एक कविता गहाळ झाली

Submitted by द्वैत on 16 December, 2023 - 09:26

एक कविता गहाळ झाली
डायरीच्या पानांतून, की....
पावसाच्या धारांतून
नितळनिळ्या पाण्यातून
कंचहिरव्या रानातून
स्वप्नबावऱ्या डोळ्यांतून
ओल्याकंपित अधरांतून
कातरहळव्या प्राणांतून
एक कविता गहाळ झाली
डायरीच्या पानांतून, की....

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह.....