मराठी चित्रपट मार्केंटींगमध्ये कमी पडतात का? आणि का?
Aatmapamphlet नावाचा मराठी चित्रपट गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. मला आज हे नाव कानावर पडले.
चित्रपटाचे कौतुकच वाचले, त्यामुळे ट्रेलर बघितला. पुन्हा एकदा लहान मुलांची लव्हस्टोरी. विषयात नावीन्य नाही. पण सादरीकरणात असावे. तसेच लव्हस्टोरीपलीकडे काहीतरी असावे असे वाटते. एखादा डार्क ह्युमर वगैरे. कारण जातीभेद देखील दाखवला आहे त्यात. चित्रपट लोकांपर्यंत वेळीच पोहोचला असता तर नक्कीच चर्चा झाली असती असे मटेरीअल एकंदरीत वाटले.
IMDb अगदी ९/१० दाखवले आहे, टाईम्स ऑफ ईंडिया ४/५ स्टार दाखवत आहे.
ट्रेलर ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=oSEWI7V5CRQ
हा सुद्ध परेश मोकाशी चित्रपट आहे. या आधी वाळवी पाहिला होता. चांगला चित्रपट आहे हे कानावर पडताच कोण सोबत आहे हे न बघता एकटाच रात्रीचा शो बघून आलेलो. आवडलेला. त्यावर धागाही काढलेला. जेणेकरून जास्तीत जास्त लोकं बघतील.
पण या वरच्या Aatmapamphlet चित्रपटाबद्दल गूगल करताना अजून काही बातम्या नजरेस पडल्या त्या अश्या की काही ठिकाणी पब्लिक नसल्याने याचे शो रद्द करावे लागले. कधी मराठी चित्रपटांना जास्त शो नाही म्हणून ओरडा असतो, तर ईथे आहे तोच शो चार माणसे बघून रद्द होत आहे.
काय आहे हे? यांना मार्केटींग करता येत नाही का? की मार्केटींगचे महत्व समजत नाही का? की बजेट प्रॉब्लेम असतो? पण व्यवसाय म्हटले की त्यावर तोडगा काढावाच लागणार ना? सोशल मिडिया मध्ये जरी प्रभावी मार्केटींग केली तरी जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पिक्चर पोहोचवता नाही येऊ शकत का? आपण मायबोलीवर मराठी चित्रपट कसा वाटला धागा काढतो. मी स्वतः मायबोलीवर कित्येक मराठी चित्रपटांबद्दल स्वतंत्र धागे काढले आहेत, जे हिंदीबाबत केले नाही. ही जी एक मातृभाषेतील कलाकृतींबद्दल आत्मियता असते ती आपल्या सर्वातच कमी जास्त प्रमाणात असते. याचा फायदा घेऊन मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे ईतके कठीण आहे का? कारण आपल्याला कितीही वाटले की मराठी चित्रपटांना प्रोत्साहन द्यावे तरी आपणही चार लोकांना तेव्हाच सांगणार जेव्हा तो आपल्यापर्यंत पोहोचणार. जो ट्रेलर बनवला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचायला हवा ना, की आपणच जाऊन शोधायचा. नक्कीच काहीतरी चुकतेय.. चर्चा अपेक्षित.
अस्मिता कुठे बघितलास?
अस्मिता कुठे बघितलास?
मी ही काल पाहिला. बर्याच
मी ही काल पाहिला. बर्याच प्रसंगांना मोठ्याने हसलो. मराठीतला लालसिंग चढ्ढा म्हटलो मनातल्या मनात, आणि इथे येऊन वावे + १...
माझ्या मते शेवट असा केला आहे, कारण लेखकाची कथा सांगण्याची शैली सिनेमाची नसून प्रायोगिक नाटकाची आहे. म्हणजे, हे खरंतर एखादं प्रायोगिक नाटक म्हणून खपून गेलं असतं, पण त्यातल्या पौगंडावस्था - किशोरवयीन प्रेमाच्या मसाल्यात सध्या चलती असलेल्या सिनेमाचं पोटेन्शिअल. सगळ्यांनाच ते वय, ती शाळा, त्या उचापती हेच एक रिलेट झालंय मोस्टली. आणि जात - धर्म या साईड बाय साईड आलेल्या गोष्टी. म्हणजे मध्यवर्ती विषय तो नाही, त्यामुळे लेखकाने कुठलीही टोकदार भुमिका न घेता समजुतदारीने घेत शेवटाकडे आणलं.
मात्र शेवटाच्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या प्रेक्षकांवर न सोडता, त्याने स्वतःच सगळ्या दाखवून एक जी सुखांत करू असं म्हणून, संपवलंही असतं, तरी मनात कुठेतरी, "छ्या... असं कुठे असतंय का", किंवा "फारच बाळबोध शेवट केलाय", असं म्हणून इतका वेळ धरून ठेवलेला प्रेक्षकांना उगाच वास्तवाकडे ढकलण्यापेक्षा, अतिरंजित आणि अनालकलनीय शेवटाकडे घेऊन चित्रपट ज्या मूडमध्ये चालला, तसा संपवलाय.
रच्याकने, मला कुठेच हा परेश मोकाशीचा चित्रपट वाटला नाही (मी नावंही वाचण्याचा प्रयत्न केला पण नाही सापडलं). मध्यवर्ती संकल्पना ही जातवास्तव, किंवा धर्म वगैरे नाही असं मला वाटलं कारण मग त्या पार्श्वभुमीवरची भाषा घ्यावी लागली असती, इथे ती भाषा एकदम प्रमाण घेतली आहे. शिवाय सगळ्यांना अपील व्हावा असा चित्रपट बनवण्यासाठी, तो कुठेच गडद, भडक न करता एकदम मध्यममार्ग वापरून चित्रपट पूर्ण केलाय.
एकूणात - मराठी चित्रपट
एकूणात - मराठी चित्रपट मार्केटिंग मधे कमी असे म्हणावे तर झिम्मा , लांजेकरचे लुटुपुटूचे इतिहासपट इ. सुमारपटांचे नको तेवढे प्रमोशन करतात. सगळीकडे भडीमार. हाइप बघून सिनेमा बघावा तर दयनीय निघतो, किमान करमणूक सुद्धा होत नाही. आणि डीसेन्ट सिनेमाच नेमका कमी पडतो चर्चेत रहायला. सामान्य पब्लिक ची टेस्ट सुमारपटाचीच आहे हेच खरे.
मलाही आवडला सिनेमा.
मलाही आवडला सिनेमा. जातिभेदासारखा विषय त्याचं अतिसुलभीकरण न करता इतका मजेशीर पद्धतीने मांडणं सोपं नाही.
पणजीचा पदर वार्यावर उडणं, तिने उंबर्यावर दारूच्या बाटलीचं 'माप' ओलांडून नवीन आयुष्य सुरू करणं, वर्गातल्या सवर्ण मित्राचा थोर डायलॉग काय असू शकला असता आणि काय निघाला हे दाखवणं अशा अनेक मजामजा भयंकर आवडल्या!
ते एक माहितीपटांचे भाई भगत नावाचे निवेदक होते, त्यांची शैली वापरली आहे आणि निवेदकाचा आवाज परेश मोकाशीचाच आहे.
हो! अशा खूपच बारीक बारीक मजा
हो! अशा खूपच बारीक बारीक मजा मजा आहेत.
अगदी, अगदी स्वाती. सिनेमा
अगदी, अगदी स्वाती.
सिनेमा लहान मुलांच्या दृष्टिकोनातून लिहिल्यासारखा वाटला. गंभीर विषय असूनही त्या बाबींचा अनुल्लेख किंवा उदोउदो दोन्ही न करता, वास्तववादी व विनोदी दोन्हीला स्पर्श करूनही कथा म्हणून पुन्हा स्वतःचं वेगळेपण जपत स्वतंत्र आणि अलगद रहातो. कुठेही आव किंवा अभिनिवेश नाही, एखाद्या निरागस लहान मुलाने त्याची गोष्ट तिखटमीठ लावून सांगावी व काही खरं सांगावं आणि थोड्या थापाही जोडाव्यात आणि ते ऐकणाऱ्याला कळूनही त्यानं मुग्ध होऊन ऐकत बसावं तसा अनुभव होता.
-------
एक माहितीपटांचे भाई भगत नावाचे निवेदक होते, त्यांची शैली वापरली आहे आणि>>>>>> ही माहिती आवडली.
प्राजक्ता, आयपीटीव्ही वर बघितला.
Pages