बास्केट साठी -
ज्वारीचे पीठ ८ टेबलस्पून
मैदा २ टेबलस्पून
बेकिंग सोडा १/२ टीस्पून
बेकिंग पावडर १/२ टीस्पून
मीठ
तिखट
हळद / काश्मिरी लाल (रंगासाठी)
ओवा
जिरे
तेल
चाटसाठी -
ज्वारीचा हुरडा
कांदा
कोथिंबीर
लिंबाचा रस
हिरवी मिरची
मीठ
चाट मसाला
शेव
या गणेशोत्सवात संयोजकांनी मिलेट्स वापरून काही तरी करून दाखवा असे आव्हान दिले. रमडशी चर्चा करत असताना हुरड्याचे काही तरी करता येईल अशी टूम निघाली. खरे तर इथल्या दुकानातले ते फ्रोझन हुरड्याचे पाकीट बरेच दिवस खुणावत होते आणि ज्वारीचे पीठ सुद्धा पँट्री मध्ये ठेवलेले होते. मग काय रमड म्हणाली की बास्केट चाट करताना ती ज्वारीच्या पिठाचीच कर म्हणजे ज्वारीच्या बास्केट मध्ये ज्वारीचा हुरडा - 'मिलेटचे डोही मिलेट तरंग'!
थोडी ओळख झाल्यावर आता क्रमवार पाककृती लिहीतो.
१) सुरूवातीला ज्वारी, मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून घेतले. त्यात थोडे जिरे आणि ओवा हातावर मळून घातला (बाकी काही मळत असाल तर हात नीट धुवून घ्या नाही तर लोकांना खाताना किक बसायची )
२) आता त्याचे दोन वेगळे भाग केले. (मला दोन रंग हवे होते म्हणून. तुम्हाला एकच रंग हवा असेल तर सगळे एकत्र ठेवले तरी चालेल.)
३) एका भागात हळद आणि दुसर्या भागात काश्मिरी लाल घातले.
४) त्यात थोडे तेल घालून ते मळून घेतले.
५) आता पाणी घालून खूप पातळ न करता भिजवले.
६) परत तेल घालून नीट मळून घेतले. हे तेल आपल्याला बास्केट खुसखुशीत करण्याला मदत करणार आहे त्यामुळे कंजुसी करू नका.
७) हे पीठ १० मिनीटे झाकून ठेवले.
८) तो पर्यंत ओव्हन ३५० फॅ. ला प्रीहीट केला.
९) मळलेले पीठ मफिन कप लायनर्स मध्ये घालून ते मफिन टिन मध्ये ठेवले. याने बास्केटला नीट आकार आणि नक्षी पण मिळेल.
१०) हे २५ मिनीटे बेक केले. (१५ आधी मग १० फिरवून)
या आपल्या तयार बास्केट्स!
चाटकरता -
१) आमच्याकडे फ्रोझन हुरडा मिळाला आम्ही तोच वापरला. तुम्ही ताजा भाजलेला हुरडा वापरू शकता. हुरडा पार्टी झाल्यावर थोडा शिल्लक राहिला असेल तर तो घेवून या आणि मग वापरा.
२) कांदा, कोथिंबीर, मिरची बारीक चिरून घेतली.
३) हे सगळे हुरड्यात मिसळून घेतले.
४) त्यात चाट मसाला, थोडे मीठ आणि लिंबाचा रस घालून हलवून घेतले.
५) हे मिश्रण बास्केट्स मध्ये भरून घेतले.
६) वरतून थोडी बारीक शेव टाकली. ( ही ऑप्शनल नाही)
७) रणवीर म्हणतो तसा एक पान प्रिय मित्र धनिया सजावटीकरता लावले.
खायला आपली मिलेट बास्केट चाट तय्यार!
खरं म्हणजे आम्ही साशंक मनानेच पहिला घास तोंडात टाकला. पण खूपच आवडली.
१) तुमच्या बास्केट्स किती वजन घेतील त्याप्रमाणे आणि आवडत असेल तर गोड / तिखट चटणी वापरू शकता.
२) हुरड्याची चाट न करता त्यात लसूण चटणी / तिखट टाकून ते बास्केट मध्ये भरू शकता.
३) बास्केट गूळ घालून गोड करून त्यात गूळ आणि तूप घातलेला कोवळा हुरडा घालू शकता म्हणजे एक गोड पदार्थ पण होईल.
मस्त आहे क्रुती! खुपच कल्पक,
मस्त आहे क्रुती! खुपच कल्पक, फोटोहि सुरेख आलाय.
यम्मी दिसतेय बास्केट
यम्मी दिसतेय बास्केट
धन्यवाद प्राजक्ता आणि कविन
धन्यवाद प्राजक्ता आणि कविन
अभिनंदन धनि !
अभिनंदन धनि !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अरे वा, मस्त रेसिपी. अभिनंदन
अरे वा, मस्त रेसिपी. अभिनंदन
Pages