सध्या बाजारात ओले हरभरे (सोले) मिळायला लागलेत. ही त्याची आमटी. रूढार्थानी आमटी प्रकार जरी असला तरी सूप म्हणूनही तसा फार चांगला आहे. जरा हरभरे सोलणे हा जरा किचकट टास्क, पण एखादवेळी करायला हरकत नाही. तर साहित्य -
एक वाटी सोललेले ओले हरभरे (हरभरे सोलण्याचा वेळ अर्थातच कृतीत धरलेला नाही)
तिखट पणा नुसार हिरव्या मिरच्या - कमी तिखट, पोपटी मिरची असेल तर २-३ तरी हव्यात
जरासा जास्त लसूण - इतक्या हरभर्यांसाठी ५-६ पाकळ्या तरी हवा
चिमूटभर हिंग
चवीनुसार मीठ
चिमूटभर साखर
२ मोठे + १ लहान चमचा तेल
एका बाजूला पाणी गरम करत ठेवावे.
दुसरीकडे सोललेले हरभरे, मिरच्यांचे तुकडे अन सोललेल्या लसूण पाकळ्या एका जाड बुडाच्या कढईत कोरड्याच भाजायला घ्यायच्या; मंद आचेवर. नीट भाज बसली नाही तर आमटीला जी अपेक्षित चव आहे ती साधत नाही.
चांगले ५-७ मिनिटं भाजून झाले - मिरच्या लसूण हरभरे यांना काळसर डाग पडले की एक लहान चमचा तेल त्यावर घालायचे आणि पुढे परतत राहायचे. लगेच ते सगळं प्रकरण खर्पुसेल. चांगलं खमंग झालं की गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं.
गार झालं की मिक्सर ला गुळगुळीत पेस्ट करायची. पाणी वापरून अर्थात.
कोरडी भाज -
तेल घातल्यावर -
त्याच तेलाच्या कढईत उरलेलं तेल तापवून मोहोरीची फोडणी करायची, मोहोरी तडतडली की हिंग आणि लगेच वर ही पेस्ट घालायची. मीठ, साखर ही घालावी. पेस्ट तेलात ४-५ मिनिटं परतून वर बर्यापैकी पातळ होईल इतकं कढत पाणी यात ओतायचं. उकळी येइस्तो मोठ्या आचेवर सतत ढवळत राहायचं. उकळी फुटली के पुढे अजून १० मिनिटं तरी आमटी उकळू द्यावी. जरा थिक झाली की ५-७ मिनिटं झाकण घालून मुरू द्यावी आणि गरमगरमच खायला घ्यावी.
उकळतेय. फोटो वाफेमुळे नीट नाही आला.
ज्वारीची भाकरी, भात किंवा नुसतीही प्यायला सुरेख लागते.
या जेवायला ! - वाटीत ही केलेली आमटी, ताटलीत लाल भोपळ्याची बाकर भाजी, मुगाच्या डाळीची आंबट - गोड अशी खिचडी, भाकरी - फुलका, लोणच्यात लिंबू मिरची आणि आवळ्याचं लोणचं आहे.
विशेष साहित्य नसलं तरी भाजायला वेळ लागतो. म्हणून जरा वेळखाऊ प्रकरण आहे. बाकी कुठल्या मसाल्याची, कोथिंबीर - कढीपत्ता कश्याचीही गरज नाही. भाजल्याचा च फ्लेवर मस्त येतो आणि पदार्थ जिंकतो.
लोखंडी कढई वापरायची नाही. काळी होईल आमटी. शक्यतो जाड बुडाची स्टील ची कढई बेस्ट.
अगदी सेम पद्धत वापरून ओल्या तुरीच्या दाण्यांचीही आमटी करता येते. मी असला प्रकार मटाराचा ही केला होता - टोटल डीझास्टर. सो मटाराची उसळच चांगली होते. तसेच फ्रोजन दाण्यांची ही आमटी नीट होत नाही.
मधल्या काही स्टेप चे फटू मिसिंग आहेत - विसरलो काढायला - तरी मारकं पूर्ण द्यायचे गप...
मस्त आहे पाकृ. पण हरभरे
मस्त आहे पाकृ. पण हरभरे सोलण्याचा वेळ धरला पाहिजे पूर्वतयारीसाठी लागणाऱ्या वेळात
मस्तच, आजच आम्ही हरभर्याची
मस्तच, आजच आम्ही हरभर्याची आमटी केली . कृती पण जवळपास सारखीच होती. भातात ही आमटी खुप चांगली लागते.
मस्त पाकृ. आमच्यकडे नेहमी
मस्त पाकृ. आमच्यकडे नेहमी होते. ह्या season मध्ये दोन वेळा झाली.
खमंग होते.
मिरची नाममात्र घातली की मुलं ही आवडीने खातात.
भारी आहे!
भारी आहे!
हरभरे इ. तेल लावून अव्हनमध्ये भाजून घेता येतील बहुधा.
हरभरे इ. तेल लावून अव्हनमध्ये
हरभरे इ. तेल लावून अव्हनमध्ये भाजून घेता येतील बहुधा. >>>> एअरफ्रायरात भाजून घ्या हरभरे आणि लसूण. आणि मग हे सूप / आमटी करा. मस्त लागते.
योकु: भरलेल्या ताटाचा फोटो एक्दम तोंपासु......
वा छान दिसतेय एकदम.
वा छान दिसतेय एकदम.
मस्त! मी सोलाणे भाजले की
मस्त! मी सोलाणे भाजले की ओबडधोबड कुटून घेते.. खोबरं, तिखट , कोथिंबीर घालून आमटी..
सोलाणे घालून थालीपीठ , मभा पण मस्त लागत
मस्त दिसतेय!
मस्त दिसतेय!
ते ताट मोबाईलमधून हातात यायची
ते ताट मोबाईलमधून हातात यायची काही सोय असती तर!
आजच हरभरे ऑर्डर केलेत. नक्कीच
आजच हरभरे ऑर्डर केलेत. नक्कीच करणार.
मस्त! मी साधारण अशीच ओल्या
मस्त! मी साधारण अशीच ओल्या तुरीची आमटी केली होती इतक्यातच. त्यात तुरीचे दाणे भाजताना लसूण, मिरच्या आणि सोबत खोबर्याच्या पातळ चकत्याही भाजून घेतल्या. मग भरड वाटून असेच फोडणीला टाकले. धणा जिरा पावडर, गरम मसाला ऑप्शनल. मस्त लागते ती आमटी पण.
ताट मस्त दिसते आहे. पाककृतीही
ताट मस्त दिसते आहे. पाककृतीही सोपी आहे.
ओले हरभरे सोलतानाच निम्मे पोटात जातात त्यामुळे त्याची आमटी करायला बराच पेशन्स लागेल.
>>> एअरफ्रायरात भाजून घ्या
>>> एअरफ्रायरात भाजून घ्या हरभरे आणि लसूण
हो, good idea!
मी काळा मसाला आणि भाजलेले
मी काळा मसाला आणि भाजलेले कांदा खोबरं वाटून करते या हरभऱ्याची किंवा तुरीच्या दाण्यांची आमटी. इथे लिहिली होती पूर्वी ती रेसिपी.
पण दर वेळी इतकं मसालेदार खायची इच्छा होत नाही. हा छान पर्याय आहे.
इथे सोललेले हरभरेच मिळतात. आहेत घरात एका वेळी पुरतील इतके. उद्याच करते.
<<लोखंडी कढई वापरायची नाही. >
<<लोखंडी कढई वापरायची नाही. >>
हे काय वाचतेय मी??? योकु च्या पाकृ मधे हे वाक्य??
मायबोली पूर्वीची राहिली नाही हेच खरं..
मस्तच.
मस्तच.
मस्त. पण त्या भाजीची रेसिपी
मस्त. पण त्या भाजीची रेसिपी द्या ना प्लीज
मस्त रेसिपी. फ्रोजन मिळाले तर
मस्त रेसिपी. फ्रोजन मिळाले तर करून बघेन.
मै +१
अरूण+१
स्नेहा - भोपळ्याच्या बाकर
स्नेहा - भोपळ्याच्या बाकर भाजी ची तशी विशेष कृती नाही.
तीळ-दाणे भाजून केलेला कूट, सुकं खोबरं किसून, जरा खसखस आणि चिंचेचा कोळ हे मेन घटक, बाकी मग धणे-जिरेपूड, तिखट हळद काळा मसाला (जरा जास्त) मीठ आणि बर्यापैकी गूळ.
भोपळा सालीसकट जरा मोठा चिरून घ्यायचा. जरा दमदमीत तेलात मोहोरीच्या फोडणीवर कूट, खोबरं अन कोरडे मसाले परतून घ्यायचे; परततांना ओलसरपणा करता चिंचेचा कोळच वापरायचा.
नंतर भोपळा घालून परतून उरलेला कोळ जरा रस होईल आणि भोपळा शिजेल इतकं पाणी, मीठ आणि गूळ.
सुरेख भाजी होते.
अशीच ढेमश्यांची आणि परवरांची ही भाजी करता येते.
आ हा... काय सुरेख रंगसंगती
आ हा... काय सुरेख रंगसंगती असणारं ताट आहे योकू...एकदम चित्रकाराची कलर पॅलेट वाटली...!
((मुगाच्या डाळीची आंबट - गोड अशी खिचडी, भाकरी ))
खिचडी आंबटगोड कशी केली? लगेहाथ ती पण रेसिपी देऊन टाका...
स्वान्त्सुखाय - इथे पाहा बर
स्वान्त्सुखाय - इथे पाहा बर https://www.maayboli.com/node/72808
स्वान्त्सुखाय - इथे पाहा बर))
स्वान्त्सुखाय - इथे पाहा बर)))
मस्तच वाटतेय ही पद्धत..आणि द्राक्षांच रायतं पण नवीनच ऐकलं..करून पाहायला हवं!
धन्यवाद योकु. छान दिसते आहे
धन्यवाद योकु. छान दिसते आहे भाजी.
छान पाककृती..
छान पाककृती..
करून पाहेन नक्की..!
ते ताट ...अहाहा काय सुरेख आहे
ते ताट ...अहाहा काय सुरेख आहे, रसना का काय म्हणतात त्या तृप्त झाल्यात
वाह वाह ! आज फोटो सकट पाकृ
वाह वाह ! आज फोटो सकट पाकृ आलेली आहे..! १०० पैकी १०० मार्क्स !!
कसलं दिसतंय भरलेलं ताट ..! सुंदर , पाकृ पण भारीच !
भोपळ्याच्या साली न काढता आहेत ना ? जेवताना काढायच्या का ? कि सालासकट खायचं ???!!!
अंजली, येस साली न काढताच
अंजली, येस साली न काढताच भोपळा वापरतो. फारच जून असतील तर जरा वर वरची काढून मग वापरायचा. साल काढली नाही तर भोपळा अगदीच गाळ शिजतो म्हणून हे साल ठेवणे प्रकार. सालीसकट भाजी खाता येते किंवा खाताना साल बाजूलाही काढतात काही लोक...
छान डिटेल क्रुती आणी कलरफुल
छान डिटेल क्रुती आणी कलरफुल ताटाचा अॅपेटाय्झिन्ग फोटो.
फक्त ते नीट भाज बसली नाही तर वाचायला जरा विचित्र वाटतय त्यापेक्षा निट भाजले गेले नाहि तर बर वाटेल.
आज केली होती ही आमटी . छान चव
आज केली होती ही आमटी . छान चव आहे . आवडली सगळ्यांना . फोटो नाही काढला कारण तुम्ही काढलेल्या फोटोप्रमाणे हिरवीगार दिसत नव्हती . काही हरबरे पिवळसर होते. पण ती आमटीपेक्षा सूप म्हणूनच चांगली वाटेल. थोडी mild चव वाटली .
आज मी पण केली होती ही आमटी
आज मी पण केली होती ही आमटी सूप च्या ऐवजी. छान झाली, थोडे लिंबू पिळून घेतलं होते पिताना.
Pages