चान्गले मिक्सर ग्राइंडर सुचवा

Submitted by दिव्या१७ on 15 February, 2021 - 00:34

मी बरेच मिक्सर, फूड प्रोसेसर, ज्युसर वापरले पण आजपर्यंत परिपूर्ण असे मिक्सर ग्राइंडर मिळालेच नाही.

बजाज फूड प्रोसेसर २-३ वर्षात खराब झाला, त्याचा एक पार्ट गेला तो मिळालाच नाही शेवटी बदलून टाकला, प्रेस्टिज मिक्सर ग्राइंडर विथ ज्युसर घेतला १ वर्ष छान चालला आता इडली पीठ ग्राईंड करताना तो ३-४ वेळेस बंद पडतो.

मला इडली पीठ एकावेळेस न बंद पडता ग्राईंड करणारा, चटणी, रोजचा मसाला छान पेस्ट करणारा आणी महत्वाचे पॅक झाकण असलेला मिक्सर ग्राइंडर रोज वापरायसाठी हवा आहे, प्लीज तुमचा वापरात असलेला चांगला ग्राइंडर सुचवा आणि फूड प्रोसेसर ही

Group content visibility: 
Use group defaults

Preethi चे चांगले आहेत.... इडली डोसे बैटर,चटण्या, मसाले रोजच्या वापरासाठी छान आहेत.. इकडे बहुतेक ओळखीच्या सगळ्यांच्या घरी प्रीतीचेच आहेत..झाकण पण घट्ट असते..ग्राईंड करताना पकडावे लागत नाही..
फुड प्रोसेसर कधी वापरला नाही.. त्यामुळे आयडिया नाही..

माझा आधीचा मिक्सर कुठला होता ते आठवत नाही.गिफ्ट मिळाला होता.तोही चालू आहे आणि गेली २० वर्षे जयपान चा मिक्सर(तोही गिफ्ट, आईकडून) वापरात आहे,तोही उत्तम चालतोय.मला त्यावेळी सुमीत घ्यायचा होता.पण हा माझ्यावर लादला गेलाय. Wink

आता इडली पीठ ग्राईंड करताना तो ३-४ वेळेस बंद पडतो.>>>>> तुम्ही एकावेळेस जास्त डाळ्+तांदूळ घालता का? तसे नसेल तर वाटताना मिक्सर २ मिनिटे बंद करून पुन्हा चालू करावा.शेवटी ते मशीन आहे.
रोनाल्डचा फूडप्रोसेसर होता.पण गरम पुरण वाटताना काही तरी घोळ झाला असावा. तेव्हापासून बंद आहे.पण फूप्रो तसाही लागत नसल्याने दुरुस्त करायच्या फंदात पडले नाही.

वर मृणाली म्हणालीय तसे Preethi चे कौतुक ऐकले आहे.

आमचा ब्लॅक & डेकरचा आहे. मिक्सर - त्यात छोटे पात्र चटण्या वगैरे करायला, मोठे इडली दोसा पीठ करायला.
बारा वर्षे झाली. कधी बंद पडला नाही.

रोनाल्ड चांगला आहे. लोड केला नाही तर व्य्वस्थित चालतो.
आम्हाला केनस्टार चा अनुभव चांगला नव्हता. बाकी एकदा बजाज घेतला होता तोही चांगला टिकला.

लोड केला नाही तर व्य्वस्थित चालतो.>>
ओव्हरलोड केला नाही तर.. असे हवे ना.
लोड केला नाही म्हणजे रिकामाच फिरवला असे वाटते.

Preethi चांगला आहे असं मला आमच्या नेहमीच्या दुकानात समजलं.
प्रीती कंपनीने अजून एक ऑल इन वन (वेट ग्राईंडर + मिक्सर + फूडप्रो) काढला आहे. Vidiem नावाने. "बिनधास्त घ्या" असं सांगितलं आहे. अर्थात हे नीट तपासून, खरंच तो ऑल इन वन आहे का, नक्की प्रीतीचाच आहे का वगैरे मी बघितलं नाही. दुकानदार नेहमीचा असला तरी बजाज चा धक्का मी अजून पचवतेय ( बजाज फूड प्रोसेसर हा टोटली माझा निर्णय होता, या दुकानात नाही).

नुसता मिक्सर चांगला आहे प्रीतीचा हे नक्की.

थँक्स मृणाली, देवकी , मानव पृथ्वीकर , mi_anu, प्रज्ञा९

बघते सगळे सुजेस्ट केलेले ब्रॅण्ड्स, विडीएम प्रीती चा आहे का? ऍमेझॉन वर बघितल्यावर आवडला होता पण unknown ब्रँड आहे म्हणून इग्नोर केले, ऑल इन वन आहे ७८६० ला, विडिओ बघून चांगला वाटला, कोणाकडे आहे का विडीएम चा मिक्सर असेल तर review द्या प्लीज

https://www.amazon.in/Vidiem-MG-Watts-Mixer-Grinder/dp/B08HWWQWKL/ref=sr...

https://www.youtube.com/watch?v=CYYD0Eiu0kc

दक्षिणेत गेल्यावर तिकडचा घ्या. पण हॉटेलवाले इडली पिठासाठी जे वापरतात ते वेगळे यंत्र असते. त्यात वरवंटा स्थिर असतो आणि भांडे फिरते. पीठ तापत नसल्याने नंतर आंबते बरोबर. तसे नेहमीच्या मिक्सरात होत नाही.

इडली डोश्यासाठी वेगळे ग्राईंडर असते खरे..हॉटेलमध्ये मोठे असते..srd म्हणताएत तसे...पण घरात वापरायचे वेगळे असते टेबलटॉप ग्राईंडर...

तो विडीएम अनोळखी म्हणूनच लोक घेत नाहीत पण तो खूप चांगला आहे असं नेहमीच्या.... (इथे एक मोठी स्मायली आहे असं समजा).

बजाज, मर्फी रिचर्ड हे नाव मोठं लक्षण खोटं आहे वगैरे...
मी बजाज फूड प्रोसेसर च्या वॉरंटी पिरियड मध्ये त्याचा मुख्य जार आणि झाकण वगळता रोजच्या वापरातलं सगळं बदललंय. म्हणजे कणीक मळायचं ब्लेड एकदा (प्लाश्टिक पार्टची ग्यारंटी नसते म्हणून २५०/- दिडक्या मोजून), मिक्सर च्या भांड्याखाली जे चार पात्यांचं स्प्लिटर असतं ते दोनदा (प्लाश्टिक पार्ट... २००/- प्रत्येकी) आणि खुद्द मोटर एकदा(ची)! ती नशिबाने फुकट. शेवटी परत बंद पडला तर बॉक्सात भरून डीलरच्या "टाळक्यात घाल जाऊन" असं मला सांगण्यात आलं. डीलर नशिबवान.

फिलीप्स एनी टाईम. मस्त दणकेबाज. ४ वर्षे झाली अजूनही मस्त चालतोय. फक्त पदार्थांची क्वांटिटी सांभाळा. खच्चुन भरु नका. आधीचा फिलीप्सच होता. पण परदेशातुन परत आणणार कोण.

मी प्रीती चा zodiac750 फूड प्रोसेसर वापरते. उत्तम आहे. प्रीती ब्रँड फिलिप्सने त्याच्या पेरेंट कंपनीकडून विकत घेतलाय काही वर्षांपूर्वी. Vidiem बहुदा त्या मूळ कंपनीचा एक ब्रँड आहे. प्रीतीचा नाही हे नक्की.
प्रीतीच्या झाकणावर मी तरी हात ठेवूनच वापरते, कणिक मळताना तर धरावे लागतेच ते भांडे. आवाज मोठा आहे. पण परफॉर्मन्स उत्तम आहे. वाटण घाटण एकदम छान होतं. एकूण पाच भांडी देतात आणि विविध ब्लेड्स. पण चकत्या करायला आणि किसायला जाड बारीक अशी विविधता नाही, एकेकच ब्लेड आहे (आपल्याला फारसा फरक पडत नाही). आणि फिंगर चिप्सचे ब्लेड नाही.
बजाजचे बहुतेक सर्व मिक्सर फूड प्रोसेसर 650 watts चे आहेत, 1000 वाल्याचा रिव्ह्यू मिश्र आहे आणि एक 750 watts चं मॉडेल आहे ते मला हवं होतं पण मिळालं नाही.
प्रीतीचा मात्र सगळ्यांकडूनच रिव्ह्यू उत्तम ऐकला आहे.
फूड प्रोसेसर नको असेल तरी प्रीतीचा 750 watts चाच मिक्सर आहे.

माझ्याकडे प्रीतीचा झोडिअ‍ॅक आहे. त्यात नारळाचं दूध काढण्यासाठी ज्यूसरला खास सोय आहे म्हणून घेतला. प्रत्यक्षात दोनतीन वेळाच त्याचा उपयोग केला ती गोष्ट निराळी! पण बाकी सगळे जार्स भरपूर वापरले जातात. झाकणांच्या गास्केट्स सोडल्यास बाकी कुठलाच पार्ट बदलावा लागला नाही चारपाच वर्षात. फूड प्रोसेसरही आहे त्याला. तोही अधूनमधून वापरते मोठ्या प्रमाणात काही किसायचं असेल तर ( म्हणजे हलव्यासाठी गाजरं). इडली डोश्याच्या पिठासाठी विजयालक्ष्मीचा वेट ग्राइंडर आहे. त्यामुळे ते पीठ मी मिक्सरवर वाटत नाही.

Vidiem चा साधा ३ भांड्यांचा मिक्सर ग्राइंडर ३ वर्षे वापरत आहे. अजून एकदाही दुरुस्तीची वेळ आली नाही.
बाह्य रूप आकर्षक. दणकट आहे.
आवाज मात्र फार करतो.
उडीद डाळ वाटण्यासाठी कधी वापरला नाही अजून.

प्रीती हा बेस्ट आणि भारतीय ब्रँड आहे. स्वस्त आणि टिकाऊ. माझ्या बाहेरून आणलेल्या panasonic फूप्रोला 1000 अटॅचमेंट्स आहेत पण चक्क चटणीचं भांडं नाही. म्हणजे इडली चटणी किंवा आलं लसुण मिरची पेस्ट करायची सोयच नाही. त्यासाठी केवळ प्रीती zodiac विकत घेतला. परफॉर्मन्स बेस्ट, पण आवाज पण धुमधडाक्यात आहे. छोटंसं ग्राइंडिंग ठीक आहे पण इडली दोसा बॅटर बनवताना मी हेडफोन्स लावतेच. लावावेच लागतात. प्रीतीच्या आवाजापेक्षा फ्रेडी मर्क्युरिचा आवाज मस्त Wink

मी सुमीतच्या इतकी प्रेमात होते कारण त्याने सुद्धा माझ्यावर खुप प्रेम केले. मी त्याची काळजी घेतली, त्याने माझी. १७ वर्षे होतं आमचं नातं. Happy
पण नव्या कामवालीच्या पोटात दुखले व सुमीत सोडून गेला. Sad

तिने ३-४ मिनिटे सतत फिरवला व बंदच पडला. जुनं मॉडेल असल्याने, ते लोड आला की,आपोआप बंद नाही व्हायचा. आता नवीन मॉडेल मध्ये, ज्यास्ट लोड आला की, बटण ड्रिप होतं व वाचवतं मिक्सीला.

नवर्‍याला हजारदा सांगून, बजावून धमकी देवून पाठवले होते दुकानात की, सुमीतलाच आण, पण दुकानदाराच्या गोड गप्पात प्रीथी आणला.
आधी चिडलेले पण बरा वाटतोय. लोड आला की, बंद पडतो. मग परत सुरु करायचा. आहे १ वर्षे टिकून आहे कामवालीच्या हातात.
पण सुमीतला, विसरणे कठिणच आहे अजुन.

इडली साठी, अल्ट्रा वेट ग्रायंडर बेस्ट आहे. इडली सुद्धा मस्त होतात. ७ वर्षे झाली.

आम्ही बटरफ्लाय एमराल्ड गेले ४ वर्षांपासून वापरात आहोत. महिन्यातून एक किंवा दोनदा इडली पीठ ग्राईंड करतो, पण कधी मेजर प्रॉब्लेम आल्याचे आठवत नाही. दोन भांडी आहेत एक छोटं आणि एक मोठं . आता ऍमेझॉन वर ऐव्हलेबल नाहीये पण खाली लिंक देत आहे.

https://www.amazon.com/gp/product/B00CAW1MB2/ref=ppx_yo_dt_b_asin_title_...

आत्ताच NutriBullet Blender Combo घेतले पण भयंकर आवाज करतो, आणी इडली पीठ ग्राईंड करताना बिचारा धापा टाकतोच. Happy

अंजली : मागचे १७ वर्षे चालुय अजुन सुखनैव
प्रिथी : ८ वर्ष...दिला एकाला.. नीट चालणारा.
बजाज फुप्रो: जास्त वापर नाही पण जास्त करुन चटणी जार नी मग गाजराचा किस, मुळ्याचा किस, खोबर्‍याचा किस, दुधीचा किस वगैरे साठी जास्त.

केन्स्टार फुप्रो जवळपास १६-१७ वर्ष झाली चालतोय फुप्रो पेक्षा मिक्सर ग्राईंडरच वापरला जातो त्यातील ...
मध्यंतरी एक घेतला बोरोसिल मिक्सर चांगला आहे. पॉवर देखिल जास्त आहे तरी जुनाच वापरला जातो!

भाजणी, मसाले वगैरे करायला घरगुती चक्की, गिरणी घ्यायची आहे. कोणती घ्यावी याबद्दल काही माहिती असेल तर प्लीज सांगा.

सुमीत २० वर्षे ( दोनदा ब्लेड बदलली)
प्रीथी ५ वर्षे.
इतर काही मिक्सर आणि प्रोसेसर आहेत पण ते वापरले जात नाहित.

मला घ्यायचा आहे मिक्सर म्हणून माबो वर धुंडाळलं तर हा धागा सापडला.
माझ्या बहिणी फिलिप्स घे म्हणताएत. माझा पण पूर्वी सुमितच होता पहिला प्यार. नंतर रिको आला पण आता तो एवढा आवाज करतो की काय सांगता. घरच्या सुतारांना टफ देईल एवढा आवाज येतो, आणि वाटण बारीक होत नाही ते नाहीच.

मी पण आले होते ह्या धाग्यावर पण फार काही माहिती मिळाली नाही. अनारश्याचे तांदूळ दळून मिक्सर थकलाय प्रिथीचा आहे चार वर्षांपासून. ओलसर तांदूळ दळायला जास्त पॉवरचा घ्यायला हवा का

आमच्याकडे आधी फिलिप्स होता 500 वॅट
नंतर बरेच online रिव्यु वै वाचलेले.
त्यात प्रिती फिलिप्स इत्यादी पाहिलेले.
फूड।प्रोसेसर घ्यायचा का अशी एक उपचर्चा झाली पण त्याची भांडी कोण घासत बसणार ह्या कारणांनी ती उप चर्चा बंद पडली.
त्यातल्या त्यात आखूड शिंगी वै वै शोधून 750 वॅट चा फिलिप्स घेतला.
Online घेतला होता, बहुतेक ऍमेझॉन वर.
मार्केट पेक्षा ( दुकानात देखील विचारलेले लोकल बिजनेस सपोर्ट म्हणून ) 300 रु स्वस्त मिळालेला
सुरुय नीट.

Bajaj पण चांगला आहे..amazon वर स्वस्त मिळेल...warranty register करायची आपण...मी Panasonic वापरती आहे सध्या...

प्रिथी फार चांगला आहे, पण तरी गोड लागले तर मुळानिशी खाऊ नये तसे मी डोसा वाटण त्यात करत नाही.
खरं तर त्या साठी दगडाचा स्पेशल ग्राईंडर मिळतो पण जागा & वजन जास्त लागते.

<<बारीक होत नाही ते नाहीच.

नवीन Submitted by धनुडी >>
भांडे बदलून बघा. माझं बदललेले छोटे भांडे मस्त बारीक वाटण करते.

मी इतक्यातच फिलिप्स चा 750wats चा मिक्सर घेतला . बारीक वाटले जात आहे पण भांडी फारच पातळ स्टील ची आहेत. आवाजही मोठा वाटला. मिनिटभर फिरवले तरी गरम लागतात हाताला . आधीचा kenstar चा फुडप्रो तसाच ठेवलाय . 18वर्षे जुना आहे . बारीक वाटले जात नाही एवढा एकच प्रॉब्लेम आहे . जुन्या भांड्यांची पाती बदलून मिळतात का ?

धनवन्ती, पाती बदलून भांडं बदलून झालंय आता अख्खा मिक्सर चं बदलीन म्हणते Happy धन्स सगळ्यांना. एक दोन दिवसांत घेईन. इथे लिहीते नंतर कुठला घेतला.

फिलिप्स चा 750wats चा मिक्सर घेतला . बारीक वाटले जात आहे
- हा दोन वर्षांपूर्वी घेतला. (Vijay sales , काही विशेष सेलमधून )अजूनही चांगला चालला आहे.कोरडे पीठ,मसाले करता येतात. (अगोदरचा व्हिडिओकॉन पंचवीस वर्षे वापरला. त्याचा आवाज कमी होता पण कोरडे पीठ होत नव्हते. आता त्याची भांडी मिळत नव्हती.)
दुकानदार सांगतात की सर्व मिक्सर दिल्लीच्या आसपास बनतात आणि मोठ्या कंपन्या तिकडून उचलून त्यांचा शिक्का मारतात.

मुख्य रोनाल्ड सामानात असल्याने सध्या छोटा वंडरशेफ बाहेर निघालाय.साईझ लहान असली तरी उत्तम आहे. एकावेळी 30 सेकंद फिरवल्यावर 10 सेकंद विश्रांती घ्यावी लागते.इडली बॅटर पण व्यवस्थित झाले.पण 4 बॅच.
नॉर्मल मिक्सर ला पसंती रोनाल्ड किंवा सुमित.

Atomberg चा BLDC motor वाला मिक्सर कोणी वापरला आहे का?
BLDC technology मुळे वीज कमी लागते आणि आवाजही कमी येतो म्हणतात. मला त्यात सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे इतर मिक्सर सारखे त्याला air vents नाहीत (गरजेचे नाहीत म्हणे!) त्यामुळे स्वच्छता करतांना आत पाणी जाण्याची शक्यता शून्य!

मिक्सर गरम होत असेल तर वाटायच्या आधि डाळ तान्दुळ १ तास फ्रिज(फ्रिजर नाहि) मधे ठेवा किवा वाटताना पाण्याएवजी आइस क्युब घाला...तरी इन्डियन मिक्सर धापा टाकतातच...मी पण प्रिथिचा घेवुन आलेय भारतातुन पण त्यापेक्षा माझा बॉसचा चान्गला होता..हा तेवढा दणक्ट नाही.

आईस क्युब???? :O
शुअर? पात्यांची वाट नाही का लागणार?

आम्ही एक वर्षापूर्वी Sujata Powermatics Plus 900W घेतला. दणकट आहे. दोसा आप्प्याचे पीठ, पिनट बटर सगळे छान होत आहे.

आम्ही एक वर्षापूर्वी Sujata Powermatics Plus 900W घेतला. दणकट आहे. दोसा आप्प्याचे पीठ, पिनट बटर सगळे छान होत आहे.>>>> मी आत्ता हेच लिहायला आलेले कि कालच हा मिक्सर आणला आहे(फक्त ज्यूसर चे एक्सटेंशन नसलेला आहे ते नंतर लावता येते म्हणाला दुकानदार ) आधी preethi चा बघून आलेलो पण नंतर सुजाता सुचवले कोणीतरी व ९०० वॅट आहे म्हटल्यावर प्रीती कॅन्सल करून सुजाता घेतला आहे वापर मात्र जर्मनी ला गेल्यावरच करणार आहे review लिहीन इथे (अजून महिना दिड महिन्याने )
हा सुजाताचा मिक्सर म्हणे कमर्शिअल साठी .. हॉटेल वाले किंवा छोटे व्यावसायिक लोक वापरतात .. आम्हाला दुकान दाराने खूप वेळा विचारले तुमचे हॉटेल किंवा तसा काही व्यवसाय आहे का वगैरे.. तो प्रीती च घ्या असे मागे लागलेला (कदाचित प्रीती चा मिक्सर विकल्याने त्याला जास्त मार्जिन मिळत असावे ..कुणास ठाऊक )

नाही लागत वाट एक किवा दोनच टाकायचे... हिरवी चटणि करतानाही टाका चटणी हिरविगार राहते काळवडत नाही.

@anjali_kool : यातला ज्युसर चार पाच जणांसाठी ज्यूस करायचा असेल तर चांगले. एक दोघांसाठी करायचा असेल तर करायला सोपे आहे, पण मग स्ट्रेनर आणि चोथा गोळा होतो ते भांडे साफ करणे जरा वेळ खाऊ आहे. स्ट्रेनर जरा नाजूक हाताने, दात घासायच्या ब्रशने साफ करायचे. आणि त्यातील चोथा वाळायच्या आत साफ करावे अथवा ज्यूस काढून झाला की स्ट्रेनर लगेच पाण्यात बुडवून ठेवायचा.
तेव्हा ज्युसर अटॅचमेंट घ्यायची असेल तर याचा विचार करून घ्या.
बाकी मिक्सर छान आहे.

नाही लागत वाट एक किवा दोनच टाकायचे... हिरवी चटणि करतानाही टाका चटणी हिरविगार राहते काळवडत नाही.>>>> +१
मानव, अंजली नोटेड! आवाजही नहीं करता आहे का

घरी कुक लोकं मिक्सर वापरतात.
आधी महाराजा चा फुप्रो होता आणि नंतर महाराजा चाच 800 वॉट मिक्सर. कुक्स ना जास्त लोड टाकायची ही सवय असते (कांद्याचे मोठाले ठोकळे वगैरे), ज्यानी मिक्सर अन् भांडी दोन्ही च्या बेसिक कपलर च्या फ्लांज वरचे वर तुटायाच्या.
दोन तीन महिन्यापूर्वी वैतागून वेज टाईप कपलर वाल्या मिक्सर च्या शोधात निघालो. अटम्बर्ग, फिलिप्स, सगळे बेसिक 4 उभ्या फ्लांज वाले. वेज फ्लांज फक्त सुजाता अन् vidiem ला.
सुजाता 900 वॉट तर vidiem 650 वॉट. कुक्स ना मिक्सर ची पॉवर किती आहे यानी फरक पडत नाही, कानाला ठराविक वेळ मिक्सर चा आवाज ऐकू आला म्हणजे मिश्रण तयार असा ठोकताळा असतो.
त्यामुळे vidiem घेतला.

आज पर्यंतचा अनुभव छान...

अमेरीकेत वापरायला कुठला मिक्सर घ्यावा? मी ऑस्टरचा मिक्सर आणि त्याला देशी दुकानातली चट्णी अ‍ॅटॅचमेंट असे बरेच वर्षे वापरत आहे. या ऑस्टरमधे सोना मसूरी तांदूळ वापरुन इडली-डोसा बॅटरही होते पण आता ते मॉडेल मिळत नाही. मला लेकासाठी घ्यायचाय.

भारतातून मिक्सर नेणार असाल तर प्रीती चा न्या, u. S. Canada वापरासाठी त्यात अनुकूल बदल केलेले असतात. तसें दुकानदाराला सांगा कि अमेरिकेत वापरायचा आहे. त्यानुसार volt ampere फलाना ढिमका असे बदल असलेला प्रीती दुकानदार देईल. पुण्यात असाल तर गावात तुलसी नावाच्या मोठ्या दुकानात जाल तर ५मिनिट मध्ये मिक्सर घेऊन बाहेर याल. बाकी कुठं छोट्या शॉप वाल्यांकडे पण मिळतो पण ते गोडाऊन ला आहे, दाखवता येणार नाही, कन्फर्म सांगा तर दोन दिवसात आणून ठेवतो इत्यादी ऐकवतात. सो तुलसी त जाउन घेणे बेटर. चार साडेचार किलो वजन असत without बॉक्स, त्याला कपड्यात गुंडाळून न्या.वापरताना खूप भरू नका नाहीतर झाकण सैल बसलं असेल तर मटेरियल चा सडा भिंतीवर घालून पुढचा वेळ चिडचिडित जातो (स्वानुभव )टोच मिक्सर इथेही मिळतो पण थोडे डॉलर महाग पडतो. त्यापेक्षा भारी दगड सुद्धा कुटून देऊ अशी advertise असलेला मिक्सर इथं मिळतो पण बऱ्याच आधी तो बराच महाग होता म्हणून घेतला नव्हता आता किंमत माहित नाही

Pages