मराठी चित्रपट मार्केंटींगमध्ये कमी पडतात का? आणि का?
Aatmapamphlet नावाचा मराठी चित्रपट गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. मला आज हे नाव कानावर पडले.
चित्रपटाचे कौतुकच वाचले, त्यामुळे ट्रेलर बघितला. पुन्हा एकदा लहान मुलांची लव्हस्टोरी. विषयात नावीन्य नाही. पण सादरीकरणात असावे. तसेच लव्हस्टोरीपलीकडे काहीतरी असावे असे वाटते. एखादा डार्क ह्युमर वगैरे. कारण जातीभेद देखील दाखवला आहे त्यात. चित्रपट लोकांपर्यंत वेळीच पोहोचला असता तर नक्कीच चर्चा झाली असती असे मटेरीअल एकंदरीत वाटले.
IMDb अगदी ९/१० दाखवले आहे, टाईम्स ऑफ ईंडिया ४/५ स्टार दाखवत आहे.
ट्रेलर ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=oSEWI7V5CRQ
हा सुद्ध परेश मोकाशी चित्रपट आहे. या आधी वाळवी पाहिला होता. चांगला चित्रपट आहे हे कानावर पडताच कोण सोबत आहे हे न बघता एकटाच रात्रीचा शो बघून आलेलो. आवडलेला. त्यावर धागाही काढलेला. जेणेकरून जास्तीत जास्त लोकं बघतील.
पण या वरच्या Aatmapamphlet चित्रपटाबद्दल गूगल करताना अजून काही बातम्या नजरेस पडल्या त्या अश्या की काही ठिकाणी पब्लिक नसल्याने याचे शो रद्द करावे लागले. कधी मराठी चित्रपटांना जास्त शो नाही म्हणून ओरडा असतो, तर ईथे आहे तोच शो चार माणसे बघून रद्द होत आहे.
काय आहे हे? यांना मार्केटींग करता येत नाही का? की मार्केटींगचे महत्व समजत नाही का? की बजेट प्रॉब्लेम असतो? पण व्यवसाय म्हटले की त्यावर तोडगा काढावाच लागणार ना? सोशल मिडिया मध्ये जरी प्रभावी मार्केटींग केली तरी जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पिक्चर पोहोचवता नाही येऊ शकत का? आपण मायबोलीवर मराठी चित्रपट कसा वाटला धागा काढतो. मी स्वतः मायबोलीवर कित्येक मराठी चित्रपटांबद्दल स्वतंत्र धागे काढले आहेत, जे हिंदीबाबत केले नाही. ही जी एक मातृभाषेतील कलाकृतींबद्दल आत्मियता असते ती आपल्या सर्वातच कमी जास्त प्रमाणात असते. याचा फायदा घेऊन मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे ईतके कठीण आहे का? कारण आपल्याला कितीही वाटले की मराठी चित्रपटांना प्रोत्साहन द्यावे तरी आपणही चार लोकांना तेव्हाच सांगणार जेव्हा तो आपल्यापर्यंत पोहोचणार. जो ट्रेलर बनवला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचायला हवा ना, की आपणच जाऊन शोधायचा. नक्कीच काहीतरी चुकतेय.. चर्चा अपेक्षित.
त्यामुळे हा चित्रपट मनोरंजक
त्यामुळे हा चित्रपट मनोरंजक असला तरी अंधारात एकटे बघायला मजा येईल का याबद्दल साशंक आहे.>>>कुठलीही शंका न ठेवता जा...नक्की मजा येईल...आणि हे असले शाळेतले प्रेमप्रकरणं पाहायला मुलांना नेऊच नये असे माझे मत आहे...सुदैवाने आमच्याकडे 11 cha show होता..खरंतर भलताच odd time....पण त्यामुळे मुली शाळेत आणि आम्ही theater ला अशी आमची सोय झाली.
आणि हे असले शाळेतले
आणि हे असले शाळेतले प्रेमप्रकरणं पाहायला मुलांना नेऊच नये असे माझे मत आहे
>>>
हो, ते देखील आहेच. त्या मुळे सुद्धा तिच्या नावावर फुल्ली होतीच.
जातोय आज रात्री
जातोय आज रात्री
एक मैत्रीण तयार झाली
आमच्या धरून ३८ सीट बूक झाल्या आहेत वाशी रघूलीला मोल... कोणी असेल तर भेटा रे...
वाशी रघूलीला >> माझं नाव
वाशी रघूलीला >> माझं नाव सांगा.
या धाग्यामुळे आत्म पँफ्लेट
या धाग्यामुळे आत्म पँफ्लेट चित्रपटाची तिकीट विक्री एखाद्या टक्क्याने वाढली असावी.
मराठी चित्रपट निर्मात्यांनी मायबोलीवर चित्रपटाचं प्रमोशन करायचा विचार करावा.
याआधी काही मायबोली चित्रपटांसाठी माध्यम प्रायोजक होती.
फक्त त्यात धोका हा की मायबोलीवर चित्रपटांबद्दल फक्त चानचानच लिहिलं जाईल असं नाही. पिसेही काढून दिली जातील.
फक्त त्यात धोका हा की
फक्त त्यात धोका हा की मायबोलीवर चित्रपटांबद्दल फक्त चानचानच लिहिलं जाईल असं नाही. पिसेही काढून दिली जातील.>>>
आजच्या लोकसत्ता मुंबई
आजच्या लोकसत्ता मुंबई पुरवणीत नाटक , सिनेमा, वाद्यवृदं यांच्या पान भरून जाहिराती आहेत. (शुक्रवार म्हणून?)
त्यात आत्मपॅम्फ्लेटची दुसरा आठवडा सुरू हे सांगणारी जाहिरात आहे. तसंच आजच डाक आणि दिल दोस्ती दीवानगी हे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत, त्यांच्याही जाहिराती आहेत. आतम...ची जाहिरात गेल्या शुक्रवारीही आली असेल कदाचित.
डाक आणि दिल दोस्ती... कुठल्या चित्रपटगृहांत पाहता येतील, त्याची नावे दिली आहेत. पण आत्मपॅम्फ्लेट वाल्यांनी तुलनेने मोठी जाहिरात देऊनही ते केलेलं नाही.
ही कामं पब्लिसिटी एजंटकरवी केली जातात. यां
पिसेही काढून दिली जातील. >>
पिसेही काढून दिली जातील. >> होलसेलमध्ये
https://youtu.be/Hrk-VWzpbSc
https://youtu.be/Hrk-VWzpbSc?si=I4jK3DiBi2PaCvnS परेश आणि आशिष ची मुलाखत
छे, आम्हाला नाही पहायला
छे, आम्हाला नाही पहायला मिळणार. नंतर प्राईमवर आला तर बरं.
अरे फार भार्री आहे हा सिनेमा!
अरे फार भार्री आहे हा सिनेमा! मज्जा आली बघायला! एकेक वाक्य, डायलॉग लक्ष देऊन ऐकावे आणि एन्जॉय करावे असे फार कमी सिनेमे असतत त्यातला हा एक!
मै- कुठे पाहिला…
मै- कुठे पाहिला…
आयपी टिव्हिवर आलाय ना.
आयपी टिव्हिवर आलाय ना.
मी गुरुवारी रात्री पाहिला हा
मी गुरुवारी रात्री पाहिला हा पिक्चर
सविस्तर लिहावे म्हणून नंतर लिहीन म्हटले .. पण मग वेळच नाही मिळाला..
छान आहे .. आवडला.. सुरुवातीची दहा-पंधरा मिनिटे शैलीशी जुळवण्यात गेली.. पण त्यानंतर असा रमलो की संपूच नये असे वाटत होते.. इंटरवल झाला तेव्हा देखील पटकन फिरून जागेवर आलो.. कारण दोन मिनिटे देखील चित्रपट चुकवायचा नव्हता.. त्या दोन मिनिटातही बरंच काही चुकेल असा पिक्चर होता.. शेवट मात्र चमत्कारिक केला.. मला त्याचा एक अर्थ लागला की तो असा का केला असावा.. पण त्यावर आता चर्चा स्पॉइलर होईल.. बघा लोकहो लवकरात लवकर..
yes.. मस्त आहे पिक्चर....एकदम
yes.. मस्त आहे पिक्चर....एकदम खुसखुशीत आहेत संवाद..
अरे वा आला का आयपीटीव्हीवर
अरे वा आला का आयपीटीव्हीवर बघते मग आज.
मै क्वालिटी ओके आहे का?
मला नाही सापडला काल!
मला नाही सापडला काल!
हो क्वलिटी पूर्ण बघू
हो क्वलिटी पूर्ण बघू शकण्याइतपत ठीक होती. अमित, बहुतेक सायोला पण नाही सापडला. काय भानगड आहे काय माहित.
कचाचित Stbmu आणि Stbmu Pro अॅप मुळे काही फरक असावा. माझ्याकडे Pro आहे.
कोण जाणे! माझ्याकडे तो
कोण जाणे! माझ्याकडे तो आयपीटीव्हीचा बारका डबा मिळायचा पूर्वी तो आहे.
टायगर ३ चं जबरदस्त मार्केटिंग
टायगर ३ चं जबरदस्त मार्केटिंग सुरू झालं आहे. दिवाळीच्या तारखा नेमक्या यशराज बॅनरलाच मिळतात. पूर्वी दिवाळीला शाहरूखचा आणि इदला सलमानचा चित्रपट रिलीज व्हायचे. दिवाळीत चालून जाण्यासारखा आहे. यात अडवणूक आहेच. मराठी चित्रपट दिवाळीला कसा सादर करणार यांच्या आडमुठ्या मार्केटिंगपुढे ?
बघितला आयपीटीव्हीवर. हटके
बघितला आयपीटीव्हीवर. हटके आहे नक्कीच. ब्लॅक कॉमेडी प्रकारातला. निवेदनाची शैली थोडी बोअर झाली होती नंतर पण अॅक्चुली डायलॉग आहेत मधे मधे त बरंय. काही काही डायलॉग्सला खरंच मनापासून हसले. स्पेशली "यालाच मित्र गोळा होणे म्हणत असावे" ला....
उघडउघडपणे असे विषय हाताळणे म्हणजे बाँबच पाडण्यासारखे आहे पण कॉमेडीच्या नावाखाली चालून गेलंय.
बघितला आयपीटीव्हीवर. हटके
डबल पोस्ट
फार छान आहे चित्रपट उलट लहान
फार छान आहे चित्रपट उलट लहान मुलांनाही दाखवावा असा(लगेच काय ते प्रेम प्रकरण करत नाहीत हल्लीची मुलं फार हुशार आहेत त्यांना गर्ल-- फ्रेंड आणि गर्लफ्रेंड मधला फरकही कळतो) तसही लहान मुलांची पाटी कोरीच असते जाती धर्माबद्दल.लहान मुलांच्या नजरेतून एवढा गंभीर विषय विनोदी पद्धतीने मांडण्याची किमया परत एकदा परेश मोकाशी यांनी केली आहे एकादशी मधे पहिल्यांदा तो फॉर्म्युला वापरला होता आणि हिटही झाला होता फक्त एकादशी च प्रोमोशन जास्त झालं होतं कदाचित नावाच्या वादामूळे . या चित्रपटाचं प्रोमोशन जरी कमी झालं तरी या धाग्यामुळे आणी माऊथ पब्लिसिटी मुले चित्रपट चालेल,चालायला हवा किंवा निदान ott वर तरी पहायाला हवा .
चित्रपटातले अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे आहेत. आणि कॉमेंट्री सारखं जे पूर्ण चित्रपटाचं विवेचन केलंय ये फार वेगवान बनवते चित्रपटाला.बहुतेक तो आवाज मोकाशी यांचाच आहे.
शेवट मला अर्धवट वाटला कदाचित आत्मप्लाप्लेट नंतर आत्मप्लॅनेट येण्याची शक्यता आहे.
स्पॉइलर--
स्पोईलर यासाठी की लोकांनी त्यासाठी चित्रपट बघावा .चित्रपटात बरीच हसण्यासारखे संवाद आणि सिच्युएशनस आहेत.त्यातली बाटलीला लाथ आणि दारातून आत यावर हसू येत. आणि शेवटाला 10 मिनिटात तर पब्लिक खूप हसते का ते चित्रपटात पहा.
काल एकाकडून समजले कि
काल एकाकडून समजले कि जाणिवपूर्वक मोकाशींनी सुरूवातीला कमी थिएटर्स मधे रिलीज केला सिनेमा. त्यावर मान्यवरांच्या दहा प्रेक्षक, पाच प्रेक्षक, शोज रद्द अशा बातम्या येऊ दिल्या. त्यावर समाजमाध्यमात झालेल्या चर्चेमुळे आपोआप माऊथ पब्लिसिटी झाली आणि आता शोज वाढले आहेत, सिनेमा पण लोकांपर्यंत पोहोचतो आहे.
रिस्क घेतली पण यशस्वी झाली. गेल्या आठवड्यात मार्केटिंगवर १५ करोड खर्च झालेल्या एका सिनेमाने मान टाकली. हिंदीचं बजेट पण एव्हढंच असतं मार्केटिंगचं.
मोकाशींनी जर खरेच असे केले असेल तर या कॅल्क्युलेटेड रिस्कला आणि अभिनव मार्केटिंगला दाद द्याविशी वाटते. त्यांनी कन्फर्म करावं. अर्थात अशी युक्ती दुसर्यांदा चालत नाही.
<< दहा प्रेक्षक, पाच प्रेक्षक
<< दहा प्रेक्षक, पाच प्रेक्षक, शोज रद्द अशा बातम्या येऊ दिल्या. >>
इथे कौतुकाचे इतके झरे वाहात आहेत, म्हणून काही बोललो न्हवतो. मी सिनेमा बघितला आहे. डार्क कॉमेडी आहे. थिएटरऐवजी OTT वर बघा, इतकेच मत मांडीन.
‘ती काय दिसते! काय चालते!
‘ती काय दिसते! काय चालते! तिच्यासारखा डबा तर कुणीच खात नसेल!’
‘ती काय दिसते! काय चालते!
‘ती काय दिसते! काय चालते! तिच्यासारखा डबा तर कुणीच खात नसेल!’ >>> आणि हे एक आणखी
"...आणि तिचा वस्तू पाडायचा वेगही फार कमी आहे"
ते "भावांनो" सुद्धा धमाल आहे. शाळांमधल्या पोरांनी पाहिला तर कॅच ऑन व्हायला हवे.
बघितला (झी-५). मजेदार आहे. शेवटी मला जरा भरकटल्यासारखा वाटला पण ओव्हरॉल आवडला.
बघितला (झी-५).
बघितला (झी-५).
>>>>
ओह.. आला हा.. घरच्यांना दाखवायला हवा. बायकोला झेपतो का बघायला हवा..
मी ही आजच बघितला झी५ वर
मी ही आजच बघितला झी५ वर
मस्त आहे. मला आवडला सिनेमा
आला का झी 5 वर? बघायला पाहिजे
आला का झी 5 वर? बघायला पाहिजे.
Pages