Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज कोकोनटचा वाढदिवस आहे. हा
आज कोकोनटचा पहिला वाढदिवस आहे. हा फोटो बघून आम्ही त्याला सहा आठवड्यांचा असताना १ जानेवारी २३ ला घेऊन आलो होतो. डकी नाव बदलून कोकोनट ठेवलं होतं.
१)
२)
३)
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
लहान्या कोकोनट कसला गोड
लहान्या कोकोनट कसला गोड दिसतोय.
अरे वाह
अरे वाह
कोकोनट ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
असाच गोंडस रहा
अमा - तुमची लेक आणि पैठणी मस्त आहे
मलाही ओड्याची गंमतच वाटली, मी आपला रिल्स वगैरे बघून या
याला कुठं सेफ आणि कोझी वाटेल याचा विचार करून, त्याच्या ट्रीट, खेळणं सगळी जय्यत तयारी केली होती
तर हा ढेकळ्या बाहेर हिंडतोय मस्त फटाके बघत
त्याला फक्त खुप धूर झाला तर आवडत नाही मग आत पळून येतो
असेही त्याला नाक तिक्ष्ण असल्याने कुठल्याही उदबत्ती, परफ्युम, डिओ किंवा तेल आवडत नाही
आणि आम्ही बाहेरून आलो की त्या वासाने जोरात शिंकतो
पण बाकी फुल्ल एन्जॉय केली दिवाळी त्याने यंदा
माझे मामा मामी, बहीण भाऊ सगळेच आलेले आणि सगळे भुभुप्रेमी त्यामुळे त्याला काय करू काय नको असं झालेलं
खेळायला, लाड करून घ्यायला एवढे ऑप्शन बघून म्हणजे त्याला हरखुन जायला होत होतं
कोकोनट ला हॅपी बड्डे! काय खास
कोकोनट ला हॅपी बड्डे! काय खास प्लान मग आज?
किती गोड दिसतोय कोकोनट.
किती गोड दिसतोय कोकोनट.
Happy birthday to Coconut.
Happy birthday to Coconut. Treatos and walks.
कोकोनट , हॅपी बर्थडे
कोकोनट , हॅपी बर्थडे
फ्रॉम हॅरी
ओड्या शूरवीर आहे मग एकदम!
ओड्या शूरवीर आहे मग एकदम!
हॅपी बर्थडे कोकोनट! हॅपी दिवाळी इथल्या सगळ्या माऊ-भूभंना
आम्हाला एवढी फर असून थंडी वाजते बाबा! अॅडव्हान्स हॅपी हॉलिडेज फ्रॉम सॅमी टू ऑल हर बडीज....
अग कसलं गोड दिसतंय! स्वेटर
अग कसलं गोड दिसतंय! स्वेटर घालून बरा घेतला?!!
थांकू थांकू सर्वांना.
थांकू थांकू सर्वांना.
डॉग बेकरी आहे- तिथे जाऊ, पक्कं नाही पण पेट शेल्टरसाठी आपापल्या पेट सोबत फंड रेजर वॉक आहे, तिथंही जायचा प्लॅन आहे.
जाई, हॅरीचे व्हिडिओ बघते अधुनमधून.
सॅमी किती गोड, मऊ आणि कोझी दिसतोय.
आशुचॅम्प,
ओड्याचाच वाढदिवस झाला असं वाटतंय हे वाचून.
Happy birthday Coconut!❤️
Happy birthday Coconut!❤️
ओडीनची मजाच मजा!
माऊ किती लाडिक बघतेय.
अमा, लेक मस्त आहे.
अमा, लेक मस्त नटली आहे. गोड!
अमा, लेक मस्त नटली आहे. गोड!
ओडया पुढच्या वर्षी फटाके लावायला नाही गेला म्हणजे मिळवली
माव्या एकदम पोक्त मोड
कोकोनट क्यूट दिसतोय अगदी. त्याला हॅपी बर्थडे!
सॅमी गुंडोबा दिसतोय मस्त.
सॅमी सुंदर.या माऊची लांबी
सॅमी सुंदर.या माऊची लांबी पूर्वीपेक्षा वाढलीय का?
Happy birthday coconut!
Happy birthday coconut!
ओडीनची मज्जाच झाली की! माऊई डांबरट आहे
सॅमी आणि स्विटी क्यूट..
मै हो घालून घेतला या वेळी.
थँक्यू!!
मै हो घालून घेतला या वेळी. मागच्या वर्षी रिव्हर्स गिअर लागला होता
या माऊची लांबी पूर्वीपेक्षा वाढलीय का?>>>>> हो असेल थोडी मोठी दिसते आता. कॅट एज नुसार २ वर्षाची झाली.
कोकोनट ला वाढदिवसाच्या खूप
कोकोनट ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
भरतभेटीचा सीन !!
आज आमच्याकडे भरतभेटीचा सीन !!
ऑश्कु चे आगमन झाले आहे सकाळीच! माऊईला सकाळी सकाळी घरात गडबड, माझे फोन कॉल्स, एअरपोर्ट वर पिक अप ला जायची बाबाची घाई इ. बघून काहीतरी मज्जेचे घडणार आहे याचा अंदाज आला असावा. एक्सायटेड होता एकदम. कसेतरी खाणे उरकले आणि खिडकीतच जाऊन बसला. ऑश्कु आणि डीजे आल्यावर पार येडाच झाला! त्याने लगेच ओळखलं दोघांना . कुई कुई, हॅ हॅ, उड्या, अन मग झूमीज !! ऑश्कु आधी टरकला जरा, मग झाली पुन्हा गट्टी. हा भरतभेटीचा सीन झाला.
आता दोघे कुठेही एकत्र फिरतायत. सतत मस्ती करतायत.
सारखे बॅकयार्ड मधे हुंदडायला मागतायत. हे पहा. मागच्या दारापाशी बाहेर जाऊ दे म्हणून भुणभुण करणारे दोघे
तिथे आधी एक घंटी टांगलेली होती. हे दोघे सारखीच घंटी वाजवायला लागले! मग आता काढूनच ठेवली आहे ती. कदाचित म्हणूनच असे चेहरे झालेत!
आता आमचे काही खरे नाही पुढचे २ आठवडे भरपूर एक्साइटमेन्ट असणार आहे!
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
हे अती गोड झालं आहे मैत्रेयी, 'डबल धमाका' व्हिडिओ येऊ देत आता. तिसरा फोटो तर खरंच भरतभेटीचा वाटतोय.
Enjoy Thanksgiving..!
माऊईला नेत नाही का एअरपोर्टवर
माऊईला नेत नाही का एअरपोर्टवर?
नाही तो अणि मी घरीच थांबलो
नाही तो अणि मी घरीच थांबलो नाहीतर तिकडे गाडीतच ही सगळी एक्साइटमेन्ट भुंका भुंक , मस्ती झाली असती.
मैं, फोटोज् खूप मस्त आलेत.
मै, फोटोज् खूप मस्त आलेत. गोड दिसतायत दोघं. क्यूटनेस ओव्हरलोड!
फारच क्युट फोटो आलेत.ओश्कु चा
फारच क्युट फोटो आलेत.ओश्कु चा शेवटच्या फोटोतला चेहरा
अशक्य क्यूटनेस भरलाय फोटोत.
अशक्य क्यूटनेस भरलाय फोटोत.
वॉव मस्त फोटो...
वॉव मस्त फोटो...
(No subject)
अय्यो कसली गोंडस भेट
अय्यो कसली गोंडस भेट
अगदी बिछडे हुवे भाई वाटतात
आता आई बापाच्या डोक्याला मुंग्या आणतील एकत्र मिळून
ओड्याचा किस्सा
ओड्याचा किस्सा
आम्ही फिरायला जातो तिथं एक भटक्या भुभुंचा कळप असतो हे सांगितले होतं ना, त्यात एक पांढऱ्या रंगाची भुभी आहे, ती ओड्याच्या जाम लाडात येते, तो आला की मागेमागे फिरते, खेटायला बघते
ओड्याला पण आवडत असावी असा संशय आहे पण तेवढ्यात मग ग्रुपमध्ये बाकी भुभु भुंकून गदारोळ करतात
कबिले बाहेरून आलेला लडका नाही चालणार असा सूर बहुदा
तर ओड्याने दिवाळीत जोरदारपणे देवाची प्रार्थना केली असणार कारण काल समस्त गॅंग गायब आणि फक्त ही एकटी पांढरी भुभी अकख्या मैदानात उरलेली
पुलं नी पाळीव प्राणी मध्ये लिहिलं आहे तसे सेम भुभ्याची स्वप्ने
पण ते फार रंगात यायच्या आत मी त्याला लीश बांधून पकडून लांब नेलं,गेल्या वेळच्या अनुभवामुळे मी कायमच सावध असतो
ओड्या म्हणाला असेल "ओह शीट, बाबाला पण घरीच राहू दे हे देवाला सांगायचे विसरलोच"
ओड्या
ओड्या
कसली निरागस बाळे आहेत दोन्ही.
कसली निरागस बाळे आहेत दोन्ही.
फार छान फोटो आणि किस्से
फार छान फोटो आणि किस्से
भरत भेट तर awesome
Belated हॅप्पी बड्डे कोकोनट
Pages