Submitted by अभि१३ on 23 November, 2023 - 03:38
आमच्या मातोश्रींच्या तळहाताला व तळपायाला जळवाताचा त्रास होत आहे. एलोपथी, आयुर्वेद दोन्ही कडे दाखवून झाले. तळहाताला व तळपायाला भेगा पडतात. आई खूप पथ्यपाणी करते तरीही त्रास होतोच. आईचे वय 50+ आहे. ह्या बद्दल कोणाला काही अनुभव किंवा माहिती आहे का ? उपाय असला तर सुचवावा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हातापायाला भेगा पडत असतील आणि
हातापायाला भेगा पडून रक्त येत असेल तर काही काळ आहारातून हिरव्या मिरचीचा वापर थांबवून पहा. लाल तिखट प्रमाणात वापरले तरी चालेल. मला कुठल्याही प्रकारचे डॉक्टरी ज्ञान नाही. घरात काही जणांना मिरचीचा वापर बंद केला तर रिलीफ मिळतो हा अनुभव आहे.
कोकम तेलाचा एक गोळा मिळतो.
कोकम तेलाचा एक गोळा मिळतो. आधी वापरले नसेल तर वापरून पहा.
कोकम तेलाचा एक गोळा मिळतो##
कोकम तेलाचा एक गोळा मिळतो## कोकणात मिळतो, त्याला मुटलं म्हणतात. त्याने आराम पडेल. कांस्य वाटीने मसाज करून पहा, त्यानेही आराम मिळू शकेल.
भ्रमर , केशवकुल , कोकमच्या
भ्रमर , केशवकुल , कोकमच्या तेलाचा गोळ्याचा वापर कसा करायचा ?
कांस्यथाळी ची खूप मसाज
कांस्यथाळी ची खूप मसाज सेंटर्स पुण्यात आहेत.20 मिनिट तूप मसाज वगैरे,एकदा करून बघा.बराच फरक पडेल.
शिवाय रात्री झोपताना रोज साधे कोकोनट ऑईल तळपायाला चोळून झोपल्यास पण फरक जाणवेल.
बाह्य उपचार कराच.पण डॉक्टरना
बाह्य उपचार कराच.पण डॉक्टरना विचारून बी कॉम्प्लेक्स चालू करा.फरक पडेल.
शरीरातली ऊष्णता कमी
शरीरातली ऊष्णता कमी करण्यासाठी उपाय करा.
ज्वारी/नाचणीच्या पिठाचं ताकातलं आंबील, (मुळात आहारात ज्वारीचं, इतर भरडधान्यांचं प्रमाण वाढवा. बाजरी नको, ती ऊष्ण असते.)
सुकं अंजीर भिजवून रोज खाणे,
धने-जिरे भिजवून त्याचं पाणी पिणे,
शरीरातली ऊष्णता कमी
शरीरातली ऊष्णता कमी करण्यासाठी उपाय करा.
पण डॉक्टरना विचारून बी कॉम्प्लेक्स चालू करा.
>>>>+१०००
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी 'सांडू'चे चंदनासव हा एक चांगला उपाय आहे. एखाद वेळेस घ्यायचे असेल तर बाटलीवर प्रमाण लिहिलेले असते त्याप्रमाणे पाण्यात मिसळून घ्या.
नियमित वापरायचे असेल तर डॉक्टरी सल्ला घ्या.
अभि१३
अभि१३
कोकम गोळा थोड्या उष्णतेने विरघळतो. ते तेल भेगेवर लावायचे. आमच्याकडे कोकणात सगळ्या घरात आसतो.
अवश्य वापरून पहा.
आम्ही लहान असताना आईला हा
आम्ही लहान असताना आईला हा त्रास व्हायचा, आम्ही जाळवात म्हणतो. तेव्हा आमच्या फॅमिली डॉक्टरांचं औषध प्लस बाबा गोग्रासवाडीत जाऊन गाईचं तूप आणायचे, हे आठवतंय. आता आई बाबा नाहीत नीट सांगायला पण आईला बरं वाटलेलं काही महिन्यांनी.
कैलास जीवन, कोकम तेल, गाईचं तूप यांनी थोडा आराम पडेल बहुतेक.
माइल्ड साबण वापरणे, भांडी
माइल्ड साबण वापरणे, भांडी घासताना,कपडे धुताना ग्लव्हस घालणे, आंघोळ झाल्या झाल्या पेट्रोलियम जेली लावणे, रात्री झोपताना ( आणि शक्य असल्यास दिवसा देखील ) पायांना सढळपणे पेट्रोलियम जेली लावून मोजे घालणे या सर्वांचा पण फायदा होतो .
Becksons' (किंवा दुसऱ्या
BAKSON'S (किंवा दुसऱ्या कंपनीचे )Graphites homeopathic medicine ointment.
एकमेव सोपा उपाय. लागू पडले तर तीन दिवसांत गुण येतो. photo