भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅप्पी बर्थडे ओडीन & दादू!
ओडू देखणा दिसतोय एकदम सगळ्या फोटोत आणि बेहद खूष पण...

माऊई Sad चिअर अप बेबी

मस्तच फोटो सगळे. दादू आणि ओडीनने मजा केली आहे. Happy
माऊई , आपण बाहेर निघालेलं त्यांना लगेच कळतं आणि आसपास घुटमळत राहतात. ऑस्करला मिस करणार आता.

Oscar is missing bromance:(
Screenshot_20231206_205405_Gallery.jpg

दादू आता काय पुढच्या वर्षी कॉलेज मध्ये जाईल. आजी आजोबा त्याला म्हणाले आता बाहेरच दे पार्टी मित्रांना. तर म्हणे ओडीन ला सोडून मी पार्टी करूच शकणार नाही.

ते पण येडं ह्या ह्या करत त्याच्या मागे हिंडत असतं, आता म्हणलं ओडीन मोठा भाऊ झालाय डॉग ईयर प्रमाणे, पण शून्य मॅच्युरीटी, अजूनही ते पपी फेज मधून बाहेरच यायला तयार नाही.

आशुचँप- ओडीनला आणि तुमच्या लेकाला वादिहाशु. मस्त फोटोज. नकोच यायला ओड्याला मॅच्युरिटी. ते काम माणसांचं.
माऊई आणि ऑश्कु पण क्युट.

मस्त पिक्चर्स.

मी बरेच दिव्स एक माझा पहिलाच विणकामाचा प्रॉजेक्ट करत होते. काल ते सुईवरून तोडायची प्रॅक्टिस करुन तो सोडवला. मला डोक्याला बांधायला थंडीत आयडिअल साइज रुमाल झाला आहे. प्लस गंमत म्हणून स्वीटीवर टाकला तर तिला ही ते उबदार ब्लांकिट आवडले. थोडावेळ अंगा वर झुल घातल्या सारखी घालुन फिरली. मग काढून टाकले. कुत्र्यांना कमीच थंडी वाजते. आता त्या रुमाल/ ब्लांकेटला मागून सुती बॅकिन्ग लावुन शिवून घेते म्हणजे पक्के काम होईल. अगदीच स्टारटर प्रॉजेक्ट आहे म्हणून फोटो नाही टाकलेला.

तुमची बाळंपण सारखी मागे मागे करतं असतात का? आमच्या येड्याला तर बाथरूममधे पण मागे यायचं असतं. पुर्णवेळ दाराबाहेर बसुन असतो. जोरदार शिंकलो तरी स्वारी जिथे असेल तिथून येऊन सगळीकडे वास घेऊन खात्री करते सगळं ठीक आहे ना याची.

हो तर काय. माउई पण कायम मागे मागे फिरतो माझ्या. कधीही मागे वळले तर मागेच असतो २ फुटाच्या रेडियस मधे Happy अगदी झोपलेला असेल आणि मी १ मिनिट कप ठेवायला किचन मधे जायला जरी जागेवरची उठले तरी ताबडतोब सोबत येतो. बाथरूम च्या बाहेर पण पहारा ठरलेला!
मला वाटले हे असं फक्त लहान ब्रीड चे डॉग्ज करत असतील. सिंबा पण करतो याची गंमत वाटली.

@maitreyee आमच्याकडे तर बायकोने साधं मोबाईल दाखवून हे बघ म्हटलं तरी माझ्या आधी सिंबा हजर असतो काय ते पहायला Happy

मला अगदी तुमच्या ऊलट वाटलं होतं कि छोटी प्रजाती नसेल करत मागे मागे

आमच्याकडे तर बायकोने साधं मोबाईल दाखवून हे बघ म्हटलं तरी माझ्या आधी सिंबा हजर असतो काय ते पहायला>>> लोल!!
मजेशिर लुडबुड खुडबुड !! दे आर बेबिज फॉरेव्हर आय गेस!!...

छोटी प्रजाती नसेल करत मागे मागे >>>> छोटी प्रजाती पूर्णपणे शेपूट असते! हे घे / इकडे ये / चल / पोळी / ये हे शब्द कोणीही कोणालाही म्हणाले तरी प्रजाती लगेच हजर!

ज्योई कधी कुठल्याही खोलीत एकटा रहात नाही. आम्ही असतो तिथेच असतो. आम्ही हललो की लगेच आमच्या मागे.

ऑस्कर आणि माऊची मस्ती मस्त!

Lol सहमत. स्मॉल- मिडियम- लार्ज सगळेच मागावरच असतात. मी तर रागावून झाले काय आपलं आई-आई-आई, आता मोठा झालास तू, शाळेत जातोस वगैरे. पण Happy

ओड्या लहान असताना खूप करायचा मागे मागे
आता आळशी झालाय किंवा स्वतंत्र
त्यामुळे त्याला झोप आलेली असेल तर निवांत झोपून राहतो मी इकडे तिकडे गेलो तरी,
त्याला वरच्या खोल्यात झोपायला जास्त आवडतं, त्यामुळे दुपारी मी जेवण उरकुन कधी वरच्या खोलीत चाललोय याची वाट बघत बसलेला असतो जांभया देत Happy
पण त्याला जर शंका आली की मी बाहेर चाललोय की मग पाठ सोडत नाही. मी हरितात्या म्हणाले तसं बाथरूम च्या बाहेर पहारा देणं वगैरे सगळं

त्यांचे आडाखे पण अगदी बरोबर असतात
आम्ही संध्याकाळी बाहेर जाताना तो अगदी बारीक निरीक्षण करत असतो, मी जर बाहेर जायचे म्हणजे जीन्स, चांगला शर्ट वगैरे घातला, हेल्मेट घेतलं तर त्याला कळतं की आता बाबा आपल्याला नेणार नाही, सो तो निवांत पसरतो
पण चप्पल किंवा रनिंग चे शूज, हाफपॅन्ट आणि घरातलाच जुना टीशर्ट घातला असेल तर मग माझ्या आधी तो बाहेर, जाताना त्याचा बेल्ट खोक्यातुन काढून माझ्या पायाशी आणून आदळतो Happy

छोटी प्रजाती पूर्णपणे शेपूट असते! हे घे / इकडे ये / चल / पोळी / ये हे शब्द कोणीही कोणालाही म्हणाले तरी प्रजाती लगेच हजर!>>> हे खरयं. मैत्रेयी च्या बेबीज चा कझीन शोभेल आमचा भु भु.
याला पण मराठी चांगले कळते. गाडी , चक्कर, बाहेर जायचे का, खाऊ, पाणी , किल्ली, दिदि आली का बघ ई ई .

Pages