Submitted by A M I T on 5 December, 2023 - 07:23
मणक्यांची माळ दुखे अजुनि कंबरेत
शेक घेऊनी वरती बाम लावलेत
कोळूनी तू पी युट्युब, थंबनेल त्यांचे
डोळ्यांदेखत पळे दुखणे पामराचे
मणक्यांस फरक पडतो शून्य मिनिटांत
त्यासाठी तापवुनी नारळाचं तेल
मोहरीलाच तडकावूनी, पाठीवरी चोळ
रिमझिमते औषध हे जलद चादरीत
हातांसह बोटांनी पाठ चेपताना
बरगड्यांची मुक्त हाडे मिळुनि मोजताना
आवंढ्यापरी येतसे फुफ्फुस सरकुनी गळ्यात
तू गेलिस चोळुनी ते मूव (Moov) रागे रागे
घरघरणे पंख्याचे फक्त उरे मागे
होते ही चिडचिड का कधी तुझ्या घरात?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त दुखण्याचे गाणे
मस्त
दुखण्याचे गाणे
जमलय
जमलय
जोक्स अपार्ट लवकर योग्य डॉक शोधा
मस्त रे!
मस्त रे!
चांगला होता प्रयत्न.
चांगला होता प्रयत्न.
भारी
भारी
आमट्या... आलास का 'वळणावर'!
आमट्या... आलास का 'वळणावर'!
भारी जमलंय!
येउदे अजुन विडम्बने... विडम्बन किंग
एक नंबर! प्रतेक कडव्याची
एक नंबर! प्रतेक कडव्याची शेवटची ओळ विशेष आवडली. "रिमझिमते औषध हे जलद चादरीत' ही तर भारीच!