परवा परवा कविताकोश डॉट ऑर्ग साईटवरती 'अनिल कार्की' यांच्या 'रमोलिआ-१', 'उदास वख्त के रमोलिआ', आणि 'पहाडोंपर नमक बोती औरते' या व इतर कविता सापडल्या. साईटवरील, माहीतीनुसार, उत्तरखंड भागातील, एका गावी या कविचा जन्म झालेला आहे. पहील्यांदा भेदक वाटली ती या कवितांमधील भाषा. हिंदी पण प्रादेशिक बोली भाषेचा प्रभाव. कवितांमधील, शब्दाश्बदांतून, अक्षरक्ष: 'मिट्टी की सौंधी खुशबू' म्हणतात तसा भास होतो. खूपसे लोकजीवन, रीतीरिवाज या कवितांमधून लक्षात येते.
ए हो
मेरे पुरखो
खेत के हलिया [हल चालवणारा]
आँगन के हुड़किया[ हुडुक नावाचे वाद्य वाजविणारा]
आँफर[हत्यार बनविण्याची, हत्यारांना धार लावण्याची जागा] के ल्वार[ लोहार]
गाड़[ लहान नदी] के मछलिया[कोळी]
ढोल के ढोलियार[ढोल वादक]
होली के होल्यार[होळी गायक12]
रतेली[विवाह प्रसंगी नौटंकी करणाऱ्या वरपक्षाच्या स्त्रिया] की भौजी
फतोई[पहाडी बास्केट] के औजी
जाग जाग
मेरे भीतर जाग!
.
जसे लोकजीवन लक्षात येते तसेच या लोकजीवनाचा ऱ्हास होत चालला आहे, हेही लक्षात येते. कविने तेथील लोकांचाच तळतळाट, या कवितांमधुन व्यक्त केलेला आहे. बाप रे! शिव्या शापांची भाषा अतिशय उद्वेगी, आहे, मग त्यात कोणताही खोटा मुलामा नाही की सौम्यता नाही. मला पहील्यांदा वाचल्यावर ती भाषा शापवाणी आणि पोट ढवळून काढणारी वाटली होती. डार्क ,ताकदवा, सशक्त वाटलेली.
तेरी गुद्दी[मेंदू1] फोड़ गिद्द खाए
तेरे हाड़ सियार चूसे
चूहे के बिलों धंसे तेरे अपशकुनी पैर
लमपुछिया[लांब शेपूटवाले] कीड़े पड़े तेरी मीठी जुबान में
तेरी आँखों में मक्खियाँ भनके
आदमी का ख़ून लगी तेरी जुबान
रह जाए डुंग[दगड] में रे!
नाम लेवा न बचे कोई तेरा
अमूस[अमावस्या] का कलिया
रोग का पीलिया
मार के निशान का नीला
ढीली हो जाय तेरी ठसक दुःख से
नक्की कोणाला उद्देशून हा तळतळाट आहे ते कळले नाही. पण एकंदर निसर्गाचा ऱ्हास अन्य काही सामाजिक समस्या या शापवाणीच्या तळाशी आहेत.
ए हो मेरे पुरखो
जागो जागो रे
मेरे भीतर जागो
इस बखत के बीच में
किंवा,
जै हो!
इस बखत की संध्या में
इस बखत की अमूसी रात की चाँख[दृष्ट] लगी है
तेरह बरस का राज्य
तेरह बरस का बछड़ा
बिज्वार[बैल] नहीं बनेगा
कौन मलेगा रे उसकी उगती जुड़ी पर तिल का तेल
करणी, जादूटोणा अशा प्रकारांची आठवण करुन देणारी, ही कविता खूप खूप डार्क जॉनरमधली, शाबर मंत्र वगैरे सारखी एकदम आदिवासी भाषा वाटली, जिला एक नाद आहे, जी काळजाला घरे पाडते, आपल्या आरामदायक शहरी मनाला जिची भीती वाटते.
.
'पहाड़ों पर नमक बोती औरतें ' या कवितेत मात्र वाचकांपुढे, मुख्यत्वे, स्त्रीजीवन येते. पहाडी स्त्रिया, पर्वतांवर जाउन, मीठ टाकून का येतात त्याचे वैद्न्यानिक कारण कळत नाही पण तशी काहीशी लोक-प्रथा दिसते. 'पलटनिया पिता-1', 'पलटनिया पिता-२' आदि कवितांमधून अजुन एक जीवनाचा पैलू लक्षात येतो तो म्हणजे, येथील पुरुष सैन्यात भरती होतात.'शेरपा' नावच्या कवितेत दु:ख मांडलेले आहे की या शेरपांनीच ज्यांना वाटाड्या या नात्याने वाट दाखविली, तेच लोक आता या जमातीला लुटत आहेत.
.
नेटवरती शोधून कवि 'अनिल कार्की' यांच्याबद्दल फारशी माहीती मिळाली नाही. हे एक युवा, उदयोन्मुख कवि असावेत. एखाद दुसरी कविता फेसबुकवरही सापडली.
चीख रहे हैं बीज
रो रही हैं झांड़ियां
असहाय बेलें
लड़खड़ाती
गिर रहीं धरती पर
जिसे डुब जाना है
एक दिन
उदास सावट असलेल्या या कविता, नेपाळ, उत्तरखंडमधील सामाजिक प्रश्न अधोरेखित करतात.
_____________________________________________________
http://kavitakosh.org/kk/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E...
जयप्रकाशा कर्दम या कविच्या कविता, दलित रचना , या श्रेणीखाली वाचायला मिळाल्या. खूप वेदना आहे, विद्रोह, आक्रोश आहे या कवितांमध्ये. तसेच सामाजिक, विशेषत: रुढींविरुद्ध लिहीलेले आहे. शिक्षणानेच सामाजिक स्तर उंचाउ शकेल, अशी दिशा आहे.
कविता आवडल्या. कविची माहीती वाचली. कविस, आंबेडकरांबद्दल आदर व आत्मियता आहे. बरेच लेख आहेत जालावरती.
प्रत्यक्ष ईश्वरालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे -
ईश्वर, तेरे सत्य और शक्ती को
मै अब जान गया हूं
तेरे दलालोंकी कुटीलता
और कमीनेपनको भी
पहचान गया हूं
शुक्र है तू कहीं नही है
केवल धर्म के धंधे का
एक ट्रेड नेम है
अगर सचमुच तू कही होता
तो सदीयोंकी
अपनी यातना का हिसाब्
मै तुझसे जरुर चुकाता
आरक्षणाच्या संदर्भात, कविचे विचार -
.
क्या मंदीरोंकी मोटी कमाई पर
ब्राह्मणोंका एकाधिकार उचित है?
क्या गैर-सरकारी संस्थानोमे
केवल सवर्णोंका नियमन उचित है?
क्या यह सब आरक्षण नही है
फिर मेरे आरक्षण का विरोध क्युं?
साभार - https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/123911/9/09_chapter%2...
एक सखी आपल्या प्राणप्रिय
बिती विभावरी जाग री - जयशंकर प्रसाद -
एक सखी आपल्या प्राणप्रिय सखीला जागी करते आहे.
बिती विभावरी जाग री| विभावरी म्हणजे रात्र- ‘ रात्र सरली आहेआणि तू अजुन निद्राधीन ! अगं उठ आणि बघ तरी - तेजोनिधी सूर्यनारायण सप्ताश्व रथावरती स्वार होउन निघाले. ऊषारुपी वधु तारकारुपी रजत घट , आकाशाच्या तेज-गंगेमध्ये ओतु लागली आणि तुझ्या डोळ्यावरील झोप काहीउडत नाही. अशी कशी ग तू, मी केव्हाची उठवते आहे, पण तू काही जागे व्हायचेनाव घेशील तर शपथ. पक्षीसुध्दा जागे होउन किलबिल करु लागले आहेत. नव्या पालवीने तरारलेल्या तरुवेलींचे पदर वार्यावर डोलत आहेत, कळ्याफुलांच्या अंगोपांगी मधुघट भरुन ओसंडत आहेत. हे सारे सृष्टीसौंदर्य वाया चालले आहे; उठून बघ तरी.
पहाटेच चित्रमय तसेच काव्यमय वर्णन कवि जयशंकर प्रसाद यांनी केलेले आहे. ते जेव्हा पहाटेच्या लालिम्याला पाणवठ्याचीउपमा देतात तेव्हा सहजच सुधीर मोघे यांच्या ‘फिटे अंधाराचे जाळे’ कवितेतील वाहणारा प्रकाश आठवतो.
तर ‘बीती विभावरी जाग री’ याकवितेतील नायिका कशी आहे तर ती निद्रीस्त आहेच पण तिने केसांत मलय पर्वतावरून येणारा सुगंधमाळला आहे. कवितेच्या शेवटच्या कडव्यात हे वर्णन येते आणि रसिकांना उलगडा होतो की नायिका अन्य कोणी नसून, भारतमाता आहे. ही सरलेली रात्र आहे परकीय राजवटीतील पराधीनतेची. आणि ही नितांत सुंदर कविता , वेगळ्याच विलक्षण उंचीवर जाउन पोचते. कविरुपी सखी भारतमातेला जागृत करत आहे - उठ पारतंत्र्याची रात्र सरली आणि उज्वल भविष्याची पहाट उमलली आहे.
विलक्षण सुन्दर कविता आहे.
भा रा तांबे यांच्या 'घन तमी
भा रा तांबे यांच्या 'घन तमी शुक्र बघ राज्य करी' कवितेची आठवण करुन देणारी , अज्ञेय यांचीबावरा अहेरीही कविता मध्यंतरी वाचनात आली. मनावरील निराशेची पुटे झाडून मनास उभारी देणाऱ्या कवितेतील शुक्राची आठवण का आली हे पुढे येइलच.
पहटेला कोणी एक शिकारी पावले न वाजवता हळूच येतो आणि काय करतो आहे तर - जगावरती आपल्या रक्तिम किरणांचे जाळे पसरतो आहे. आणि हे जाळे तरी कसे तर सर्व प्राणीमात्र काय वस्तुदेखील या जाळ्यात एकेक करत अडकत जातात. मग त्याच्या शिकारीमध्ये ना फक्त मध्यम आकाराचे पारवेच येतात तर मोठे मोठे पक्षीदेखील अडकतात.
पहील्यांदा आकाशातील वस्तू मोजता मोजता आता कवि खालती पृथ्वीवरती येतो.निव्वळ पशुपक्षीच नाही तर स्थावर जंगम, विमाने, त्रिशूळ ध्वजवाले मंदीरांचे कळस या किरणांच्या जाळ्यात हळूहळू येत जातात. गोरज मुहूर्तावरील गाईंच्या खुरांनी उडणारी धूळ, बागेमध्ये कमानाकार रचलेल्या वेलींची सिलहाउटी, कार-मोटार बसचा धुराळा, धूर सुद्धा. अर्थात धूर सूर्यप्रकाशाला अडथळा करेल असे आपल्याला वाटते पण नाही हा शिकारी त्यांचेही भक्ष्य करतो आहे, त्यांनाही आपल्या पकडीत बंदिस्त करत चालला आहे. कारखान्यांच्या धुराड्यातून उठणाऱ्या काळ्याकुट्ट धूरांच्या ढगांनाही त्याने आपल्या चपेटमध्ये घेतलेले आहे.
आणि मग अशा काळोख्या धूराच्या वर्णनानंतर कवि म्हणतात - हे समर्थ, ताकदवान अशा शिकाऱ्या तुझ्या सद्दीपलीकडे कोणताच काळोख नाही. तुझे जाळे पोचत नाही असा कोणताही जळमटवाला कोपरा नाही असे असताना, तू ये आणि माझ्या मनातील काळोखाचे साम्राज्यदेखील तुझ्या किरणांच्या जाळ्यामध्ये ओढून घे. माझ्या मनाच्या प्रांगणात असा एकही कानाकोपरा सोडू नको जो की अंध:कारमय आहे. तुला हे सहज शक्य आहे. तुझ्या ज्योतिर्मय प्रकाश जाळ्याच्या कृतज्ञतेने माझे मन ओसंडून भरुन वाहू देत.
कोणी कधी शिकाऱ्याला आमंत्रण, आवताण देते का तर नाही पण हा सृष्टीतील अनवट शिकारी- सूर्यनारायण मात्र हवाहवासा आहे, कवि त्याच्या जाळ्यात आपले तन मन गुरफटू देण्याकरता तयार आहे. हा कवितेचा परमोच्च बिंदू आहे.
पहिल्या दोन कविता थोड्या
पहिल्या दोन कविता थोड्या वाचल्या. पण पुढे पुढे वाचवेनात तेव्हा नाद सोडला. 'पहाड़ों पर नमक बोती औरतें' मात्र पूर्ण वाचली. आणि आवडली. पण त्या स्त्रिया असं का करतात ते मात्र कळलं नाही. बर्फ वितळू नये म्हणून मीठाचा वापर करतात त्याचा संदर्भ असावा का? का त्या पर्वतावर लाकडं वगैरे फोडून घाम गाळतात त्या कष्टाच्या घामातल्या मीठाचा संदर्भ आहे? पलटनिया, शेरपा, प्रतिसादातल्या कविता अजून वाचल्या नाहीत. नंतर वाचेन.
मराठी साहित्यातलं बरंच काही वाचायचं राहिलंय. हिंदी तर सातवीपर्यंतच घेतलेलं. त्यामुळे तिथे तर आनंदच. दहावीनंतर तर संस्कृतही सुटलं. ना धड संस्कृतचा अभ्यास झाला ना हिंदी साहित्याची ओळख झाली. असो. निदान ह्या निमित्ताने काही वाचून होतंय म्हणून तुमचे आभार,
स्वप्ना धन्यवाद.
स्वप्ना धन्यवाद.
आज वेळ मिळाला तेव्हा पलटनिया
आज वेळ मिळाला तेव्हा पलटनिया पिता १ आणि २ वाचल्या. सहसा मी कवितांच्या वाटेला जात नाही. पण ह्या वाचाव्याश्या वाटतात. पलटनिया पिता १ आवडली. पलटनिया पिता २ मधले बरेचसे शब्द कळले नाहीत. हिंदीच्या घोर अज्ञानामुळे का बोलीभाषेतल्या शब्दांचा वापर असल्यामुळे हा संशोधनाचा विषय ठरावा
ह्या दोन्ही कविता वाचून पुलवामानंतर भारताने चायनावर आक्रमण करावं ह्यासाठी शिवाजीपार्कवर लोकांच्या सह्या गोळा करणारे पेन्शनर्स आठवले. त्यांना ह्या कविता वाचायला दिल्या पाहिजेत :रागः
शेरपाही आवडली. अगदी मार्मिक भाष्य केलंय. 'बावरा अहेरी' स्वतः वाचून काहीही कळली नाही.
तुम्ही दिलेला अर्थ नंतर वाचते.
होय स्वप्ना, 'बगस' व अन्य
होय स्वप्ना, 'बगस' व अन्य काही शब्दांना मी देखील अडखळले/ अडखळते पण त्यांना वळसा घालून पुढे गेले की अधिकाधिक सुंदर जागा लक्षात येउ लागतात, कधी मनात नवीन विचार उमटू लागतात. कविने लिहीलेली कविता आपल्याला वेगळ्या तर्हेने उलगडू शकते., व ती आपली पर्सनल कविता बनून जाते.
उत्तरेकडच्या राज्यातल्या
उत्तरेकडच्या राज्यातल्या निसर्गाचं मला असलेलं आकर्षण आणि नव्या शब्दांची, नव्या तर्हेच्या जीवनशैलीची होत असलेली ओळख ह्यामुळे ह्या कविता वाचाव्याश्या वाटताहेत बहुतेक.
मला हिंदी भाषेचे सौंदर्य फार
मला हिंदी भाषेचे सौंदर्य फार भुरळ घालते स्वप्ना. प रवा मी बातम्या ऐकत होते ज्यात - हॉकीच्या आपल्या मुलींच्या टीमने जी इच्छाशक्ती व चिकाटी दाखवली तिचे वर्णन करताना कोणीतरी इतक सुंदर शब्द वापरला - अपनी बेटीयोंने जो ललक दिखाई ..... तो शब्द आणि असे अनंत सुंदर शब्द आहेत हिंदीमध्ये. ते कवितां मध्ये सापडले की मग मी ते गुगल करुन करुन अजुन हिंदी वाचते. छंद आहे माझा.
फ़क़त चंद लम्हे - निदा फ़ाज़ली
निदा फ़ाज़ली
पिघलता धुआँ ही कविची आठवण आहे. या आठवणीतील घराचे आंगण हे सफरचंदाच्या झाडांनी सुशोभित आहे, घरापाशी एक तळे आहे. मला वाटते कविचे घर काश्मीरमध्ये होते.
ही फ़ातिहा नावाची नज्म तर इतकी सुंदर आहे. माणुसकी शिकवण्याकरता कवि जन्म घेतात.
फातिहा म्हणजे - मृतकों की आत्मा की शांति के लिए, पवित्र क़ुरआन की प्रथम सूरत (अध्याय)
कवि म्हणत आहेत कबरी वेगवेगळ्या असतील पण प्रत्येक मृतात्म्याच्या विरहात, दु:खी-कष्टी हृदय तर एकच असते कधी कोण्या आईचे तर कधी बापाचे, मुलाचे, प्रेयसीचे. मग फातिहा कोणत्याही कबरीपुढे वाचल्याने काय फरक पडतो बरं. एकाच दु:खावरती घातलेली ती फुंकर आहे.
छोटी सी हँसी
फ़क़त चंद लम्हे ही एक सुरेख नज्म आहे. बस यायला अवकाश आहे. कवि आणि एक मुलगी/स्त्री बसस्टॉपवरती उभे आहेत. दोघेही अपरिचित पण कवि संभाषण करु इच्छितो. का नाही? दोन अपरिचितांनी एकमेकांशी शब्दही बोलू नये असे काही असते का? कधीकधी तिर्हाईत व्यक्तीशी बोलून एक सुकून (शांती) मिळतो कारण तिर्हाईत व्यक्ती नॉन-जजमेन्टल असते. आपल्याला घरच्या-दारच्या कटकटी विसरुन , २ क्षण घालवता येता. हे वैश्विक सत्य आहे.
छोटी सी हँसी - निदा फ़ाज़ली
.
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
रानभुली आपल्या
रानभुली
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
गंगाधर मेहेर या कविच्या काही
गंगाधर मेहेर या कविच्या काही कविता मध्यंतरी वाचल्या -
हे उषेचे म्हणजे पहाटफुटीचे सुंदर वर्णन -
" समंगल आई सुन्दरी
प्रफुल्ल-नीरज-नयना उषा,
हृदय में ले गहरी
जानकी-दर्शन की तृषा ।
नीहार-मोती उपहार लाकर पल्लव-कर में
सती-कुटीर के बाहर
आंगन में खड़ी होकर
बोली कोकिल-स्वर में :
'दर्शन दो सती अरी !
बीती विभावरी ॥'
*
अरुणिमा कषाय परिधान,
सुमनों की चमकीली मुस्कान
और प्रशान्त रूप मन में जगाते विश्वास :
आकर कोई योगेश्वरी
बोल मधुर वाणी सान्त्वनाभरी,
सारा दुःख मिटाने पास
कर रही हैं आह्वान ।
मानो स्वर्ग से उतर
पधारी हैं धरती पर
करने नया जीवन प्रदान ॥"
------------------------------------
अध्यात्मिक कविता - "अमृतमय"
"मैं तो बिन्दु हूँ
अमृत-समुन्दर का,
छोड़ समुन्दर अम्बर में
ऊपर चला गया था ।
अब नीचे उतर
मिला हूँ अमृत-धारा से ;
चल रहा हूँ आगे
समुन्दर की ओर ।
पाप- ताप से राह में
सूख जाऊँगा अगर,
तब झरूँगा मैं ओस बनकर ।
अमृतमय अमृत-धारा के संग
समा जाऊँगा समुन्दर में ॥"
-------------------------------
सीता जेव्हा पुष्कर विमानातून श्रीरामांसहित अयोध्येस जात होती त्यावेळी कवि-कल्पित 'वनलक्ष्मी' हे वदती झाली. किती सुंदर कल्पना आहे -
' जा रही थी जब लौट चली
पुष्पकारूढ़ तू गगन-मार्ग पर,
खड़ी मैं तब ले पुष्पाञ्जली
हरिण-नयनों में शोकभर
ऊपर को निहार
तुझे मयूरी की बोली में पुकार
रही थी बड़ी चाह से,
लम्बी राह से ।
अरी प्यारी !
सहेली की बात मन में करके याद
क्या तू आज पधारी
इतने दिनों बाद ? '