#StraightFromHeart
नवरात्रीच्या नऊ रंगाचे कपडे नऊ दिवस घालायचे आणि फोटो काढून पाठवायचे. एक मजेचा भाग म्हणून छान वाटतं.
पण ही काही परंपरा / धार्मिक रीत आहे का? अजिबात नाही.
फेसबुक आणि सोशल मीडियाच्या काळाआधी
म. टा. / लोकसत्तेच्या पुरवणी मधून नवरात्रीचे नऊ रंग छापून येऊ लागले. त्याबरोबर वेगवेगळ्या ऑफिसेस मधले ग्रुपफोटो छापायला लागले. प्रसिद्धी मिळाल्याने अजूनच हे प्रस्थ पसरत गेले.
मन सहाजिकच भूतकाळात गेले. आई आजी कडे होत्या का एवढ्या साड्या आणि त्या ठेवायला मोठे वॉर्डरोब. घरात एक दोन कपाटं, त्यातले १-२ कप्पे मिळायचे. त्यात ५-६ नेहेमीचे कपडे,२-४ ठेवणीतले. त्यात नऊ रंगाचे कपडे मिळणं केवळ अशक्य.
नवरात्रीतला भोंडला, सोसायटी/गल्लीतला रोजच्या कपड्यातला गरबा, अष्टमीला देवीचे दर्शन ह्या कशालाच पैसे लागत नसतं पण आनंद, भक्तीभाव, उत्साह हमखास असे.
कदाचित वर्तमानपत्रवाल्यांना नवरात्रीच्या स्पेशल पुरवणीसाठी मोठ्या मोठ्या जाहिराती मिळत असतील. जाहिरातदारांना नवरात्रीच्या आगे मागे सेल लावून भरमसाठ नफेखोरी होत असेल. बरंच मोठं अर्थकारण असल्याशिवाय गोष्टी येवढ्या पसरत नाहीत. बरं ह्यात समाजाचे सगळे स्तरही सामावले जात नाहीत.
गमती गमतीत सुरू झालेल्या ह्या गोष्टी कधी गरज बनुन त्याच्या चालीरीती बनतील आणि पुढे धार्मिक रुढी /परंपरा होतील आणि सगळ्यात स्तरातील लोकांना वेठीस धरतील हा विचार टोकत रहातो.
—-----------------------
हा लघुलेख मी दोन वर्षांपूर्वी लिहिलेला. यावर खूप मतमतांतर त्यावेळी वाचायला मिळाली. राग लोभ सगळंच प्रकट झालेलं.
या दोन वर्षात बहुदा जग अजूनच बदललं म्हणजे मला ते जाणवलं ( कदाचित बऱ्याच उशिराने असावं).
एकेका रंगांचे कपडे हे प्रकरण माझ्या समजुतीप्रमाणे फक्त नवरात्रीपुरतं मर्यादित होतं. पण आता आता समजतंय की कोणत्याही विशिष्ट समारंभांना, फोटो काढायच्या वेळेलाही एकाच रंगाचे, थाटाचे किंवा धाटणीचे वस्त्र किंवा पेहराव असावा ह्याचा आग्रह. म्हणजे पूर्वी चुकून जरी एकाच रंगाचे कपडे घातले तर बॅंडवाले म्हणून चिडवतील अशी भीती वाटण्याचा काळ जाऊन आता तेच “In” झालय.
अशा सुंदर एकसारख्या सजलेल्या (बहुतांशी ) जणींचा उत्साह, उरक आणि आनंद (अगदी फोटो पुरता किंवा त्या समारंभापुरता का असेना) मोहून टाकतो. कदाचित त्या क्षणापुरत तुमचेही मन प्रफुल्लित करतो.
मग एक-दोन दिवस त्यावर चर्चा, फोटोंची देवाण घेवाण यात जातात. मुख्य (?)म्हणजे सोशल मीडियावर झळकतात. नकळत, फारशा उत्सुक नसलेल्याचंही त्यात खेचलं जाणं हे सगळं ओघाने आलच.
काही लोकं या साऱ्याला न भुलता त्यांच्या विचारांशी ठाम राहून, गुंतुनी गुंत्यात न पडता तटस्थ राहू शकतात.
तर माझ्यासारखे काठावरचे, ज्यांच्या बुद्धीला तर हे एक सारखे रंग, पेहेराव, (जे बहुदा घरात नसल्यामुळे) ते जमविताना होणारी दमछाक, यातायात, त्यासाठी लागणारा अनाठायी वेळ, व्यय आणि शक्ती काहीच पटत नसणारे, पण त्यांचे मन मात्र वरच्या उत्साही लोकांचा उत्साह बघून, आनंद बघून नकळत बुद्धीशी फारकत घेऊ बघते.
आणि मग त्यांच्या उत्सवात सामील होऊन घरी आल्यावर परत बुद्धी वरचढ होऊन मनाला मात करते.
एकरंगी, एकरूपी पेहराव हे आजकाल मूळतः ज्या सोशल मीडिया साठी घेतले जातात त्या FB, Insta आणि Whatsapp चा कर्ताकरविता, जो ह्या सगळ्या लोकांच्या एंगेजमेंट वर अब्जावधी पैसे कमावतो तो मात्र रोज एकाच रंगाचे कपडे घालतो कारण त्याच म्हणणं रोज कोणते कपडे घालायचे हे ठरविण्यात वेळ आणि क्रयशक्ती वाया जाते. किती विरोधाभास आहे, नाही?
अगदी नैसर्गिकपणे सुटसुटीतपणे साजरे केलेले सण, साध्या कपड्यातले फोटो कमी आनंद देणारे असतात का? आधुनिक काळाकडे सरकत असताना आचार, विचार, आणि आहार स्वातंत्र्याचे पंख लेवून भरारी घ्यायचे अशावेळी आपणच आपल्यासाठी नवनवीन चौकटी बांधून त्यातच रमणार आहोत का?
दरवर्षी सण आले की त्यावर विरजण पाडणारं कोणी लिहितच असाही एक आरोप होतो. पण कदाचित ह्या लाटेवर स्वार करणारे असतात तेव्हा कधी कोणाला त्याची मागची एखादी बाजू व्यक्त करावीशी वाटूच शकते की...
अमा सकारात्मक आणि उत्सवी
अमा सकारात्मक आणि उत्सवी प्रतिसाद आवडला.
नवरात्रात लोकांना आजचा
नवरात्रात लोकांना आजचा/उद्याचा कुठला रंग लक्ष्यात ठेवावा लागतो. यामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते, तरुणांची शाबूत रहाते तर वृध्दांचा मेंदु सक्रीय होऊन अल्झायमर होण्याची शक्यता नगण्य होते.
ह्याच बरोबरीने रात आंधळेपणा
ह्याच बरोबरीने रात आंधळेपणा रंग आंधळे पणा ह्यावर सुद्धा अतिशय परिणामकारक उपचार म्हणून हे ९ रंग वापरणे उपयोगी ठरतात ह्यावरून सनातन वैदिक धर्म किती परिपूर्ण आणि दूर दृष्टी ठेवून होता ह्याची साक्ष मिळते![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आता सर्व मुद्दे संकलित करुन कायच्या काय फॉरवर्ड बनवण्यात यावेया धाग्यासाठी योग्य मसाला
या धाग्यासाठी योग्य मसाला मिळाला.
काल एका भारतीय इंग्रजी वृत्तवाहिनीवर इस्रायल - पॅलेस्टिन प्रश्नावर चर्चा होती. इस्रायलचं प्रतिनिधित्व करणार्याने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार्या महिलेच्या कपड्यांच्या रंगावरून (हिरवी साडी, लाल किनार, काळा ब्लाउज ) ती पॅलेस्टाइनचं समर्थन करते आहे असा निष्कर्ष काढला.
तो स्वतः इस्रायलच्या झेंड्यांतले पांढरा आणि निळा हे रंग असलेले कपडे घालून आला होता.
कपड्यांच्या रंगात कोणताही अर्थ किंवा उद्देश नाही, ही माझ्या आजीची साडी आहे आणि तिने दिलेल्या साड्या मी नेसत असते, असे बाईंनी सांगूनही काही फरक पडला नाही. ही क्लिप त्यांनी ट्विटरवर टाकल्यावर अर्थातच दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया आल्या.
त्यातल्या एका भगव्या बाईंनी - तू निरागसपणाचा आव आणू नकोस. तू या रंगाचे कपडे विशिष्ट उद्देशानेच घातलेस. अगदी नवरात्रीतला आजचा रंगही निळा आहे. इस्रायली व्यक्तीच्या पारखी नजरेला दाद दिली पाहिजे. त्याने तुला बरोबर ओळखलं. Disgusting woman you are
असं उत्तर दिलं.
हे असंच चालत राहिलं तर नवरात्रीतला कलर कोड फॉलो करत नाही म्हणून तुम्ही xxx , हिंदू विरोधी, इ.इ. विशेषणं लागू शकतील. लोकल ट्रेनमध्ये मॉबकडून मार मिळू शकेल.
हे असंच चालत राहिलं तर
हे असंच चालत राहिलं तर नवरात्रीतला कलर कोड फॉलो करत नाही म्हणून तुम्ही xxx , हिंदू विरोधी, इ.इ. विशेषणं लागू शकतील. लोकल ट्रेनमध्ये मॉबकडून मार मिळू शकेल.>> नाय हो आमची मुंबई, मुंबई लोकल वगैरे चे रील्स बघितले तर विरार स्टेशन प्ला ट फॉर्म एकदम लाल रंगाने भरून गेलेला होता. लोक पण परवडेल जमेल तसेच करतात की . एक मजा असते. कपडोंसे पता चलता वाले असतात . वी हॅव टु लिव्ह विथ दोज पण जनरल पब्लिक मजा करते. आमच्या इथे एक बारक्या चणीच्या मावशी आहेत. दोन वर्शा पूर्वी विडो झाल्या पण काल सुरेख लाल व काळ्या काठाची सोने री वर्ख काम असलेली साडी नेसुन आलेल्या. ती नेसते कारण तिला आनंद मिळतो त्यात. त्या निमित्ताने जरीच्या साड्या बाहेर निघतात.
आजचा कलर यल्लो. पण मी जीन्स व व्हाइट टॉप घातला आहे. नटायचा मूड नव्हता.
इकडे , बे एरियात, एका शाळेत
इकडे , बे एरियात, एका शाळेत.
आज सकाळी ३ बायका / स्टाफ ( भारतीय) पिवळे कपडे घालून येताना दिसल्या.
एक अभारतीय, त्यांची सहकारी. " आज पिवळा रंग होता? मला काल का नाही सांगितलं, माझ्याकडे पण पिवळा आहे.. मी तो घालून आले असते. "
हे पाहणारी मी निशब्द.
इकडेही नवरात्रीचे रंग आलेत .
काल unity/ inclusion साठी इकडे शाळेत केशरी रंग घातला होता.
तसही स्पिरीट week ला एकाच रंगाचे/थीम चे कपडे घालतात.
Christmas लाल, व्हॅलेंटाईन डे पिंक/ रेड, st. पॅट्रिक डे ग्रीन, ४जुलै रेड, blue or व्हाईट.....
त्याचं काय सांगता... आमचे जिम
त्याचं काय सांगता... आमचे जिम जॉर्डन भाऊ पिवळा टाय घालून आलेत आज! आता बोला!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
https://www.cbsnews.com/live-updates/speaker-of-house-vote-live-updates-...
परवाचीच गोष्ट.
परवाचीच गोष्ट.
इकडे दहा बारा वर्षे स्थित मराठी तरुणी मला विचारत होती, " ए हे नवरात्रीच्या रंगांचं काय आहे ? हे काही नवीन सुरु झालय का ? मला तर असा काही आठवत नाही .."
मग तिने किस्सा सांगितला.
तिचं ऑफिस एक बे एरियात, दुसरं भारतात आणि तिसरं ब्राझील मध्ये.
ती म्हणाली सध्या भारतातले लोकं नवरात्रीचा ड्रेस कोड / रंग घालून येत यावं म्हणून ऑफिसाला येतात एरव्ही सगळेच वर्क फ्रॉम होम.
आता ते रोज फोटो आणि दुसऱ्या दिवशीचा रंग पण पोस्ट करायला लागलेत.
मग ब्राझील ऑफीसातळे लोकही एकदम तरस्त घेऊ लागलेत.
त्यांच्याही चर्चा सुरु झाल्यात " हे आज पाचवा दिवस ना ? कोणता रंग आहे?" वगैरे ...
एक दोन वर्षात ब्राझील ऑफिस मधल्या लोकांनी पण नवरात्रीचे रंग पाळायला सुरवात केली तर आश्चर्य नको वाटायला..
बाकी सगळ्या गॊष्टी एका बाजूला ठेवून एका गोष्टीची गंमत वाटायला लागलीये.. नवीन प्रथा किंवा रूढी कशा पडतात ते या निमित्ताने बघायला मिळतंय.
एका देवस्थानाचा जन्म, तशा चालीवर उगाच सुचलं, एका प्रथेचा जन्म
Pages