सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑनलाईन रमी नामक जुगार देखील खेळ आहे म्हणून चालतो.. तिथे काय बोलावे.>> सर तुमचाच लाडका त्याची जाहिरात करतो त्याला बोला आधी, बाकीच्यांना नंतर

सरांना सलमान खानकडून पैसे मिळतात शाहरूख च्या नावाने वात आणण्याचे. जब तक है जान, दिलवाले, झिरो,फॅन फ्लॉप झाल्याने सलमानने पैसे वाढवून दिले म्हणून पठाणचा धागा वर्षभर आधी काढला. पण सर तोंडावर आपटले. पठाण सुपर हिट झाला. शाहरूखने मार्केटिंग असे काही केले कि सर उताणे पडले. मग सलमान ची मर्जी संपादन करण्यासाठी जवान चा धागा काढला. पण शाहरूखने दाक्षिणात्य भाषेत रिलीज केला आणि साऊथचे सुपरस्टार्स घेऊन सरांसह चांचौ चे दात घशात घातले.

आता डंकीच्या मागे लागणार आहेत,

माझं म्हणणं खोटं असेल तर सरांनी टायगर ३ वर धागा काढून तो फ्लॉप करून दाखवावा.

सर तुमचाच लाडका त्याची जाहिरात करतो त्याला बोला आधी, बाकीच्यांना नंतर
>>>>

बोललो आहे की
स्वतंत्र धागा काढून निषेध केला आहे.
तिथे तर तुम्ही कित्येकदा लिंक देऊन फिरकत देखील नाही.

>>>

जे जे वाईट आणि हानीकारक आहे ते कायदे आणि सरकार बंद करू शकले असते तर दारूबंदी केव्हाचीच झाली असती..>>>> ज्यांना स्वतः प्यायचीच आहे त्याबाबत सरकारच काय पण देव सुद्धा काही करु शकत नाही....
पण दुसरे एक उदाहरण देतो सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान निषिद्ध केल्याने सार्वजनिक ठिकाणी पॅसिव्ह स्मोकिंग ने होणाऱ्या कॅन्सरच्या एकूण टक्केवारीतील प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.....ज्यांचा काहीही दोष नव्हता त्यांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजारापासून काहीप्रमाणात या कायद्यामुळे आणि त्याच्या कोणत्याही प्रमाणातील अंमलबजावणीने काही प्रमाणात जीवनदाच मिळाले नाही का??

ज्यांना स्वतः प्यायचीच आहे त्याबाबत सरकारच काय पण देव सुद्धा काही करु शकत नाही....
>>

सरकार रोखू शकत नाही. बंधन घालू शकते. ते देखील वैयक्तिक बाबींवर सार्वजनिक जागेत करू नका इतकेच. पण जो उत्सव मुळातच सार्वजनिक स्वरूपात होतो त्याचे काय करणार..
बरे या उत्सवास पाठिंबा जर राजकीय नेत्यांचा असेल तर मुळात राजकीय इच्छाशक्ती हा मुद्दाच बाद झाला.
एकाने इच्छाशक्ती दाखवताच त्याचा विरोधक लगेच फायदा उचलायला बघणार..

मुळ लेखातील शेवटचे वाक्य खालीलप्रमाणे होते

त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

आणि जेवढा ही मी हा धागा वाचला आहे त्यामधे उत्सव साजरा/साजरे करणे बंद करा असे कुणीही म्हणालेले आढळले नाही
@Hemant 333 मग त्यावर तुमची

>>एका वाक्यात .
कायदे आणि सरकार उत्सव बंद करू शकणार नाहीत.
इतकेच आहे.>>

हि प्रतिक्रिया मुळ प्रश्नाला समर्पक आहे का?? प्रामाणिक पणे तुम्हीच सांगा...

उत्सव नाही हो
त्यातील वाढीस लागलेले गैर प्रकार असेच म्हणायचे आहे.

गैरप्रकारांचेही सोडा
एखादा गणपती नवसाला पावतो म्हणून जी भरमसाठ गर्दी आणि चेंगराचिंगरी होते. त्याचे काय करावे..

बरे या उत्सवास पाठिंबा जर राजकीय नेत्यांचा असेल तर मुळात राजकीय इच्छाशक्ती हा मुद्दाच बाद झाला.
एकाने इच्छाशक्ती दाखवताच त्याचा विरोधक लगेच फायदा उचलायला बघणार...>>>
या सर्व प्रकारात विरोधात असणारा तसाही दूरच असतो पण त्याने परिस्थितीत काही फरक पडेल असे दिसत नाही. त्यामुळे अलिप्त रहावे हा मुद्दा निकाली निघतो.

जे आपल्या विरोधातील राजकीय नेत्याला कोंडीत पकडतील असा तुमच कयास आहे ते मंडपा मंडपा मधे जाऊन प्रबोधन करणाऱ्या सामान्य माणसाचे काय करतील असं तुम्हाला वाटतं?? इस रिस्क मे इश्क नही होगा, पक्का..

कायदे बनवण्याचे मार्ग दोनच, जर राजकीय नेते औदासिन्य दाखवत असतील तर या विषयावर इतकी चर्चा व्हायला हवी की न्यायालयाने सेल्फ कॉग्निझन्स घेऊन कायदा करण्यास भाग पाडायला हवे....
एकूणच या ला प्रभावीपणे आळा कायदेशीर मार्गानेच बसू शकतो.

एखादा गणपती नवसाला पावतो म्हणून जी भरमसाठ गर्दी आणि चेंगराचिंगरी होते. त्याचे काय करावे..>>> हे ज्याने त्याने स्वतः च्या रिस्क वर करावे.... गर्दी मधे जाणे टाळता येण्यासारखे असते, अगदीच नाही तर मर्यादित तरी करता येते...आणि गर्दीत जायचेच आहे तर ते लेझिम खेळायला जावे कि गौतमी पाटील चा डांस पहायला हे ज्याचे त्याने ठरवावे....लोकशाही आहे देशात....पण डिजे-डॉल्बी नकोतच.

एखादा गणपती नवसाला पावतो म्हणून जी भरमसाठ गर्दी आणि चेंगराचिंगरी होते. त्याचे काय करावे..>>> हा प्रश्न मला निरुपा रॉय पर कुंभ के मेले मे मेरे बच्चे खो जाते है उसका क्या करु? विचारते आहे असा काहीसा वाटला Lol

ठाकरे ची सेना खरी की शिंदे ची हाच निकाल नाही लागला.
>>>
धाग्याचा विषय सोडून असे फाटे फोडून काय साध्य होणार? या अशा भुरट्या राजकीय साठमार्या चालूच असतात. यांचा ‘आधीच अस्तित्वात असलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची कडक अंमलबजावणी’ याशी काय संबंध आहे?

आणि तुम्ही म्हणता तशा केसेससाठीच संविधानात दुरूस्त्या होतात, नवीन उपकलमं टाकली जातात. अशा ५० (?) तरी दुरूस्त्या आजवर झाल्यात, संविधानाचा मूळ ढाॅंचा/ साचा / पाया न बदलता. त्यासाठीही राजकीय इच्छाशक्ती लागतेच.

तुम्हाला बोअर होईल पण तरी सांगतो- आपलं संविधान जगातल्या काही उत्कृष्ठ संविधानांपैकी एक आहे. योग्य कारणांसाठी कायदे नि कलमं बदलण्याच्या तरतुदी त्यात आहेत. साक्षात पंतप्रधानाला कोर्टात उभं करण्याची त्यात ताकद आहे. इंदिरेसारख्सा व्यक्तीला पीएम पदावर असताना कोर्टात उभं राहावं लागलं होतं. अलाहाबाद (की लखनौ?) कोर्टात ४ तास जजच्या प्रश्नांची उत्तरं देत इंदिरा गांधी उभ्या होत्या..

" एकूणच या ला प्रभावीपणे आळा कायदेशीर मार्गानेच बसू शकतो."

तो पर्यंत आपण काय करायचे .फक्त कायदा होण्याची वाट बघायची का?

की सामाजिक माध्यमावर फक्त लिहीत राहायचे ?
कोर्ट समजमध्यामावरील विरोधाला गंभीर पने घेते का?
की.
निषेध मोर्चा, बंद, mainstream media .ह्यांना गंभीर पने घेते.
अनेक प्रश्न उभे राहतात .पण मिळतील चर्चे नी उत्तर

लवकर सर्वानी सर्व चर्चा मसुदा PIL स्वरुपात सादर करुन सर्व मायबोली सभसदांच्या सह्या घ्या बरं पटापट. काय बिशाद कोणाची पुढील वर्षी एक तरी डी जे वाजवायची !!

कोर्ट समजमध्यामावरील विरोधाला गंभीर पने घेते का?>> माझ्या मते आपली न्यायव्यवस्था सेल्फ कॉग्निझन्स घेताना माध्यम बायस्ड नाही आहे

की सामाजिक माध्यमावर फक्त लिहीत राहायचे ?>>> समाजमाध्यमे फार प्रभावी माध्यम आहे....tunisian revolution संदर्भात माहिती मिळवू शकता

तो पर्यंत आपण काय करायचे .फक्त कायदा होण्याची वाट बघायची का?>> , आपापल्या परीने प्रयत्न करावा...
ज्यांचा समाज माध्यमांवर चांगल रिच आहे त्यांनी त्या माध्यमातून यावर आवाज उठवावा.

ज्यांना असा विश्वास आहे की ते प्रत्यक्ष ग्राउंड वर उतरुन या प्रश्नाची दखल घ्यायला भाग पाडतील त्यांनी तो मार्ग स्वीकारावा

जे कायदेविषयक तज्ञ असतील त्यांनी त्या दिशेने हा प्रश्न उचलून धरावा

स्वतंत्र धागा काढून निषेध केला आहे.>>> सतत लाल करून सगळ्यांना उबग, वीट येईपर्यंत कौतुक करत असता
बदाम काय आणि काय काय
मग त्याच वेगाने आणि प्रमाणात निषेध आणि निवडुंग पण देत चला की
की एकदा मम म्हणून आचमन टाकलं की बोलायला मोकळे बघा मी इतक्या वर्षांपूर्वी एक धागा काढला होता

अजुन एक सहज सोपा मार्ग आहे जो सरकार तत्काळ अमलात आणू शकते.
Dj/ डॉल्बी साठी ज्या काही मशीन लागतात.
Speaker,mixer, amplifiers, ह्यांच्या वर खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स लावणे .
आणि ह्या सर्व वस्तू प्रचंड महाग होतील असे उपाय करणे.
२) ठराविक decibel पेक्षा जास्त आवाज करणाऱ्या speaker निर्मिती ,इम्पोर्ट, साठा,विक्री ह्याला पूर्ण देशात बंदी घालने.
४) ज्या वाहनात ही यंत्रणा बसवली जाते त्या वाहनांना तसे बदल करण्यासाठी प्रचंड मोठी फीस ठेवणे.
हे सरकार सहज करू शकते
आणि हे कृत्य कोणत्या धर्माच्या सणा विरुद्ध आहे अशी बोंब पण कोणाला मारता येणार नाही

Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 20:42>>> +1

आणखी एक करु शकतो जे कुणी मंडळ अथवा संस्था आवाज मर्यादेचे उल्लंघन करताना आढळेल किंवा पुराव्यानिशी तक्रार येईल त्यांना पुढील १० वर्षांसाठी डिजे-डॉल्बी कोणत्याही मिरवणूकीत अथवा कार्यक्रमांत वाजवण्यास बंदी करावी...
यासाठी एक गव्हर्नमेंट ऍप तयार करु शकतात ज्यावर लोकेशन बेस्ड आवाजाची डेसिबल पातळी टाईमस्टॅंप सकट अनॉनिमसली अपलोड/ रिपोर्ट करता येईल.

यांना कुणी तरी नीती आयोगात घ्या रे ! >>>> Happy Happy Happy
त्यांना कुणीतरी पंतप्रधान च केलं पाहिजे
हा हा म्हणता देशापुढचे सगळे प्रश्न सोडवून टाकतील

जगद्गुरू Happy

आणखी एक करु शकतो जे कुणी मंडळ अथवा संस्था आवाज मर्यादेचे उल्लंघन करताना आढळेल किंवा पुराव्यानिशी तक्रार येईल त्यांना पुढील १० वर्षांसाठी डिजे-डॉल्बी कोणत्याही मिरवणूकीत अथवा कार्यक्रमांत वाजवण्यास बंदी करावी.>>> काही उपयोग नाही
रात्री 10 नंतर बंदी आहे ना
त्याचे सरसकट उल्लंघन होते, पोलीस केस दाखल करतात, मिरवणुकीत तर डॉल्बीपण जप्त केले होते
कालांतराने मग राजकीय वजन आणून हे गुन्हे मागे घेतले जातात

आता उत्सव संपून किती दिवस झाले, कित्येक मांडव अजूनही रस्ता अडवून आहेत, पालिका त्यांच्यावर कारवाई करते, पण पुढं काय? नंतर ते सगळं मागे घेतला जातं

नुसता कायदा करून काहीच उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी व्हायला हवी

आपल्याकडे नियमभंग हे इंग्रजांच्या काळापासून जे सुरू आहे ते अद्याप आहेच
नाहीच आम्ही पाळणार नियम काय करता बोला

"त्यांना कुणीतरी पंतप्रधान च केलं पाहिजे"

" ह्यांना कोणी तरी निती आयोग वर घ्या"

समजा मला कोणी तरी पंतप्रधान बनवले किंवा निती आयोग चा अध्यक्ष बनवले तर मी त्या " कोणी तरी च ऐकेन ना"
ते माझे पाहिले कर्तव्य च असेल, ती माझी नैतिक जबाबदारी असेल.
आणि मजबुरी तर असेल च असेल.

नुसता कायदा करून काहीच उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी व्हायला हवी>>> त्याच साठी ॲपचा उपाय मनात आला...जर अनॉनिमसली लोक तक्रार दाखल करु शकले, तर पोलीसांना कारवाई करावी लागेल, न केल्यास माहीतीच्या अधीकारात या बाबी उघड होऊन पोलीसांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता कायम रहाते...

आणि डिजे जप्त करुन सुटतात म्हणून बंदी मंडळांवर टाकणे जास्त प्रभावी होउ शकते.

Pages