कॕनडीयन पंतप्रधान यांनी त्यांच्या देशात घडलेल्या नागरिकाच्या हत्येसाठी भारताला दोषी ठरवल्या दिवसापासुन ज्या घडामोडी घडत आहेत, मला १९८५-८६ वाचनात आलेली कादंबरी रोज आठवते आहे.
कादंबरी चे नाव इन हाय प्लेसेस जी कॕनडा सरकार, त्यांच्या मध्यवर्ती निवडणुका व त्यातला बहुचर्चीत मुद्दा भोवती घोटाळते.
या कादंबरी ने एके काळी विक्रीचे रेकाॕर्ड मोडले आहे.
या कादंबरी ची कथा, बहुचर्चीत मुद्दा असतो की एक अर्धवट वयाचा, जहाजावर जन्माला आलेला मुलगा कॕनडा च्या किनाऱ्यावर उतरतो , पण ते जहाज निघुन जाते आणि तो कॕनडातच रहातो ; या भोवती घोटाळते. त्याला नागरिकत्व द्यावे असे एक राष्ट्रीय पार्टी म्हणत असते तर दुसरी त्याला नागरिकत्व देऊ नये म्हणत असते.
ही कादंबरी वाचताना मनात येई की या देशातले नागरिक आणि राजकीय पक्ष किती सजग आहेत जे एका परदेशी व्यक्ती ला नागरिकत्व द्यावे किंवा नाही याबाबतीत मध्यवर्ती निवडणुका मधे मुद्दा चर्चा करताना दिसत आहेत. याउलट भारतात अनेक बंगलादेशी नागरिक रहातात. स्लिपर सेल चालवतात, एखाद्या राज्यात निवडणुका या परदेशी नागरिकांचे सहायाने एखादा पक्ष जिंकतो ( आसाम ) आणि आसाम गणसंग्राम परिषद या विरूद्ध लढा देते पण तेव्हा स्थिती हाताबाहेर गेलेली असते.
आज असे लाखो लोक बेकायदेशीर पध्दतीने कॕनडात घुसले आहेत. हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न नाही तर ते भारताच्या विरोधी कारवाया करत आहेत. हे होत असताना तिथले नागरिक आणि सरकार चुप का राहिले ?
आज कोणीतरी भारतात तुरूंगात असलेला एक गुंड कॕनडातल्या गुन्हेगाराचा गेम करतो आणि त्याची जबाबदारी घेतो.
कॕनडाच्या नागरिकांच्या आणि राजकीय पक्षांच्या सजगतेचा, देशप्रेमाचा भावनेचा झालेला अंत आपण पाहतोय का ?
दुसऱ्या बाजुला एक सजग सरकार हजारो मैलावर असलेल्या भारत विरोधी कारवायांचा खातमा करण्यासाठी आपली राष्ट्रीय सुरक्षितता जपण्यासाठी, एका गुंडाचा वापर करत आहे का ?
एखादी कादंबरी त्या देशाची राजकीय परिस्थिती , संस्कृती आणि विचारधारा यांचे सम्यक चित्रण करते. असे असताना ती वंश व संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्नशील असणारी विचारधारा अशी दुषीत का बर झाली असेल ?
दुसऱ्या बाजुला आधीच्या खलिस्तान चळवळीने पोळल्याचा अनुभव घेऊन ही विषवल्ली परदेशातच कोणत्याही मार्गाने संपवायची राजनिती भारताने स्विकारली आहे.
भारतीय सैनिकाचे शिर कापुन नेल्यानंतर पाकिस्तान ला फक्त निषेधाचा खलिता पाठवणारा देश आज आंतरराष्ट्रीय राजकारणात एका प्रगत देशावर कुरघोडी करत आहे.
ही कादंबरी लिहली त्यावेळचा कॕनडा आणि भारत आज एका दुसऱ्या टोकाला पोहोचले आहेत.
चांगली असेल कादंबरी.वाचते
चांगली असेल कादंबरी.वाचते.हॅली ची हॉटेल वाचलीय ती खूप आवडायची. त्यात कृष्णवर्णीय लोकांना हॉटेल प्रवेश लढा वाला मुद्दा चांगला मांडला आहे.
बाकी सध्याचं कॅनडा राजकारण बघून चिंता वाटतेय इकॉनॉमी ची.
कॅनडा
कॅनडा
बाकी सध्याचं कॅनडा राजकारण
बाकी सध्याचं कॅनडा राजकारण बघून चिंता वाटतेय इकॉनॉमी ची.>> कुणाच्या इकॉनॉमीची?
'इन हाय प्लेसेस' वाचली होती
'इन हाय प्लेसेस' वाचली होती कधी काळी. पण आठवत नव्हती. या इंट्रोमुळे आठवली.
आपल्या इकॉनॉमी ची.कॅनडा मध्ये
आपल्या इकॉनॉमी ची.कॅनडा मध्ये कोग्निझंट प्रोसेशिया आणि अनेक आयटी कंपनीज ची ऑफिसेस आहेत.संबंध ताणले गेले तर आपल्यावर परिणाम होणार.
सर्वाना धन्यवाद
सर्वाना धन्यवाद
<भारतीय सैनिकाचे शिर कापुन
<भारतीय सैनिकाचे शिर कापुन नेल्यानंतर पाकिस्तान ला फक्त निषेधाचा खलिता पाठवणारा देश >
पाकिस्तानच्या अशा कृत्याचा त्या त्या वेळी तसाच जवाब त्यांना दिला गेला आहे. फक्त आधी त्याचा गाजावाजा केला जात नसे.
Outgoing Army Chief General Bikram Singh on Thursday said that India has given a befitting reply to Pakistan after the beheading of an Indian soldier by Pakistani troops in 2013 along the Line of Control (LoC)
"It has been done. Please understand that when we use force, that use is from tactical to operational to strategic levels.
"When I mention that during that incident, it was aimed at operations at the tactical level, which have been undertaken. I think this has been done by the local commander, the chiefs have nothing to do with it," General Singh said.
याचा अर्थ तिथला स्थानिक लष्करी अधिकारी असे निर्णय घेऊन , बेत आखून , त्याची अंमलबजावणी करीत असे. त्यासाठी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयातूनच काय, लष्करी मुख्यालयातूनही आदेश द्यायची गरज नसे.
https://www.indiatoday.in/india/north/story/general-bikram-singh-pak-beh...
<< लष्करी मुख्यालयातूनही आदेश
<< सध्याचं कॅनडा राजकारण बघून चिंता वाटतेय इकॉनॉमी ची. >>
सिमला मे बर्फ गिरेगी तो ये आत्महत्या करेगा, हे आठवले.
☺️ शिमलामे बर्फ गिरूगी...तो
☺️ शिमलामे बर्फ गिरेगी...तो जरूर
सीन धमाल आहे
सीन धमाल आहे.
@भरत,
@भरत,
तो खलिताच असायचा.
फरक दिसतोय ना ? मांजर डोळे मिटुन दुध पिते तसे खुशाल रहा.
फौजेतही खुषमस्करे असतील. एखादा लेख लिहून किंवा आत्मचरित्रात दोन पाने लिहून काय होणार.
सीमेवर शहिद झालेले जवान आणि शहरात झालेल्या बॉब स्फोटात मृत्युमुखी पडलेले असल्या फुसक्या धोरणांना व बोटचेप्या राजकारणी मंडळींना माफ करणार नाहीत.
@भरत,
@भरत,
तो खलिताच असायचा.
फरक दिसतोय ना ? मांजर डोळे मिटुन दुध पिते तसे खुशाल रहा.
फौजेतही खुषमस्करे असतील. एखादा लेख लिहून किंवा आत्मचरित्रात दोन पाने लिहून काय होणार.
सीमेवर शहिद झालेले जवान आणि शहरात झालेल्या बॉब स्फोटात मृत्युमुखी पडलेले असल्या फुसक्या धोरणांना व बोटचेप्या राजकारणी मंडळींना माफ करणार नाहीत.
अरे वा! तुम्ही माजी लष्कर
अरे वा! तुम्ही माजी लष्कर प्रमुखांवर अविश्वास दाखवताय! छान ! छान !
जनरल बिक्रम सिंग यांनी निवृत्त होताना पत्रकारांशी बोलताना ते सांगितलं.
पुलवामा मध्ये शाहिद झालेलया
पुलवामा मध्ये शाहिद झालेलया जवानांनी कोणाला माफ करायला नको तर???
गलवान - न कोई आया था .....
गलवान - न कोई आया था .....
गलवान - न कोई आया था .....
गलवान - न कोई आया था .....
तुम्ही कादंबरीत काळ १९८५-८६
तुम्ही कादंबरीत काळ १९८५-८६ बद्दल बोलत असाल तर तेव्हा ऑलरेडी कॅनडामध्ये खलिस्तानी टेरेरिस्ट सेटल झालेले होते. कनिष्क विमान हायजॅक करून त्यातल्या शेकडो प्रवाश्यांचे खून खलिस्तानीजनी १९८५ मध्ये केले.सो कॅनडा तेव्हा आणि आत्ता यात तसा काही फरक नाही. १९६८ ते १९८४ या काळात तिथे आताच्या जस्टोन त्रुडोचे वडील पंतप्रधान होते.सो प्रो-खलिस्तान राजकारण तेव्हापासूनच आहे.
भरत जी
भरत जी
अरे वा! तुम्ही माजी लष्कर प्रमुखांवर अविश्वास दाखवताय! छान ! छान !
जनरल बिक्रम सिंग यांनी निवृत्त होताना पत्रकारांशी बोलताना ते सांगितलं.
एकट्या बिक्रम सिंगांनी घडवल ? याला दुजोरा का नाही मिळाला ?
देशात वातावरण असहिष्णु आहे असे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पण म्हणाले . म्हणुन ते बरोबरच आहे असे मानुन चालायला देशातले लोक मुर्ख नाहीत. मृदुंग मुख लेपनं करिती मधुर ध्वनी स्वार्थ असेल की असे बोलले जाते.
<याला दुजोरा का नाही मिळाला ?
<याला दुजोरा का नाही मिळाला ?>
वा! पुन्हा एकदा लष्कर प्रमुखावर अविश्वास. हे तुमच्याच विचारधारेनुसार देशद्रोही कृत्य नाही का?
त्यांचं ते विधान मे २०१४ नंतरचं आहे. ते खोटं बोलले असतील तर सरकारने सांगितलं असतं ना? मी बातमीची लिंक दिली आहे. किमान ती उघडून वाचायचे कष्ट तरी घ्यायचे होते.
<देशात वातावरण असहिष्णु आहे असे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पण म्हणाले . म्हणुन ते बरोबरच आहे असे मानुन चालायला देशातले लोक मुर्ख नाहीत. > हातच्या कंकणाला आरसा कशाला? देशातलं वा तावरण असहिष्णुच आहे. तुम्हाला सोयीचं नाही, म्हणून तुम्ही साक्षात लष्कर प्रमुखाला खोटं ठरवताय. हा त्याचा पुरावा.