Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
पावसाळी दिवसात भाऊ भाऊ बॅकयार्ड मधे मस्ती करु शकत नाहीत म्हणून विंडो सिट्स पकडून बसलेत
कसला मस्त फोटो आहे. त्यांची
कसला मस्त फोटो आहे. त्यांची तोंड जरी दिसत नसली तरी मला खात्री आहे कि एकदम उदास असतील ते दोघे बाहेर जाता येत नाही म्हणून ..
सिम्बा तर पाऊस पडत असला कि उदास होऊन दरवाजाला तोंड लावूनच बसलेला असतो कारण त्याला भिजायला अज्जीबात आवडत नाही, अगदी शी-शु करायला पण कडेकडेने जाऊन लगेच परत येतो .
(No subject)
तुम्हाला मित्रमैत्रिणी आहेत, नातेवाईक आहेत , कुटुंब, मुले आहेत. पण हे लक्षात घ्या की मला तुमच्याशिवाय कोणी नाही - हा मुद्दा फार टचिंग वाटला.
खूप भावनिक आहे.
खूप भावनिक आहे.
फारच टचिंग आहे, मी आणि सध्या
फारच टचिंग आहे, मी आणि सध्या तो कोबो लॅब गेल्यापासून फारच फील करतोय
कुणी करत होत का त्याला इंस्टा वर?
मला म्हणजे असं झालेलं की ओड्या जाईल तेव्हा माझं कसं होईल, नुसता विचार केला तरी डोळ्यात टचकन पाणी येतं, शेवटी पोरगा म्हणाला बाबा अरे आहे तो अजून खूप वर्षे आपल्यासोबत, इतक्यात काय सेंटी होतो, म्हणलं तुला नाही कळणार बापाच्या फिलिंग्ज इतक्यात
असो, उद्या दोन्ही लेकरांचा
असो, उद्या दोन्ही लेकरांचा वाढदिवस आहे, आपला हिरो 4 वर्षे पूर्ण करतोय
दादूचे सगळे मित्र येतीलच दंगा घालायला
फोटो टाकतो उद्या
वाह, ओडिन ची पार्टी मस्त
वाह, ओडिन ची पार्टी मस्त होऊदे.फोटो व्हिडिओ टाका.
ओडिन ला आणि त्याच्या दादूला अ
ओडिन ला आणि त्याच्या दादूला अॅडवान्स मधे हॅपी बड्डे!!
तुम्हाला मित्रमैत्रिणी आहेत,
तुम्हाला मित्रमैत्रिणी आहेत, ...... अरे कालच एका मांजराचा व्हिडिओ पाहत होते.त्यात ह्या कॅप्शन होत्या.टचकन पाणी आले डोळ्यात.
ओड्याचे जुने फोटो शोधताना
ओड्याचे जुने फोटो शोधताना दादूचेच दोन एकदम लहानपणीचे फोटो सापडले. तेव्हापासूनच तो भूभूप्रेमी होता.
-
किती गोड आहे दादू
किती गोड आहे दादू
क्युट फोटोज दादू चे.दादू आणि
क्युट फोटोज दादू चे.दादू आणि ओडिन ला हॅप्पी बड्डे.
सर्व भुभु माऊ क्युट फोटोज..
सर्व भुभु माऊ क्युट फोटोज..
ओडिन ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
दादू जास्त क्यूट आहे का ती
दादू जास्त क्यूट आहे का ती भूभूबाळे हेच समजत नाहीये. फोटो मस्तच.
दादू आणि ओड्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
दादू आणि ओड्याला वाढदिवसाच्या
दादू आणि ओड्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !>>> + १०००
ओड्याचे लहानप्णीचे फोटो
ओड्याचे लहानप्णीचे फोटो पाहिले . क्यूट आहेत .
हॅरीचा आहे का ते शोधला . मिळाला . फोल्डर / सब फोल्डरमध्ये पाडून होता.
अजून एक मिळाला.
अजून एक मिळाला.
हॅरीचे डोळे किती सालस शांत
हॅरीचे डोळे किती सालस शांत आहेत.थोडे दुःखी पण वाटतात मध्ये मध्ये.
दादू आणि ओडिन ला हॅप्पी बड्डे
दादू आणि ओडिन ला हॅप्पी बड्डे....+१.
हॅरीचे डोळे किती सालस शांत आहेत.थोडे दुःखी पण वाटतात मध्ये मध्ये......... अगदी अगदी!
दादू फार फार गोड दिसतोय आणि
दादू फार फार गोड दिसतोय आणि भुभेही
ओड्याला वाढदिवसाच्या खूप खूप
ओड्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
बाकी दादू एकदम प्राणी प्रेमी दिसतोय … अजून १-२ पेट्स द्या त्याला सांभाळायला
दादुचा फोटो गोड आहे....दादुला
दादुचा फोटो गोड आहे....दादुला आणी ओडीनला वाढदिवसाच्या शुभेच्छा
दादूचा फोटो खूप गोड आहे. दादू
दादूचा फोटो खूप गोड आहे. दादू आणि ओडिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अगदी हेच संभाषण आमच्या घरीही झाले होते आशुचॅम्प. मग मी लेकीला म्हटलं, कोकोनटला मी इतकी माया करेन, इतकी काळजी घेईन, नियमित फिरायला नेईन की तो कमीतकमी पंचवीस वर्षे तरी धडधाकट राहील.
काहीकाही नाती कशी 'meant to be' होऊन जातात.
हॅरीचे फोटो गोंडस आहेत, कान फारच आवडले.
>>>>>>>>दादू आणि ओडिन ला
>>>>>>>>दादू आणि ओडिन ला हॅप्पी बड्डे.
+१
थँक्स अस्मिता
थँक्स अस्मिता
Happy Birthday Odin and Dada
Happy Birthday Odin and Dada much love.
हैप्पी बड्डे ओडीन आणि दादू
हैप्पी बड्डे ओडीन आणि दादू
काल डीजे आणि ऑश्कु परत गेले.
काल डीजे आणि ऑश्कु परत गेले. ते जाताना बॅग्ज वगैरे खाली आणल्यावर माउईला बरोबर समजले आता हे निघाले. माउई फार इमोशनल आहे. खूपच कुई कुई केले ते जाईपर्यन्त. तिच्या अंगावर आणि बॅगांवर उड्या मारून झाल्या. अन मग ते गेल्यावर डिजेचा इथे ठेवलेला एक स्वेटर अंगाशी घेऊन बेड्वर मुटकुळे करून झोपला! हे पहा
आज पण तसाच मूड होता त्याचा. आता त्याला चीअर अप करणे हे एक काम झाले आहे!
दोन्ही बाळांचा मस्त झाला
दोन्ही बाळांचा मस्त झाला वाढदिवस. ओड्याला हे कळलं होतं आज काहीतरी स्पेशल आहे आणि आपले लाड होत आहेत, त्यामुळे इतका एक्साईट होत होता की त्याला आवरताना नाकी नऊ आले. शेवटी त्याला कुल डाऊन करायाला खोलीत थोडावेळ डांबून शांत बसायला लावलं. नुसता धुडगुस घातला. आणि केकचे आकर्षण इतकं होतं की त्याच्यासाठी आजीने अमेरिकेहून आणलेले एक टॉय सपशेल दुर्लक्ष करून टाकलं.
दादू नंतर म्हणे माझ्यापेक्षा ओड्याचेच फोटो चांगले आलेत. म्हणलं शिकलाय तो आता पोझ द्यायला. बरोबर कॅमेरात बघून स्माईल देतो.
-
-
-
-
कसले मस्त आलेत सगळे फोटो!!
कसले मस्त आलेत सगळे फोटो!! ओडिन खूष दिसतो आहे एकदम!!
Pages