कुठला चित्रपट बघताना कधी रडलायत का?

Submitted by छन्दिफन्दि on 16 September, 2023 - 21:13

कॉमेडी, हॉरर, ऍक्शन किंवा मसाला चित्रपटांबद्दल बऱ्याचदा लिहिलं, बोललं जात, चर्चा रंगतात.
या वेळी इमोशनल / भावनावश चित्रपटाची चर्चा करूया.
मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कुठला चित्रपट बघताना कधी रडलायत का?
कुठल्या दृश्याला?
रडणे म्हणजे ओक्सा बोक्शी किंवा डोळे पुसायला रुमाल / tissues लागेल असेच नाही, डोळे भरून येणे किंवा मन हेलावणे हेही चालेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

radhanisha, ती लिंक पाहिली नाही, पण तुम्ही म्हणता ते the ugly duckling गाणं असावं. बरंच जुनं गाणं आहे ते आणि होते कुरूप वेडे हे त्यावरूनच लिहिलं गेलं आहे.

"आम्ही असू लाडके" या चित्रपटाच्या शेवटच्या गाण्याच्यावेळी फार रडू आले होते. पुर्ण चित्रपट गतिमंद मुलांवर आहे. खरोखरची गतिमंद मुले या सिनेमात घेतली आहेत. सुबोध भावे व गिरीश ओक यांचा सुंदर अभिनय ....

त्यात गिरीश ओक आपल्या गतिमंद मुलाचा राग राग करत असतो. पण शेवटी त्याला आपला मुलगा जगण्यासाठी व नॉर्मल रहाण्यासाठी जी धडपड करतोय त्याची जाणीव होते. मग शेवटी गतिमंद मुलांनी सादर केलेले सुंदर गाणे आहे. मध्येच एक मुलगा ओळ विसरतो आणि प्रेक्षकातून पश्चाताप झालेला गिरीश ओक गाणे म्हणत येतो. सर्वांच्या अभिनयामुळे व त्या सिनच्या सादरीकरणामुळे अक्षरशः खूप रडलो. आता ही प्रतिक्रिया लिहीतानाही डोळ्यात पाणी आले.

https://www.youtube.com/watch?v=6WGjW0byt-o
वर प्रतिसादात वर्णन केलेले हेच ते गाणे. पण नुसते गाणे पाहुन नाही तर चित्रपट पाहील्यावर या गाण्यावर हमखास रडू येईल.

असाच १ दिलीप प्रभावळकरांचा देखिल चित्रपट होता..त्यात मी असा कसा असा कसा वेगळा? हे गाणे होते. सुलभा देशपांडे त्यांची आई झालेल्या. डोळे पाणावतात त्यांचा अभिनय पाहून.

चौकट राजा
गाण्यातच नाव आहे.
इतका सुप्रसिद्ध चित्रपट
एक झोका गाणे आजही ऐकतो ..

चौकट राजा मध्ये सुलभा देशपांडे मरतात तेव्हा दि प्र चा अभिनय बघून कैक दिवस रडले आहे मी.

नुकतेच नाळ 2 आणि झिम्मा 2 बघताना दोनेक प्रसंगात डोळ्यात पाणी आले.
तेच रेल्वे मेन या भोपाळ दुर्घटना वर मालिका बघताना नाही आले.. कदाचित मन त्यासाठी आधीच तयार असावे. म्हणून ..

बरेच मूवी, बघताना रडते. डोळ्याचे नळ एकदम विक आहेत, लगेच पाणी येत. मूवी कशाला क्रिकेट ची मॅच बघताना पण रडले होते,वर्ल्ड कप मॅच भारत श्रीलंका, जेव्हा स्टेडियम मध्ये प्रेक्षकानी प्लास्टिक बाटल्या , etc फेकल्या होत्या ती मॅच

<<हाथी मेरे साथी. त्या हत्तीला मरताना पाहून रडु येते.<<
अगदी,,
तसेच जॅकी दा चा ' तेरी मेहरबानीया'

Pages