लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

FB_IMG_1696937710048.jpg

उपसंपादकांचा सत्कार करायला हवा

औद्योगिक क्षेत्रात गुणवत्तेला अनन्यसाधारण महत्व असते. गुणवत्ता तपासणी आणि नियंत्रणासाठी यंत्रणा असते.

वृत्तपत्रांमध्ये असे काही नसते का?
अशी असंख्य उदाहरणे आजकाल वाचायला मिळतात. वाचकांनीच दबाव गट तयार करून ह्या चुका दाखवून वृत्तपत्रांना श्रेणी दिली पाहिजे.

वृत्तपत्रांमध्ये असे काही नसते का? >>>
एकेकाळी नक्की होते पण "हल्ली" ढासळलेले दिसते.
अंदाजे 3५ वर्षांपूर्वीचे दोन पत्रकारांचे अनुभव मी वाचलेले आहेत.

१. ह मो मराठे यांनी त्यांच्या एका पुस्तकात स्वतःचा अनुभव लिहीलेला आहे. ते दिवसभर शिक्षण करून रात्री वृत्तपत्रात नोकरी करायचे . श्रमामुळे त्यांना खूप दमायला व्हायचं.
अशाच एका रात्रपाळीत त्यांनी एका बातमीत,
" एका मोठ्या नेत्याला अल्सरचा त्रास या ऐवजी चुकून कॅन्सरचा" असे लिहिले होते.
त्यावरून त्यांची नोकरी गेली.

२. दुसऱ्या पत्रकारांचे नाव आठवत नाही पण त्यांच्याबद्दल अन्य कोणीतरी लिहिले होते. प्रसंग होता दरवर्षी भरणाऱ्या एका मोठ्या सभेचा. हे गृहस्थ वार्ताहर म्हणून नेमलेले होते. प्रत्यक्ष सभेच्या वेळेस ते ढाराढूर झोपल्याने जाऊ शकले नाहीत. तरी त्यांनी सभेचा वृत्तांत मागच्या वर्षीचे वृत्तपत्र पाहून दणकून लिहून टाकला होता ! वास्तवात काही कारणाने ती सभा झालीच नव्हती !!
यांची देखील नोकरी गेली होती.

दुसरं उदाहरण अचंबित करणारं आहे! Lol
पहिल्या उदाहरणातही जे झालं ( नोकरी गेली) ते जरा जास्त तीव्र वाटलं तरी चूकही मोठीच होती.

शिरीष कणेकरांच्या (बहुतेक एकला बोलो रे) पुस्तकात पण असा किस्सा होता.चीफ रिपोर्टर ने सूर्यग्रहण? लिहिले होते.(म्हणजे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का नीट तपासा आणि बातमी कव्हर करा).तर या माणसाच्या भयंकर अक्षराने रिपोर्टर ला तो पूर्णविराम वाटला आणि त्याने ठराविक ग्रहणाची बातमी छापून टाकली.(हजारो मुंबईकरांनी समुद्रात उभं राहून सूर्याला अर्घ्य दिले वगैरे.त्याकाळी देतही असतील.)
आणि ग्रहण दुसऱ्या दिवशी होते Happy

ते जरा जास्त तीव्र वाटलं तरी चूकही मोठीच
>>
त्याचे स्पष्टीकरणही हमोंनी दिले आहे .
त्यावेळेस ते नेते पक्षातील क्रमांक एकचे होते. तसेच तेव्हा कॅन्सरवरील उपचारांना मर्यादा होत्या.
त्यामुळे कॅन्सर म्हटल्याबरोबर लोकांना, “आता काय खरं नाही, संपलं सगळं” असे वाटत असे.
ती बातमी छापली गेल्यानंतर संपादकांना सतत चौकशीचे फोन येत राहिले होते.
हे सगळं गांभीर्य ओळखून हमो स्वतःच राजीनामा घेऊन गेले होते.
..
सूर्यग्रहण >>> भारी.

ह्या वरून एक च सिद्ध होते कृत्रिम बुध्दीमत्ता ला भाषेचे ज्ञान शून्य आहे.
इंग्लिश सोडून बाकी सर्व भाषेचे भाषांतर कृत्रिम बुध्दीमत्ता करू शकत नाही.
तेवढी क्षमता तिच्यात नाही.
.कारण कृत्रिम बुध्छिमध्ये चा माहितीचा सोर्स
हा .
भंडारा म्हणून जगभर पुरवलेल्या ज्या fb पासून यूट्यूब पर्यंत अनेक सेवा फुकट आहेत आहेत तो आहे.

तुझ काय किंवा तुज काय .
फक्त अर्थ थोडा बदलेले पण वर्णन तर प्रेमाचे च राहील त्या मध्ये बदल होत नाही.

देवा! Lol

आपण निर्मल राहणी निर्मल विचार ठेवावे.त्याला 'तुझं(तू केलेलं) निब पेंटिंग/वारली आर्ट/मंडला डिझाईन/लिप्पन आर्ट' यापैकी काहीही म्हणायचं असेल.मीटर मध्ये बसत नै म्हणून शब्द गाळला.

ध्यान

Pages