वर्ष २०२४: संकल्प आणि plans

Submitted by किल्ली on 25 December, 2023 - 01:54

नमस्कार माबोकर मंडळी.
आज नाताळ.
नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होईल, व्यायामशाळा गर्दीने फुलून जातील. Healthy/ पौष्टिक खाण्याच्या संकल्पाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न जवळपास सगळेचजण करतील. Happy

ह्याही वर्षी काही विशेष संकल्प असतील तर इथे लिहूया आणि नियमितपणे update देऊया.
काही कामे अशी असतात की ती प्रत्यक्ष सुरु केल्यानंतरच त्याची depth कळते आणि ती वाढत जातात. त्यामुळे कधीकधी पूर्णत्वाकडे जात नाहीत.
असंही काही असेल आणि आपण comfortable असू तेवढं इथे share करूया. कदाचित ती आव्हाने पूर्ण करण्यासाठी मदत इथे मिळेल. एकमेकांचे अनुभव कामाला येतील. Motivation तर नक्की मिळेल.

मागचं वर्ष वैयक्तिक /भावनिक पातळीवर प्रचंड उलथापालथ करणारं ठरलं माझ्यासाठी. जीवनाची घडी जमेल तशी बसवते आहे. ती व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने माझ्यासमोर अनेक आव्हाने आणि कामे आहेत. तोच माझा plan असेल. त्यातील काही कामांची नोंद इथे ठेवीन.
.............
१. कार driving शिकणे - पातळी: स्वतः गाडी ऑफिसला आणि इतर कामासाठी पुण्यात घेऊन जाता आली पाहिजे आणि one piece मध्ये वापस आली पाहिजे सुरक्षित.

२. Documents ची कामं - चिक्कार आहेत. सगळी इथे लिहीत नाही.पण मुख्य कामे पूर्ण झाली की अपडेट्स देईन.

३. Health आणि व्यायाम :

A.नियमितपणे walking सुरु ठेवीन. त्याची attendance maintain करेन. म्हणजे track राहिल.
B. Diet : ह्याचीही एक checklist बनवली आहे. ह्यात काय खायचे नाही आणि काय खायचे ह्याचे calender बनवले आहे ते भिंतीवर लावून रोज टिक करत जाईन. जास्त काही strict नाही. फक्त अनियंत्रित असणाऱ्या वाईट सवयी सोडण्यासाठी आहे.

४. मानसिक आरोग्य आणि stress management
ह्यात सुधारणा करायची आहे.

५. माझ्या कामाला पूरक अशी नवीन technology शिकणे आणि त्यात project करणे.

६. लिखाण almost बंद झाले आहे. ते परत सुरु करायचे आहे. माझ्या दोन्ही web sites बंद पडल्यात त्या परत सुरु करायच्या आहेत.
......

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> त्यापुढे कठीण ते महकाठीण होत जाते.
@मानव खूपच छान. आपण खूप पुढे गेलेले आहात मग.
मला वाटतं आपली पडछाया (shadowy persona) आपण स्वीकारणे (embrace) खूप आवश्यक असते. काही जणांना (मला) सहज जमते काहींना (परफेक्शनिस्ट लोकांना, सेल्फ-ड्राईव्ह खूप असलेल्या) लोकांना ते कठीण जाते.

>> खरं तर कोणतीही एक गोष्ट करा पण perfect करा असं माझं मत असतं.
असं माझं पण मत होतं एके काळी. पण माझ्या असं लक्षात आलं की सुरुवातीला आपली जी उत्कृष्टपणाची (perfect ) व्याख्या असते ती आपणच हळूहळू उंचावत नेतो आणि पर्यायाने ती गोष्ट करणे आपण जमत नाही म्हणून सोडून देतो. त्यामुळे, पर्फेक्टशनच्या फार नादी लागणे मी सोडून दिलं आहे,

माझे या वर्षी दोनच संकल्प ...पण मी मनापासून प्रयत्न करणार आहे पूर्ण करण्याचा...
१. वजन कमी करणे. किती ते नाही ठरवलं..पण करणार कमी.
२. खर्चावर ताबा ठेवणे. (माझा हात बऱ्यापैकी खर्चिक आहे. )
वेळेत सवयीला आवर घालायला हवा.
मुद्दाम इथे कबूल करतेय..

अश्विनी, खाणं कमी केलंस तर आपोआप दोन्ही गोष्टी साध्य होतील, शुभेच्छा!
माझाही एक संकल्प आहे. नवीन वर्षाचा नाही म्हणता येणार कारण तो जरा आधीच केला. तो म्हणजे .. परत लिहायला सुरुवात करणे. त्यासाठी, जसा पूर्वी करत असे तसा सतत लिखाणाचा विचार करणे.

>>>>>> परत लिहायला सुरुवात करणे. त्यासाठी, जसा पूर्वी करत असे तसा सतत लिखाणाचा विचार करणे.
मस्त.

ओह ओके.

स्वगत (तुम्हाला उद्देश्युन नाही मानव) - 'कॉम्प्लिमेन्ट न घेता येणे', 'ब्लेम मात्र तत्काळ घेणे' , ' सेटिंग टु हाय अ बार' ही काही परफेक्शनिस्ट व्यक्तित्वाची व्यवच्छेदक लक्षणे.

सगळ्यांचे संकल्प वाचले. सर्वांना शुभेछा Happy
चिमण - लिखाण नक्की चालू करा!

माझा संकल्प - नियमित सकाळी लवकर उठणे. याला काही उपाय tricks असल्या तर सुचवा कृपया Happy मी अजिबात मॉर्निंग पर्सन नाही. पण सकाळी लवकर उठून कामाला लागायची खूप इच्छा आहे.

बोका - हाहा पण मला हे ज्यूस वगैरे प्यायचे नाहीत. असे चालू केले तर खरच माझी जगायची इच्छा मरून जाईल Lol
सामो - येस जमवायला हवे रात्री लवकर झोपणे (त्यासाठी वेब सिरीज धाग्यावर येणे बंद केले पाहिजे आधी. Netflix सुटत नाही हाहा

गाडी ऑफिसला आणि इतर कामासाठी पुण्यात घेऊन जाता आली पाहिजे>>>>>>> Biggrin
पुण्यात गाडी चालवणारा माणूस चंद्रावरपण गाडी चालवू शकतो Biggrin

Health आणि व्यायाम
मानसिक आरोग्य आणि stress management
माझ्या कामाला पूरक अशी नवीन technology शिकणे आणि त्यात project करणे

माझ्यासाठी ह्या ३ गोष्टी टॉप priority असतील. बाकीच्या गोष्टी लागेल तसं अ‍ॅड करीन.

वाचतेय सगळ. सगळ्यांचे संकल्प सिद्धीस जावोत ही शुभेच्छा

स्क्रीन टाईम कमी करणे हा माझा २०२४ चा संकल्प आहे.

गिटार आणि बासरी घेऊन ठेवलीय तर एक तरी धड वाजवायला शिकायचंय
वजन 112 वर अडकलंय, त्याला किमान दोन आकड्यात आणायचं आहे- त्यासाठी रोज पायी फिरणं आलं. हल्ली जरा strength कमी वाटायला लागलीये तर त्यासाठी काहीतरी वजनदार काम रोज करायचंय.

वाचन वाढवायचंय, लिखाण सुरू करायचंय. असं बरंच काही काही. नोकरीचं एक, थोडं सिरियसली काम करून बढती घ्यायची. खरं तर नोकरीचा कंटाळा येतोय. शेअर मार्केट शिकायचं, गुंतवणूक करायची. शेताकडे लक्ष द्यायचं.

दुसरा स्टेबल इन्कम सोर्स शोधून त्यावर काम करायचं

सर्वांना संकल्पपूर्तीसाठी शुभेच्छा.

स्वतः नववर्षाचे म्हणून संकल्प यावर्षी करणार नाही कारण मागच्यावर्षीचा बॅकलॉग प्रचंड आहे Happy

२०२३ सालाने मानसिक आणि शारीरिक आरोग्याची, पेशन्सची कठीण परीक्षा घेतली, तुटेपर्यंत ताणले. कुजक्या लोकांनी मनाला प्रचंड दुःख दिले, सहकाऱ्यांनी भरभरून मनस्ताप दिला, प्रचंड आर्थिक नुकसान केले. पण stayed rock steady . डिप्रेशन आणि मधुमेहाचे गळेपडू निमंत्रण परतवून लावले. जमले-जमवले. यावर्षीही जमवणार !

मागच्यावर्षी उजव्या हाताने सर्व काम करण्याचा प्रण केला होता (मी डावखुरा आहे, उजवा हात जेमतेम १०% क्षमतेने वापरतो). बरीच प्रगती झाली. सही दोन्ही हातानी सेम येते आहे. उजव्या हाताने फळे-भाज्या शार्प चाकूने चिरता येण्याइतपत जमते आहे, feeling proud !

डॉक्टरांची कानटोचणी आणि एकंदर वाढलेले वजन लक्षात घेऊन फायनली व्यायामाला सुरुवात केली आहे.
प्रोफेशनल अभ्यास वाढवायला सुरुवात करणे ही दुसरी प्रायॉरीटी २०२४ साठी.

उजव्या हाताने फळे-भाज्या शार्प चाकूने चिरता येण्याइतपत जमते आहे >> जबरी!!

सर्वांचेच संकल्प रोचक आहेत. कॉर्पोरेटमध्ये असतो तर म्हणालो असतो की दर ३ महिन्यांनी संकल्पपूर्ती कुठवर आली याचा आढावा घ्यायला धागा काढू. Wink

मागच्यावर्षी उजव्या हाताने सर्व काम करण्याचा प्रण केला होता (मी डावखुरा आहे, उजवा हात जेमतेम १०% क्षमतेने वापरतो). बरीच प्रगती झाली))))

हे भारी आहे...पण असा संकल्प कशासाठी केला होता?

... असा संकल्प कशासाठी केला होता?...

पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी Happy

जोक्स अपार्ट, डावखुरा असलो तरी साधारण १४-१५ वयापर्यंत दोन्ही हाताने लिहिणे (सारखेच गचाळ अक्षर), चित्रे काढणे, जेवणे, जड सामान उचलणे वगैरे जमत होते. नंतर उजवा हात वापरणे कमी कमी होत गेले आणि त्याने काहीच काम जमेनासे झाले ते आतापर्यंत. आता परत दोन्ही हात वापरता येण्यातला आनंद लुटतो आहे Happy

आत्ता वेळ होता म्हणून सप्लायर्स च्या वेब साइट्स बघत होते. मस्त मस्त कच्चा माल बघुन स्वतःच काही परफ्युम्स बन वावीत असे वाटू लागले आहे.

संकल्प - मायबोली टाईम कमी करायचा आहे.

तीन स्टेप्स डोक्यात आहेत.

1) माबो वाचन शून्य करायचे. कुठलेच धागे, लेख, कथा, चर्चा वाचायच्या नाहीत. भले जगात काय चालू आहे ते काही दिवस नाही समजले तरी चालेल. मग भले कोणी बोलू दे तुझे माबोवाचन कमी पडतेय. कारण तो प्रतिसाद सुद्धा वाचला जाणार नाही.

2) प्रतिसाद शून्य करायचे आहेत. भले आयपीएल चालू होऊ दे किंवा शाहरुखचे एकाच महिन्यात तीन चित्रपट प्रदर्शित होऊ दे. जगातल्या घडामोडींवर व्यक्त व्हायचे नाही.

3) आपले आपले लिखाण करायचे. धागे काढायचे. कोणी वाचतेय की नाही, प्रतिसाद येताहेत की नाही याची चिंता करायची नाही. जोपर्यंत कोणाला आपल्याकडून काही प्रतिसादाची अपेक्षा नाही तो पर्यंत तो आपल्याच धाग्यावर सुद्धा द्यायचा नाही.

बघू किती प्रमाणात आणि किती महिने जमते एक तारखेपासून.....

एकदा हे जमले की मग माझे इतर बरेच संकल्प सहज पूर्ण होतील..

कॉर्पोरेटमध्ये असतो तर म्हणालो असतो की दर ३ महिन्यांनी संकल्पपूर्ती कुठवर आली याचा आढावा घ्यायला धागा काढू. Wink---- इथे करणार आहोत आपण feedback and analysis. Quartery Proud
नुकताच review झालाय ऑफिस मध्ये त्यामुळे समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते!

संकल्प - मायबोली टाईम कमी करायचा आहे.>>>>>

तुला तुझ्या या संकल्पाची आठवण करून द्यायचा मी संकल्प करत आहे.

तसेच शक्य तितक्या माबोकरांनी मोठ्या संख्येने माझ्या संकल्पामधे सामिल व्हावे असे मी आवाहन करत आहे.

>>>>>पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी Happy
हाहाहा
>>>>>>>>२०२३ सालाने मानसिक आणि शारीरिक आरोग्याची, पेशन्सची कठीण परीक्षा घेतली, तुटेपर्यंत ताणले. कुजक्या लोकांनी मनाला प्रचंड दुःख दिले, सहकाऱ्यांनी भरभरून मनस्ताप दिला, प्रचंड आर्थिक नुकसान केले.
अरेरे.
हे नवे वर्ष नक्की मस्त जाणार. एकदा रॉक बॉटम (नदीच तळ) गाठल्यानंतर दुसरी दिशा ही उर्ध्वच असणार. तेव्हा काळजी करु नये.

तुला तुझ्या या संकल्पाची आठवण करून द्यायचा मी संकल्प करत आहे.
>>>>

हे नक्की करा. ते माझ्या फायद्याचे आहे. यावेळी काही गोष्टी पक्या ठरवले आहेत. कारण तब्येत.. आयुष्य थोडे वाढवायचे आहे. आणि त्यासाठी जरा वेळ हवा आहे Happy

यंदाच्या वर्षी फक्त एकच संकल्प

___________________________
सीरियस मोड ऑन ---
@ र आ - परिक्रमा फाइनल असेल तर संपर्कामध्ये राहून एकत्र करायचा ठरवू शकतो शेड्यूल

करून द्या पहाट नवीन पंखांना
अपेक्षा भरारी घेऊ द्या सुसाट रस्त्यावरून
क्षितिजे धाऊन पळून जातील
लवकर निघा कामावरून

Pages