साडेसात घोड्यांची शर्यत... 7th lap

Submitted by विक्रम मोहिते on 26 December, 2023 - 09:49

याआधी...
१. पहिला भाग https://www.maayboli.com/node/84439
२. दुसरा भाग https://www.maayboli.com/node/84446
३. तिसरा भाग https://www.maayboli.com/node/84453
४. चौथा भाग https://www.maayboli.com/node/84461
५. पाचवा भाग https://www.maayboli.com/node/84466
६. सहावा भाग https://www.maayboli.com/node/84474

"साब, आ गया धारावी. सत्तर रुपया हुवा आप का."
नाकाला रुमाल लावून विशाल बाहेर आला, मुंबईमधला सगळ्यात गचाळ भाग म्हणून धारावी ओळखलं जातं आणि कित्येक गुन्हेगारांचा बालेकिल्ला म्हणून सुद्धा. राजू चायनीज शोधून तो दुकानासमोर आला, गल्ल्यावर राजूभाई फाटक्या बनियान मध्ये कॅश मोजत बसला होता.
"क्या चाहिये साब, अभी खाली नूडल और सूप मिलेगा, राईस मंगता है तो एक घंटे के बाद आना."
इतक्या सकाळी नूडल कोण खाणार, तसं पण विशाल इथे दुसऱ्या कामासाठी आला होता.
"मेरेको लॉलीपॉप चाहिये, बिना फ्राय, मसाला मार के. " त्याने कोडवर्ड सांगितला.
राजूने त्याला आपादमस्तक पाहिलं, आणि पोऱ्याला आवाज दिला.
"छोटू, ये साब को हवामहल लेकर जा."
छोटू सोबत विशाल त्या हवामहल नावाच्या १५x २० च्या पत्र्याच्या शेड समोर येऊन उभा राहिला. छोटूने बेल वाजवली, एक वेळा लांब आणि मग सलग ३ वेळा.
आतून लगेच दरवाजा उघडला गेला आणि दोघांना जवळपास खेचूनच आत घेऊन उभं करण्यात आलं, विशालची चाचपणी करण्यात आली आणि त्याच्याकडे कोणतं शस्त्र किंवा वायर टॅप नाही आहे हे पाहून त्याला दुसऱ्या रूममध्ये जाण्याची परवानगी मिळाली. रूमचं दार उगडून आत जाताच विशालला परत आश्चर्याचा धक्का बसला, बाहेरून पत्र्याचं शेड दिसत असलं तरी आतून एकदम राजेशाही थाट होता. फ़र्निश कमरा, दोन AC, मुलायम सोफे, एक छोटा बार काउंटर, एक मोठा टीव्ही, आणि कोपऱ्यात नेहमीसारखं कोळ्याच्या जाळात गुंतून बसलेला विकी. त्याच्या यायच्या आधीच रूम मध्ये अजून काही लोक सुद्धा होते. सवयीप्रमाणे विशाल बार काउंटर कडे वळला आणि इतक्यात रूमचा दरवाजा उघडला आणि बबनशेठ मॅक्सिसोबत आत आले. त्यांना बघून सगळे उभे राहिले.
"अरे बसा बसा, काय तुम्ही लोकांना राजूभाईने काही खायला प्यायला दिलं कि नाय कि नुसताच AC ची हवा खात बसलाय. "
सगळे उगाच ख्या ख्या हसले आणि परत आपापल्या जागी बसले. विशाल बार काउंटर जवळची खुर्ची पकडून बसला.
"आपल्याला उगाच टाइम खोटी करायला आवडत नाही, सरळ मुद्द्यावर येतो."
खिशातून दारूची चपटी काढून तोंडाला लावत बबनशेठ पुढे बोलायला लागला,
"१०० बँकामध्ये मिळून जितका पैसा नसेल तितका एकट्या ग्रीनफिल्ड मध्ये आहे, पण तो पैसा चोरायचा हि दुय्यम बाब आहे. आपलं मुख्य टार्गेट आहे बँकेच्या लॉकर नंबर २०४. त्या लॉकर मध्ये काय ठेवलं आहे काय नाही याच्याशी तुम्हा लोकांचा काही घेणं देणं नाही, ते सगळं बबनशेठ वर सोडा. तुमचं काम म्हणजे बबनशेठला त्या लॉकर मधली गोष्ट आणून द्यायची. मॅक्सि आणि अशोक आतून, आणि विशाल कस्टमर बनून बाहेरून बँकेची सगळी माहिती काढा. २९ मार्च २०२४ ला आपल्याला त्या बँकेत घुसायचा आहे. गुड फ्रायडे एकदम शुभ मुहूर्त आहे. समजा काई लफडं झालं तरी बँक पुढचे २ दिवस सलग बंद असेल. आपल्याकडे मोजून ७२ तास असणार आहेत आपलं काम करायला. चला कामाला लागा."

लॉकर नंबर २०४... काय असेल बरं त्यात जे पैशापेक्षा पण महत्वाचं आहे?

साडेसात घोडे-

१. बबनशेठ
२. विशाल
३. मॅक्सि
४. अशोक
५. सचिन
६. ___________
७. ___________
७ १/२. विकी Y2K

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

आवडले लिखाण
सगळे भाग सलग वाचले
पुढचा भागही लवकर येऊ दे