२०२३ सरायला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. यंदाच्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या जश्या
जग:
भारत जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश ठरला
विज्ञान:
भारताने चांद्रयान ३ या मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले आणि असा पराक्रम करणारा पहिला देश ठरला
जीवन:
उत्तराखंड येथील बोगदा दुर्घटना आणि आत अडकलेले सर्व व्यक्ती सुखरूप बाहेर
मार्केट:
शेयर मार्केट मधील निफ्टी या निर्देशांकाने २१००० तर सेन्सेक्स या निर्देशांकाने ७२००० पातळी गाठली
खेळ:
हॉकी वर्ल्ड कप, क्रिकेट एक दिवसीय वर्ल्ड कप अश्या दोन मोठ्या टूर्नामेंट भारतात पार पडल्या तर आशियाई खेळात भारतीय खेळाडूंनी उत्तुंग प्रदर्शन केले
तश्या ह्या वर्षात अजूनही बऱ्याच घटना घडल्या आहेत, पण ह्या काही ठळक घटना. अजून काही घटना तुमच्या लक्षात असतील तर त्या इथे नक्की लिहा म्हणजे २०२३ चा आढावा घ्यायला आपल्या सगळ्यांना सोपे होईल.
मणिपूरमध्ये काहीतरी फुटकळ
मणिपूरमध्ये काहीतरी फुटकळ घडलं.
संसदेतही.
अखंड भारत असताना काँग्रेसच्या
अखंड भारत असताना काँग्रेसच्या forest gump ने वेग वेगळ्या राज्यांतून भारत जोडो यात्रा काढली .
कित्तेक सामान्य लोक त्यात सहभागी झाले , काही ठराविक नट मंडळी फॉरेस्ट गपं बरोबर सेल्फी काढून आणि त्याचा उत्साह वाढवून आली .
परिणामी तीन राज्यातील सत्ता काँग्रेसच्या हातून गेली , ज्या ज्या भागातून यात्रा गेली तेथील काँग्रेसचे उमेदवार पडले .
आता २०२४ मध्ये त्या फॉरेस्ट गंप ने पुन्हा यात्रा काढली आहे .
बघू या काय होतंय ते .....