Submitted by दिव्या१७ on 15 February, 2021 - 00:34
मी बरेच मिक्सर, फूड प्रोसेसर, ज्युसर वापरले पण आजपर्यंत परिपूर्ण असे मिक्सर ग्राइंडर मिळालेच नाही.
बजाज फूड प्रोसेसर २-३ वर्षात खराब झाला, त्याचा एक पार्ट गेला तो मिळालाच नाही शेवटी बदलून टाकला, प्रेस्टिज मिक्सर ग्राइंडर विथ ज्युसर घेतला १ वर्ष छान चालला आता इडली पीठ ग्राईंड करताना तो ३-४ वेळेस बंद पडतो.
मला इडली पीठ एकावेळेस न बंद पडता ग्राईंड करणारा, चटणी, रोजचा मसाला छान पेस्ट करणारा आणी महत्वाचे पॅक झाकण असलेला मिक्सर ग्राइंडर रोज वापरायसाठी हवा आहे, प्लीज तुमचा वापरात असलेला चांगला ग्राइंडर सुचवा आणि फूड प्रोसेसर ही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी वर सांगितलेल्या प्रीती
मी वर सांगितलेल्या प्रीती मिक्सर मध्ये दोन option असतात स्टील आणि प्लास्टिक जार असे. किंमतीत थोडा फार फरक असतो.मी स्टील घेतला आहे कारण बॅग आपटा आपटी मध्ये आणताना सेफ रहावा म्हणून आणि कालांतराने प्लास्टिक मध्ये ग्रेव्ही चे वास मुक्काम ठोकतात अस मला वाटत म्हणून.
थँक्स मंजूताई, स्वाती आणि
थँक्स मंजूताई, स्वाती आणि बिल्वा.
बिल्वा, मिक्सर देशात खरेदी करणे शक्य नाही , इथेच घ्यायचाय. एमॅझॉन किंवा तत्सम ऑनलाईन खरेदी/ शिप टु स्टोअर.
स्वाती, निन्जाचे कुठले मॉडेल ?
परत तोच प्रश्न विचारते आहे,
परत तोच प्रश्न विचारते आहे, चांगला दणकट मिक्सर सुचवा. सध्या अमेझॉनचा सेल पण सुरू आहे. त्यामुळे घेईन म्हणते
प्रिथी चा घ्या. टिकाऊ खूपच.
प्रिथी चा घ्या. टिकाऊ खूपच. आणि त्याची प्लास्टिक झाकणे २ एक्स्ट्रा घ्या.
दुसर्या धाग्यावर हाच प्रश्न
दुसर्या धाग्यावर हाच प्रश्न विचारला आहे. (ऑनलाईन खरेदी).
अॅमेझॉन फेस्टीवल चालू आहे. अल्ट्रचा एक कोनिकल स्टोन ग्राइंडर युट्यूबवर पाहिला होता. डिस्काउंट आहे. ईएमआय पण आहे.
मिक्सर मधे डाळ कट होते, स्टोन ग्राईंडवर जात्याप्रमाणे दळून निघते अशी माहिती आहे. कुणी वापरला असेल तर (डिस्काउंट असेपर्यंत) उत्तराची अपेक्षा आहे.
माझ्याकडे आहे अल्ट्राचा वेट
माझ्याकडे आहे अल्ट्राचा वेट ग्राईंडर. खूप छान पीठ होते. घरी इडली-दोसे आवडतं असतील तर जरूर घ्या.
बघतो आता डिस्काउंट चालू असेल
बघतो आता डिस्काउंट चालू असेल तर.
डोसे, इडली शिवाय आणखी काय बनू शकते?
मलाही इंटरेस्ट आहे या वेट
मलाही इंटरेस्ट आहे या वेट ग्राइंडर मध्ये.
इडली डोस्यांसाठी.
प्लीज चांगले मॉडेल सांगा.
कुविंग्स चा ब्लेंडर बऱ्याच
कुविंग्स चा ब्लेंडर बऱ्याच गोष्टींना चांगला पर्याय आहे, इडली / डोसा बॅटर चांगले होते, नारळाचे दूध काढायला पण बेस्ट आहे, मिल्क शेक पण मस्त होतात, ड्राय पॉट मध्ये अगदी मिरची पूड पण होते, कॉफी बीन्स पण चांगले होतात ( (अगदी कॉफी ग्रँडेर सारखे होत नाहीत , कारण भांडे मोठे आहे , भरपूर बीन्स घातल्या तर होईलही ), मसाले छान बारीक होतात. गेले ८ महिने तर वापरतोय, एकदम रेकमंडेड आयटम आहे. फक्त तो ६० सेकंड पेक्षा जास्त कन्टीनुएस वापरता येत नाही, पण ३० सेक च्या आधीच काम झालेला असत.
तसेच कुविंग्स चा कोल्ड प्रेस
तसेच कुविंग्स चा कोल्ड प्रेस ज्युसर पण बेस्ट आहे, गेले वर्षभर वापरात आहे, सगळे ज्यूस मस्त निघतात. फक्त वापर होणार असेल तर घेण्यासारखा आहे.
https://www.amazon.in/Kuvings-Professional-Press-Juicer-B1700/dp/B07DLCZ...
माझ्याकडे अय्यर कंपनीचा वेट
माझ्याकडे अय्यर कंपनीचा वेट ग्राईंडर आहे. त्यात इडली डोसे बॅटर, नारळ खवणे आणि कणीक मळणे करता येते (मी कणीक मळणे सोडून बाकी कामे करते) पुण्यातला ब्रॅंड आहे. मला मुंबईत होम डिलीव्हरी मिळाली होती. ॲमेझॉन फ्लिपकार्टवर मी तरी हा ब्रॅन्ड बघितला नाही. मला माबोकरांपैकीच कोणीतरी रेकमंड केला होता. एकदम मस्त आहे प्रॉडक्ट. फक्त ते (कोणताही वेट ग्राईंडर) ठेवायला जागा आहे का आणि कुठे ठेवता येईल हे आधी डिसाईड करा कारण तो बऱ्यापैकी जड असतो. रोज वापरात नाही आणि ओट्यावर किंवा वर टेबलवर जागा नाही म्हणून खाली कुठेतरी ठेवू आणि लागेल तेव्हा काढू असा विचार केला की तो त्याच्या वजनामुळे कमी वेळा काढला जातो.
Pages