साहित्य -
एक लहान दुधी, फोडणीचे साहित्य, तेल, ३-४ हिरव्या मिरच्या, दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे, मुठभर कोथिंबीर, दोन चमचे तीळ, दोन चमचे खोबऱ्याचा कीस, कढीपत्ता,चवीपुरते मीठ गुळ .
१. दुधीचे साल काढून दुधी चोपर (Chopper) मध्ये बारीक करून घ्यावा.
२. भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे.
३. कढईमध्ये जरा जास्तच तेल घेऊन, तेल तापल्यावर मोहरी, हिंग ,हळद घालून जाडसर वाटलेला ठेचा , तीळ,कढीपत्ता घालावा.
४. वाटण नीट परतले गेले की दुधी घालावा.
५. मीठ घालून झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ द्यावी.
६. चवीनुसार गूळ घालून नीट हलवून घ्यावे.
७. गॅस बंद करून, वरून खोबऱ्याचा किस पेरावा.
८. गरमागरम भाजी तयार!!
१. मिरच्या, भाजलेले दाणे आणि कोथिंबीर किंचित तेल घालून जरा परतून घेवून मिक्सरमध्ये ठेचा केल्यास वाटण करताना पाणी घालायची गरज पडणार नाही.
फार चविष्ट वाटते आहे ही
फार चविष्ट वाटते आहे ही पाककृती. त्या ठेच्यामुळे खासच चव येणार.
मस्त! मी पहिल्यांदाच बघितली
मस्त! मी पहिल्यांदाच बघितली अशी भाजी दूधीची.
साहित्य, कृती आणि फोटोवरून मस्तच लागत असेल हे लक्षात येते.
छान आहे ही रेसिपी.
छान आहे ही रेसिपी.
गूळ खोबरे न घालता करणार
फोटो बघून कराविशी वाटतेय ..
फोटो बघून कराविशी वाटतेय ..
भाजी मस्त वाटते. करून बघेन.
भाजी मस्त वाटते. करून बघेन. दूधीला पाणी सूटून गचका होत नाही का?
अरे वा! दुधीचे सर्वच प्रकार
अरे वा! दुधीचे सर्वच प्रकार आवडतात. नक्की करून बघणार.
अरे वा! मस्त रेसिपी!
अरे वा! मस्त रेसिपी!
मिरचीने मस्त चव येईल. भारीच!
मिरचीने मस्त चव येईल. भारीच!
अरे वा! मस्त दिसते आहे.
अरे वा! मस्त दिसते आहे.
नक्की करणार.
मस्त दिसतेय. आवडली.
मस्त दिसतेय. आवडली.
मस्त आहे.
मस्त आहे.
छान रेसीपी. बक्षिस पात्र.
छान रेसीपी. बक्षिस पात्र.
फोटो बघून कराविशी वाटतेय .. >
फोटो बघून कराविशी वाटतेय .. >> +1
धन्यवाद सर्वांना..
धन्यवाद सर्वांना..
@sonalisl नाही ,गचका नाही होत
@sonalisl नाही ,गचका नाही होत..
मस्त दिसतेय रेसिपी. करुन
मस्त दिसतेय रेसिपी. करुन बघणार.
भन्नाट आहे. फोटोही मस्त.
भन्नाट आहे. फोटोही मस्त.
मस्त आहे
मस्त आहे
ही भाजी दोनदा करून झाली फारच
ही भाजी दोनदा करून झाली फारच आवडलेली आहे रेसिपी! दुसर्या वेळी करताना यात आले पण घातले. फार मस्त फ्लेवर आला.
वेगळीच पद्धत दिसतेय. नक्की
वेगळीच पद्धत दिसतेय. नक्की करुन बघणार.
काल ह्या पद्धतीने दुधीची भाजी
काल ह्या पद्धतीने दुधीची भाजी केली. मस्त चव आणि सोपीही आहे एकदम. फार मसाले वगैरे नाहीत. पुन्हा नक्की करणार.
बायदवे, ओजस, तुम्ही फोडणीत तीळ घालायचे हे लिहायला विसरला आहात, फोटोत दिसतं आहे. पण बघा अॅड करता येतंय का.
अरे वा! कालच दुधी आणलाय. करून
अरे वा! कालच दुधी आणलाय. करून बघते.
छान झाली ही भाजी. आज केली.
छान झाली ही भाजी. आज केली.
वाटणात थोडं पाणी घालावं लागलं कारण नुसते कोरडे दाणे, कोथिंबीर, मिरच्या मिक्सरमधे वाटल्या जाईनात. पाणी सुटलं भाजीला. तुमची जेवढी कोरडी दिसतेय तेवढी नाही झाली माझी. पण वेगळी चव आलीये. आवडली.
करुन बघेन या पद्धतीने
करुन बघेन या पद्धतीने
आज या पद्धतीने दुधीची भाजी
आज या पद्धतीने दुधीची भाजी करुन बघितली. मस्त झालेली. दुधीला नाक मुरडण्याऱ्या मंडळीनी पण खाऊन छान झालीये भाजी , याच पद्धतीने कर अशी दाद दिली .
१० मिनिटात भाजी होते. वेगळी चव मस्त लागते .
मी आज करुन बघेन मात्र तीळ व
मी आज करुन बघेन मात्र तीळ व खोबर्याशिवाय
@ सायो , योग्य ते बदल केले
@ सायो , योग्य ते बदल केले आहे.
आज मुहूर्त लागला या भाजीला!
आज मुहूर्त लागला या भाजीला!
मी दुधी किसून घेतला, आणि गिचका व्हायच्या भीतीने कीस पिळून फोडणीवर घातला. मग तेच पाणी लागेल तसं थोडं थोडं घालत वाफवला. किंचित लिंबू पिळलं. गूळ नाही घातला.
नुसता वाटीत घेऊन खावा इतकी सुंदर चव आली आहे!
याचीच बटाट्याच्या किसासारखी तूप-जिऱ्याच्या फोडणीतली आवृतीही मस्त लागेल!
अभिनंदन ओजस !
अभिनंदन ओजस !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अभिनंदन....
अभिनंदन....
Pages