Aatmapamphlet - मराठी चित्रपट मार्केंटींगमध्ये कमी पडतात का? आणि का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 October, 2023 - 11:52

मराठी चित्रपट मार्केंटींगमध्ये कमी पडतात का? आणि का?

Aatmapamphlet नावाचा मराठी चित्रपट गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. मला आज हे नाव कानावर पडले.

चित्रपटाचे कौतुकच वाचले, त्यामुळे ट्रेलर बघितला. पुन्हा एकदा लहान मुलांची लव्हस्टोरी. विषयात नावीन्य नाही. पण सादरीकरणात असावे. तसेच लव्हस्टोरीपलीकडे काहीतरी असावे असे वाटते. एखादा डार्क ह्युमर वगैरे. कारण जातीभेद देखील दाखवला आहे त्यात. चित्रपट लोकांपर्यंत वेळीच पोहोचला असता तर नक्कीच चर्चा झाली असती असे मटेरीअल एकंदरीत वाटले.
IMDb अगदी ९/१० दाखवले आहे, टाईम्स ऑफ ईंडिया ४/५ स्टार दाखवत आहे.
ट्रेलर ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=oSEWI7V5CRQ

हा सुद्ध परेश मोकाशी चित्रपट आहे. या आधी वाळवी पाहिला होता. चांगला चित्रपट आहे हे कानावर पडताच कोण सोबत आहे हे न बघता एकटाच रात्रीचा शो बघून आलेलो. आवडलेला. त्यावर धागाही काढलेला. जेणेकरून जास्तीत जास्त लोकं बघतील.

पण या वरच्या Aatmapamphlet चित्रपटाबद्दल गूगल करताना अजून काही बातम्या नजरेस पडल्या त्या अश्या की काही ठिकाणी पब्लिक नसल्याने याचे शो रद्द करावे लागले. कधी मराठी चित्रपटांना जास्त शो नाही म्हणून ओरडा असतो, तर ईथे आहे तोच शो चार माणसे बघून रद्द होत आहे.

काय आहे हे? यांना मार्केटींग करता येत नाही का? की मार्केटींगचे महत्व समजत नाही का? की बजेट प्रॉब्लेम असतो? पण व्यवसाय म्हटले की त्यावर तोडगा काढावाच लागणार ना? सोशल मिडिया मध्ये जरी प्रभावी मार्केटींग केली तरी जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पिक्चर पोहोचवता नाही येऊ शकत का? आपण मायबोलीवर मराठी चित्रपट कसा वाटला धागा काढतो. मी स्वतः मायबोलीवर कित्येक मराठी चित्रपटांबद्दल स्वतंत्र धागे काढले आहेत, जे हिंदीबाबत केले नाही. ही जी एक मातृभाषेतील कलाकृतींबद्दल आत्मियता असते ती आपल्या सर्वातच कमी जास्त प्रमाणात असते. याचा फायदा घेऊन मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे ईतके कठीण आहे का? कारण आपल्याला कितीही वाटले की मराठी चित्रपटांना प्रोत्साहन द्यावे तरी आपणही चार लोकांना तेव्हाच सांगणार जेव्हा तो आपल्यापर्यंत पोहोचणार. जो ट्रेलर बनवला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचायला हवा ना, की आपणच जाऊन शोधायचा. नक्कीच काहीतरी चुकतेय.. चर्चा अपेक्षित.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट न पाहताच कसा आहे ते सांगता येत नाही. पण मराठी चित्रपटासाठी धागा काढल्याबद्दल मनापासून कौतुक !
पहिल्यांदाच वात न आणणारा धागा वाटला. यातले मनोगत मनस्वी वाटत आहे.

धन्यवाद आचार्य
आता रिक्षा नाही फिरवत पण मराठी चित्रपटांचे मी बरेच धागे काढलेत, माऊथ पब्लिसिटी करतो, चांगला आहे हे समजते तेव्हा आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघतो. आणि असे करणारे बरेच जण पाहण्यात सुद्धा आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटाबाबत उदासीन आहे असे नक्कीच नाही. चांगले मराठी सिनेमे तो थिएटरमध्ये बघायला जातोच. पण ते त्यापर्यंत वेळीच पोहोचायला तर हवेत. एखादा चित्रपट चांगला आहे असे कानावर आल्यास दहा पैकी नऊ जण हा कोणता असे विचारत असतील तर नक्कीच काहीतरी चुकतेय.. याउलट दुनियादारी चित्रपटाला मी अमराठी लोकही पाहिलेली. याचा अर्थ त्याचे मार्केटींग नक्कीच चांगले केले असणार..

असा चित्रपट आहे हे आज कळले... वाळवी चे देखील नीट प्रोमोशन नव्हते.. स्वप्नील ची स्टार पॉवर थोडे ऑडियन्स घेऊन आली तेव्हडेच...

मराठी चित्रपट पण जर यशस्वी बॅनर चे (झी मुव्हीज वगैरे)असले तर त्यांना हा प्रश्न येत नाही.चला हवा येऊ येऊ द्या आणि इतर कॉमेडी शो मधून जाहिरात केली जाते.
शेवटी सर्व गणितं पैश्याची असावीत.मराठी ला प्रेक्षक कमी म्हणून दिवसात दुपारी 3 वगैरे ऑड वेळेचे शो.आणि अश्या वेळेचे शो म्हणून गैरसोय असल्याने प्रेक्षक कमी.थिएटर मधून न दाखवता थेट ओटीटी ला विकले तर पाहिले जातील.आपण स्पॅनिश जर्मन मल्याळी मुव्ही थिएटर ला पाहिले नसते.पण ओटीटी मुळे पाहिले जातात.
नेटफ्लिक्स वर मराठी कंटेंट खूप जास्त नाही.रिजनल म्हटलं की बदाबदा के ड्रामा आणि स्पॅनिश कंटेंट कोसळतो.
जितके वेगळे, क्रिटिक ने नावाजलेले मराठी पिक्चर्स नेटफ्लिक्स प्राईम वर येतील तितका दर्शक वाढत जाईल.

Aatmapamphlet
काय अर्थ या नावाचा?

असा चित्रपट आहे हेच माहित नव्हते. जालावर शोधले तर निर्माते म्हणून T-Series, Colour Yellow Productions आणि Zee Studios ही नावे आहेत. यातल्या दोन पार्टीजचे मार्केटिंग डिपार्टमेंट असणार ना? मग असे का व्हावे?

एक चांगला सिनेमा आला आहे आणि त्याला शोज नाहीत असे वातावरण निर्माण करणे ही नवीन स्ट्रॅटर्जी असेल कदाचित. सरांचं अजून एक घर होईल मुंबईत.

का कुणास ठाऊक, ते पॅम्पलेट पाहून मी एकदम आत्मऑम्लेट असे वाचले. पॅम्पलेट, ट्रेलर वगैरे पाहून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण व्हायला हवी अशी माझी भाबडी अपेक्षा आहे. म्हणजे दिग्दर्शक, लेखक यांची प्रतिभा अफाट, अभिजात वगैरे असेल पण चित्रपट आम्हां पामरांसाठी निर्माण केलाय ना?

परेश मोकाशींच्या 'एलिझाबेथ एकादशी'ने असेच दचकायला झाले होते. पण आपसूक ही गोष्ट २ मुलांची व सायकलची आहे हे कानावर पडत गेले. त्यामुळे इंटरेस्ट निर्माण झाला. या वेळी निखिल वागळे यांचे एक ट्विट वगळता असे काही आहे हे ही माहिती नव्हते.

व त्यात हे असे काहीतरी पाहून आजोबांच्या ट्रंकमध्ये असलेल्या एखाद्या जुनाट पुस्तकाचे कव्हर किंवा आपल्याला न समजणारा अगम्य प्रकार आहे अशी भावना निर्माण होते. मग कोण वाट्याला जाईल?

आत्मप्लँचेट असेल.
स्वतःचाच आत्मा प्लँचेटवर बोलवण्याचा प्रकार असे काही तरी.

ते पॅम्पलेट पाहून मी एकदम आत्मऑम्लेट असे वाचले.

>>>
माझे पण आत्मआम्लेट, आत्मपापलेट असं काहीतरी कन्फ्युजन झालं Lol

र आ Lol

चित्रपट नक्कीच बघेन.
पण वरचा रिव्हू वाचून काहीच समजलं नाही. गोंधळात टाकणारं लिहिलंय.

Aatmapamphlet
काय अर्थ या नावाचा?
>>>>

असे किचकट नाव ठेवणे हे देखील मला मार्केटिंगचे दृष्टीने गांडलेले वाटते...सुटसुटीतपणा नको ना नाव.. कोणाला कसे सांगायचे..

रिव्ह्यू बहुधा भरत यांनी दिलेल्या लिंक मध्ये असावा..
माझ्याकडे काही कारणाने ते लिंक ओपन होत नाहीये.
सिनेमा गल्ली ग्रुपची असेल तर मला तिथेच समजले होते.

या विषयावर मायबोलीवर चर्चा झालेली आहे. अन्य ठिकाणीही झालेल्या आहेत चर्चा.
मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची, निर्मात्यांची मतंही छापून आलेली आहेत. असे असताना मोकाशी असे कसे अडाणी राहिले असतील ?

आचार्य,
अन्य ठिकाणच्या चर्चेची रिक्षा फिरवली तसे मायबोलीवरील चर्चेची लिंक दिली तर तिथे वाचता लिहीता येईल..

तुम्ही स्वतः कोट केलेल्या वाक्यांची लिंक द्यायचे कष्ट घेत नाहीत सर. आम्हाला पण कामं आहेत कि नाहीत ?
शोधा. मलाही तेच करावे लागेल.

किमान मला सापडलेली लिंक डकवली आहे. तुम्ही आजवर पाडलेल्या "अभ्यासपूर्ण" धाग्यात सुद्धा लिंका नसतात, लोकांनी प्रतिसादात एखादे वाक्य लिहीले तर लिंकांची मागणी करता हे अद्भुत आणि वंदनीय आहे.

ओके

बूक माय शो चेक केले.
सध्या असलेल्या चित्रपटात ८.८ अशी सर्वाधिक रेटिंग आहे. रिव्ह्यू छान आहेत. पण नवी मुंबईत तीन थिएटर मिळून ५ शो आहेत.
मला ते जमण्यासारखे नाहीत अन्यथा विचार केला असता बघायचा..
बघूया पुढच्या आठवड्यात राहतो का किंवा आणखी कोणी ओळखीचे बघून कसा आहे ते सांगते का?

मार्केटिंग अभावी मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अवघड
https://www.lokmat.com/filmy/it-difficult-reach-marathi-film-audiences-w...

मराठी चित्रपटांच्या मार्केटिंगचे मार्केटिंग व्हावे.
https://www.lokmat.com/filmy/marketing-marathi-films-can-be-marketed/

गुगल सर्च
https://www.google.com/search?q=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%...

खूप छान आहे चित्रपट. 1st डे बघणार होतो, पण बाहेरगावी असल्याने 3rd डेला बघावा लागला.

ट्रेलर वरून अंदाज लावू नका, डार्क आणि ब्राईट(?) च्या मधली कुठलीतरी कॉमेडी आहे. अंतर्मुख करायला लावणारी. बहुधा ही कथा डायरेक्टर आशिष बेंडेची ही आत्मपॅमफ्लॅट कथा असावी. नायक मोठा म्हणजे कॉलेजात जाण्याएव्हढा होईस्तोवर छान चालला, पुढेही चांगला आहे पण शेवट जरा गुंडाळल्यासारखा वाटला. एक खात्री, संपूर्ण चित्रपट तुम्ही हसत राहणार आणि खरंय खरंय म्हणत राहणार हे नक्की.

नावाचा उलगडा ट्रेलर मध्येच केला आहे. मोठ्या लोकांचे आत्मचरित्र असते तसे आपल्या बेंड्याचे हे आत्म pamphlet आहे.

Pages