प्रेम...! काय असत प्रेम?
उरात भरणारा प्रत्येक श्वास म्हणजे प्रेम
जिवलगाचा लागलेला निरंतर ध्यास म्हणजे प्रेम
काळजात दरवळणारा अल्लड गंध म्हणजे प्रेम
स्नेहाच्या धाग्यांचा मखमली बंध म्हणजे प्रेम
चिंब भिजवणाऱ्या जिव्हाळ्याच्या धारा म्हणजे प्रेम
मनातल्या आठवणींचा असलेला किनारा म्हणजे प्रेम
त्याने पाहावं,आणि तिने लाजावं म्हणजे प्रेम
तिने बघावं आणि त्याने घायाळ व्हावं म्हणजे प्रेम
त्याने श्वास घ्यावा आणि हृदयात ती उतरावी म्हणजे प्रेम
तिने डोळे मिटावे आणि फक्त तो दिसावा म्हणजे प्रेम
दोन क्षणांचा दूरावा युगायूगांसम वाटणं म्हणजे प्रेम
आठवणींच धुकं काळीजभर दाटणं म्हणजे प्रेम
त्याने तिला जीवापलिकडे जपणं म्हणजे प्रेम
मनातल्या आठवणीनं काळीज व्यापणं म्हणजे प्रेम
असं हे प्रेम जगायचं असतं,जगवायचं असतं
हृदयाच्या एका कोपऱ्यात त्याला जिवंत ठेवायचं असतं
कारणं रखरखत्या वाळवंटातलं ते शेवटचं पान असतं
प्रेम
Submitted by शब्दब्रम्ह on 12 May, 2023 - 04:46
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान !
छान !
छान.
छान.