बंगाल मध्ये राशन घोटाळा (तांदूळ वरील हमीभाव मध्ये घोटाळा) ED च्या रडार वर आला आणि त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये धाड सत्र सुरु केले. धाडीसाठी गेलेल्या ED च्या ऑफिसर वर संदेशाखली या गावात हल्ला करण्यात आला आणि वाहनांची नासधूस करण्यात आली. ह्यावर भाजपा नेत्यांनी वक्तव्य दिलेच आहेत पण काँग्रेसचे पश्चिम बंगाल मधील प्रभारी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री अधीर रंजन चौधरी यांनी राज्यात (पश्चिम बंगाल) कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिली नसल्याचे वक्तव्य दिले आणि सोबतच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी सुद्धा केली.
ह्या संपूर्ण प्रकरणावरून पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस हि भाजपाची "ब" टीम आहे का? असे तुम्हाला वाटते का?
Congress calls for president's rule in Bengal over ED attack amid '2-seat' rift with Mamata Banerjee's TMC
https://www.hindustantimes.com/india-news/congress-calls-for-presidents-...
Assault on ED officers sparks political uproar in Bengal; Congress calls for President’s rule
https://www.theweek.in/news/india/2024/01/05/assault-on-ed-officers-spar...
ED Officers Attacked During Raid In Bengal; Opposition Demands President's Rule
https://www.ndtvprofit.com/politics/wb-ed-2ndld-assault
बंगाल मध्ये काँग्रेसला जिवंत
सध्या तरी रंजन हा बी टीम वाटत नाही !
पण बंगाल मध्ये काँग्रेसला जिवंत ठेवायचे असेल तर ममता च्या गुंडगिरी विरोधात भूमिका घ्यायला रंजन अधीर झालेला दिसतोय .
नाहीतरी पूर्वी कित्तेक दशके बंगाल आणि केरळ मध्ये कमुनिस्ट्याचा पक्ष विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांचे बळी घेत होते आता टी एम सी घेत आहे , इतकाच फरक !
कित्तेक काँग्रेसी कार्यकर्ते देखील टी एम सी ने मारले आहेत , तरी देखील स्वतच्या कार्यकर्त्यांच्या मृत्युकडे दुर्लक्ष करून ममता बरोबर हातमिळवणी करणाऱ्या महान गांधी घराण्याचा उद्दात्त दृषिकोन दिसून येतो .
१० जनपथ मधून रंजन साहेबांना ऑर्डर कम मुस्कटदाबी सूचनाही ही गेल्या असतील " तेथील काँग्रेसी मतदारांना भुलविण्या इतपत ममता वर टीका करा पण आमची भाजप विरोधी युती तुटणार नाही याची काळजीही घ्या !
खेला होबे!
खेला होबे!
उर्वरित भारतातील अर्बन
उर्वरित भारतातील अर्बन नक्षल्यांना ममता बानोचे कौतुक असते यात वाद नाही .
कम्युनिस्ट्या किड्यांनी बंगाल मध्ये राजकीय हिंसाचार चे कल्चर आणले , त्यात बंगाल चाळीस पन्नास वर्ष होरपळला गेला . गेली कित्तेक दशके तेथे या कमुनिस्ट्या वाळविने काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते मारले .
त्यांना हरवून निवडून आलेली बानो देखील आता त्याच मार्गाने जात आहे ,त्यात भर म्हणजे बंगाल मधील मुस्लिमांना कुरवळण्यासाठी बांगलादेशी घुसखोरीला हिच्या मंत्र्यांचे जाहीर समर्थन असते .
साहित्यात सर्वात जास्त नोबेल अवॉर्ड आणणाऱ्या बंगाल मध्ये राजकीय हिंसाचार किडक्या कम्युनिस्ट आणि ममता बानो ने पसरवला . अगोदरच त्या राज्यात औद्योगिक प्रगती नाही त्यात भर म्हणजे सिंगूर मधील टाटा चा प्रकल्प याच बानो ने पळवून लावला ( कोर्टात केस चालू आहे टाटा ला दोन चार हजार कोटींची नुकसान भरपाई द्यावी लागेल ) , उपरती होऊन कदाचित ती आता अंबानी चे पाय धरत असावी गोष्ट वेगळी ......
बरं मग?? लोकशाही मार्गाने
बरं मग?? लोकशाही मार्गाने तिला हरवावे आणि सत्तेत यावे
त्या अगोदर तुम्हा लोकांना
त्या अगोदर तुम्हा लोकांना तुमच्याच काँग्रेसच्या आधी रंजन च्या सुरात सूर मिसळावा लागेल की नाही ?
का शेकडो काँग्रेसी कार्यकर्त्यांच्या बलिदानावर पाय देवून ममता ची पूजा करणार ?
YouTube वर unfiltered by
YouTube वर unfiltered by Samdish या चॅनल वर CPI (M) च्या सीताराम येचुरी यांची मुलाखत आली आहे. नक्की बघा.
मुलाखत बघितल्यावर काँग्रेस BJP ची ब टीम नक्कीच वाटेल.
एकाच विचाराची दोन पक्ष
एकाच विचाराची दोन पक्ष वेगवेगळे निवडून लढवत असतील तर त्या पक्षांना एकमेकाची B टीम म्हणतात.
पण प्रतेक वेळेस तसेच असेल असे नाही.
मग सेनेला bjp ची B team Maharashtra मध्ये म्हणावे लागेल.
स्वतःची ताकत ओळखण्यासाठी पण समविचारी पक्ष एकमेका विरुद्ध लढतात
एकाच विचाराची दोन पक्ष
एकाच विचाराची दोन पक्ष वेगवेगळे निवडून लढवत असतील तर त्या पक्षांना एकमेकाची B टीम म्हणतात. >>> मग एनसीपी ही काँग्रेस ची बी टीम आहे का?
मग सेनेला bjp ची B team Maharashtra मध्ये म्हणावे लागेल. >> होतेच आधी, म्हणून तर मांडीला मांडी लावून महाराष्ट्रात सरकार चालवले ना आणि आताही शिंदे गट सरकार मध्ये आहेच
स्वतःची ताकत ओळखण्यासाठी पण समविचारी पक्ष एकमेका विरुद्ध लढतात >> चूक, सगळ्यांना आपली ताकत माहिती असते, म्हणून तर ते निवडणूक लढवतात. बाकी बी टीम म्हणजे मुख्य ओप्पोसिशन पार्टीचे मत खाणे आणि त्यांना निवडून न येऊ देणे.
उदाहरण: समजा 3 पार्टी असतील व A आणि C मध्ये मुख्य चुरस असेल तर A पार्टी B पार्टीला मैदानात आणते जेणेकरून B पार्टी C पार्टीचे मत खाईल आणि त्यांना मत कमी पडतील व A पार्टी जिंकेल. जर B आणि C समविचारी असतील तर त्यांनी युती करून एकत्र येणेच योग्य जेणेकरून त्यांच्या मतांची बेरीज जास्त होऊन A पार्टी निवडणूक हरेल.