भाग 1 आणि 2 इथे वाचा:
भाग १
भाग २
अतिशय भिन्न विचार असलेली दोन किंवा माणसं वर्षानुवर्षे घरात नांदत असली की कोणतंही काम अगदी सुधेपणाने होत नाही.(आता मी यापुढे 'आणि यातच तर खरी आयुष्य जगण्याची लज्जत असते.आयुष्य रुपी जेवणाला चव आणणारं हे माईनमूळ लोणचं.संसाराच्या खमंग पोळीला लावलेलं चमचमीत वऱ्हाडी तिखट.असंच हाय हुय करत हे तिखट खात नंतर जिभेवर आलेली गोड आफ्टरटेस्ट न्यारीच.असंच हे तिखट लोणचं,प्रेमाचे गुलाबजाम,समजूतदारपणा चा वरणभात,गॉसिपिंग ची चटणी खात जे जेवण खाऊन एक दिवस यथावकाश मृत्यूरुपी तृप्त ढेकर द्यावा.' असं लिहून तुमच्या साठी वात्रट व्हॉट्सअप फॉरवर्ड अजिबात तयार करणार नाहीये. घाबरू नका.) इंटिरिअर वाल्याना विरोध करण्या वरून झालेले हे काही संवाद वानगीदाखल:
'अरे तू त्यांच्या सगळ्या सूचनांना हो म्हणून मान काय हलवतोस?त्यांचं काय जातंय सगळीकडे काचा लावायला?उद्या काचेच्या भिंती वाला संडास सुचवतील.'
'मग तू कर ना विरोध.तुला मी कधी अडवतो का?'
'मी करते आहेच.पण तू जर नेहमी साने गुरुजी बनून राहिलास तर मला नेहमी विरोध भूमिकेत जावं लागेल आणि ते पाठीमागे 'साहेब बिचारा भला माणूस पण त्याची बायको हडळ आहे' म्हणतील.'
'जसं काय आपण विरोध करत नाही तोपर्यंत आपल्या मागे ते आरत्याच ओवाळतात की नाही.विरोध तुझा आहे.व्यक्त तूच करायचा.'
'म्हणजे मी केला नाही तर तुला घरातल्या सगळ्या कपाटाना काचेची शटर आणि त्यातून दिसणारा पसारा चालेल का?'
'किती निराशावादी सिनिक आहेस गं तू!! पसारा होणाऱच असं सुरुवातीपासून धरून चाललं तर कठीण आहे.माझ्या कपाटात तरी अजिबात असं होणार नाही.'
'हे बघ,आतापासूनच शब्द देऊ नकोस.तुझे शब्द काय आहेत मला माहिती आहे.तू 3 वेळा सिडलिंग ट्रे आणून त्यात मायक्रोग्रीन वाढवून सॅलड खाणार होतास.3 वेळा ते गॅलरीत पडून सडलेले,तुटलेले ट्रे मी फेकलेत.'
'हे बघ,प्रत्येक भांडणात सिडलिंग ट्रे आणायची गरज नाही.दम है तो इंटिरिअर वाल्याना विरोध कर वरना ग्लास शटर बरदास्त कर.'
'सिडलिंग ट्रे' हे आमच्या सर्व भांडणांमधलं ब्रह्मास्त्र आहे.जसा ड्रॅकुला ला परतवायला क्रॉस तसा भांडणातल्या नवऱ्याला गारद करायला सिडलिंग ट्रे.
'ओ' ला अतिशय आवडणाऱ्या 2 गोष्टी: प्रोफाईल शटर्स उर्फ काचेची कपाट दारं आणि 'हायड्रॉलीक शटर्स' उर्फ वर उघडणारी दारं.दोन्हीला मी कडाडून विरोध केला.एकतर 15 वर्षांपूर्वी केलेल्या इंटिरिअर मध्ये आम्ही लांब राहत असल्याने पाहणी करायला सारखं येणं न जमल्याने आणि मुख्य सुतार 6 फूट 2 इंच असल्याने त्याने आपल्या उंचीनुसार लावलेली स्वयंपाकघरातली कपाटं.कोणतंही कपाट आतली वस्तू बरगडीत उसण भरल्याशिवाय किंवा कुठून तरी धडपडत शिडी घेऊन आल्याशिवाय दाद न देणारं.हायड्रॉलीक शटर्स वर उघडणारी सर्वात छतालगतच्या शेल्फ ला लावणं हा दिसायला एकदम सुंदर गुळगुळीत एकसंध, हँडल न दिसणारा प्रकार असला तरी बुटबैंगण माणसाला ऍक्सेस ला अतिशय मूर्खपणाचा आणि वेदनादायी होता.त्यामुळे शेवटी शेवटी माझा 'जब वी मेट' मधला अंशुमन, 'क्यो देखू मैं गनने के खेत, नही देखणे मुझे गनने के खेत!!!' झाला.आता यातल्या बऱ्याच शेल्फ ना हाताला येईल असा एक दांडा असतो, तो धरून झाकणं खाली ओढता येतात.
'कटकटी चिडकी बाई शक्यतो सगळ्याला नाही म्हणणार' हे 'ओ' ला माहीत असल्याने ओ चे साईट सुपरवायझर आधी सरांना फोन करून पटवून घेऊ लागले.मग आम्ही सर्व निर्णयात व्हिडिओ कॉल करून चर्चा करून एकमेकांना आणि 'ओ' ला सेम पेजवर आणलं.सुदैवाने हे प्रकार 10-20 मिनिटात आवरत असल्याने ऑफिस कामाला याचा फटका बसला नाही.
'ओ' ची काम करण्याची प्रोसेस शिस्तबद्ध होती.ठराविक टप्प्यात 2डी डिझाईन शेअर करणे, ठराविक रक्कम मिळाल्यावर बिल ऑफ मटेरियल शेअर करणे, ठराविक रक्कम मिळाल्यावर 3डी चे फोटो शेअर करणे(प्रत्यक्ष डिझाईन पाठवले जात नाही.),ठराविक रक्कम दिल्यावर मापं आणि फॅक्टरी फर्निचर ची कट लिस्ट बनवायला येणे, ठराविक रक्कम दिल्यावर सर्व मटेरियल साईट वर टाकणे असे.यात सर्वात जास्त नियमित गोष्ट अकौंन्ट कडून हफ्ता मागणी होती.मग असा कामाचा काही काळ सुरळीत गेल्यावर 'ओ' चा आणि आमचा नाच गं घुमा चा खेळ चालू झाला.
आम्ही: 'नाच गं घुमा!!'
'ओ': 'या गावचा, त्या गावचा, इलेक्टरीशीयन गावी गेला, पैसे नाही मला, सामान नाही मला, कामगार नाही मला,कशी मी नाचू!!'
आम्ही: 'नाच गं घुमा!पैसे घे तुला,कामगार दे मला, सामान घे मला, नाच गं घुमा!!'
'ओ' ची गंमत ही की हफ्ता मागणी करून हफ्ता घेण्याच्या 2 दिवस आधी ते साईटवर पूर्ण 4 सुतार,1 इलेक्टरीशीयन ची टीम लावत.मग खुश होऊन आम्ही हफ्ता दिला की दुसऱ्या दिवशी पासून फक्त एक पाप्याचं पितर प्लास्टर वाला, इन्व्हेंटरी नाही, साईट सुपरवायझर दुसऱ्या साईट वर असे प्रकार चालू होत.'ओ' ने आमचं काम घेतलं तेव्हा त्यांच्याकडे बिझनेस कमी होता.आमचं काम घेतल्यावर सृष्टीत पॉझिटिव्ह गुडलक लहरी निर्माण होऊन त्यांच्याकडे 5 मोठी प्रोजेक्ट आली आणि त्यांच्यावर छाप पाडणे महत्वाचे ठरू लागले.
त्यात 'ओ' च्या एकंदर रिसॉर्स मॅनेजमेंट मुळे एक इलेक्टरीशीयन येऊन आधीची पाहणी करणार, दुसरा येऊन भिंतींना खड्डे पाडून वायरीची खाच बनवणार,तिसराच येऊन स्विचबोर्ड लावणार असा सगळा खो खो होता.या खो खो मध्ये मूळ कॉन्स्टंट आम्हीच असल्याने आम्हाला डोकं ठिकाणावर आणि थंड ठेवून सर्वाना एका पानावर ठेवणं गरजेचं होतं.सुतार टीम बदलत राहिल्याने त्यांनी टीव्ही चं पॅनल 3 वेळा काढून परत बसवलं. आमच्या दोघांपैकी जे कोणी ऑफीस ला जाईल त्याचा व्हॉटसअप वर पहिला प्रश्न 'आज टीव्ही पॅनल परत तोडलं का लॅमीनेट बसवलं' हा असायचा.प्रत्येक ऑफिस ला जाणाऱ्या निरागस जीवाला 'आपण घरी येऊ तेव्हा काहीतरी एक आयटम जोडला गेला असेल,छान वस्तू लावता येतील' असं वाटायचं.घरी येऊन बघावं तर एखाद्या बिझी सलून मध्ये 5 माणसांच्या अर्ध्या अर्ध्या दाढ्या करून फोन घ्यायला बाहेर जाणाऱ्या माणसा सारखं एक कपाटाचे फक्त 2 कप्पे, दुसऱ्याचं दार,तिसऱ्याचं मॅग्नेट राहिलेलं असं सगळंच फर्निचर अर्धंमुर्ध दिनवाणं उभं असायचं.(सुतार काही चूक करत नव्हते. जितकी फायनल प्रोडक्ट लॅमिनेट लावलेली जास्त, तितकें ओरखडे, गोंद न सांडणे,वेल्डिंग कटिंग च्या ठीणग्या जाऊ न देणे याबद्दल जास्त जपावं लागतं.)आता आता जरा सगळ्या पृष्ठभागावर लॅमिनेट लागायला लागले.
ओ च्या चांगल्या गोष्टी या की मटेरियल आणि कामाची प्रत चांगली आहे.शिवाय त्यांनी आमच्या डोक्यातल्या अनेक अबस्ट्रॅक्ट कल्पना नीट पूर्ण केल्या.यातली महत्वाची माझ्यासाठी म्हणजे परदेशात असते तशी शूज, कोट्स आणि हेल्मेट काढून ठेवण्याची लिव्हिंग रूम च्या एका कोपऱ्यात करण्याची चिमुकली(आत नुसती उघडी शेल्फ असलेली) लाकडी खोली.(याला आम्ही 'पसारा करण्याची खोली' म्हणतो.आम्ही आता लिव्हिंग रूम च्या सर्व पृष्ठभागावर टाकतो त्या गोष्टी एकाच खोलीत टाकायच्या.)दुसरी गोष्ट म्हणजे पार्सल्स आत टाकता येतील अशी चौकोनी झडप खिडकी असलेलं दार.हे रेडिमेड दारांमध्ये पण मिळतं.
अश्या प्रकारे गणपती नंतर नवरात्रात 'पूर्ण होणार' अशी वदंता असलेलं काम दिवाळीत पूर्ण होणार होतं.पण 'तुमच्याकडे साईटवर बनवायच्या गोष्टी खूप जास्त आहेत' म्हणून ते अजून बाकी आहे.बहुतेक दिवाळी नंतर 15 दिवसात होईल.आम्हीही मख्खपणे सामानाच्या ढिगात स्वयंपाकघर आणि एक खोली मोकळी स्वच्छ आणि टापटीप ठेवून तिथे मजेत राहतो आहोत.जेव्हा होईल तेव्हा होईल.
सध्या सोसायटी वाले सोसायटीत चकरा मारता मारता भेटले की 'क्या बात है,अभीभी पुरा नही हुवा, महल बना रहे हो क्या' विचारतात.आम्ही पण शांतपणे 'ह्या ह्या ह्या, होने के बाद आ जाओ देखणे' म्हणून महाल बनवत असल्याच्या ऐटीत म्हणून पुढे निघून जातो!! कितीही छोटे बदल असले तरी आमच्यासारख्या कष्टाच्या व्हाईट मनी ने आयुष्यात कधीतरी मोठं काम काढणाऱ्या लोकांसाठी आमचा महालच तो.
या गं घरी.आपण प्ले डेट करू
या गं घरी.आपण प्ले डेट करू
अनू डू यु सजेस्ट घराचे
अनू डू यु सजेस्ट घराचे इंटिरियर करताना घरात दुसर्या खोलीत राहणे की त्या काळात जवळच्या भागात भाड्याने/नातेवाईका कडे राहणे, जेणे करून कामा वर लक्ष ही राहील आणि आवाज धूळ कचरा ह्यांचा त्रास ही होणार नाही?
उ.बो. अनु
उ.बो.

अनु
जवळच्या भागात भाड्याने:
जवळच्या भागात भाड्याने: नक्कीच चांगला ऑप्शन.1बीएचके हवा.त्याच सोसायटीत मिळाल्यास उत्तम.फक्त काम लांबणार नाही इतके कन्फर्म हवे.(आमच्या केस मध्ये 27 जुलै ला साईटवर काम चालू होऊन 'गणपतीत राहते घर हातात' चे सध्या 25 डिसेंबर पर्यंत बहुतेक सगळं होईल' झालेलं आहे त्यांना कमी सुतार टिम्स मध्ये अनेक साईट हँडल करायच्या असल्याने.या न्यायाने किमान 80000 भाड्यात गेले असते.) याचा एक फायदा हा झाला की होणारे बदल, चुका, समजुतीतले घोटाळे लगेच करेक्ट करता आले.2 खोल्यात विशेष काम नसल्याने त्या वापरता आल्या.
अर्थातच घरी राहणे हा आमचा निर्णय असल्याने त्याबरोबर येणारं सर्व मान्य होतं.सध्याचा मानसिक त्रास हा सुतार आणि पेंटर एकावेळी असण्याचा जास्त आहे.पेंटर पहिल्या दिवशी आम्ही ग्रुपवर आरडा ओरडा केल्याने कामाच्या प्रत्येक स्टेप कलर चेंज असेल तेथे हाक मारून बोलावतात(म्हणजे उदाहरणार्थ, 1 भिंत पुट्टी केली, हाक मारली, 'बघा', मग 1 भिंत रंगवायला घेतली, डबा बघा आणि फोटो ग्रुपवर टाका.मग काम झाल्यावर जमीन साफ केली, परत हाक मारतात 'बघा'.हे quality च्या दृष्टीने चांगलं असेल तरी वर्किंग डेमध्ये घरी एकट्या माणसाला 10-12 'बघा' जास्त होतात.
'ओ' वाल्यांचा साईट सुपरवायझर किमान दिवसातले 2 तास साईटवर रोज असता तर हे 2.5 महिन्याचे काम होते.
नातेवाईकात इतके दिवस राहणं मी प्रिफर करणार नाही.अगदी माहेरी पण.
तीनही भाग वाचले. खूप मस्त
तीनही भाग वाचले. खूप मस्त लिहिले आहेत. टोटली रिलेटेबल.
मलाही आता घरच्या खालच्या मजल्याचे टाईल्स बदलण्यापासून इंटिरियर करायचे आहे.पण त्या तोडफोड, धूळ, पावडर या कल्पनेनेच अंगावर काटा येतो. काही ना काही करणे काढून बरीच टाळाटाळ केली, पुढे ढकलले पण आता काम सुरु करण्याची वेळ आली आहे.
एक प्रश्न होता, तुम्ही agency कशी निवडलीत. quotes compare केलेत का ?
आम्ही सोसायटीत झालेल्या
आम्ही सोसायटीत झालेल्या कामांच्या एजन्सी ना संपर्क करत होतो.
शंकरशेट वर जागा वाचवणार्या छान फर्निचर चं दुकान आहे.त्यांना कोट मागितले तर त्यांनी 32 लाख सांगितले.अर्थातच इतके पैसे खर्चायचे नव्हते.मुख्य एम 6 शून्यात अजिबात न जाणे हा होता.मग अजून एका एजन्सी ला संपर्क करत होतो.तिथे जी बाई संभाषण करायची तिने नोकरी बदलली.या सगळ्यात कुठून तरी नंबर मिळवून 'ओ' ने संपर्क साधला.
काही टिपा:
1. जो माणूस ज्या क्षेत्रात गुरू आहे त्यालाच निवडा.म्हणजे इंटिरिअर वाले मॉड्युलर किचन गंडवतात.सोफे डायनिंग टेबल बनवण्यात त्यांचा कॉन्फिडन्स किती आहे हे बघावं लागतं.नाहीतर भारंभार पैसे खर्च करून मग 'अरे यापेक्षा पेपरफ्राय वरून मागावलेला स्वस्त आणि छान पडला असता' असं होतां.किंवा पेंटिंग त्यांना दिल्यास चॉईस मध्ये खूप ढवळाढवळ होते.ते शिकलेले असतात, काही गोष्टी(उघडे नागडे ट्यूब लाईट) ज्या आपल्या साठी गरज त्या इंटिरिअर मध्ये आयडियली नो नो असतात.खूप भव्य आर्टिस्टिक स्वप्न वाली नवी एजन्सी घेतली, तर त्यांना खूप ममव कामं ज्यात आव्हान, मजा नाही ती आवडत नाही.आणि त्यांच्या आवडीने काम केले तर आपल्याला महाग पडत जाते.यातून त्यातल्या त्यात या डिझायनर च्या आधीच्या वर्क चे बरेच फोटो बघून ठरवावं लागतं आपली पत्रिका जुळेल का.
2. सर्वात आधी दिलेलं कोट हे 'अमुक ऑनवर्डस' असतं नेहमी.म्हणजे बेसिक आयटम बजेट.आपल्याला अर्थातच हे बेसिक आयटम न आवडल्याने हळूहळू बजेट फुगत मूळ कोट च्या 30% तरी वाढतं.त्यामुळे मूळ बजेट आपल्या कपॅसिटी च्या 3-4 लाख कमी सांगितलेले उत्तम.
3. नात्यात/मैत्रीत व्यवहार शक्यतो नको.अगदी सख्ख्या बहिणीशी पण आवडीत वेव्हलेंथ जुळेल असं नाही.
अनु..अगदी रीलेटेबल लिहिले
अनु..अगदी रीलेटेबल लिहिले आहेस. विशेषत: आपल्या आवडी आणि त्यांची स्वप्नं न जुळण्याबद्दल.
कुठलाही मला आवडलेला वॉल पेपर मॅडम ना दाखवला की त्या असं तोंड करतात...की आपला चॉईस अगदीच हा वाटू लागतो !
आमच्या इकडे एक जण इंटिअरिअर
आमच्या इकडे एक जण इंटिअरिअर डीजाइनरकडे गेला. "इंटिरिअर करायचं आहे."
"एअरिआ किती?"
"सहाशे."
"हजारच्या खालची कामं घेत नाही."
हे अगदी तसेच्या तसेच घडतं /
हे अगदी तसेच्या तसेच घडतं / घडलं आमच्या नवरा-बातकोत.
म्हणजे , कामगारांनी काय काम केलय हे आजिबात न बघता, फक्त त्यांना ऑर्गॅनिक केळी, ज्युस ,सबवे सँन्डविच आणून देणे इतकाच रोल होता आमच्याकडे आणि कामगार म्हणतील तसं मान डोलायची.
>>>> साहेब बिचारा भला माणूस पण त्याची बायको हडळ आहे'<<<
अगदी हेच वाक्य मला एकायला मिळाले, ते ही माझ्यासमोर पण तो अमेरीक्न असल्याने जरा सोबर शब्दात म्हणाला.
“युअर हसबंड इज सॉफ्ट बट यु आर डिफिकल्ट.”
का? तर भिंतीला रंगाचे दोन हात त्याने मारले नाही आणि दोन हात मारायचे असे ठरले असून सुद्धा.
तीनही भाग छान लिहिलेत. .
तीनही भाग छान लिहिलेत. . ऑफीसमधून आल्यावर
घरातला पसारा पाहून तुम्हांला काय वाटत असेल त्याची कल्पना केली.
गेल्या वर्षी घर बदललं पण तिथे जायच्या आधीच सगळे बदल करून घेतले.. आम्हांला नाही पण शेजाऱ्यांना आवाजाचा त्रास नक्कीच झाला असणार..
सरकारी घरात राहतो त्यामुळे डिपार्टमेंट जे बदल घरात करेल ते सगळं करून घ्यावे लागतात.. सध्या नवीन खिडक्या बसवायचं काम सुरू आहे.. मी पतींना सांगितलं सगळ्या कॉलनीच्या खिडक्या बसवून झाल्या की , मग नाव द्या आपलं... धूळ, कचरा , साफसफाई करायची सध्या तरी माझी बिल्कुल मानसिक तयारी नाही.
पार्सल एन्ट्री मिनीडोअर चा आज
पार्सल एन्ट्री मिनीडोअर चा आज योग्य वापर पहिल्यांदा झाला.हे बघण्याची इच्छा काही जणांनि व्यक्त केली म्हणून फोटो टाकते आहे:

फायदा एकच: घरात कोणी नसताना, आणि घरच्या पत्त्यावर जाही फार किंमती वस्तू नसलेले पार्सल मागवले असेल तर कोणाला घरी थांबा सांगावं लागत नाही किंवा सिक्युरिटी ला त्रास द्यावा लागत नाही.
बाहेरून दाराला असे मिनी दार(याचे फिनिश आणि धूळ याकडे दुर्लक्ष करा.अजून काही गोष्टी टच अप बाकी आहे.).याच्या आत अजून एक दार आहे.या मिनिडोअर मधून पार्सल/पत्र/बिन महत्व कुरियर आत ढकलून द्यायचं.कोणाला बाहेरून काढायचं तर परत दार ढकलून काढता येतं पण इतके व्याप करत नाही कोणी.
हे मिनी दार बाहेरून स्प्रिंग बिजागरी ने फिक्स केले आहे.(ही कल्पना समजवून द्यायला 'ओ' च्या ग्रुप वर बरेच शिव्याशाप वाले मेसेज आमच्याकडून, आणि सुताराशी बरीच चर्चा खर्ची पडली.मुद्दाम हाताने आतून उघडून दाखवून फोटो काढला आहे.

हाच परिणाम जाळीच्या सिक्युरिटी डोअर ला रेडिमेड मिल्क बॉक्स मिळतो त्याने पण साधता येईल.
2024 मध्ये ओ चं तोंड बघायचं
2024 मध्ये ओ चं तोंड बघायचं नाही हा संकल्प पूर्ण होणार नाही.एक भिंतीत फोल्डिंग बेड करायचा होता त्यांना, तो जरा चुकला.म्हणजे तो ज्या प्रकारे बनवला त्या प्रकारे तो गादी सहीत वर जाणार नाही.किंवा गादी सहीत वर जाणार, असा बनवला तर तो डोक्याच्या बाजूला तिरका होईल.ओ चा मुख्य माणूस जरा उद्धट आहे.मालकाला काही वेळा फोन केल्यावर एकदा त्याने उचलला.मग पाहणी केल्यावर असं कळलं की सुतारांनी लाकडी फ्रेम बनवलीय ती धातूची बनायला हवी होती(हा सुवर्ण काळ असा होता जेव्हा उद्धट माणूस दुसऱ्या साईट्स वर होता, साईट को ओरडीनेटर सहकुटुंब राजस्थान ट्रिप ला गेला होता आणि सुतारांना असं प्रॉडक्ट बनवायचा टेक्निकल अनुभव नव्हता.
तर आता त्या लाकडी फ्रेम बदलून धातूच्या लावणे, त्या मी नसताना आणि नवरा असताना त्यांना बोलावून लावणे(तो बेड आम्ही 1 वर्षं बंदच ठेवला.कोणी आलं तर एक जुना फोल्डिंग गादीसोफा आहे तो उघडतो.) हे एक काम उरलंय.मी नसताना म्हणजे त्यांची तोंडं पाहिली की मी चिडायला चालू होते त्यामुळे नवराच आता ते यायच्या दिवशी ऑफिस ला पाठवून देतो
आम्ही पुरेपूर वापर आणि पसारा चालू केला हे सांगायला फोटोप्रपंच(इतके शूज नवे नाहीयेत हां, जुने जुने जपून ठेवलेले खराब झालेले काही फेकायचे राहिलेत.)

अनू..
अनू..
इतकं काँप्लिकेटेड डिझाईन कुणी आणि का बनवलं पण ?
आणि ह्या शू रॅक मधे, सरळ कप्पे करायचे ना मधे फळ्या ठोकून तर असे बॉक्सेस का बनवले ?
त्याने मेसी दिसतंय!
मस्त लिहीले आहेस तिन्ही भाग!
मस्त लिहीले आहेस तिन्ही भाग!
बॉक्स नाहीयेत ते, आयकिया चे
बॉक्स नाहीयेत ते, आयकिया चे प्लास्टिक स्टँड आहेत, एका बुटाच्या जागेत एकावर एक ठेवून 2 शूज मावावे म्हणून.त्यात मुलगी आल्यावर नेम धरून शूज भिरकावते.त्यामुळे हे असं वेडंवाकडं.
थोडं आवरायचं किंवा आवरून घ्यायचं आहे खरं.
कल्पकता आणि हौशी वृत्तीचे
कल्पकता आणि हौशी वृत्तीचे मनःपूर्वक कौतुक
मड बॉक्स / रूम उपयोगी आहे. छान बनवले आहे.
आमच्याकडे जागा नाही. बाल्कनीत कुत्रं (मादी) असतं आणि ती कुठलीही वस्तू थोडा वेळ जरी तिथं ठेवली तरी घर डोक्यावर घेते.
कितीही मोठं घर घ्या
कितीही मोठं घर घ्या,कालांतराने ते लहानच होते.
बाकी ठीके, पण फायर
बाकी ठीके, पण फायर एस्टिंग्विशर का आहे घरी? (बावळट असला तरी जेन्यूईन आहे ओ प्रश्न!)
असाच आणला होता एकदा
असाच आणला होता एकदा नातेवाईकांनी.कंपनीत विकत मिळत होता की तत्सम काही.
IKEA stands look like useless
IKEA stands look like useless plastic. Shabby chic goals.
कितीही मोठं घर घ्या
कितीही मोठं घर घ्या,कालांतराने ते लहानच होते. >>> खरे आहे.
अनुतै,
मेन डोअरला लागून भिंतीवर शक्य असेल तर शू रॅक बसवलेलं चांगल. मी मागवलेलं सुटसुटीत आहे. आजपासून Amazon वर फ्रीडम सेल चालू आहे. कदाचित डिस्काउंट असेल.
आधी होतं शु रॅक. नको होतं
आधी होतं शु रॅक. या डिझाईन मध्ये नको होतं.थोडी फ्लेक्झिबलिटी राहावी म्हणून फक्त बेसिक कप्पे करा सांगितलं होतं.पुढेमागे आणि काही उद्देशाने वापरले तरी चालावं असं.
सध्या या जागी लाईट लावला की नीट बघता येतं.
अच्छा
अच्छा
छान दिसतंय की हे. एकात दोन
छान दिसतंय की हे. एकात दोन करायची आयकिडीया पण आवडली. त्या शेल्फ चा रंग ही छान आहे.
मला परत ती कडी आणि हॅण्डल खटकलं. त्यात थोडे पैसे घाला की. आणि कोणी चक्रम माणसाने कडी न काढता/ त्यावर टेप न लावता रंग फासला आहे! : राग:
याच्या पूर्वीची कडी अजूनच
याच्या पूर्वीची कडी अजूनच जुन्या स्टाईल ची होती.त्यांनी घरी कोणी नसताना केलेली भोकं या कडीची होती.त्यामुळे तीट समजून सोडून द्यायचे.आता 'नवा खिळा हवाय भिंतीवर' किंवा 'हे काढून परत नवे करायला हवे' अशी स्फोटक वाक्य बोलली की लोकांच्या काळजाचे ठोके चुकतात.(पैसे से डर नही लगता बाबू, एक काम करते करते दुसरा बिगाडनेवाले इनसानो से डर लगता है)
<<<कितीही मोठं घर घ्या
<<<कितीही मोठं घर घ्या,कालांतराने ते लहानच होते.
Submitted by देवकी >>>
आणि पसारा आवरायला घेतला की परत मोठं होतं ....
अगदी.छोटा दिसणारा एक खण त्यात
अगदी.छोटा दिसणारा एक खण त्यात विविध कॅटेगरी च्या वस्तू कोंबत राहिलं की 2 तासाचं आवरण्याचं काम बनतं.
जागा फार छान वापरली गेली आहे
जागा फार छान वापरली गेली आहे की.
नेमबाज मुलगी हुशार आहे
बाकी इतके शूज चपला बघून गब्बर विचारेल कितने लोग रहते है?

आणि राजपाल यादव म्हणेल जिल्हा क्यू नही घोषित करते हो
आमचे बाबा नेहमी आम्हा तीन
आमचे बाबा नेहमी आम्हा तीन बायांना चप्पल वरुण ओरडत असतात के तुमचे किती जोडे आहेत वगैरे.
मधे माझ्या नणंदेकडे गेलेलो तेंव्हा तिचा चप्पल स्टँड बघून आई त्यांना म्हणाली त्यांच्याकडे इन मिन दीड बायका आहेत तरी आपल्यापेक्षा जास्त चप्पल आहेत. मग आईने बाबांची भविष्यात बोलती बंद करण्यासाठी त्याचा फोटो काढून घेतला.
आता अनुच्या कडच्या चपला दाखवते
(पूर्वी लोकं चपलाहार दाखवायचे)
(पूर्वी लोकं चपलाहार दाखवायचे
(पूर्वी लोकं चपलाहार दाखवायचे) >>>>

Pages