शब्द

Submitted by नितीनचंद्र on 26 September, 2023 - 21:15

शाब्दिक चुका शोधणे , त्या चारचौघात बोलुन दाखवणे याने फारसे काही साध्य होत नाही. सार्वजनिक किंवा व्यावसायिक जीवनात माणसे जोडणे महत्वाचे असे मला वाटते. जेव्हा एखाद्या व्यावसायिक माणसाला शब्द रहित संवाद अर्थात देहबोली चे महत्व माणसांच्या वर अवलंबून असलेल्या व्यवहारात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे याची जाणीव होते, तो दैनंदिन व्यवहारात असे शब्दच्छल करत बसत नाही. अशी व्यक्ती आशय लक्षात घेते आणि काम साधुन मोकळी होते.

काही जणांना मात्र चुकीच्या पध्दतीने लिहलेले किंवा बोललेले शब्द ऐकताच खटकते यात त्यांचा दोष नाही.

भाषा कौशल्य हे मल्टीपल इंटेलिजन्स थेअरी मधे आठ पैकी एक कौशल्य आहे जरूर पण त्या सोबत छिद्रान्वेशी हा स्वभाव दोष असेल तर व्यवहारात मोठा तोटा संभवतो.

बजाज आॕटो मधे नोकरीला लागल्यानंतर माझ्या सोबत काम करणाऱ्या एका इंजिनियर ने अर्धा दिवस रजेचा फाॕर्म भरताना रजेचे कारण Not filling well असे लिहले. हा अर्ज एका बीए इंग्रजी स्पेशल झालेल्या क्लार्क च्या हाती पडला. " याचा दिवस नीट भरला जात नव्हता" असे भाषांतर करून दहावी एस एस सी वुईथ लोअर इंग्रजी आणि पुढे तीन वर्षे डिप्लोमा इंजिनियरींग शिकुन नोकरी ला लागलेल्या इंजिनीयर ची हेटाळणी सतत करत असे.

पुढे हाच इंजिनियर जेंव्हा मॕनेजर झाला, त्याने अनेक वर्षे या क्लार्क ला कमीतकमी पगारवाढ देऊन त्याच्या भाषा कौशल्याचा गौरव आपल्या अधिकारात यशस्वी रित्या केला. ही बाब शब्दप्रेमी लोकांनी धडा म्हणुन नोंद करावी.

मी बांठिया प्रार्थमीक जैन विद्या मंदीर चिंचवड मधे १९६९ साली इयत्ता पहिलीत असताना, "विचारल्या बिगर बाहेर जायच नाही " असे वर्गशिक्षीका म्हणाल्या आणि माझ्या आईने ते ऐकले . ती अशीच व्यथित झाली होती.

एखादा बिगारी " विचारल्या बिगर " म्हणला तर ठीक होते पण मॕट्रीक ( जुनी ) शिकलेल्या शिक्षीकेला जर शुध्द बोलता येत नसेल तर विद्यार्थी पुढे काय शिकणार ? असा प्रश्न ती पुढे अनेक वर्षे करत असे.

पण या शाळेशिवाय चिंचवड ला पर्याय त्या काळी नव्हता. माझ्याही शब्द उच्चारणातील चुका ती पुढे अनेक वर्षे शोधुन दुरूस्त करायचा प्रयत्न करत असे. मी आज आजोबा झाल्यानंतर आज सुध्दा तिचा हा प्रयत्न कायम आहे. पण आईने नोकरी किंवा व्यवसाय केला नाही. अशा चुका दाखवल्याने माणसे नाराज होतात हे तिच्या गावी नसायचे. माझे वडिल मात्र याबाबतीत समाजात वागताना माणसे जोडायचा गुरू मंत्र कायम देत.

शाळेतल्या त्या शिक्षीका रिटायर्ड झाल्यानंतर त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी माझ्या आईला भेटल्यानंतर माझे नाव नितीन नाव लक्षात ठेऊन माझी चौकशी करत ही बाब लक्षात ठेऊन पुढे शुध्द भाषा, त्या शिक्षीका आणि बिगारी ते मॕट्रीक चा प्रयोग हळु हळु बंद पडला.

भाषेचा अभिमान जरूर असावा पण प्रमाण भाषेचा आग्रह , त्यावर दुसऱ्या ला हिणवणे, कमी लेखणे ही बाब समाजात जगताना मात्र कधीतरी कर्माचे फळ देऊन जाते ही बाब आधोरेखीत करावी वाटते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

उत्तम विचार. आई शिक्षिका असल्याने, शुद्धलेख आणि शुद्ध (= प्रमाण) भाषा यांचे संस्कार फार कडकपणे बिंबवले गेलेले आहेत.

खरं आहे, बरेचदा आपल्याला खटकलं की आपण पटकन चूक दाखवून देतो. ते कमी केलं पाहिजे. पण मी माझ्या सर्व मदतनीस(कामवाल्या) बायकांना शुद्ध भाषा सकारात्मक पणे शिकवायचा प्रयत्न करते.

विचार आवडला. भरत यांना अनुमोदन.

चुका काढल्याने लोक दुखावले जातात हे खरं आहे. मग चुका समजून न घेणाऱ्या लोकांना दोष द्यावा की चुका काढणाऱ्या व्यक्तीला? मला वाटतं, ज्यांना अचूकतेपेक्षा लोक महत्त्वाचे वाटतात, त्यांनी लोकांना दुखवू नये. ज्यांना अचूकता महत्त्वाची वाटते, त्यांनी लोकांना काय वाटेल याची फिकीर करू नये, भले कमी पगार मिळाला तरी चालेल.

>>विचार आवडला. भरत यांना अनुमोदन.>> +१
चूक दाखवून देण्यात काहीच गैर नाही पण त्या मागचा हेतूही तितकाच महत्वाचा. चूक दाखवायचीही योग्य पद्धत असते. काम योग्य प्रकारे होण्यासाठी चूक दाखवणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या चांगल्यासाठी चूक दाखवून ती सुधारण्याची संधी देणे वेगळे आणि त्या वरुन मुद्दाम हेटाळणी करत रहाणे वेगळे.
भाषेच्या बाबतीत, एकीकडे दुसर्‍याला प्रमाणित मराठी भाषेत बोलत नाही म्हणून हसायचे आणि स्वतः मात्र मराठी भाषेत बोलताना त्यात गरज नसताना दहा इंग्रजी शब्द घुसडायचे असेही चालते. शाळेत अशुद्ध उच्चारांवरुन ओरडणे/टिंगल करणे यासारखे प्रकार शिक्षकांकडून होतात तेव्हा विद्यार्थी अजूनच बावरुन जातो. विषयाचे आकलन आणि प्रमाणित भाषेत संवाद या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रमाणित भाषा नीट बोलता यावी म्हणून प्रयत्न जरुर करावेत पण ते सकारात्मक पद्धतीने होणे गरजेचे.

लेखातला विचार आवडला.

भाषा शुद्ध अशुद्ध नसते.
प्रमाण भाषा हे भाषेचे एक रूप झाले....... +१.

चांगल्यासाठी चूक दाखवून ती सुधारण्याची संधी देणे वेगळे आणि त्या वरुन मुद्दाम हेटाळणी करत रहाणे वेगळे......खरंय!

नितीनचंद्र,तुमच्या आईचे व्यथित होणे अकारण नव्हते.माझी एक नातलग शिक्षिका होती.बेळगावातून आली होती.त्यामुळे मुलींना,ते कुठे गेलं किंवा झोंड वगैरे बोलायची.त्यामुळे मुख्याध्यापक जरा वैतागले होते.याउलट माझे आईवडील आपापसात कोकणी बोलायचे.आईही शिक्षिका होती.पण कोकणीतील हेल किंवा शब्दोच्चार, प्रमाण मराठी बोलताना आला नाही.यात फार विशेष नाही.