काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.
तुमचे मत काय आहे जरूर लिहा.
तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.
सिग्नल्स वर ट्रॅफिक पोलिस
सिग्नल्स वर ट्रॅफिक पोलिस किंवा कॅमेरा नसेल तर आयुष्यात कधीच वाहतूक नियम न मोडणारे पण नियम मोडतात.
चोरी हे खूप मोठे पाप असे समजणारे.
सूनसान रस्तावर दोन हजाराची नोट दिसली तर सरळ खिश्यात टाकतात.
मानवी स्वभाव असा आहे
वाईट गुण प्रतेक व्यक्ती मध्ये असतात.
ते नष्ट करायचे असतील तर स्वतः ग्राउंड लेव्हल येवून ते सुधारणा करण्याचे काम करावे लागते
म्हणजे सरकारने पोलीस काढून
म्हणजे सरकारने पोलीस काढून घेतले पाहिजेत.
ज्यांना वाटते कि रहदारीचे नियम पाळले पाहिजेत त्यांनी आधी रहदारीच्या कमिटीत जायचे. विरोध नको म्हणून रहदारीचे नियम तोडायचे. रहदारीचे नियम तोडण्याचे फायदे सांगायचे मग बदल सांगायचे, नाही तर नाही.
याच न्यायाने चोरी होऊ नये म्हणून....
बाकी आप समझदार होंगे!
ललित लेखन मधून विरंगुळा मध्ये
ललित लेखन मधून विरंगुळा मध्ये हलवा ओ जरा
गाजराचा की दूधीचा?
गाजराचा की दूधीचा?
कोकणचा हलवा
कोकणचा हलवा
उत्सव आहे ते उस्तव लिहिले तर
उत्सव आहे ते उस्तव लिहिले तर काय उपयोग. प्लीज कन्सिडर.
रेखा नाराज होईल.
रेखा नाराज होईल.
का कुणास ठाऊक पण हेमंत खऱ्या
का कुणास ठाऊक पण हेमंत खऱ्या आयुष्यात असे दिसत असतील असे उगीचच वाटते (उजवीकडचे)
समाजाला योग्य मार्गावर
समाजाला योग्य मार्गावर न्यायचे आहे ना ?
मग ग्राउंड वर सहभाग हवा>> असहमत आहे, लोकशाहीत यासाठीच आपण सरकार निवडतो, जे योग्य सार्वत्रिक हिताचे आणि सर्वांच्या नैसर्गिक न्याय्य हक्कांचे रक्षण करतील असे कायदे बनवणे आणि त्यांची नियमबरहूकूम अंमलबजावणी केली जाईल यासाठी दक्ष असणे यासाठी सरकार आणि सरकारी यंत्रणा असते. या देशाचे नागरीक म्हणून आपण सर्वांनी त्या नियमांचे पालन करणे इतकेच अपेक्षीत असते, जेव्हा केव्हा कोणत्याही समाज घटकाचे नैसर्गिक न्याय्य हक्क कोणत्याही दुसऱ्या समाजघटकाद्वारे अथवा यंत्रणेद्वारे नाकारले जातात तेव्हा त्याचा सेल्फ कॉग्निझन्स घेउन त्यांचे म्हणणे प्रतिनिधी म्हणून उचलून धरणे/ मांडणे हे लोकप्रतिनिधींचे/ माध्यमांचे आणि त्यावर त्वरित निर्णय घेऊन अन्याय रोखणे हे सरकारचे व त्यांनी दुर्लक्ष केल्यास न्याययंत्रणेचे काम असते.
आपण आपल्या मुलांना योग्य वळण लावू ही त्यामुळे काही प्रमाणात ही संख्या कमी होईलही, पण जे पालक स्वतः या सर्व गोष्टींचा पुरस्कार करतात त्यांची मुलेही त्याच विचारसरणीने जातात किंवा ज्यांची मुले पालकांचे न ऐकता कोणत्यातरी पारिस्थितीक कारणांमुळे या विचारसरणीच्या बळी पडतात, त्या समुहात मोडणाऱ्यां सर्वांवर नियंत्रण असायला नियम/कायदे हवेत आणि त्याची काटेकोर/कडक अंमलबजावणी सुद्धा हवीच.
समाजातील वाईट तत्वे समाजसुधारणा करुन पुर्णपणे नष्ट होतील हे मानणे बाळबोधपणाचे आहे, तसे असते तर आजवर जगात एकतरी देश पुर्णपणे सर्व प्रतिबंधात्मक नियमांपसून मुक्त झाला असता.
@हेमंत३३३
@हेमंत३३३
तुम आगे बढो. तुमची कळकळ स्पॄहणिय आहे. पारडं झुकलं की तुम्ही समतोल साधण्याचा प्रयत्न करता.
पारडं झुकलं की तुम्ही समतोल
पारडं झुकलं की तुम्ही समतोल साधण्याचा प्रयत्न करता.>>> +११११ महाभारतात बर्बरिक शक्तिशाली योद्धा होता. तो ज्या बाजूने युद्ध खेळेल ती बाजू जिंकणार होती पण तो पण आपल्या हेमंत सरांसारखं करायचा. जी बाजू कमकुवत होत जाईल त्या बाजूने युद्ध करायला जायचा. त्यामुळे श्रीकृष्णाने हुशारीने त्याला बाजूला केला. हेमंत सरांना पण इथले काही आयडी शब्दांचं मोहिनी अस्त्र सोडून आपल्या बाजूने करायला बघतात. त्यांना वाटतं हेमंत सरांच्या लक्षात येत नाही. पण हेमंत सर हुशारीने जी बाजू कमकुवत असेल त्याच बाजूने लढतात.
बोकलत
बोकलत
येरवडा जेल च्या पुढे एक
येरवडा जेल च्या पुढे एक भव्य आणि प्रशस्त वास्तू आहे. त्रिखंडात प्रसिद्ध आहे. तिथून दोन शुभ्र गणवेशधारी आमच्या इथे फिरत होते. एक जण फोटो दाखवत होता , एक जण पोस्टी. एकाने विचारलं "नागरिकांच्या जीवितास धोका ?"
ते म्हणाले "नाही. एका कोपर्यात बसून पोस्टी लिहीत असायचा. बाकी त्रास नाही"
मी मी त्या पोस्टी वाचल्या. ओळखलं पण अजिबात सांगितलं नाही.
जोपर्यंत हे वाय फाय कनेक्शन काढून घेत नाहीत तोपर्यंत का सांगू ?
यांनाही होऊ देत की त्रास, होऊ दे पळापळ.
त्यामुळे श्रीकृष्णाने
त्यामुळे श्रीकृष्णाने हुशारीने त्याला बाजूला केला.>>>धाग्यावरील एकूणच प्रतिसाद पहाता परिस्थिती श्रीकृष्णाचा धावा करावा अशीच आहे
"एक भव्य आणि प्रशस्त वास्तू
"एक भव्य आणि प्रशस्त वास्तू आहे. " - नीट बघा आचार्य. प्रशत्स वात्सू असेल.
भलतीच उस्तवारी सुरू आहे इथे
भलतीच उस्तवारी सुरू आहे इथे
तेव्हढा कोणीतरी दिवाळीत फटाके
तेव्हढा कोणीतरी दिवाळीत फटाके वाजवायचे का नाही यावर पण बोला. दिवाळी आलीच आहे.
या वर्षी मायबोलीकरांनी घरातून
या वर्षी मायबोलीकरांनी घरातून बाहेर पडा आणि सरांच्या घरात फटाके वाजवावेत.
हिंदू सण साजरा झालाच पाहीजे.
मी रॉकेट उडवणार.
लक्ष्मी बॉब, सुतळी, चौकोनी, चिम्मन चिडी, भुईचक्रम भुईनळा , सात बार, आठ बार , शंभर बार, पॅराशूट, आगगाडी वाटून घ्या.
फुलबाजी लहान गटासाठी ठेवूयात.
लवंगी फटाके महिला वर्गासाठी राखीव.
हेमंत सर खरेच ग्रेट आहेत.
हेमंत सर खरेच ग्रेट आहेत. कमकुवत बाजू कुठे हे लगेच ओळखतात.
तेव्हढा कोणीतरी दिवाळीत फटाके
तेव्हढा कोणीतरी दिवाळीत फटाके वाजवायचे का नाही यावर पण बोला. दिवाळी आलीच आहे.
>>> अर्थातच वाजवायचे. गरजेच्या वस्तू व सेवांत डॉल्बी, लेझर आणि मग फटाकेच येतात. तसेही, कारखान्यांमधून, गाड्यांनी इतके प्रदूषण होते. मग तुमच्या घरासमोर फटाके वाजवले आणि तुमच्या घरात धूर आला म्हणून तुम्ही तक्रार केली तर तुम्ही दुटप्पी आहात.
खा भरपूर लाडू बेसन
खा भरपूर लाडू बेसन
आणि घाला फटाक्यांच्या
खर्चाला वेसण
प्रशत्स वात्सू असेल. >>>
प्रशत्स वात्सू असेल. >>> फेफ.
प्रशत्स वात्सू >>
प्रशत्स वात्सू >>
लवंगी फटाके महिला वर्गासाठी
लवंगी फटाके महिला वर्गासाठी राखीव.
>>> नॉटी
म्हणजे हे सर्व फटाके अजून पण
म्हणजे हे सर्व फटाके अजून पण बाजारात उपलब्ध आहेत.
कोर्टाने आदेश देवून ,हंगामी जन आंदोलन करून काडी चा फरक पडला नाही.
ही फटाके वाजणारी लोक उगवतात कोठून .
समाज माध्यमावर तर मोठे ज्ञान देत असतात.
१५ aug २६ जानेवारी ल देशप्रेमाच उत् येतो.
पाकिस्तान भारत मॅच वेळेस तर देशिरेम उतू जाते.
इतके देशप्रेमी लोक असून पण.
भ्रष्ट कारभार,बँकांचे कर्ज बुडवणारे,देशाच्या कायद्याचे तीन तेरा वाजवणारे.
प्रतेक पावलावर देशाशी प्रतारणा करणारे भेटतात.
मग हे देशप्रेमी कुठे जातात
एव्हढे चहा पिणारे लोक असून
एव्हढे चहा पिणारे लोक असून दारूचे गुत्ते कसे काय चालतात ?
मग हे देशप्रेमी कुठे जातात
मग हे देशप्रेमी कुठे जातात
>> अमेरिकेत...
मार्केट मध्ये कोकेन आणि
मार्केट मध्ये कोकेन आणि हेरॉईन पण मिळते.
हेमंत सरांच्या व्हॉट
हेमंत सरांच्या व्हॉट अबाऊटरीची सामाजिक परिक्षेपातील सूक्ष्म तरंगलहरीच्या अनुषंगाने डेसिबल्सिक तौलनिक चिकित्सा : एक गंभीर चिंतन
असा धागा निघू शकतो.
म्हणजे हे सर्व फटाके अजून पण
म्हणजे हे सर्व फटाके अजून पण बाजारात उपलब्ध आहेत.
कोर्टाने आदेश देवून ,हंगामी जन आंदोलन करून काडी चा फरक पडला नाही.
ही फटाके वाजणारी लोक उगवतात कोठून .
समाज माध्यमावर तर मोठे ज्ञान देत असतात. >>> थोडक्यात समाज माध्यमावरा जे ज्ञान देतात तेच लोक कोर्टाचा आदेश पायदळी तुडवून फटाके वाजवतात. या सिद्धांतामुळे आता कोर्टाचे आदेश कोण पायदळी तुडवतात हे शोधणे सोपे झाले आहे. याच तर्कानुसार दारूचा अवैध व्यवसाय करणारे शोधणेही अवघड नाही. पोलिसांनी मायबोलीपासून सुरूवात करावी. प्रशासनाने या आयडींचे आयपी अॅड्रेसेस पोलिसांना उपलब्ध करून द्यावेत. मग बघा. एका दिवसात फटाके बंद होतील, दारू बंद होईल. ड्रग्ज, स्मगलिंग, चोरी, भ्रष्टाचार सगळे बंद होईल.
दुनियाभरचे कायदे मोडतात आणि मायबोलीवर येऊन शहाणपण शिकवतात, शिवाय एका माणसाची टिंगलही करतात म्हणजे काय ?
Pages