युरिटी भरत नाही फक्त फायदे उकळता.
.
वाईट या गोष्टीचे वाटते की, why the hell am I unable to stand up for myself? Why don't I find my voice? Nature/nurture.genes/horoscope कशातही मला उत्तर सापडत नाही. नाही कसे, या सर्वातच ते उत्तर विखुरले गेलेले आहे असे वाटत रहाते, संशय येतो. जेव्हा अन्य एका संस्थळावरती, मला सुरुवातीला, बुलिंग झाले होते तेव्हा, एकंदर लहानपणीचा अनुभव पहाता, व आत्ताचा अनुभव पहाता, "जैसे थे" च परिस्थिती आहे. सतत पॉवरप्ले, बुलिंगचा अनुभव येतो यात माझा ओव्हरसेन्सिटिव्हनेस प्रथमदर्शनी कारणीभूत नक्की असेल पण त्याची परिणिती, समोरच्या व्यक्तीचा सेडिस्ट स्वभाव बाहेर आणण्यास कारणीभुत होतो हे सत्य आहे. बुलिंग हे फक्त शाळेत होत नाही ते लहानपणी घरातही होते, ते नोकरीतही होते. जिथे जिथे दोन व्यक्तिंचा परस्पबंसंबंध येतो तिथे बुलिंग होण्याची शक्यता असते. स्वत:च्या हतबलतेचा राग येतो. ही हतबलता कारणाशिवाय येते हे माहीत आहे पण ती येत जाते, तिचे सावट पसरत जाते हेही माहीत आहे.
,
परवाच मिसिंग एलिमेन्ट हे ज्योतिषशास्त्रावरील पुस्तक वाचत होते. जलराशिचे आधिक्य = वायुतत्वाचे दमन्. वायु तत्व =संवाद, वादविवाद, स्वत:चा मुद्दा मांडण्याचे articulate skill, स्वत:ची story सांगण्याची हातोटी. याउलट जलराशी = अतिरेकी भवनिकरता, over sensitivity, मूडीनेस, फक्त अन्य लोकांबद्दल करुणाच नाही तर self-pity देखील्. कशा या सर्व गोष्टी फिट बसतात्. उदाहरणार्थ चवथ्या घरातील (मन)........... प्लुटो (नरकाचा अधिपती, अर्थात स्वत: नरकमय + पॉवरफुल असणारा ग्रह,) आणि बुलिंग, . हे सर्व फिट्ट बसते व मग कोणी कितीही ज्योतिषाला नावे ठेवा, त्या टिकेतील फोलपणाच जाणवतो. आमच्यासारखे लोक फार भरभरुन, अक्षरक्ष: कामधंदा नसल्यागत लिहीतो कारण हेच की आमचा आवाज फक्त लेखणीतुन सापडतो, मनातील व्यथा, गोंधळ फक्त लिखाणातुन व्यक्त करता येतात.
हतबलता कारणाशिवाय येते
हतबलता कारणाशिवाय येते हे माहीत आहे पण ती येत जाते, तिचे सावट पसरत जाते..... खरंय.
जास्त मागे न पहाता वर्तमानात जास्त रमण्याचा प्रयत्न कर.अर्थात हे मलाही लागू आहेच.
अगं 'नॉट स्टँडिंग अप' हे फार
अगं 'नॉट स्टँडिंग अप' हे फार छळतं आणि ते जमत तर नाहीच.
उदाहरणार्थ माझी मुलगी अगदी बालवाडीत होती आणि तिला घ्यायला मी गेले . ती होती अगदी हाकेच्या अंतरावरती, मला ती दिसत होती. पण इतक्यात एक दुसरी लहान मुलगी मला हिंसक आअवेशात मुलीकडे पळत येताना दिसली. पण मी तिला हटकलेच नाही आणि त्या मुलीने, हिचे केस इतके जोरात ओढून तिला पाडले. आणि मी अजुनही कुढते आहे की "अर्रे यार!! आपली कृतीशून्यता."
एकदा तिच्या खूप लहानपणी मुलगी म्हणाली 'शूट! .... ब्लाह ब्लाह ब्लाह" आणि ताबडतोब दुसर्या मुलीने तिला हटकले की "अव्वा! असा बॅड वर्ड काय वापरतेस?" आणि मुलीने गिल्टी भावनेने माझ्याकडे पाहीले तेव्हाही मी हा स्टँड घेतलाच नाही की 'शिट! इज अ बॅड वर्ड. नॉट शूट"
अर्थात या फार पूर्वीच्या आणि क्षुल्लक घटना आहेत बट दे आर स्टिल पेनफुल. पेनफुल का तर - आपण प्रतिकार करु शकत नाही. मग आपले जवळचे का पणाला लागेनात. ही भावना मला खूप खाते. असो.
इन जनरल पेनफुल भावना विसरता येत नाहीत
नॉट स्टँडिंग अप' हे फार छळतं.
नॉट स्टँडिंग अप' हे फार छळतं.......पूर्णपणे मान्य.
आमच्यासारखे लोक फार भरभ
आमच्यासारखे लोक फार भरभरुन, अक्षरक्ष: कामधंदा नसल्यागत लिहीतो कारण हेच की आमचा आवाज फक्त लेखणीतुन सापडतो, मनातील व्यथा, गोंधळ फक्त लिखाणातुन व्यक्त करता येतात >> वाचून वाईट वाटले, पण एकीकडे असे डोक्यात आले की मनातील व्यथा वेळच्या वेळी कागदावर मांडून त्या कागदाचा वा इमेलचा उपयोग समस्या सोडवायला करता येईल का? उदा. एच आर/वरिष्ठ यांच्याशी लेखी संवाद करणे ज्यातून हे मांडता येईल?
निदान तुम्ही लिहून तरी व्यक्त होत आहात, हेही नसे थोडके. अनेकजण व्यक्तच होऊ शकत नसतील.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार हपा. मी एच आर च्या कानावरती नंतर घातलेले. म्हणजे तो जॉब सोडल्यानंतर. पण जॉबमध्ये असताना गप्प राहीलेले होते.
एच आर ला सांगून काही फायदा
एच आर ला सांगून काही फायदा नाही, निव्वळ तुमच्या मनाचे समाधान.
नॉट स्टँडिंग अप' हे फार छळतं.
नॉट स्टँडिंग अप' हे फार छळतं.......पूर्णपणे मान्य+११
जगात दोन प्रकारच्या प्रवृत्ती
जगात दोन प्रकारच्या प्रवृत्ती असतात, दोन प्रकारची माणसे असतात. एक दोज वन हू रूल आणि एक दोज वन टू बी रूल्ड..
नमते घेणे हा स्वभाव विशेष आपल्या केमिस्ट्रीतच असतो, आपल्या व्यक्तिमत्त्वातच असतो . आणि तो कधीच लपून राहत नाही . तुमच्या देहबोलीतूनच ते उदृत होत राहतो, आणि रूल करणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना तो बरोबर दिसतच असतो, त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्ही ऑलवेज रिसिविंग एंडलाच राहता!
>>>>>>एच आर ला सांगून काही
>>>>>>एच आर ला सांगून काही फायदा नाही,
बरोबर. एच आर ला त्यांच्या मागे कटकटी लावणारे लोक नको असतात.
@पशुपत - शक्य आहे. पण हा असा त्रास अजुन कुठेही झाला नाही. ही प्रत्येक खाजगी बाबीत ढवळाढवळ करे. "मग तू सोशल सेक्युरिटी' देतेस का. तर मी म्हटलं हो माझ्या पगारातून कापून घेतात. तर ती विचारे "आर यु शुअर?" याचा अर्थ - तिचे म्हणणे होते - तुम्ही इमिग्रन्टस सोशल सेक्युरिटी भरत नाही फक्त फायदे उकळता.
बकवास function at() { [native code] }इशय फालतू व्यक्ती होती.
नॉट स्टँडिंग अप' हे फार छळतं.
नॉट स्टँडिंग अप' हे फार छळतं.... पूर्ण सहमत. शिवाय योग्य वेळी स्टॅण्ड घेणं गरजेचं असतं. नंतर हातपाय आपटण्यात काही पॉइंट नसतो. वेळ निघून गेल्यावर काहीही केलं, कितीही योग्य, ड्रास्टिक स्टेप्स घेतले तरी फायदा होत नाही. वर मनाला बोचणी लागून राहते ती वेगळीच.
पण काही लोक असतातच काटेरी. आपण त्यांच्या सोबत काट्यासारखे रहा नाहीतर फुलासारखे, ते ओरबाडणारच.
अशा वेळी आपल्याकडे नसलेल्या 'फटकळपणा' या गुणाची फार उणीव भासते.
>>>>>अशा वेळी आपल्याकडे
>>>>>अशा वेळी आपल्याकडे नसलेल्या 'फटकळपणा' या गुणाची फार उणीव भासते.
होय अगदी खरे आहे. हाच गुण लागतो. समोरची व्यक्ती खाजगीपणाच्या मर्यादा ओलांडत असेल तर कडक वागावे लागते. मी दूर रहायचे पण आपण दूर राहीलो तरी ही भूतं, झाड धरायला येतातच.
आपण दूर राहीलो तरी ही भूतं,
आपण दूर राहीलो तरी ही भूतं, झाड धरायला येतातच.. अगदी अगदी.
चिन्मयी प्रतिसादाबद्दल आभारी
चिन्मयी प्रतिसादाबद्दल आभारी आहे. तुम्ही कौमार्या नंतर लिहायचे बंद केलेत , ते परत सुरु करा उलट सुलट मतांकडे लक्ष देउ नका.
सामो, ती मी नाही. मी मानसी
सामो, ती मी नाही. मी मानसी आयडी आहे त्यांचा. (शोधून बघितलं)त्यांनी नंतर काही लिहिलं नाही खरं. चिरफाड वाढलेय इथे. म्हणून असेल कदाचित.
ओह ओके धन्य्वाद चिन्मयी.
ओह ओके धन्यवाद चिन्मयी.
सामो, ह. पाना अनुमोदन. तू
सामो, ह. पाना अनुमोदन. तू लिहिलेलं नेहमीच काही नुसतंच तुझ्या मनातील खळबळ व्यक्त करणारं नसतं. काही वेळा सम - अनुभवी लोकांनाही दिलासादायक असतं.
बाकी एक ज्योतिष शंका - सतत भावनिक दृष्ट्या इतरांवर अवलंबून असण्याची परिस्थिती /प्रवृत्ती कोणता तरी ग्रहच निर्माण करतो ना. (ऐकीव) म्हणजे व्हॅलिडेशन लागतं कोणत्याही बाबतीत असा स्वभाव?
प्राचि एक ग्रहमान म्हणजे ७
प्राचि एक ग्रहमान म्हणजे ७ व्या घरातील सूर्य. व्यक्तीला परप्रकाशी बनवतो. पण does that mean all ppl born in the evening need validation? तर तसं रोखठोक नसावं. अन्य ग्रहं बघावे लागणारच.
———-
तुझ्या इतक्या छान प्रतिसादाबद्दल आभार.
‘नॉट स्टँडिंग अप' – ह्या
‘नॉट स्टँडिंग अप' – ह्या विषयावर आर. के. नारायण ह्यांची एक फारच सुंदर कादंबरी आहे, ‘The man eater of Malgudi’. We can immediately relate with the main character.
धन्यवाद शर्मिला. मिळाली तर
धन्यवाद शर्मिला. मिळाली तर वाचेन.