Submitted by मेधावि on 1 November, 2021 - 22:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
डाळीचं पिठ दोन वाट्या ( नेहमीचंच घातलं)
साखर सव्वा वाटी
वेलदोडा, जायफळ, काजूबेदाणे
तळणीसाठी ऑप्टीमम साजूक तूप. (मला दोन घसघशीत चमचे भरून लागलं) शेवटचा चवंग्याचं तर तळणं न होता परतणं झालं.
क्रमवार पाककृती:
छान होतात हे लाडू. मोतीचुरासारखे लागतात.
डाळीचं पिठ किंचीत मीठ घालून दुधात भिजवून सा. तुपात मध्यम जाळीतून शेव पाडून तांबडी (ब्राऊन नाही) आणि कुरकुरीत होईपर्यंत तळायची.
गार झाली की मिक्सरमधून भरड काढायची.
साखरेचा एकतारी पाक करून त्यात ओतायचा आणि मिश्रण आळलं की लाडू वळायचे.
भारी लागतात हे लाडू.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तिरुपतीच्या प्रसादाची चव
तिरुपतीच्या प्रसादाची चव आणण्याकरिता पुढच्या वेळेस थोडी कुटलेली खडीसाखर, जरास्सा कापूर आणि लवंग घालणार आहे लाडू वळताना. देवळातल्या तीर्थाच्या चवीचं पाणी पण बनवलं होतं एकदा तांब्याच्या भांड्यात अगदीच इवलास्सा कापूर घालून.>>>>
रेसिपी टाका ना मेधावि तिरुपती लाडूची
सि, मी प्रयोग करूनच पहाणार
सि, मी प्रयोग करूनच पहाणार आहे. प्रकरण जमलं तर टाकीनच.
पहिल्यांदा ऐकलं शेवेचे लाडू.
पहिल्यांदा ऐकलं शेवेचे लाडू. छान दिसताहेत.>>> + 10000
मंजूताई मस्त झालेत लाडू.
मंजूताई मस्त झालेत लाडू..temtpitng
छान दिसतायत!
छान दिसतायत!
निट स्टेप बाय स्तेप क्रुती लिहा ना कूणीतरी
किती दुध वापरले,शेवेसाठि पिठ कस हव्,पाक कसा हवा?
प्राजक्ता, मी दूध मोजलं नव्हत
प्राजक्ता, मी दूध मोजलं नव्हत पण काय केलं ते सांगते आधी भिजवलं . थोडं पीठ घातलं सोर्यात (पितळी)
तर पा डायला त्रास/ताकद लागत होती मग अजून दूध टाकून सैल केलं ... बाकी स्टेप म्हणजे डायरेक्ट तापलेल्या कढईत शेव पिळायची. जाड जाळी वापरली त्यामुळे लवकर झाली शेव पाडून. लगेच पाक करायला घेतला. साखर बुडेल इतके दूध घालून मंद आचेवर ठेवल. एकतारी पाक होईपर्यंत गार शेव वाटून घेतली. मिश्रण थंड झाल्यावर वेलदोडे पूड व बदाम घालून लाडू वळले.
एक प्रश्न:
एक प्रश्न:
पीठ तयार केलं. सोऱ्यात घालून दाब देऊन पाहून हवं तेवढं सैल करून घेतलं.
आता शेव पाडायची जरा प्रॅक्टिस केली आधी ताटात शेव पाडून, तेलात पाडण्या ऐवजी. तर ती ताटात पाडलेली शेव परत पिठात कालवून वापरता येईल का तेलात शेव पाडताना?
हो.
हो. ताटात कशाला पाडता? एक ताट वाढेल घासायला. त्यापेक्षा पिठाच्या भांड्यातच प्रॅक्टीस करा शेव पाडायची.
तेलाऐवजी तूप वापरा तळणीसाठी.
धन्यवाद. वेगळ्या ताटात या
धन्यवाद. वेगळ्या ताटात या करता की चवंग कसा पडतो आहे तो आकार बघायला.
लाडुसाठी अर्थात ते महत्वाचे नाही, पण एकदंरीत प्रॅक्टिस साठी.
जनहितार्थ
जनहितार्थ
<साखर बुडेल इतके दूध घालून
<साखर बुडेल इतके दूध घालून मंद आचेवर ठेवल. एकतारी पाक होईपर्यंत गार शेव वाटून घेतली.> मंजूताई, तुमचा २०२१ चा प्रतिसाद. दूध की पाणी?
ही कृती बघितलीच नव्हती अजून.
ही कृती बघितलीच नव्हती अजून. मस्त आहे. सगळ्यांचे लाडू सुरेख दिसतायत.
या वर्षी बनविलेले लाडू (माझा
या वर्षी बनविलेले लाडू (माझा सहभाग शून्य)
मी अजून एकदाही शेव केली
मी अजून एकदाही शेव केली नाहीये, तर मला जमतील का हे लाडू? पाकातले लाडू केले आहेत , म्हणजे पाकाचं टेन्शन नाही पण शेवच कधी केली नाहीये, कढईत डायरेक्ट शेव पाडायची ? हे लाडू खरंच सोपे आहेत का?
आज केले मस्त झाले.
आज केले मस्त झाले.
आज केले मस्त झाले.
आज केले मस्त झाले.
मस्त लाडू.
मस्त लाडू.
आज केले मस्त झाले....... चुकून वाचले 'आज केले फस्त झाले.'
मस्त झाले म्हणजे फस्त झाले हे
मस्त झाले म्हणजे फस्त झाले हे ओघाने (तोंसुपा च्या) आलेच.
(No subject)
मंजू, लाडू अप्रतिम दिसतायत.
मंजू, लाडू अप्रतिम दिसतायत.
मस्त झाले म्हणजे फस्त झाले हे ओघाने (तोंसुपा च्या) आलेच. >> मानव
मंजूताई मस्तच दिसताएत लाडू.
मंजूताई मस्तच दिसताएत लाडू.
देवकी, मानव
(No subject)
Pages